वाक्प्रचार व त्यांचा अर्थ
१) आस लागणे - ध्यास लागणे.
२) आस्वाद घेणे - गोडी चाखणे.
३) इशारा करणे - खूण करणे.
४) धीर सुटणे - आत्मविश्वास गमवणे.
५) मनात चलबिचल होणे - मन अस्वस्थ होणे.
६) सावरून धरणे - आधार देणे.
७) धक्का बसणे - मनात हादरणे.
८) दगा देणे - धोका देणे.
९) नवल वाटणे - आश्चर्य वाटणे.
१०) ग्रह चांगला होणे - अनुकूल मनःस्थिती निर्माण होणे.
११) पत्ता नसणे - गायब असणे.
१२) जविाचे कान करून ऐकणे - खूप लक्षपूर्वक ऐकणे.
१३) बेचैन होणे - अस्वस्थ होणे.
१४) सांत्वन करणे - दिलासा देणे.
१५) खिन्न होणे - निराश होणे.
१६) अगतिक होणे - हतबल होणे.
१७) उद्युक्त करणे - तयार करणे, प्रेरणा देणे.
१८) पाठबळ असणे - पाठिंबा असणे.
१९) अचंबा वाटणे - नवल वाटणे.
२०) आ वासून उभे राहणे अवाक होणे, आश्यर्यचकित होणे.
२१) धीर ना होणे - हिंमत नसणे.
२२) दवंडी पिटणे जाहीर करणे.
२३) आटापीटा करणे - खूप प्रयत्न करणे.
२४) डंका बजावणे - प्रसार करणे.
२५) टेकीला येणे - हैराण होणे.
२६) झुंबड लागणे - गर्दी होणे.
२७) ध्यानी ठेवणे - लक्षात ठेवणे.
२८) जर्जर करणे - हैराण करणे.
२९) शिकस्त करणे - प्रयत्न करणे.
३०) वसवणे - निर्माण करणे.
३१) गौरव करणे - सन्मान करणे.
३२) न्हास होणे - नाश होणे, अंत होणे.
३३) तरतूद असणे - उपलब्धी असणे.
३४) ख्याती मिळवणे - प्रसिद्धी मिळवणे.
३५) प्रशंसा करणे - स्तुती करणे
३६) अकलेचा खंदक / अकलेचा कांदा - मुर्ख मनुष्य
३७) अर्धचंद्र - हकालपट्टी करणे
३८) अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे
३९) अंगाचा तीळ पापड होणे - खूप राग येणे
४०) अळमटळम करणे - टाळाटाळ करणे
४१) अठरा विश्वे दारिद्र्य असणे - अतिशय गरीब असणे
४२) अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस
४३) अत्तराचे दिवे लावणे - पैशाची उधळपट्टी करणे
४४) अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने हुरळून जाणे
४५) अन्नाला मोताद होणे - उपाशी राहणे
४६) अवदसा आठवणे - वाईट बुद्धी सुचणे
४७) आक्काबाईचा फेरा येणे - अत्यंत गरीबी येणे
४८) अंग धरणे - बाळशेदार होणे, लठ्ठ होणे
४९) आभाळ ठेंगणे होणे - खूप आनंद होणे
५०) आकाशाला गवसणी घालणे - शक्तीबाहेरची गोष्ट करू पाहणे
५१) आगीत तेल ओतणे - एखादे अपकृत्य घडत असताना त्यात भर टाकणे
५२) आकाश पाताळ एक करणे - खूप प्रयत्न करणे, खूप आरडाओरडा करणे
५३) आगीतून निघून फुफाट्यात पडणे - एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे
५४) आभाळ कोसळणे/फाटणे - खूप मोठे संकट येणे
५५) इतिश्री होणे - शेवट होणे
५६) इरेला पेटणे - चूरस वाढणे
५७) उपसर्ग होणे - त्रास होणे
५८) उखळ पांढरे होणे - खूप पैसा मिळणे
५९) उचल बांगडी करणे - हाकलून देणे
६०) उन्हाच्या झळा सोसणे - दुःख सहन होणे
६१) उपरती होणे - पश्चात्ताप होणे
६२) उदक सोडणे - त्याग करणे
६३) उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची वेळ येणे
६४) उदरी शनी येणे - भरभराट होणे
६५) उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे - कधीही कोणाला मदत न करणे
६६) ऊर फोडून येणे - फार श्रम करणे
६७) ऊर भरून येणे - अंतःकरणात भावना दाटून येणे
६८) उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः काही न करता दुसऱ्याला केवळ उपदेश करणे
६९) कच खाणे - माघार घेणे
७०) कपाळमोक्ष होणे - मरण पावणे
७१) कंठस्नान घालणे - ठार मारणे
७२) कणिक तिंबणे - भरपूर मार देणे
७३) कढी पातळ होणे - आजारामुळे अंगात त्राण न उरणे
७४) कपाळ पांढरे होणे - वैधव्य प्राप्त होणे
७५) कपाळ फुटणे - वैधव्य प्राप्त होणे/दुर्देव ओढवणे
७६) कान फुंकणे - एखादयाच्या विरुद्ध दुसऱ्याच्या मनात भरविणे
७७) कानावर हात ठेवणे - आयत्यावेळी जबाबदारी टाळणे
७८) काकदृष्टीने पाहणे - बारकाईने न्याहाळणे
७९) कानाने हलका असणे - कशावरही पटकन विश्वास ठेवणे
८०) कानाला खडा लावणे - एखादी चूक पुन्हा न करण्याचे ठरविणे
८१) काथ्याकूट करणे - निरर्थक वादविवाद करणे
८२) काट्याचा नायटा होणे - शुल्लक कारणावरून मोठे संकट ओढवणे
८३) काट्याने काटा काढणे - दुष्टाचा दुष्टाकडूनच नाश करणे
८४) काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे
८५) कानोसा घेणे - अंदाज घेणे
८६) काखा वर करणे - जवळ काही नाही असे दाखविणे, ऐनवेळी बाजूला होणे
८७) कोंड्याचा मांडा करणे - काटकसरीने व समाधानाने राहणे
८८) कागदी घोडे नाचविणे - फक्त लेखनात शूरपणा दाखविणे
८९) काडीमोड करणे/घेणे - घटस्फोट घेणे, संबंध तोडणे
९०) कुभांड रचणे - दुसऱ्यावर खोटे आरोप करणे
९१) कुंपणाने शेत खाणे - विश्वासू माणसानेच घात करणे
९२) कच्छपी लागणे - एखाद्याच्या नादी लागणे
९३) कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे
९४) केसाने गळा कापणे - विश्वासघात करणे
९५) खलबत करणे - गुप्त विचार विनिमय करणे, चर्चा करणे
९६) खसखस पिकणे - मोठ्याने हसणे
९७) खडा टाकणे - अंदाज घेणे
९८) खडे फोडणे - दोष देणे
९९) खापर फोडणे - दुसऱ्यावर दोष ठेवणे
१००) खडे चारणे - पराभूत करणे
१०१) खोगीर भरती करणे - निरूपयोगी व्यक्तीची भरती करणे
१०२) खाजवून खरूज काढणे - मिटलेले भांडण मुद्दाम उकरून काढणे
१०३) खाल्ल्या घरचे वासे मोजणे - केलेले उपकार विसरणे
१०४) खाल्ल्या अन्नास जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे
१०५) गंगेत घोडे न्हाणे - एखादे काम कसेबसे पार पडणे
१०६) गर्भगळीत होणे - खूप घाबरणे
१०७) गंडांतर येणे - संकट येणे
१०८) ग्रहण सुटणे - संकटातून सुटका होणे
१०९) गळ्याला तात लागणे - मोठ्या संकटात सापडणे
११०) गळ्यातील ताईत होणे - अतिशय प्रिय होणे
१११) 'ग' ची बाधा होणे - गर्व होणे, घमेंड होणे
११२) गाशा गुंडाळणे - एकदम पसार होणे, निघून जाणे, पोबारा करणे
११३) गळ्यात घोरपड बांधणे - फक्त जबाबदारी लादणे
११४) घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे, काम अडणे
११५) घोडे मारणे - नुकसान करणे
११६) घर डोक्यावर घेणे - खूप आरडाओरडा करणे
११७) घरावर तुळशीपत्र ठेवणे - घरादाराची आशा सोडणे
११८) घागरगडचा सुभेदार - पाणक्या (पाणी भरण्याचे काम करणारा)
११९) धूळ चारणे - पराभव करणे
१२०) चतुर्भुज होणे/चार हात होणे - लग्न होणे, मारामारी होणे, कैद होणे
१२१) चन्हाट वळणे - कंटाळवाणे बडबड करणे
१२२) चाह करणे - स्तुती करणे, वाहवा करणे
0 टिप्पण्या