महाराष्ट्राचे स्थान व विस्तार
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांत रचना झाली त्यानंतर १ मी १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सध्य स्थितीला महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या नुसार सर्वात मोठा जिल्हा आहे तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा परिषद आहे परंतु मुंबई आणि मुंबई उपनगर हि दोन शहरे १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही त्यामुळे ३४ जिल्हा परिषद आहेत. तर महाराष्ट्रात ३५८ तालुके आहेत(मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषद नाहीत).
स्थान :
अक्षांक : १५° 37’ ते २२° ६’ उत्तर .
रेखांश : ७२° ३६’ ते ८0° ५४’ पूर्व .
विस्तार :
पूर्व-पश्चिम लांबी : सुमारे ८०० कि.मी.
उत्तर दक्षिण लांबी : सुमारे ७०० कि.मी.
क्षेत्रफळ :
एकूण भौगोलिक क्षेत्रफळ : ३,०७,७१३ चौ. किमी
भारतातील राज्यांच्या क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राच्या राजकीय सीमा :
- ईशान्य-पूर्व : छत्तीसगड
- आग्नेय: तेलंगणा
- दक्षिण: कर्नाटक
- नैऋत्य: गोवा
- उत्तर: मध्यप्रदेश
- पश्चिम:अरबी समुद्र
- वायव्य- दादरा, नगर हवेली व गुजरात
महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा हि मध्य प्रदेशाला लागते तर गोवा राज्याला सर्वात कमी लागते.
महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा :
- उत्तरेस - सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या
- ईशान्येस - दरकेसा टेकड्या
- पूर्व - चिरोली टेकड्या, सुरजगड, भामरागड टेकड्या
- आग्नेय -इंद्रावती नदी
- दक्षिणेस - चिकोडी डोंगर, हिरण्यकेशी नदी
- नैऋत्येस - तेरेखोल नदी
- पश्चिमेस - अरबी समुद्र
- वायव्य - नर्मदा नदी , तोरणमाळ
समुद्र किनारा -
महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे त्यामुळे एकूण ७२० किमी लांबीचा असा समुद्र किनारा लाभला आहे.
0 टिप्पण्या