कोकणातील नद्या

 कोकणातील नद्या 

            कोकण किनारपट्टीच्या ३० ते ६० किमी रुंदीच्या भागातून या नद्या वाहतात. या सर्व नद्यांचं मिळून कोकण नदी खोरे तयार होत. कोकण नदी खोऱ्याचा एकूण जलवाहन क्षेत्र ३०,७२८ चौ.किमी आहे. कोकणातील सर्व नद्या खूपच कमी लांबीच्या आहेत. कोकणातील सर्व नद्याचा उत्तर हा तीव्र स्वरूपाचा आहे त्यामुळे  ह्या नद्या अतिशय वेगाने वाहतात ह्या सर्व नद्यांची पात्र हि अरुंद व खडकाळ आहेत तसेच ह्या सर्व अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्यामुळे नदीच्या मुखाजवळ खाड्या तयार झाल्या आहेत.

        महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. उत्तरेस पालघर ते दक्षिणेस सिंधुदुर्ग असा कोकण पसरला आहे. 


कोकणातील प्रमुख नद्या:

१.वैतरणा 

वैतरणा नदीचा उगम नाशिक येथील त्र्यंबकेश्वर अंजनेरी डोंगररांगेत होतो. हि नदी पुढे वाहत जात पालघर येथे अरबी समुद्राला दातिवरे खाडीतून मिळते.तिची एकूण लांबी १५४ किमी आहे. कोकणातील हि सर्वाधिक लांब नदी आहे. वैतरणा नदीवर मोडकसागर हे धरण आहे.

उपनद्या: 

उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या : पिंजाळ,देहरजा,सूर्या

डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या:तानसा

धरणे: मोडकसागर धरण , नाना शंकरशेट ( मध्य वैतरणा धरण), तानसा 

संगमस्थळ :

   नद्या                           ठिकाण 

१.वैतरणा - तानसा          चिमणे (वसई)

२.वैतरणा -  पिंजाळ        वाडा

३.वैतरणा - देहरजा         पालघर

४.वैतरणा - सूर्या            पालघर 


२. उल्हास नदी 

        उल्हास नदीचा उगम लोणावळ्याजवळ राजमाची टेकडीत होतो. तिची एकूण लांबी १४५ किमी आहे. उल्हास नदी पुणे, रायगड आणि ठाणे अशी वाहत येत अरबी समुद्राला मिळते. उल्हास नदीच्या भातसा, काळू, मुरबाडी आणि भिवपुरी ह्या उपनद्या आहेत.


३. सावित्री नदी :

        सावित्री नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो सावित्री नदी रत्नागिरी, रायगड अशी वाहत येत बाणकोट खाडीतून अरबी समुद्राला मिळते. तिची एकूण लांबी 38 किमी आहे. 


कोकणातील खाड्या 



कोकणातील नद्यांवरील धरणे:

   नदी           धरण
वैतरणा            मोडकसागर
भातसई            भातसा
तानसा             तानसा
सूर्या                सूर्या  
वैतरणा            अप्पर वैतरणा
पाताळगंगा       मोरंबा धरण 
कुंडलिका          डोलावहळ 
मुरबाडी            बारवी धरण 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या