राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

    


MPSC-Rajyaseva-Main-2018-GS-2

MPSC-Mains-2018-GS-II-Final-key



 1. खालील विधाने लक्षात घ्या :

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करता येते.

(b) उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या न्यायाधिशाला निवृत्तीनंतर वकिली करणे किंवा कोणत्याही कोर्टात किंवा अधिसत्तेसोबत भारतात कार्य करण्यास परवानगी नाही.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत ?

फक्त (a)
फक्त (b)
दोन्ही योग्य आहेत
दोन्ही अयोग्य आहेत
उत्तर= (1)

 

2. "माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतु येतो तसे हक्क मागोमाग येतील', असे कोणी म्हटले होते ?

इंदिरा गांधी
जवाहरलाल नेहरू 
महात्मा गांधी
मोरारजी देसाई

उत्तर= (3)

 

3. खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही? 

पांथगृहे व पांथगृहपाल
पैज व जुगार 
औषधे आणि विष
पथकर

उत्तर= (3)

 

4. संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणूकी संबंधीच्या वादाबाबतचे खटले चालविण्याबाबतचे उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो? 

पर्यवेक्षणाचे अधिकार क्षेत्र
प्रारंभिक अधिकार क्षेत्र
सल्लादायी अधिकार क्षेत्र
अपिलीय अधिकार क्षेत्र

उत्तर= (2)

 

5. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम - 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला? 

42 वी घटनादुरुस्ती
44 वी घटनादुरुस्ती 
86 वी घटनादुरुस्ती
97 वी घटनादुरुस्ती 

उत्तर= (3)

 

6.कोणत्या राज्यात विधीमंडळाची द्विगृही सभागृहे आहेत ?

(a) बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश

(b) राजस्थान, गुजरात, गोवा

(c) हरियाणा, केरळ, जम्मू व काश्मीर

(d) मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल

पर्यायी उत्तरे :

(b) आणि (c) बरोबर
(a) बरोबर
(c) बरोबर
यापैकी नाही

उत्तर= (2)

 

7.खालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटनादुरुस्ती करून करण्यात आला आहे?

8 वे
9 वे
10 वे
यापैकी नाही

उत्तर= (2)

 

8.खालील विधाने लक्षात घ्या :

(a) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत IVA या विभागाचा समावेश करण्यात आला.

(b) ह्या विभागात कलम 51 A या एकमेव कलमाचा समावेश आहे.

(c) ह्या घटनादुरुस्तीद्वारे नागरिकांच्या दहा मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

(d) 89 व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 51 A मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत ?

(a), (b) आणि (c)
(a) आणि (c)
(a), (c) आणि (d)
सर्व

उत्तर= (1)

 

9.भारतीय संसदेमध्ये खात्यांशी संबंधित _______ स्थायी समित्या आहेत. प्रत्येक समितीत ________  सदस्य लोकसभेमधून आणि _______ सदस्य राज्यसभेमधून आलेले असतात.

3, 15, 10
24, 21, 10
3, 20, 10
20, 10, 10

उत्तर= (2)

 

10. (a) भारतीय संसदेत 1968 मध्ये सर्वप्रथम लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते.

       (b) भारतात लोकपाल ही संस्था अद्यापही अस्तित्वात येवू शकलेली नाही. (जून 2018 पर्यंत)

वरीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे?

फक्त (a)
फक्त (b)
दोन्हीही
दोन्हीपैकी एकही नाही 

उत्तर= (2)

 

11.भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ? 

(a) लोकसभा
(b) राज्यसभा
(c) पंतप्रधान
(d) राष्ट्रपती
(e) कायदा मंत्री

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b)
  
(a), (b) आणि (d)
(a), (b), (d) आणि (e)
उत्तर= (1)

 

12.भारताच्या निवडणूक आयोगासंदर्भात दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

हा आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त व तीन निवडणूक आयुक्त मिळून बनलेला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
त्यांचा कालावधी सहा वर्षांचा असतो किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो यातील जो अगोदर पूर्ण होईल तो.
यापैकी नाही.

उत्तर= (1)

 

13. खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकतो.

(b) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतो.

पर्यायी उत्तरे :

विधान (a) बरोबर (b) चुकीचे आहे.
विधान (b) बरोबर (a) चुकीचे आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चुकीची आहेत.

उत्तर= (4)

 

14.खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे?

भाषिक अल्पसंख्यांकासाठी विशेष अधिकारी
राज्याचा महाधिवक्ता
राज्य लोकसेवा आयोग
4. राज्य मानवी हक्क आयोग
उत्तर= (4)

 

15. जोड्या जुळवा.


उत्तर= (4)

 

16.खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

के.एस. हेगडे
हुकुम सिंह
कृष्णकांत
गुरदयालसिंग धिल्लन 


उत्तर= (3)

 

17. खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मिती बद्दल योग्य आहे?

(a) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.

(b) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.

(c) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.

(d) राज्यांच्या संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.

पर्यायी उत्तरे 

(a), (b), (d)
(a), (b), (c)
(a), (c), (d)
4. (b), (c), (d)

उत्तर= (2)

 

18. राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते :

(a) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.

(b) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल,

(c) जर केन्द्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.

(d) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (c)
(b) आणि (c)
(a), (b) आणि (d) 
4. (a), (c) आणि (d)

उत्तर= (2)

 

19.यादी -1 मधील मुद्यांची यादी - II मधील मुद्यांशी खाली दिलेल्या संकेतांआधारे अचूक जोडी जुळवा :


उत्तर= (2)

 

20. अचूक जोड़ी कोणती ?

कलम 79 - लोकसभेची रचना
कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता
कलम 99 - संसद सचिवालय 
कलम 85 - सदस्यांची अपात्रता  

उत्तर= (2)

 

21. भारतीय संसदेच्या अधिकारावर असलेल्या मर्यादेबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) बहुतेक विधेयके ही राष्ट्रपतींच्या पूर्व संमतीने संसदेत सादर करावी लागतात.

(b) राज्यघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत राहून संसदेला कृती करावी लागते. (c) संसदेने मंजूर केलेले कायदे जर राज्यघटनेतील तरतूदीशी विसंगत असतील तर ते सर्वोच्च न्यायालयाकडून घटनाबाह्य म्हणून घोषित होवू शकतात.

(d) राज्यघटनेद्वारा नागरिकांना जे कांही मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत त्यामूळे संसदेची अधिसत्ता मर्यादित होते.


पर्यायी उत्तरे :


विधाने (a), (b), (d) बरोबर आहेत. 
विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत.
विधाने (a), (c), (d) बरोबर आहेत.
4. विधाने (b), (c), (d) बरोबर आहेत.
उत्तर= (4)

 

22.जम्मू आणि काश्मिर राज्यास असलेल्या विशेष दर्जाबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) सर्व कायद्यांना राज्यात लागू करण्यासाठी संसदेला राज्य शासनाची मान्यता आवश्यक असते.

(b) भारतीय संसद राज्य विधिमंडळाच्या संमती शिवाय राज्याच्या सीमा वाढवू अथवा कमी करू शकत नाही.

(c) भारतीय राज्यघटनेचा भाग IV आणि IV-A हा राज्यास लागू आहे.

पर्यायी उत्तरे :


(a), (c)
(b) फक्त 
(b), (c)
4. वरीलपैकी एकही नाही
उत्तर= (2)

 

23. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_________ समावेश होतो.
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 
संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा
संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा  

उत्तर= (3)

 

24. पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

(a) केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.

(b) लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात.


पर्यायी उत्तरे :

फक्त (a)
फक्त (b)
दोन्ही
कोणतेही नाही  
उत्तर= (2)

 

25. अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्ये कोणती आहेत ?

(a) अनुसूचित जातींसाठीच्या कार्यदेशीर सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी व परीक्षण करणे.

(b) संसदेला अहवाल सादर करणे.

(c) अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे. 

उत्तर= (1)

 

26. भारतीय राज्यघटनेतील _______ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

कलम 20 
कलम 21
कलम 22
कलम 31 

उत्तर= (2)

 

27. भारतीय घटनेच्या तिस-या आणि चौथ्या भागासाठी ‘राज्य' या संज्ञेमध्ये :

(a) भारत सरकार आणि संसद

(b) प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधीमंडळ

(c) स्थानिक शासन

(d) भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था यांचा समावेश होतो

वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त? 


उत्तर= (4)

 

28. भारतीय संघराज्यासंबंधीची खालील विधाने लक्षात घ्या :

(a) अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या घटनांमधून भारतीय राज्यघटनेने संघराज्याची वैशिष्ट्ये घेतली आहेत.

(b) घटक राज्यांमधील कराराचे फलित म्हणजे भारतीय संघराज्य.

(c) भारतीय संघराज्यातील घटकांना फुटून निघण्याचा अधिकार आहे.

कोणते विधान/ने बरोबर नाही/नाहीत?

  
 (b) आणि (c)
 (a) आणि (c)
 फक्त (c)


उत्तर= (2)

 

29. खालील विधाने विचारात घ्या :

(a) धर्मनिरपेक्ष राज्य' म्हणजे राज्य सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही,

(b) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्विकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे.

(c) धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

 फक्त (a)
 (a) आणि (c) 
 (b) आणि (c)
 वरील सर्व 
उत्तर= (4)

 

30.राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ________ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

पाच

सहा

सात

आठ 

उत्तर= (2)

 

31. खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

 केवळ (a) योग्य आहे
 केवळ (b) योग्य आहे
 (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत
 (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत
उत्तर= (4)

 

32.राज्यसभेचे अध्यक्ष _______ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

दोन

पाच 

सहा

चार

उत्तर= (3)

 

33._______  या सध्याच्या राज्यांच्या काही भागांनी मिळून बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश आणि दिल्ली

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश

मध्य प्रदेश आणि राजस्थान

उत्तर= (3)

 

34. खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे.

या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.

या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.


उत्तर= (3)

 

35. खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात ?

प्रतिषेध

उत्प्रेक्षण

बंदी प्रत्यक्षीकरण

अधिकारपृच्छा 

उत्तर= (1)

 

36. 2003 मधे राज्यसभेच्या निवडणुकीत कोणते दोन बदल करण्यात आले?

(a) उमेदवार संबंधित राज्याचा निवासी असण्याची आवश्यकता नाही आणि खुली मतदान पद्धती

(b) गुन्हेगारी प्रकरणात नाव असल्यास अपात्र आणि उत्पन्नाची खरी माहिती

(c) राजकीय पक्षाचे सभासदत्त्व आणि 10 वर्षे राजकारणाचा अनुभव

(d) पराभूत उमेदवार नसावा आणि वयोमर्यादा 70 वर्षापेक्षा अधिक नसावी

पर्यायी उत्तरे :

 (a) आणि (b) बरोबर
 (c) आणि (d) बरोबर
 फक्त (a) बरोबर
 फक्त (c) बरोबर
उत्तर= (3)

 

37.समाजवादी पक्षाबाबत काय खरे आहे?

(a) समाजवादी पक्ष 1938 मध्ये काँग्रेस पासून वेगळा झाला.

(b) आचार्य नरेंद्र देव हे समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते.

(c) जयप्रकाश नारायण, एस.एम. जोशी, अशोक मेहता हे समाजवादी पक्ष/प्रजा समाजवादी पक्षाचे नेते होते.

पर्यायी उत्तरे : 

 फक्त (a), (b)
 फक्त (b), (c)
 फक्त (a), (c)
 (a), (b) आणि (c)
उत्तर= (2)

 

38. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहेत?

(a) न्यायालयाचा अवमान 

(b) बदनामी

(c) कायदे मंडळाचा अवमान

(d) राज्याची सुरक्षितता

पर्यायी उत्तरे :

 फक्त (a), (b), (d)
 फक्त (b), (c), (d)
 फक्त (a), (c), (d)
 फक्त (a), (b), (c)
उत्तर= (1)

 

39. 'कामराज प्लॅन/योजना' म्हणजे काय?

 सर्व वरिष्ठ काँग्रेसजनांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून तरुण पक्ष कार्यकत्र्यासाठी मार्ग मोकळा करावा.

  सर्व वरिष्ठ काँग्रेसजनांनी एकत्र व्हावे आणि इंदिरा गांधींना विरोध करावा.

 सर्व वरिष्ठ काँग्रेसजनांनी आपल्या हृदयाचे शब्द ऐकावे आणि व्ही.व्ही. गिरी यांना मतदान करावे.

 सर्व वरिष्ठ काँग्रेसजनांनी तरुण पक्ष कार्यकत्र्यांना सल्ला द्यावा.


उत्तर= (1)

 

40. योग्य कथन ओळखा :

(a) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.

(b) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.

पर्यायी उत्तरे :

 फक्त (a)
 फक्त (b)  
 (a) आणि (b) दोन्ही
 (a) आणि (b) दोन्ही नाही 

उत्तर= (2)

 

41. खालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते ?

 सी. राजगोपालाचारी
मिनू मसानी 
पी.सी. जोशी
के.एम. मुन्शी
उत्तर= (3)

 

42.जोड्या लावा - (भारताची जनगणना, 2011)



उत्तर= (2)

 

43. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या बाबत काय खरे आहे?

(a) ते काँग्रेस समाजवादी पक्षाचे संस्थापक महासचिव होते.

(b) त्यांनी 1965 साली सक्रीय राजकारणाचा त्याग केला.

(c) त्यांनी भूदान आंदोलनात सहभाग घेतला.

(d) ते आणिबाणीच्या विरोधाचे प्रतिक होते.

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (c) 
(b), (c) आणि (d) 
(a), (c) आणि (d) 
(a), (b) आणि (d)
उत्तर= (3)

 

44. योग्य कथन ओळखा :

(a) केंद्रीय विद्यापीठ बिहार' चे पुनर्नामकरण 'केंद्रीय विद्यापीठ दक्षिण बिहार' असे करण्यात आले.

(b) बिहार मध्ये 'जयप्रकाश नारायण केंद्रीय विद्यापीठ' या नावाने दुसया केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :

फक्त (a)
फक्त (b) 
(a) आणि (b) दोन्ही
(a) आणि (b) दोन्ही नाही

उत्तर= (1)

 

45. काही राज्यांचे अपवाद वगळता, 2015 - 16 नंतर सर्व शिक्षा अभियानासाठी केंद्र व राज्य सरकारांमध्ये निधी वाटप पद्धतीचे प्रमाण ______ असे होते. 

60 : 40
75 : 25
70 : 30
65 : 35
उत्तर= (1)

 

46. योग्य कथन ओळखा :

(a) निवडणूक सुधारणे बाबतीतील दिनेश गोस्वामी समितीची स्थापना 1990 मध्ये झाली.

(b) निवडणूक सुधारणे बाबतीतील इंद्रजीत गुप्ता समितीची स्थापना 1995 मध्ये झाली.

पर्यायी उत्तरे :

फक्त (a)
फक्त (b)
(a) आणि (b) दोन्ही
(a) आणि (b) दोन्ही नाही 

उत्तर= (1)

 

47. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी आहे ?

(a) कलम 324

(b) कलम 325

(c) कलम 327

(d) कलम 329

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) अचूक आहे
फक्त (c) अचूक आहे
फक्त (d) अचूक आहे
 (a) आणि (d) अचूक आहे
उत्तर= (3)

 

48. भारतामध्ये मतदारासाठी अपात्रतेचे कोणते निकष आहेत?

(a) वास्तव्य नसणे

(b) मानसिक दुर्बलता

(c) गुन्हा किंवा भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कृत्य

(d) आर्थिक लाभाचे पद धारण केल्यास

पर्यायी उत्तरे :

फक्त (a), (b), (c)
 फक्त (b), (c), (d)
 फक्त (a), (c), (d)
 फक्त (a), (b), (d)
उत्तर= (1)

 

49.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर पुढीलपैकी कोणती विद्यार्थी संघटना संलग्न आहे?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
ऑल इंडिया स्टूडंट्स् फेडरेशन
नॅशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया
प्रोग्रेसिव स्टूडंट्स यूनियन

उत्तर= (4)

 

50. जोड्या लावा - (तिथि भोजन - मध्यान्ह भोजन योजना)


उत्तर= (2)

 

51. जोड्या लावा :


उत्तर= (1)

 

52. जोड्या लावा - (शासनाच्या शैक्षणिक योजना)


उत्तर= (4)

 

53.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एम.फिल., पीएच.डी. सारख्या संशोधनाच्या अभ्यासाकरिता कोणती योजना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देते ?

राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती 
डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय शिष्यवृत्ती
बाबू जगजीवन राम राष्ट्रीय शिष्यवृत्ती
महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय शिष्यवृत्ती

उत्तर= (1)

 

54. अयोग्य कथन ओळखा :

1951 मध्ये साम्यवादी पक्षाने रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग केला आणि सार्वत्रिक निवडणूकीत                सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
ए.के. गोपालन, एस.ए. डांगे, अजय घोष हे साम्यवादी पक्षाचे (CPI) नेते होते.
1964 मध्ये साम्यवादी पक्ष दोन गटात विभागला गेला CPI ने चीनचे समर्थन केले आणि CPI (M)                ने रशियाचे समर्थन केले.
ब्रिटिशांना त्याच्या नाझी जर्मनी विरोधातील लढ्याला पाठिंबा देण्याचे साम्यवाद्यांनी 1941 साली ठरवले.
उत्तर= (3)

 

55.प्रत्येक राज्य व्यवस्थेतील राजकीय पक्षाची सामाजिक संदर्भ निरनिराळा असतो. साम्यवादी पक्षांच्या बाबतीत खालील वाक्य कोणत्या गटास तंतोतंत लागू होतात?

(a) साम्यवादी पक्ष बेकायदेशीर

(b) साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यास कायदेशीर बंदी नाही

(c) क्रांतीचा अग्रदूत

(d) एकाच पक्षाच्या अनेक शाखा

देशांच्या गटाच्या खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय वरील (a), (b), (c), (d) यांच्याशी अनुक्रमे साधर्म्य सांगतो ?

इंग्लंड, अमेरिका, भारत, चीन
अमेरिका, चीन, भारत, इंग्लंड
अमेरिका, इंग्लंड, चीन, भारत 
चीन, अमेरिका, भारत, इंग्लंड 

उत्तर= (3)

 

56.योग्य कथन ओळखा :

(a) महाराष्ट्राच्या शेतकरी संघटनेने शेतक-यांचे आंदोलन हे इंडियाच्या फौजे विरुद्ध भारताचे युद्ध" म्हणून जाहीर केले.
(b) भारतीय किसान युनियन ही 70 च्या दशकातील शेतक-यांच्या आंदोलनातील एक प्रमुख संघटना होती.

पर्यायी उत्तरे :

फक्त (a)
फक्त (b)
 (a) आणि (b) दोन्ही
 (a) आणि (b) दोन्ही नाही

उत्तर= (1)

 

57. अयोग्य कथन ओळखा :

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये नियंत्रण युनिट व बॅलट युनिट चा समावेश असतो.
एक बॅलट युनिट सोळा उमेदवारांपर्यंत सेवा पुरवू शकते. 
एक नियंत्रण युनिट 48 उमेदवारांना प्राप्त मतांची नोंद ठेवू शकते.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे 6 व्होल्ट बॅटरी वर चालू होते आणि ते कोणत्याही ठिकाणी आणि                               कोणत्याही परिस्थितीत उपयोगात येवू शकते. 

उत्तर= (3)

 

58. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार आकारिक मूल्यमापना मध्ये कोणती साधने-तंत्रे वापरली जातात?

(a) लेखी परीक्षा

(b) दैनंदिन निरीक्षण

(c) प्रकल्प

(d) गृहकार्य/स्वाध्याय

पर्यायी उत्तरे :

फक्त (a), (b), (C)
फक्त (a), (b), (d) 
फक्त (a), (c), (d)
फक्त (b), (c), (d) 
उत्तर= (4)

 

59. जोड्या लावा - (प्रादेशिक आकांक्षा)


 

उत्तर= (1)

 

60. खालील वाक्ये वाचा :

(a) 2001 च्या जनगणनेच्या आधारे परिसीमित केलेले मतदार संघ हे 2026 नंतरच्या पहिल्या जनगणने पर्यंत अस्तित्वात राहतील.

(b) परिसीमन आयोग हा लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या मतदार संघांचे परिसीमन करतो.

वरीलपैकी कोणते/ती वाक्य/वाक्ये बरोबर आहे/आहेत ?

(a) आणि (b) दोन्ही
(a) ही नाही आणि (b) ही नाही
फक्त (b)
फक्त (a)
उत्तर= (1)

 

61.योग्य कथन ओळखा :

(a) जुलै, 2002 मध्ये राष्ट्रीय मच्छीमार संघटने द्वारे (NFF) परकीय ट्रॉलर्सला सरकारने दिलेल्या परवान्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संप करण्याचे आव्हान करण्यात आले.

(b) आंध्र प्रदेशाच्या दुर्गम खेड्यातील ग्रामीण महिलांनी मद्यविरोधी, माफिया विरोधी, सरकार विरोधी केलेल्या संघर्षाला अर्क-विरोधी आंदोलन म्हटले गेले.


पर्यायी उत्तरे :

फक्त (a)

फक्त (b)

(a) आणि (b) दोन्ही

(a) आणि (b) दोन्हीही नाही
उत्तर= (3)

 

62. योग्य कथने ओळखा :

(a) भारतीय वृत्तपत्र परिषद ही वैधानिक पूर्ण न्यायिक स्वायत्त संस्था आहे.

(b) भारतीय वृत्तपत्र परिषदेमध्ये एक अध्यक्ष व 28 सदस्यांचा समावेश होतो.

(c) वृत्तपत्राचे स्वातंत्र्य जतन करणे हा भारतीय वृत्तपत्र परिषदेचा उद्देश आहे.

पर्यायी उत्तरे : 

फक्त (a), (b)
फक्त (b), (c)
फक्त (a), (c)
वरील सर्व
उत्तर= (2)

 

63. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे ?

एकसष्टावी घटना दुरुस्ती
बेचाळीसावी घटना दुरुस्ती
त्रेसष्टावी घटना दुरुस्ती
शहाऐंशीवी घटना दुरुस्ती
उत्तर= (1)

 

64. लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी किती राखीव मतदार संघ आहेत ? 

एस.सी. - 78, एस.टी. - 39
एस.सी. - 84, एस.टी. - 47
एस.सी. - 81, एस.टी. - 39
एस.सी. - 79, एस.टी. - 41

उत्तर= (2)

 

65. आंध्र प्रदेश मध्ये कोणत्या उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना 2014 नंतर झाली ?

(a)  ट्रायबल विद्यापीठ

(b) महात्मा गांधी विद्यापीठ

(c) केंद्रीय विद्यापीठ

(d) एन.आय.टी.

पर्यायी उत्तरे :

फक्त (a), (b), (c)
फक्त (a), (b), (d)
फक्त (a), (c), (d)
वरील सर्व 
उत्तर= (3)


66. भारतीय जनसंघाची विचारधारा आहेत :

(a) एक देश, एक संस्कृति व एक राष्ट्र विचार

(b) व्यक्तिगत स्वातंत्र्या द्वारेच वैभवप्राप्ती शक्य

(c) भारताची कार्यालयीन भाषा इंग्रजी ऐवजी हिंदी

(d) धार्मिक व सांस्कृतिक अल्पसंख्याकांच्या सवलतीस विरोध

पर्यायी उत्तरे :

फक्त (a), (b), (c)
फक्त (a), (b), (d)
फक्त (a), (c), (d)
फक्त (b), (c), (d)

उत्तर= (3)

 

67. 2018 चा वर्षाकरता एन्.आय.आर.एफ्. ने विद्यापीठाची मानांकने जाहीर केली. खालील पहिल्या चार संस्थाकरता योग्य अनुक्रम काय आहे?

(a) बनारस हिंदू विश्वविद्यालय

(b) जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय

(c) अण्णा विश्वविद्यालय

(d) भारतीय विज्ञान संस्था

पर्यायी उत्तरे :

(c), (a), (d), (b)
(d), (b), (a), (c)
(b), (a), (d), (c)
(a), (b), (c), (d)
उत्तर= (2)

 

68. खालील वाक्ये बघा :

(a) फिक्की ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उदीम संघटना आहे.

(b) फिक्की ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया-अंतर्गत स्थापन केली आहे.

वरील वाक्यांपैकी कोणते/कोणती बरोबर आहे/आहेत ?

फक्त (a) 
फक्त (b)
(a) आणि (b) दोन्ही
(a) ही नाही आणि (b) ही नाही
उत्तर= (4)

 

69.खालीलपैकी कोणामधे लोकसभेची ऐकच जागा आहे?

(a) मिझोराम

(b) मेघालय

(c) नागालैंड

(d) सिक्कीम

(e) गोवा

(f) दादरा आणि नगर हवेली

पर्यायी उत्तरे :

(a), (b), (d), (e)
(a), (c), (e), (f)
(a), (c), (d), (f)
(a), (b), (c), (d), (f)
उत्तर= (3)


70. इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT - In) ही माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा 2008 कलम 70B अंतर्गत पुढील कार्य करते.

(a) सायबर सुरक्षेसंबंधी घटनांवर माहितीचा संग्रह, तिचे विश्लेषण आणि प्रसार.

(b) सायबर सुरक्षेसंबंधी अंदाज वर्तविणे आणि सावध करणे.

(c) सायबर सुरक्षेसंबंधी घटनांसाठी आपत्कालीन उपाय करणे.

(d) सायबर सुरक्षेसंबंधी घटनाची माहिती संसदेला देणे.

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (d)
(a), (b) आणि (c)
(a), (c) आणि (d)
(b), (c) आणि (d)

उत्तर= (2)

 

71. खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? 

(a) छावणी क्षेत्र पालिकेत नऊ निर्वाचित सदस्य असतात.

(b) छावणी क्षेत्र पालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी संरक्षण मंत्र्याद्वारा नियुक्त केला जातो.

(c) भारतात छावणी क्षेत्र पालिकांना तीन प्रकारात विभागले जाते.

(d) छावणी क्षेत्र पालिकेच्या उपाध्यक्षाची निवड पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी तिच्या सर्व निर्वाचित व नामनियुक्त सदस्यांकडून होते.

पर्यायी उत्तरे :

(a), (b)
(c), (d) 
फक्त (d)
वरीलपैकी एकही नाही

उत्तर= (4)

 

72. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत?

राज्यातील मुख्य सचिवा समान असे पद संघ सरकारमध्ये नाही.
मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख आहे तर केन्द्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव                           (Cabinet Secretary) हा केन्द्रीय सचिवालयाचा प्रमुख आहे.
मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख आहे तर केन्द्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव             हा केन्द्रीय सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख नसतो.
वरीलपैकी एकही नाही.
उत्तर= (2)

 

73. योग्य पर्यायांची निवड करा :

(a) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.
(b) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिका-यांचा कप्तान असतो.
(c) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.
(d) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.

पर्यायी उत्तरे :
(b) आणि (d) फक्त
(c) आणि (d) फक्त 
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b) आणि (c) फक्त 
उत्तर= (4)

 

74. 74 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे झालेल्या बदलाबाबत जोड्या लावा. 


उत्तर= (3)

 

75. 'ऑक्सफोर्ड शब्दकोषा'नुसार जिल्हा प्रशासनाची व्याख्या आहे :

(a) विशेष प्रशासकीय उद्देशांकरीता निर्माण करण्यात आलेला भूभाग.

(b) विशेष प्रशासकीय उद्देशाकरीता निर्माण करण्यात आलेल्या भूभागातील सार्वजनिक कार्यांचे व्यवस्थापन,

(c) शासनाची जिल्ह्यातील संपूर्ण कार्यप्रणाली. 

(d) लोकप्रशासनाचा असा भाग जे जिल्ह्याच्या ठराविक क्षेत्रात काम करीत असते.

योग्य पर्याय निवडा :

(a) आणि (c) फक्त
(a) आणि (d) फक्त  
(b) फक्त
(d) फक्त

उत्तर= (3)

 

76. खालील विधाने विचारात घ्या :

(a) ग्रामपंचायत हे ब्रिटीशांच्या काळापासूनच स्थानिक प्रशासनाचे एकक होते, परंतु त्यांना शासकीय नियंत्रणाखाली काम करावे लागत असे.

(b) भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये स्थानिक स्वशासना' बाबत कायदे करण्याचा अधिकार खास करून प्रांतिक विधिमंडळास प्रांतिक वैधानिक यादीतील नोंद. क्र. 12 अन्वये दिला होता.

(c) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 41 अन्वये राज्य ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाय योजना करील.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) फक्त
(c) फक्त 
(a) आणि (b)
(a), (b), (c) 

उत्तर= (1)

 

77. 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ?

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त एक                तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव असतील.
पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील तर ते आपले पद धारण                करण्यास अपात्र ठरतील.
पंचायतीची निवडणूक लढण्यासाठी किमान वय 25 वर्षे असेल.
मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक (मतदान).

उत्तर= (4)

 

78. राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.

(b) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करु शकतात.

(c) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

(d) एकदा का रज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपान्तर          करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.

पर्यायी उत्तरे

(b) फक्त
(b), (c), (d)
(a), (d)
(a), (b), (d)
उत्तर= (3)

 

79.खालील विधाने विचारात घ्या :

(a) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विरुद्ध अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये साध्या                      बहुमताने मंजूर होतो.

(b) अशा त-हेचा अविश्वास ठराव हा अध्यक्षाची निवड झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या                                 कालावधीपर्यंत आणता येत नाही.
(c) अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी                          जिल्हाधिकारी असतो.
(d) अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलावण्यात आलेली विशेष सभा कोणत्याही कारणास्तव                   तहकुब होत नाही.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a), (b), (c)
(b), (c), (d)
(c) आणि (d)
फक्त (a)

उत्तर= (3)

 

80. सचिवालय ही एक धोरण निश्चित करणारी संस्था आणि संचालनालय ही एक धोरण अंमलात आणणारी संस्था असा असणारा फ़रक संपुष्टात आणावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय सुधार आयोगाने/समितीने केली होती ?

मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग 
राजस्थान प्रशासकीय सुधार समिती
पंजाब प्रशासकीय सुधार आयोग
केरळ प्रशासकीय पुनर्रचना आणि आर्थिक समिती

उत्तर= (1)

 

81. खालील विधाने विचारात घ्या :

(a) 1999 च्या कायद्यान्वये महाराष्ट्रात महानगर नियोजन समिती (Metropolitan Planning Committee) गठीत करण्याची तरतूद आहे.
(b) सदरहू कायद्यातील तरतूदीनुसार प्रत्येक महानगर नियोजन समितीमध्ये पन्नास पेक्षा कमी नाही आणि साठ पेक्षा जास्त नाही इतके सदस्य असतात.
(c) समितीच्या सदस्यांमधून तिच्या अध्यक्षाची निवड केली जाते.
(d) जिल्हाधिकारी हा सदरहू समितीचा पसिद्ध सदस्य असतो.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) फक्त
(a), (b), (d)
(b), (c)
(a), (c), (d)
उत्तर= (1)

 

82. योग्य जोड्या जुळवा.


उत्तर= (4)

 

83. राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे?

मंत्र्यांची नियुक्ती ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी होते.
राज्यात मंत्र्यांची एकूण सदस्य संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नसावी
दहाव्या अनुसूची खाली अपात्र ठरलेला विधानसभेचा सदस्य हा राज्यमंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो.
मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.

उत्तर= (4)

 

84. जिल्हा प्रशासनाचे घटक आहेत :

(a) कायदा आणि सुव्यवस्था

(b) महसूल

(c) कारागृह/तुरुंग प्रशासन

(d) जिल्हा नियोजन समिती

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (d) फक्त
(c) आणि (d) फक्त 
(d) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त 
उत्तर= (4)

 

85. खालील विधाने विचारात घ्या :

(a) स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हाधिकारी हा कार्यकारी दंडाधिकारी आणि न्यायिक दंडाधिकारी अशा दोन्ही भूमिका पार पाडत असे.

(b) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-50 नुसार जिल्हाधिका-याची न्यायिक दंडाधिकारी म्हणून असलेली भूमिका गणली गेली.

(c) महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जिल्हाधिका-यास नियामक आणि विकास प्रशासन अशा दोन्ही साठी जबाबदाच्या देण्यात आल्या आहे.

(d) तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये जिल्हाधिका-यास केवळ नियामक प्रशासनासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

फक्त (a)
(b) आणि (c)
(a),(c) आणि (d)
(a) आणि (b)
उत्तर= (4)

 

86. खालील विधाने विचारात घ्या :

(a) विधानसभेने मंजूर केलेले विधेयक (वित्तीय विधेयका व्यतिरीक्त) विधान परिषदेने फेटाळले अथवा तीन महिन्यांच्या कालावधीत मंजूर केले नाही तर ते विधेयक पुन्हा मंजूर करेल आणि पुन्हा ते विधान परिषदेकडे पाठवेल.

(b) जर या दुस-या प्रसंगी विधान परिषदेने जे विधेयक पुन्हा फेटाळले अथवा एक महिन्याच्या आत मंजूर केले नाही तर ते विधेयक दोन्ही सभागृहाकडून मंजूर झाले असे समजले जाईल.

(c) जर एखादे विधेयक विधान परिषदेकडून मंजूर होवून विधानसभेकडे आल्यानंतर फेटाळले गेले तर ते विधेयक संपुष्टात येते.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) फक्त
(b) फक्त
(a), (b)
(a), (b), (C)

उत्तर= (4)

 

87. संचालनालयाच्या कार्याबाबत योग्य पर्यायांची निवड करा :

(a) मंत्र्याना तांत्रिक सल्ला देणे.

(b) जिल्हा पातळीवरील खात्यातील कर्मचा-यांच्या कार्याची तपासणी करणे.

(c) विभागातील कर्मचा-यांकरीता सेवा अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे.

(d) दुय्यम पदावरील अधिका-यांवर नियम बार शिस्तविषयक अधिकार अंमलात आणणे.

पर्यायी उत्तरे : 

(a) आणि (d) केवळ
(b) आणि (c) केवळ 
(a), (b), (c) आणि (d)
(a), (c) आणि (d) केवळ

उत्तर= (3)

 

88. जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा (निलंबित करण्याचा) अधिकार कोणास आहे?

जिल्हाधिकारी
विभागीय आयुक्त 
मुख्य कार्यकारी अधिकारी
वरीलपैकी कोणालाही नाही
उत्तर= (2)

 

89. खालील विधाने विचारात घ्या :

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.

(b) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जावू शकतो.

पर्यायी उत्तरे :

विधान (a) बरोबर
विधान (b) बरोबर
दोन्हीही विधाने बरोबर
दोन्हीही विधाने चुकीची
उत्तर= (1)

 

90. पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारशी :

(a) त्रि-स्तरीय पद्धती ऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी.

(b) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे.

(c) पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग नसावा.

(d) विसर्जित केल्यास, एका वर्षात निवडणूका घेतल्या पाहिजेत.

पर्यायी उत्तरे :

(a), (b), (c)
(b), (c), (d)
(a), (b)
(a), (d)
उत्तर= (3)

 

91. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

जे.व्ही.पी. समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता.
फझल अली आयोगाने 'एक भाषा-एक राज्य' हे तत्त्व नाकारले होते.
फझल अली आयोगाने 15 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती.
राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 अन्वये 14 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.

उत्तर= (3)

 

92. 74 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

या कायद्याने भारतीय राज्यघटनेला भाग IX-A हा नव्याने समाविष्ट झाला.
या कायद्याने राज्यघटनेमध्ये नव्याने बाराव्या अनुसूचीचा देखील समावेश झाला. 
बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या एकोणतीस कार्याचा समावेश आहे.
वरीलपैकी एकही नाही.
उत्तर= (3)

 

93. योग्य जोड्या जुळवा.


उत्तर= (1)

 

94. खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे.

(b) राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

फक्त (a)
फक्त (b) 
(a) आणि (b)
दोन्हीही चुकीची
उत्तर= (4)

 

95. खालील विधाने विचारात घ्या :

(a) पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते.  

(b) सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते.

(c) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.

(d) विस्तार अधिकारी (पंचायती) हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

योग्य विधाने निवडा :

 
(a), (b) आणि (c)
(a), (b) आणि (d)
वरील सर्व 

उत्तर= (3)

 

96.'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

बलवंतराय मेहता समिती
अशोक मेहता समिती 
जी.व्ही.के. राव समिती
एल.एम. सिंघवी समिती

उत्तर= (2)

 

97. उप विभागीय अधिकारी अथवा प्रांत अधिकारी यांचे खालीलपैकी कोणते दंडाधिकरणीय कार्य (Majesterial Work) आहे?

विविध प्रकारचे वैधानिक दाखले देणे.
बॉम्बे टेनन्सी अ‍ॅन्ड अग्रिकल्चरल लॅन्डस् अ‍ॅक्ट, 1948 खालील सर्व टेनन्सी प्रकरणांची सुनावणी करणे.
पोलीस गोळीबाराची प्रकरणे, पोलीस कस्टडीतील मृत्यू प्रकरणांची चौकशी करणे.
तहसिलदारांच्या कार्यावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
उत्तर= (3)

 

98. कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.

      कारण (R) : मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.

(A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत व (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे.
(A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही.
(A) बरोबर आहे परंतु (R) चूक आहे.
(A) चूक आहे परंतु (R) बरोबर आहे.

उत्तर= (1)

 

99. समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला .कायदा केन्द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो :

जर तो केन्द्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.
जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केन्द्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.
जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास.
जर बहुसंख्य राज्याच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास.
उत्तर= (2)

 

100. महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी.

(b) निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी.

(c) नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी.

वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a)
(b) 
(c)
यापैकी एकही नाही

उत्तर= (3)

 

101. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

15 सप्टेंबर 1948 रोजी केन्द्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाची (The Central Police Training College) स्थापना माऊंट अबू येथे करण्यात आली आणि 1967 साली त्याचे नामकरण राष्ट्रीय पोलीस अकादमी असे करण्यांत आले.
आय.पी.एस श्रेणीचे नियंत्रण भारत सरकारच्या गृहखात्यामार्फत केले जाते. 
आय.पी.एस श्रेणीतील अधिका-याची नेमणूक आणि बडतर्फी केवळ भारताच्या गृहमंत्र्याच्या आदेशाद्वारेच होवू शकते.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद ही उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न आहे.
उत्तर= (3)

 

102. खालील विधाने विचारात घ्या :

(a) अखिल भारतीय सेवेतील सदस्यांच्या सेवा शर्ती, भरतीचे नियम हे केवळ संसदेच्या कायद्याद्वारेच नियमित करता येतात,

(b) अखिल भारतीय सेवा अधिनियम, 1951 अनुसार अखिल भारतीय सेवेतील सदस्यांच्या भरतीचे नियम आणि सेवा शर्तीच्या नियमनासाठी राज्य सरकारांशी सल्लामसलत न करताही नियम बनविण्याचा अधिकार केन्द्र शासनाला दिला गेला आहे.
(c) अखिल भारतीय सेवेच्या अधिका-यांची नियुक्ती आणि नियंत्रण केन्द्र शासनाद्वारे करण्यांत येत असल्याने राज्यावर केन्द्राचे नियंत्रण निर्माण करणारी अतिरिक्त एजन्सी म्हणून ही सेवा कार्य करते.

पर्यायी उत्तरे :

विधाने (b), (c) बरोबर आहेत, (a) चूक आहे.
विधाने (a), (C) बरोबर आहेत, (b) चूक आहे.
विधाने (a), (b) बरोबर आहेत, (c) चूक आहे.
सर्व विधाने बरोबर आहेत. 
उत्तर= (2)

 

103. खालील अहवाल लक्षात घेऊन कालक्रमानुसार त्यांचा योग्य क्रम लिहा.

(a) पॉल एच. अ‍ॅपलबी अहवाल - 1

(b) ए.डी. गोरवाला अहवाल

(c) संथानाम समिती अहवाल

(d) प्रशासकीय सुधारणा आयोग अहवाल

पर्यायी उत्तरे :

(b), (a), (d), (c)
(b), (a), (c), (d) 
(a), (b), (c), (d)
(a), (b), (d), (c)
उत्तर= (2)

 

104. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

सर्व अर्थ (धन) विधेयके [अनुच्छेद-110] ही वित्त विधेयके असतात परंतु सर्व वित्त विधयके [अनुच्छेद-117] ही अर्थ (धन) विधेयके नसतात.
वित्त विधेयक [अनुच्छेद-117(3)] हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही.
वित्त विधेयका [अनुच्छेद-117(3)] बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो.
वरीलपैकी एकही नाही
उत्तर= (2)

 

105. 'सार्वजनिक उपक्रम समिती' बाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) तिची स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 साली झाली.

(b) सध्या या समितीत 15 सदस्य आहेत (लोकसभेतून-10 आणि राज्यसभेतील-5).

(c) तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होवू शकते.

(d) घटनात्मकदृष्ट्या या समितीचे अहवाल हे शासनावर बंधनकारक असतात.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/ते ?

फक्त (a)
 (a), (b), (c) 
(c), (d)
वरीलपैकी एकही नाही 
उत्तर= (4)

 

106. अयोग्य/चुकीची जोडी ओळखा :

उत्तर= (2)

 

107. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

1955 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाने भारतीय अभियंता सेवा, भारतीय वन सेवा आणि भारतीय वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गठीत करण्याची शिफारस केली होती.
राज्यसभेने 6 डिसेंबर 1964 रोजी अखिल भारतीय अभियंता सेवा, भारतीय वन सेवा आणि भारतीय वैद्यकीय व आरोग्य सेवा निर्मितीसाठी ठराव मंजूर केला होता.
भारतीय वन सेवेची निर्मिती 1966 मध्ये झाली.
पाचव्या केन्द्रीय वेतन आयोगाने देखील भारतीय वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि भारतीय अभियंता सेवा या दोन अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्यासंबंधी शिफारस केली होती.
उत्तर= (2)

 

108. लोकलेखा समिती बाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

(a) लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली.

(b) लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात.

(c) सदस्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असतो.

(d) 1963 पासून विरोधी पक्षातील व्यक्तीची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते.

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (d)
(b), (c) आणि (d)
(a), (b) आणि (c)
वरील सर्व  
उत्तर= (3)

 

109. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ? 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 
भारताचे महान्यायवादी 
लोकसभेचे सभापती
उत्तर= (2)

 

110. भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? 

खर्च विभाग
महसूल विभाग 
आर्थिक व्यवहार विभाग
संरक्षण विभाग 
उत्तर= (3)

 

111. भारताच्या संचित निधीत पुढील खर्चाचा समावेश होतो :

(a) लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते

(b) उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते

(c) संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचे वेतन व भत्ते

(d) राज्यसभेचा सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (c)
(b), (c) आणि (d)
(a), (c) आणि (d)
वरील सर्व 

उत्तर= (3)

 

112. 'अंदाज समिती' च्या स्थापनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) अशा प्रकारची पहिली समिती ही अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरुन स्थापन करण्यात आली होती.

(b) लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना या समितीत प्रतिनिधीत्व मिळते आणि निवड ही एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असते.

(c) समितीच्या अध्यक्षांची निवड ही त्या समितीमधील सदस्यांच्या ज्येष्ठतेच्या तत्त्वानुसार होत असते.

(d) जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील ते आपोआपच या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होतात,

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

(a), (b), (c)
(b), (c), (d) 
(a), (b), (d)
(a) आणि (c) फक्त
उत्तर= (3)

 

113. खालील विधाने विचारात घ्या :

(a) शासनाच्या आर्थिक व्यवहारांच्या व्यवस्थापनासाठी वित्त मंत्रालयास विशेष स्थान देण्यात आलेले आहे.

(b) वित्त मंत्रालय हे देशाच्या संपूर्ण आर्थिक प्रशासनासाठी नेहमीच जबाबदार असते.

(c) वित्त मंत्रालय शासनाच्या खर्च करणाच्या विविध खात्यांचे नियंत्रण व समन्वय साधते.

पर्यायी उत्तरे :

विधाने (b), (c) बरोबर आहेत, (a) चुकीचे आहे.
विधाने (a), (c) बरोबर आहेत, (b) चुकीचे आहे.
विधाने (a), (b) बरोबर आहेत, (c) चुकीचे आहे.
सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर= (4)

 

114. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

कोठारी समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली.
कोठारी समितीने आपला अहवाल 1976 मध्ये सादर केला.
कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.
कोठारी समितीच्या शिफारशी 1979 मध्ये अंमलात आल्या.
उत्तर= (3)

 

115. खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे लेखापरीक्षण पूर्णपणे आणि प्रत्यक्षपणे नियंत्रक व महालेखापरीक्षकाद्वारे केले जाते ?

(a) एअर इंडिया

(b) दामोदर व्हॅली कार्पोरेशन

(c) एल.आय.सी.

(d) आर.बी.आय.

पर्यायी उत्तरे :

(a), (c) आणि (d)
(a), (b) आणि (d)
(a) आणि (b)
(a) आणि (d)

उत्तर= (3)

 

116. योग्य विधान/विधाने निवडा. 

(a) सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतातील नागरी सेवेचे जनक म्हणतात.

(b) राज्य सेवेतील राजपत्रित वर्गातील सदस्यांची नावे भरती व निवृत्तीच्या वेळी सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केली जातात.

(c) अखिल भारतीय सेवेतील सदस्यांचे वेतन राज्य सरकार व निवृत्ती वेतन केंद्र सरकार देते.

पर्यायी उत्तरे :

विधान (a) आणि (c) बरोबर; (b) चूक.
विधान (c) बरोबर; (a) आणि (b) चूक. 
विधान (b) बरोबर; आणि विधान (a), (c) चूक.
वरील सर्व विधाने बरोबर.
उत्तर= (3)

 

117. भारतीय प्रशासकीय सेवेमधील परिविक्षाधिन अधिकारी वर्गासाठी 'सैण्डविच पैटर्न' पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात कोणाच्या शिफारशीवरुन करण्यात आली ? 

पॉल एच. अ‍ॅपलबी अहवाल 
केंद्रीय लोकसेवा आयोग
प्रशासकीय सुधारणा आयोग
राष्ट्रीय विकास परिषद
उत्तर= (3)

 

118. खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य असतात ?

(a) अंदाज समिती

(b) स्थायी समिती

(c) लोक लेखा समिती

(d) सार्वजनिक उपक्रम समिती

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (d)
(a), (b) आणि (c) 
(b), (c) आणि (d)
(a), (b), (c) आणि (d) 
उत्तर= (3)

 

119. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अचूक उत्तरे निवडा.

(a) केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो.

(b) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष ए.आर. किडवई यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली.

(c) अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अध्यक्ष कामे करण्यास अक्षम असतो तेव्हा राष्ट्रपती UPSC च्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतो.

(d) UPSC ने निवड केल्याने उमेदवाराचा त्या पदावर अधिकार निर्माण होतो.

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (d)
(b) आणि (c)
(a), (b) आणि (c)
वरील सर्व 
उत्तर= (3)

 

120. वित्त आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 280 में वित्त आयोगास निम-न्यायालयीन दर्जा प्रदान करते.

(b) आयोगाच्या सदस्यांची नेमणूक पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाद्वारे केली जाते.

(c) आयोगाचे सदस्य पुर्ननेमणूकीसाठी पात्र असतात.

(d) त्यात एक अध्यक्ष आणि अन्य दोन सदस्य असतात.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) आणि (b) 
(a) आणि (c)
(b) आणि (c)
(c) आणि (d)
उत्तर= (2)

 

121. पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 मधील प्रकरण 3 मधील कलम _______ ते ________ मध्येपर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण, नियंत्रण व निर्मूलन याबाबत तरतुदींचा समावेश आहे.

9, 20 
8, 19
18, 22
7, 17 
उत्तर= (4)

 

122. माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा :

उत्तर= (1)

 

123. पुढील सिध्दांतांचा विचार करा :

(a) अल्ट्रा व्हायरस

(b) ऑडी अल्ट्रेम पार्टेम

(c) डेलीगेटस नॉन पोटेस्ट डेलीगेर

(d) नेमो ज्युडेक्स इन कॉझा सुआ

यापैकी कोणते सिद्धांत नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या संदर्भात आहेत ?

(a) आणि (c)
(b) आणि (d)
(a), (b) आणि (C)
वरील सर्व 
उत्तर= (2)

 

124. A याने B चा e-mail id हॅक करून C ची बदनामी केली.                                                                       तर A ने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या अंतर्गत कोणता गुन्हा केला?

ई-मेल बॉम्बंग
आयडेंटीटी थेफ्ट 
ई-मेल फ्रॉड (फसवणूक) 
ई-मेल स्पुफिंग
उत्तर= (2)

 

125. कार्यालयीन गुप्ततेचा अधिनियम, 1923 नुसार माहिती उघड केल्यास अपराधाची सजा कोणाला होते?

कार्यालयीन माहिती उघड करणान्यास
कार्यालयीन माहिती स्वीकारणाच्यास 
वरीलपैकी कोणालाही नाही
वरील दोघांनाही 
उत्तर= (4)

 

126. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार (प्रतिबंध) अधिनियम या संदर्भात पुढील गोष्टींचा विचार करा आणि कलम 3 प्रमाणे अत्याचार घडला आहे किंवा नाही ते सांगा.

(a) "a" या गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी गावच्या अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करुन त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले.

(b) "किसन'' या अनुसूचित जातीच्या, केशकर्तनालयाच्या मालकाने पांडूचे केस कापण्यास, तो अनुसूचित जमातीचा आहे म्हणून नकार दिला आणि त्याला मारुन दुकानाबाहेर काढले.

पर्यायी उत्तरे :

(a) मधे अत्याचार आहे (b) मधे नाही.
(a) मधे अत्याचार नाही (b) मधे आहे.
(a) आणि (b) दोन्ही मधे अत्याचाराचा गुन्हा घडला आहे.
(a) आणि (b) दोन्ही उदाहरणात वरील कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र अत्याचार घडलेला नाही
उत्तर= (4)

 

127. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून _______ च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करता येत नाही.

जिल्हा दंडाधिकार
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी 
जिल्हा न्यायाधीश
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश
उत्तर= (2)

 

128. पत्नी, मुलबाळं आणि पालक यांना निर्वाह रक्कम देण्यासंदर्भात कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे?

कलम 122 फौ.प्र.सं.
कलम 125 फौ.प्र.सं.
कलम 127 फौ.प्र.सं.
वरीलपैकी काहीही नाही
उत्तर= (2)

 

129. नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम _______ नुसार राज्य शासनाला सामुदायिक द्रव्यदंड बसविण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे.

9
10
10 -C
वरीलपैकी कोणतेही नाही 
उत्तर= (4)

 

130. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मधील कलम ______ मध्ये विशेष न्यायालयाची व्याख्या दिलेली आहे.

2(1)(a)
2(1)(c)
2(1)(d)
2(1)(f)
उत्तर= (3)

 

131. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 2 (______) नुसार “अ‍ॅसीमेट्रिक क्रिप्टो सिस्टम्' म्हणजे डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेली सिक्युअर की पेअर पद्धती होय.

 
e
h 
g
उत्तर= (1)

 

132. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील कलम ________ मध्ये सायबर दहशतवादासाठी शिक्षेची तरतूद दिलेली आहे.

66 B
66 C
66 F
वरीलपैकी नाही
उत्तर= (3)

 

133. ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या अनुषंगाने जोड्या लावा. 


उत्तर= (4)

 

134. कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे?

व्हिएन्ना अकॉर्ड 1994
बिजिंग डिक्लरेशन
प्लॅटफॉर्म फॉर अ‍ॅक्शन, 1995 
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

135. मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 नुसार जोड्या लावा.



उत्तर= (1)

 

136. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत पुढीलपैकी ''त्रयस्थ व्यक्ती'' कोण?

(a) भारताचा नागरिक

(b) भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती परंतु जिने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला आहे

(c) सार्वजनिक प्राधिकरण

पर्यायी उत्तरे :

(b) आणि (C)
(a) फक्त 
वरीलपैकी सर्व
वरीलपैकी कोणी नाही 
उत्तर= ()

 

137. खालीलपैकी कोणते प्रशासकीय कायद्याचे उगम आहे/आहेत? 

कायदे कानून
मंडळांचे अहवाल (Committee Reports)
प्रशासकीय चाली-रिती
वरीलपैकी सर्व 
उत्तर= (4)

 

138. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ________ मध्ये अटक वे नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतूदी दिलेल्या आहेत.

20
21 
22
वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर= (3)

 

139. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 2(1)(P) अन्वये ''राज्य आयोग'' म्हणजे खंड _______  कलम ________  खाली राज्यात स्थापन झालेला ग्राहक तक्रार निवारण आयोग होय.

a, 7
b, 9
c, 8
c, 9
उत्तर= (2)

 

140. नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 या कायद्याअंतर्गत "दुकान'' याचा अर्थ काय ?

(a) जेथे घाऊक माल विकला जातो अशी जागा.

(b) जेथे किरकोळ माल विकला जातो अशी जागा.

(c) फेरीवाला किंवा विक्रेता याच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यामधून जिथे माल विकला जातो     असे स्थान.

(d) धुलाई घर.

योग्य उत्तर निवडा :

(a) आणि (b)
(a), (b) आणि (d) 
(a), (b) आणि (c)
वरील सर्व
उत्तर= (4)

 

141. माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद _______ अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त _______ असेल. 

15, नागरिकांना
21, सरकारी दफ्तरांना
19(1)(a), नागरिकांना
19(1), सरकारी अधिका-यांना
उत्तर= (3)

 

142. सायबर अपिलेट ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात ?

भारताचे राष्ट्रपती
राज्याचे राज्यपाल
भारताचे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्र सरकार
भारताचे सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने केंद्र सरकार
उत्तर= (4)

 

143. प्रशासनिक न्यायाधिकरणाच्या अनुषंगाने जोड्या लावा :


उत्तर= (3)

 

144. ए.के. क्रायपाक या दाव्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?

आर्थिक पक्षपात
वैयक्तिक पक्षपात
विषयाबाबत पक्षपात
वरील सर्वच
उत्तर= (2)

 

145. खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मुळ आहे ?

राज्यघटना
कायदे
केस कायदा
वरील सर्व
उत्तर= (4)

 

146. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालविलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश किती कालावधीचा तुरुंगवासाच्या शिक्षेचा आदेश पारित करू शकतात ?

एक महीना
तीन महीने
सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेला
एक वर्षापेक्षा जास्त नसलेला
उत्तर= (4)

 

147. नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम 15 नुसार कोणाला अपराधाची दखल घेऊन खटला चालविण्याचा अधिकार आहे?

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
सत्र न्यायालय 
पोलीस अधिक्षक
वरीलपैकी कोणीही नाही
उत्तर= (1)

 

148. जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगात अपिल दाखल करण्याकरिता कोणती पूर्व-अट घातलेली आहे ?

रुपये दहा हजाराची ठेव
रकमेच्या पन्नास टक्के किंवा रुपये पंचवीस हजार यापैकी कमी असलेली रक्कम 
रकमेच्या पन्नास टक्के किंवा रुपये पस्तीस हजाराची ठेव
रकमेच्या पन्नास टक्के किंवा रुपये पन्नास हजाराची ठेव
उत्तर= (2)

 

149. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतूदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तिस करता येणार नाही ?

कलम 17
कलम 18
कलम 19
कलम 20
उत्तर= (2)

 

150. "माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गुपिते अधिनियम' या दोन्ही कायद्यांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा.

(a) वरील दोन्ही कायद्यात परस्परविरोधी तरतुदी आढळल्यास ‘‘माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील.

(b) दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत "हेरगिरी'' करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.

योग्य उत्तर निवड़ा : 

(a) बरोबर (b) चूक
(a) चूक (b) बरोबर
(a) आणि (b) दोन्ही विधाने चूक 
(a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर

उत्तर= (1)

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या