सह्याद्री पर्वताच्या उपरांगा

 सह्याद्री पर्वताच्या उपरांगा

सातमाळा- अजिंठा डोंगररांगा

ह्या डोंगररांगांनी साधारणतः उंची हि २०० ते ३०० मीटर आहे.

सह्याद्री पर्वताची हि प्रमुख डोंगर उपरांग आहे जी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. 

सातमाळा- अजिंठा डोंगर रंगांचा विस्तार नाशिक जिल्ह्यातील तौला शिखरापासून पूर्वेकडे यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पसरलेला आहे.

नाशिक जिल्ह्यात ह्या डोंगर रांगेला सातमाळा डोंगररांग म्हणतात तर औरंगाबाद जिल्ह्यात या रांगेला अजिंठा डोंगररांग म्हणतात.

या डोंगर रंगांची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना कमी कमी होत जाते. 

डोंगर रंगांच्या पूर्वेस उतार हा मंद स्वरूपाचा आहे तर पश्चिम बाजूस उतार हा  तीव्र आहे.

अजिंठा डोंगर रांगेच्या दोन शाखा आहेत.

  1. निर्मल डोंगर - नांदेड 
  2. अजिंठा डोंगर - यवतमाळ 

सातमाळा डोंगर रांगेच्या उत्तर दिशेला मालेगाव पठार आहे.

अजिंठा डोंगर रांगेच्या पूर्व दिशेला बुलढाणा पठार आहे.

सातमाळा- अजिंठा डोंगररांगांनी तापी व गोदावरी नद्यांच्या खोर्‍यांना वेगळे केलेले आहे.


सातमाळा- अजिंठा डोंगररांगांच्या  उपशाखा 

  • गाळणा टेकड्या : नाशिक , नंदुरबार, धुळे 
  • निर्मल डोंगर : परभणी , हिंगोली,नांदेड 
  • हिंगोली डोंगर : हिंगोली 
  • मुदखेड डोंगर :नांदेड
  • पुसदच्या टेकडया : यवतमाळ 



हरिश्चंद्र- बालाघाट डोंगररांगा 


हरिश्चंद्र - बालाघाट डोंगररां हि गोदावरी नदीच्या दक्षिणेस आहे.

सातमाळा- अजिंठा डोंगररांगांच्या दक्षिणेकडून त्यास समांतर पूर्वेकडे हरिश्चंद्र - बालाघाट डोंगररांगेचा विस्तार आहे.


हरिश्चंद्र- बालाघाट डोंगररांगांचा पुणे ,अहमद नगर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर असा विस्तार आहे.


अहमदनगर जिल्ह्यात या रांगेला हरिश्चंद्र डोंगररांग तर बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगररांग म्हणतात.
या डोंगररांगांनी गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी अलग केली आहेत.


ह्या डोंगररांगांनी साधारणतः उंची हि ६०० ते ७५० मीटर आहे. ह्या डोंगररांगा ३२० ते ३५० लांब अशा पसरलेल्या आहेत.


हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांच्या  उपशाखा 

  • तसुमाई डोंगर - पुणे
  • बाळेश्वर  डोंगर - 
  • बालाघाट पठार - बीड
  • मांजरा पठार - मांजरा नदी खोरे 

 

शंभू महादेव डोंगररांग 


शंभू महादेव डोंगर रांग हि हरिश्चंद्र - बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेस आहे
या डोंगर रांगांचा विस्तार रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेला आहे. सातारा सांगली जिल्ह्यातून कर्नाटक मध्ये या डोंगर रांगांचा प्रवेश होतो.


भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर रांग आहे.
शंभू महादेव डोंगररांगांमुळे भीमा व कृष्णा नदीचे खोरे वेगळे झाले आहे. 


डोंगर रांगेतील किल्ले
या डोंगर रांगेतील सर्व किल्ले सातारा जिल्ह्यात येतात.
अजिंक्यतारा ,सज्जनगड,वर्धनगड, वसंतगड, सदाशिवगड, मश्चिंद्रगड.


शंभू महादेव डोंगररांगाच्या उपशाखा 

  • बामणोली डोंगर - सातारा 
  • आगाशिव डोंगर- सातारा ( कराड)
  • सीताबाई डोंगर - सातारा 
  • पश्चिमेला महाबळेश्वर व पाचगणी पठार 
  • मध्य भंगार औंध पठार
  • दक्षिणेस खानापूर पठार 
  • उत्तरेस सासवड पठार, पुणे  ( या पठाराची साधारणतः उंची ८०० मीटर आहे)
  • सांगलीतील जातीचे पठार (या पठाराची साधारणतः उंची ७०० मीटर आहे)





















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या