तापी नदी
मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेत मुलताई येथे तापी नदीचा उगम पावते. तापी नदीचा एकूण प्रवाह ७२४ किमीचा आहे तर महाराष्ट्रातील प्रवाह हा २०८ किमीचा आहे. तापी नदीचे प्रवाह एकूण क्षेत्रफळ ६५,१५० चौ किमी आहे तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ ३१,६६० चौ. किमी आहे. तापी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे.
दक्षिणेस सातमाळा-अजिंठा डोंगररांगा आणि उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान सखल भागातून तापी नदी वाहते. तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्राला मिळते. महाराष्ट्रातील तिचा प्रवाह हा अमरावती, जळगाव, धुळे नंतर नंदुरबार या जिल्ह्यातून होतो. पूर्णा नदी हि तापी नदीची मुख्य उपनदी आहे हि विदर्भाच्या पश्चिम भागातून वाहत येऊन तापीला मिळते. त्यामुळे तापीनदीचे खोरे महाराष्ट्रात तापी- पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते. तापी- पूर्णा खोरे हे अमरावती, अकोला, बुलढाणा,धुळे, नंदुरबार असे आहे.
तापी नदीचे क्षेत्र हे बहुतांश खचदरीच्या भागात आहे यामुळे नदी हि खोल घळईतून वाहते. तापी नदीस खानदेश कन्या म्हणतात.
उपनद्या :
उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या: नागझिरी,मोर,गुळी,अनेर,अरुणावती,गोमती,वाकी
दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या: कापरा,शिवना,गाडगी,पूर्णा,वाघूर,गिरणा,बोरी,अंजनी,पांझरा,बोराई,अमरावती,शिवा,नेसू
0 टिप्पण्या