राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - पेपर २

 


MPSC-Prelim-General-Studies-Paper-2

MPSC-Prelim-2018-General-Studies-Paper-2-Final-Key



पुढील उतारावाचून त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या : 

हरितक्रांतीचे प्रतिकूल परिणाम

         स्वातंत्र्या नंतरच्या काळातील सततचे दुष्काळ व अन्नधान्याचा तुटवडा यातून देशाला सावरण्यात पहिल्या हरितक्रांतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली यात शंकाच नाही. वेगाने वाढणारी लोकसंख्या व अन्नधान्याचा तुटवड़ा यामुळे अतिशय भयावह स्थिती निर्माण झाली होती. परंतु अशा परिस्थितीत हरितक्रांतीमुळे कृषि उत्पादकतेत वाढ करून अन्नसुरक्षेसारखी गंभीर समस्या हाताळणे सहज शक्य झाले.


         तरीही हरितक्रांतीचे काही प्रतिकूल परिणाम झाले आणि ते दीर्घकाळ अनुभवास येत आहेत. हरितक्रांतीमुळे केवळ गहू व तांदुळ यासारख्या तृणधान्य पीकांच्या उत्पादन वाढीवर अधिक भर देण्यात आला. परंतु याचवेळेस इतर कडधान्य पीके, फळे, भाजीपाला यांचे उत्पादन मात्र घटले. फळे व भाजीपाला उत्पादन वाढीचा सद्य स्थितीतील दर पाहता भविष्यकालीन वाढती मागणी व लोकसंख्येत होणारी वाढ यांचा मेळ घालणे कठीण आहे.
          तथापि, एकाच प्रकारच्या तृणधान्य पीकांचे (तांदूळ, गहू) सातत्याने उत्पादन घेतल्याने मृदेची सुपीकता कमी होत आहे. नापीक होणा-या मृदेत कडधान्ये व भाजीपाला पीके उत्पादित करणे अधिक कठिण होत आहे. एकपीक पद्धतीमुळे (वर्षानु वर्षे सतत एकाच जातीच्या पीकाचे उत्पादन होणे) पीकांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते व ते विविध प्रकारच्या रोगांना आणि कीटकांना लवकर बळी पाडतात. हेच तर पहिल्या हरितक्रांतीचे सर्वात मोठे प्रतिकूल फली आहे.
        पहिल्या हरितक्रांतीचा दुसरा दोष म्हणजे रासायनिक खते, किटक नाशके व बुरशीनाशकांचा स्वैर वापर होय. यांच्या अतिजास्त वापराचा देशाच्या कृषीव्यवस्थेच्या भवितव्यात फार मोठा धोका आहे. अतिरिक्त आणि अप्रस्तुत असा रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर विविध प्रकारच्या पर्यावरणीय विनाशास कारणीभूत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, जलस्त्रोतांचे प्रदूषण, कृषि क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाधा ही गंभीर समस्या आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून उपयुक्त किटकांचा व इतर वन्यजीवांचा हास होत आहे.

         पहिल्या हरितक्रांतीने शेतीशी संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामध्ये मुख्यत्वे जिरायती व कोरडवाहू शेती, डोंगरील प्रदेश, किनारी प्रदेश, शुष्क व वाळवंटी प्रदेश इत्यादिंचा समावेश होतो हे प्रदेश देखील फलोत्पादन, मध उत्पादन, आळंबे (मशरूम), दूध, मांस इत्यादिंच्या निर्याती करीता सक्षम म्हणून विकसित झाले असते. हरितक्रांतीचे समीक्षक असाही युक्तीवाद करतात कि फक्त मोठे शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात कारण त्यांच्याकडे जलसिंचनाच्या सुविधा असतात. रासायनिक खते व बी-बियाणांकरीता त्यांना सहज वित्तपुरवठा होतो. लहान व अल्पभूधारक शेतकरी एकतर हरितक्रांतीपासून दूर राहिले किंवा त्यांचा उत्पादन खर्च अधिक होता व त्या तुलनेत कमी उत्पन्न मिळते. याचबरोबर जमीनदार लोक सतत जमिनीचा दंड वाढवतात किंवा दंडाने दिलेल्या जमिनी परत होतात. हरितक्रांतीमुळे शेतीमध्ये अनावश्यक यांत्रिकीकरण आले. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार कमी होवून मजूरीचे दरही कमी झाले.
       जलसिंचनाच्या सदोष पद्धतींमुळे कृषीयोग्य सुपीक जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढले व त्यामुळे शेती योग्य चांगल्या जमिनी नापीक झाल्या, जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा झाल्याने भूजल पातळी प्रचंड प्रमाणात खालावली.


 1. पहिल्या हरितक्रांतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली नाही ?

अ. कोरडवाहू प्रदेश

ब. किनारी प्रदेश

क. सुपीक जमीनीचे प्रदेश

ड. वाळवंटी प्रदेश

पर्यायी उत्तरे :

फक्त अ आणि क
फक्त क आणि ड
फक्त अ, ब आणि ड
वरील सर्व बरोबर
उत्तर= (3)

 

2. खालीलपैकी हरितक्रांती संबंधी कोणती टीका बरोबर आहे ?

अ. जल प्रवाहांचे प्रदुषण 

ब. हवेचे प्रदुषण 

क. कृषी क्षेत्रातील कामगारांस होणारी विषबाधा

ड. उपयुक्त कीटकांचा व इतर वन्यजीवांचा र्‍हास 

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ आणि ब
फक्त क आणि ड
फक्त ब
फक्त अ, क आणि ड
उत्तर= (4)

 

3. खालीलपैकी कोणते/कोणती विधाने हरितक्रांती संबंधी बरोबर आहे ?

अ. तांदूळ व गहू या सारखी तृणधान्ये उत्पादनावर भर होता.

ब. कडधान्ये, फळे आणि भाजीपाला/उत्पादनात घट.

क. कडधान्ये, फळे व भाजीपाला उत्पादनावर भर.

ड. वर्षामागून वर्षे जमीनीच्या सुपीकतेत हळू हळू घट.

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ, ब आणि ड 
फक्त क
फक्त अ आणि क
वरील सर्व बरोबर

उत्तर= (1)

 

4.हरितक्रांतीच्या काळात खालीलपैकी कोणता/कोणते पर्यावरणावर झालेले परिणाम बरोबर आहेत ?

अ. जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती

ब. जमीनीत वाढते क्षारांचे प्रमाण

क. शेती योग्य चांगल्या जमीनीचा नापिक झाल्या

ड. भूजल पातळी खाली जाणे

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ
फक्त ब आणि क
फक्त अ, ब आणि ड
वरील सर्व बरोबर
उत्तर= (4)

 

5. खालीलपैकी कोणते परिणाम हरितक्रांती संबंधी बरोबर आहेत ?

अ. वर्षामागून वर्षे एकच तृणधान्य पिकविल्यामुळे जमीनीची सुपीकता कमी होत गेली.

ब. जमीनीची सुपीकता घटल्याने कडधान्ये व भाजीपाला पिकविणे अवघड झाले.

क. एकपीक पद्धतीमुळे पीकांची रोगास प्रतिकार क्षमता घटली.

पर्यायी उत्तरे :

फक्त अ
फक्त अ आणि ब
फक्त अ आणि क
वरील सर्व बरोबर
उत्तर= (4)

 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 6 ते 10 प्रश्नांची उत्तरे द्या :
              मागील अर्धशतकामध्ये सर्व समाजाला आकार देणारी एकमेव आर्थिक शक्ती म्हणजे संवाद तंत्रज्ञान होय. या नव्या संवाद क्रांतीमुळे भौगोलीक व राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत. आजच्या बदलत्या जगात जागतिक पातळीवर इ-कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे व्यापाराच्या नवनविन संधी निर्माण होता आहेत ज्या संधी सोडणे कोणत्याही देशास परवडणारे नाही. विज्ञान तंत्रज्ञानातील अशा प्रस्फोटी, नवोपक्रमी विकासाने आंतराष्ट्रीय व्यापाराची दिशा व प्रवृत्ती यावर खोलवर परिणाम केला आहे.
              आर्थिक विकास प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका सार्वत्रिक मान्यता पावलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा विविध प्रकारचे स्थिर व बदलते लाभ प्राप्त करून देत असल्याने विकासाची क्षमता वाढवित असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकार जेव्हढा जास्त तेव्हढी विकासाची क्षमता जास्त. आर्थिक इतिहासात अशा अनके देशांच्या यशोभाथा दिसून येतात जे सुरूवातीच्या काळात तुलनात्मक दृष्टया विकसनशिल देश होते, मात्र परकीय व्यापाराच्या माध्यमाने विकसित देशात रूपांतरीत झाले.
                  व्यापार ही मानवी संस्कृतिइतकीच जुनी बाब आहे. कारण कोणतीही व्यक्ती व म्हणूनच कोणताही समाज स्वयंपूर्ण असू शकत नाही. पूर्वीच्या काळी व्यापार हा वस्तू विनिमयाच्या स्वरूपात होत होता. नंतरच्या काळात व्यापार केवल वस्तूविनिमय ते पैसा विनिमय इतकाच बदलला नाही तर संगणकाच्या माध्यमाने जगाच्या एका भागातून दुस-या भागात लोक केवळ वस्तु व सेवांचाच नव्हे तर स्टॉक, बॉन्डस् आणि वित्तिय कर्ज तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलनांचे व्यवहारही करू लागले.
              वेगवान व स्थिर वृद्धीचे निर्यात प्रोत्साहन हे उत्तम माध्यम असल्याने 1960 पासून निर्यात प्रोत्साहनाकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. भारतीसाठी निर्यातवृद्धी ही चैनीची बाब राहीली नाही हे आता मान्य झाले आहे. देशाच्या स्वावलंबनाशी तडजोड न करता देशाची विकास गती राखण्यासाठी लागणारे पुरेसे परकीय चलन मिळविण्यासाठी परकीय व्यापार ही पूर्वअट आहे. भारतीय परिस्थितीत निर्यात ही आर्थिक प्रगतीचे इंजिन म्हणून परिणामकारक कार्यभाग साधू शकते.
            निर्यात व्यापार हे भारतीय अर्थव्यस्थेतील स्थितीसाठी एक महत्वाचे अंग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. निर्यात ही देशातील न वापरलेली नैसर्गिक व मानव संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास मदत करते, देशांतर्गत बाजाराच्या मर्यादा ओलांडते, अर्थव्यवस्थेचे संघटन व सक्षमिकरण करते आणि परकीय मदतीवरील अवलंबित्व किमान करते ज्यामुळे अर्थव्यवस्थेचे परिवर्तन होते असा दीर्घकालीन विश्वास आहे.
             कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेतील महत्वाचा घटक, म्हणजे निर्यात होय, भारतासारख्या विकसनशिल देशाबाबत त्याचा तार्किक आधार म्हणजे निर्यातीपासून मिळणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होय.


6.भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण 

संवाद तंत्रज्ञान
नवी संवाद क्रांती 
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
डिजिटल टूल्स
उत्तर= (2)

 

7.विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?

व्यापाराची दिशा
 आयात व्यापार
 व्यापाराचे आकारमान
वरीलपैकी एकही नाही
उत्तर= (3)

 

8.व्यापार ही मानवी संस्कृति इतकीच जुनी बाब आहे. कारण

कोणीही स्वयंपूर्ण नाही
विकासाची हाव 
गरजा अमर्याद आहेत
साधन संपती मर्यादित आहे
उत्तर= (1)

 

9.संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले

 वस्तू व सेवा
मानवी साधन संपत्ती
नैसिर्गिक साधन संपत्ती 
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन
उत्तर= (4)

 

10.परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. 

निर्यात प्रोत्साहन
संवाद तंत्रज्ञान
संवादक्रांती
परकीय व्यापार आणि आर्थिक विकास
उत्तर= (4)

 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 11 ते 15 प्रश्नांची उत्तरे द्या :


           विविध साधनांद्वारे प्रकाशाच्या आश्चर्याचा आनंद घेता येतो. आरसे व भिंग हे यापैकी. सपाट आरसा आपणास माहीत आहे. अंतर्वक्र व बहिर्वक्र आरसे प्रकाशाचे अभिसरण वे अपसरण करण्यासाठी गरजेनुसार वापरले जातात, गोलीय आरशाचे नाभीय अंतर त्याच्या त्रिज्येच्या निम्मे असते. वस्तुचे अंतर व प्रतिमेचे अंतर यांच्या गुणाकाराचे व बेरजेचे गुणोत्तर हे आरशाचे नाभीय अंतर असते. बहिर्वक्र व अंतर्वक्र भिंग सुद्धा अशाच वरील हेतूसाठी वापरले जातात. वस्तुचे अंतर व प्रतिमेचे अंतर यांच्या गुणाकाराचे व फरकाचे गुणोत्तर हे भिंगाचे नाभीय अंतर असते.
           नवीन कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार धृवापासून किंवा मध्यापासून डावीकडे आणि अक्षाच्या खालील मोजमापे ऋण घेतात, तर उजवीकडे आणि अक्षाच्या वरील मोजमापे धन घेतात. भिंगाची अभिसरण किंवा अपसरण क्षमता ही भिंगाची शक्ती, डायॉप्टर एककात असते. एक डायॉप्टर हा नाभीय अंतराचा मीटर एककातील गुणाकार व्यंस्तांक असतो.
                सर्वसाधारणपणे आरसे किंवा भिंग हे वस्तुच्या तुलनेत विशाल प्रतिमा मिळवण्यासाठी वापरले जातात. विशालन हे प्रतिमेची आकार वे वस्तुची आकार यांचे किंवा प्रतिमेचे अंतर व वस्तुचे अंतर यांचे गुणोत्तर असते. आरसे व भिंगांचा वापर टॉर्चेस व हेडलाइर्डटस्, फ्लड लाईटस्, प्रोजेक्टर लॅम्प, सौर उपकरणे आणि भट्टी, कॅमेरा, वर्णपटदर्शक, साधा सुक्ष्मदर्शी, संयुक्त सुक्ष्मदर्शी, दूरदर्शी, चष्मे इत्यादीमध्ये केला जातो. मानवी डोळा हा एक प्रकाशिय उपकरण आहे. प्रकाश पातळ पारपटल, बुबुळ, प्रकाश नियंत्रक व नियमन करणारी व स्वत:चा व्यास बदलू शकणारी, वे परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती असलेली बाहुली यांच्यातून प्रवेश करतो. बाहुलीच्या मागे समायोजन शक्ती असणारे द्विवहिर्वक्र स्फटिकमय भिंग असते. शेवटी दृष्टिपटलावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होते. निरोगी डोळयापासून सुस्पष्ट दृष्टिचे लघुत्तम अंतर 25 सेमी असते.
                परंतु डोळयातील स्नायू पुरेशे शिथिळ न होणे किंवा अशक्त होणे, भिंगाची अभिसारी शक्ती जास्त किंवा कमी होणे, भिंग व दृष्टिपटल यांच्यातील अंतर जास्त किंवा कमी होणे, बुबुल लांबट किंवा लहान होणे यांमुळे लघुदृष्टिता, दूरदृष्टिता व वृद्धदृष्टिता असे विविध अपवर्तन दोष निर्माण होतात. योग्य अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र भिंग वापरून हे दोष दूर करता येतात. एकाचवेळी दोन्ही दोष देखील आढळून येतात. अशावेळी द्विनाभीय भिंग वापरले जाऊ शकतात.


11.एका वस्तुची उंची 3 सेमी असून 24 सेमी वक्रता त्रिज्या असणा-या अंतर्वक्र आरशापासून 20 सेमी अंतरावर ठेवली आहे. सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी आरशापासून पडदा किती अंतरावर असावा ? तसेच प्रतिमेचा आकार किती ?

        पडद्याचे अंतर                   प्रतिमेचा आकार 

-  30 सेमी                             + 4.5 सेमी 
-  30 सेमी                             -  4.5 सेमी     
+ 4.5 सेमी                                -  30 सेमी 
-  4.5 सेमी                            30 सेमी 
उत्तर= (2)

 

12.सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेमी असणा-या व्यक्तीच्या चष्म्याची नाभीय शक्ती किती असावी ?

0.02 डायॉप्टर
0.2 डायॉप्टर
2 डायॉप्टर
20 डायॉप्टर
उत्तर= (3)

 

13.यादीतील खालील उपकरणांमध्ये आरशे व भिंग वापरले जातात. त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करा.

(i) हेडलाइट्स

(ii) दूरदर्शी

(ii) संयुक्त सुक्ष्मदर्शी

(iv) प्रोजेक्शन लॅम्प

(v) फ्लडलाइट्स

(vi) साधा सुक्ष्मदर्शी 

            आरशे                           भिंग

(1)    (i), (iv), (v)                 (ii), (iii), (vi)

(2)    (iii), (iv), (ii)               (i), (vi), (v) 

(3)    (i), (ii), (vi)                 (iii), (iv), (v)  

(4)    (ii), (iii), (vi)               (i), (iv), (v)


उत्तर= (1)

 

14.एका व्यक्तीच्या डाव्या डोळ्यात लघुदृष्टिता व उजव्या डोळ्यात दूरदृष्टिता दोष आहेत. त्याच्या चष्म्याचे उजवे व डावे भिंग अनुक्रमे _________ व _________ असायाला हवेत. 

बहिर्वक्र, द्विनाभीय
अंतर्वक्र, द्विनाभीय
अंतर्वक्र, बहिर्वक्र
बहिर्वक्र, अंतर्वक्र

उत्तर= ()

 

15.1 मिमी x 1 मिमी च्या चौरसाची नक्षी असलेले कार्ड शीट, डोळ्यांच्या अगदी जवळ असलेल्या 9 सेमी नाभीय अंतराच्या बहिर्वक्र भिंगातून 9 सेमी अंतरावरून बघितल्यास, त्या कार्ड शीट वरील चौरस _____________ आकाराचे दिसतील. 

 10 मिमी x 10 मिमी
 10 मिमी
 10 सेमी2
 1 मिमी2
उत्तर= (1)


पुढील उतारावाचून त्यावर आधारित 16 ते 20 प्रश्नांची उत्तरे द्या :
              देवाला समर्पित करण्यासाठी फूल उत्कृष्ट सेवा देतात. वैयक्तिक सौंदर्याकरिता ते अमूल्य मदत करतात व कवींकरिता प्रेरणेचा स्रोत आहेत.
            वनस्पतिंकरिता फुले लैंगिक प्रजोत्पादनाचे काम करणारी रचना आहेत. बियाचे अंकुरण झाल्यानंतर झाडांची सतत वाढ होते आणि ते पूर्णपणे परिपक्व होतात. जीवनात एका विशिष्ट वेळी लैंगिक अवस्थेत पदार्पण करून वनस्पती फुलायला लागतात. फुलाच्या देठास पुष्पवृंत असे म्हणतात. फुल साधारणे चार प्रकारच्या अवयवांपासून बनलेले असते. सर्वात बाहेरचा हिरव्या अवयवांचा गट म्हणजे निदलांचे निदलपुंज व त्या नंतर आकर्षक रगांचे दलांचे दलपुंज अंसतात. त्या नतंरचा अवयव पुंकेसर ज्याच्या गटास पुमंग म्हणतात, जे नर लैंगिक अवयवाचे प्रतिनिधित्व करतात फुलाचा मध्यभाग हा मादी लैगिक गट जायांग या अवयवाने व्यापलेले असतो. ज्याचा अडंप हा घटक असतो. जायांग आणि पुमंग ह्यांच्या अस्तित्वानुसार फूल नर, मादी किंवा उभयलिंगी असू शकते. पुकेसरांच्या परागकोषिकामध्ये परागकण तयार होतात. नंतर परिपक्व परागकरण हे अडेपाच्या कुक्षिवर वाहून नेल्या जातात. या प्रक्रियेला परागीकरण असे म्हणतात. कुक्षि परागकणांना नैसर्गिकरित्या अकुंरीत होण्यासाठी लागणारी परिस्थिति उपलब्ध करून देते.
             विविध जैविक व अजैविक घटकांच्या माध्यमातून परागकण कुक्षिवर वाहून नेले जातात. जैविक घटकांमध्ये मधमाश्या, किटक, पक्षी, वटवाघूळ, मुंग्या, पशू इत्यादींचा अंतर्भाव होतो आणि अजैविक घटक हवी आणि पाणी आहेत.
          परागीकरणाची प्रक्रिया अतिशय मूलभूत असून फळे व बीजधारणे करीता महत्त्वाची आहे. त्याच प्रमाणे जैवविविधतेचे संवर्धन होण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. उत्क्रांतीमध्ये परागीकरण करणारे घटक आणि वनस्पतींची सहउत्क्रांती झालेली आहे. काही वनस्पतींमध्ये फक्त सजीव घटकांची परागीकरण करण्याकरीता नितांत आवश्यकता असते, त्यांच्या अभावी वनस्पती नष्ट होऊ शकतात. यशस्वी परागीकरण जर झाले नाही तर वनस्पतीच्या पुनरूत्पादनाची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल. म्हणून, वनस्पती वे त्यांचे परागीकरण करणाच्या घटकांचे सुद्धा संवर्धन होणे आवश्यक आहे. परागीकरणाची प्रक्रिया कोणत्याही कारणाने अयशस्वी झाली तर बीजधारणा होण्याची प्रक्रिया थांबेल.

 

16.लैंगिक पुनरूत्पादनामध्ये सहभागी होणा-या फुलाच्या विविध अवयवांमध्ये खालीलपैकी काय दुर्लक्षित करता येणार नाही ?

निदल 
 दल 
देठ
 पुंकेसर

उत्तर= (4)

 

17.परागीकरणानंतर फुलाचा कोणता अवयव परागकण अंकुरित करण्याचे कार्य करतो ?

कुक्षीवृत 
 कुक्षी
 बीजकोश
 पुंकेसर
उत्तर= (2)

 

18.जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?

परागीकरण
फलन
 पुनरुत्पादन
4. वरीलपैकी सर्व 

उत्तर= (1)

 

19.लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा

परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील
परागनलिका बीजकोषात पोहचेल
 फळांमध्ये बीजधारणा होईल
4.  

उत्तर= (3)

 

20.उत्क्रांती दरम्यान वनस्पतीची व परागीकरण करणाच्या घटकांची उत्क्रांती 

स्वतंत्रपणे झाली
एकमेकांसोबत झाली 
 प्रथम वनस्पतींची व नंतर परागीकरण करणा-या घटकांची झाली 
4. प्रथम परागीकरण करणाच्या घटकांची व नंतर वनस्पतींची झाली

उत्तर= (2)


पुढील उतारावाचून त्यावर आधारित 21 ते 25 प्रश्नांची उत्तरे द्या :
                                                    आम्लपर्जन

सर्वसाधारणपणे पावसाच्या पाण्याचा pH 5.6 असुन तो त्याच्यातील H+ आयन्स तयार झालेल्या पावसाच्या पाण्यात व कार्बनडायऑक्साईड (वातावरणातील) यांच्यातील अभिक्रियेमुळे.
                                             H20 (l) + CO2 (g) = H2C03 (aq)

                                             H2CO3 (aq) = H (aq) + HC03° (aq)

ज्यावेळी पावसाच्या पाण्याचा pH 5.6 पेक्षा कमी असतो त्यालाच आम्ल पर्जन म्हणतात. आम्ल पर्जन हा वेगवेगळया मानवी क्रियापासुन वातावरणात बाहेर पडणाच्या सल्फर व नायट्रोजन ऑक्साईड चा उपपदार्थ आहे. जैवइंघनाच्या कोळसा आणि तेल ज्वलनातुन (वीजगृहातुन) आणि भट्टयातुन किंवा पेट्रोल आणि डिझेल च्या यंत्रातुन निघणा-या सल्फरडायऑक्साईड व नायट्रोजन डायऑक्साईड ऑक्सडिकिरणातून आणि पाण्याच्या अभिक्रियेतून निघणारे प्रमुख घटक आम्लपर्जन तयार करतात. आम्लपर्जन शेतीसाठी, बनस्पतीसाठी, झाडे यांच्यासाठी हानीकारक आहे कारण तो वाढीच्या अन्नघटक विरघळवतो किंवा धुवून टाकतो. मनुष्यप्राण्यामध्ये तो श्वसनाचे आजार निर्माण करतो. पाण्याखालचे परिसंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे जलवाहिन्या आतुन गंजतात त्याला Fe, Pb आणि Cu चे थर बसतात व पिण्याच्या पाण्यात उतरतात. इमारती आम्लपर्जनाने खराब होतात, तसेच धातु तसेच शिल्प वस्तुही खराब होतात. भारतातील
ताजमहलावर आम्लपर्जनामुळे परिणाम झालेला आहे. 

 

21.पर्जण्यास आम्ल पर्जन म्हणतात जेव्हा, pH चे मुल्य _____________ असते.

7.0
8.3
 7.9
4. 5.6 पेक्षा कमी

उत्तर= (4)

 

22.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन ___________ हे बनते

HCO(aq)
H2CO3 (aq)
 H2CO2 (aq)
4. H3CO3 (aq)

उत्तर= (2)

 

23.जीवाश्म इंधन आणि पेट्रोलियमच्या ज्वलनातुन ____________ हे वायु मिळतात.

SO आणि NO
SO2  आणि NO2
 S आणि N2
4. NHआणि SO2
उत्तर= (2)

 

24.आम्लपर्जन्य, वनस्पतीसाठी हानीकारक आहे कारण 

ते अन्नद्रव्य पुरवितात
अन्नद्रव्य हे पूरक म्हणून टाकतात 
हे अन्नद्रव्य धुवून काढतात
अन्नद्रव्य तशीच राहतात
उत्तर= (3)

 

25.भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला

तीव्र पर्जन्य
आम्ल पर्जन्य
3. सतत पर्जन्य
 
उत्तर= (2)

 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 26 ते 30 प्रश्नांची उत्तरे द्या :
            अरूण तिवारी ने मला माझ्या आठवणी त्याला सांगण्याची विनंती केली. तो त्या नोंदवून ठेवणार होता. तो माझ्या प्रयोगशाळेत 1982 पासून काम करीत होता, पण फेब्रुवारी 1987 मध्ये हैद्राबादच्या निझाम इंन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेसच्या हदयाला रक्त पुरवठा करणाच्या रक्तवाहिन्यांसंदर्भातील अति दक्षता विभागात मी त्याला भेटालो तोपर्यंत मी त्याला फारसे ओळखत नव्हतो. तो अवघ्या 32 वर्षांच्या होता, पण त्याचा जीव वाचविण्यासाठी बहादुरीने लढत होता. मी तुझ्यासाठी काही करावे असे तुला वाटते का असे मी त्याला विचारले. “सर, मला तुमचे आशिर्वाद हवे आहेत जेणेकरून मला दीर्घायुष्य लाभेल आणि मी तुमचा किमान एक तरी प्रकल्प पूर्ण करू शकेन.
              त्या तरूण माणसाच्या निष्ठेने मन हलवून सोडले आणि मी रात्रभर त्याला बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली आणि तिवारी एका महिन्यात कामावर परत येऊ शकला. 'आकाश' क्षेपणास्त्राची एअरफ्रेम अगदी शून्यातून साकारण्याच्या कामात मदत करण्याचे उत्कृष्ठ काम तीन वर्षाच्या छोटया कालावधीत त्याने केले. त्यानंतर त्याने माझी कथा कालक्रमानुसार लावण्याचे काम हाती घेतले. गेल्या वर्षभरात सहनशीलता दाखवत त्याने माझ्या कथेच्या विखुरलेल्या तुकड्यांची नक्कल केली आणि त्याचे एका प्रवाही कथे मध्ये रूपांतर केले. त्याने माझे वैयक्तिक ग्रंथालय बारकाईने धुंडाळले, त्यामधून मी वाचता वाचता खुणा करून ठेवलेल्या कविता निवडल्या आणि त्यांचा माझ्या कथेच्या संहितेमध्ये समावेश केला.
                 मला असे वाटते की ही कथा केवळ माझ्या वैयक्तिक यशाची आणि दु:खाची नाही तर तंत्रज्ञानाच्या आघाडीवर स्वत:ला स्थापित करण्यासाठी संघर्ष करणाच्या आधुनिक भारतातील प्रस्थापित शास्त्र विषयक समूहाच्या यशाची आणि त्यांना बसलेल्या झटक्यांची, त्यामुळे झालेल्या तात्पुरत्या पिछेहाटीची कहाणी आहे. ती राष्ट्रीय आकांक्षेची आणि सहकार्यावर आधारित प्रयत्नांची कहाणी आहे. आणि माझ्या दृष्टीने शास्त्रीय बाबतीतील स्वयं सिद्धतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा शोध घेणा-या भारताची शौर्यकथा आपल्या काळातील एक बोधकथा आहे.
                  या सुंदर ग्रहावरील प्रत्येक जीव ईश्वराने विशिष्ठ भूमिका पार पाडण्यासाठी निर्माण केला आहे. आयुष्यात मी जे काही मिळवले आहे ते त्याच्या मदतीद्वारेच, ती त्याच्या इच्छेची अभिव्यक्ती होती. काही विलक्षण प्रतिभेच्या शिक्षक आणि सहका-यांच्या माध्यमातून त्याने माझ्यावर त्याच्या कृपेचा वर्षाव केला
आणि या प्रतिभावान व्यक्तींप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा मी केवळ त्याच्या वैभवाचे कौतुक करीत असतो. ही सर्व रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे हे ए.पी.जे. अब्दुल कलाम या नावाने ओळखल्या जाणा-या छोट्या माणसाच्या माध्यमातून केलेले त्याचे काम आहे.


26.वरील उताच्याचे लेखक ____________ आहेत.

अशोक तिवारी 
ओळखता येत नाहीत
3. ए.पी.जे. अब्दुल कलाम
हैद्राबादमधील एक डॉक्टर
उत्तर= (3)

 

27.उता-यावरून असे सूचित होते की अशोक तिवारी यांनी एक _____________ लिहिली/लिहिले/लिहिला/लिहिण्यास मदत केली.

कलामांवरील लेख

कलामांचे चरित्र

कलामांचे चरित्र


उत्तर= (4)

 

28.कलाम हे __________ होते. (खालील पर्यायांमधून अधिक परिपूर्ण वर्णन निवडा)

अज्ञेयवादी
आस्तिक
3. नास्तिक
आस्तिक, शास्त्रज्ञ आणि प्रचंड वाचन करणारे

उत्तर= (4)

 

29.आकाश क्षेपणास्त्राची ___________ कालावधीत तयार करण्यात आली.

32 वर्षांच्या
3 वर्षांच्या
3. 2 वर्षांच्या
5 वर्षांच्या
उत्तर= (2)

 

30.अरूण तिवारी _________ ग्रासलेले होते.

हृदयाशी संबंधीत विकाराने
असाध्य रोगाने
3. एक प्रकारच्या कैन्सरने
अपघाताने
उत्तर= (1)


पुढील उतारावाचून त्यावर आधारित 31 ते 35 प्रश्नांची उत्तरे द्या :
             अतिरिक्त उत्पादनाला आवर घालून त्यामुळे कोसळणा-या शेतमालाच्या किमतींवर नियंत्रण आणून शेतक-यांना मदत करण्यासाठी एग्रिकल्चरल अडजस्टमेंट एक्ट हा कायदा आला. शेतक-यांनी धान्य लागवड आणि गुरांची पैदास करू नये यासाठी त्यांना मोबदला दिला जाई, शेते न पिकवता मोकळी ठेवली जाते आणि अतिरिक्त उत्पादन नष्ट केले जाई. या धोरणावर बरीच टीका झाली. अमेरिकेत आणि जगातही कोट्यावधी लोकांना अन्न परवडत नसतानाही त्याची गरज होतीच, पण ते अन्न त्यांना देण्याचा कोणताच मार्ग राजकीयदृष्ट्या शक्य नव्हता.
                    सरकारने दक्षिणेकडे 6,40,000 चौरस मैलांवर पसरलेल्या क्षेत्रात टेनेसी नदी खो-याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. पहिल्या महायुद्धात अलाबामामध्ये मसल शोल्स येथे सरकारने धरण आणि दारूगोळा कारखाना उभारला होता. शांतता काळात तो विकण्याचे प्रयत्न फसले होते. आता 1933 मध्ये सरकारने टेनेसी खोयाचे महामंडळ, (टीव्हीए) ही स्वायत्त सरकारी संस्था सुरू केली, की जिच्या माध्यमातून या कारखान्यांत वीज आणि खते निर्माण करायची होती. याखेरीज, टीव्हीएने पुढे अनेक अतिरिक्त धरणे आणि वीज संयंत्रे उभारली, की ज्यामुळे आजूबाजूचा प्रदेश सुधारला. स्वस्त वीज उपलब्ध झाली. ज्या पुरांमुळे या खोप्याची प्रगती खुटली होती, ते पूर आटोक्यात आले. शेती तज्ञ पाठवून लोकांना जमिनीचा योग्य वापर करून अधिक उत्पादन कसे घ्यावे, हे दाखवले जात असे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मागास असणारा हा प्रदेश धडधडणा-या कारखान्यांनी आणि बहरलेल्या मळ्यांनी समृद्ध झाला.
                    भविष्याकडे लक्ष ठेवून न्यू डील कार्यक्रमात सामाजिक सुरक्षा कायदा पास केला गेला, की ज्याद्वारे लोकांचे बहुतेक सर्वसामान्य अशा त्रासदायक गोष्टींपासून रक्षण केले जाते. आजतागायत चालू असलेल्या या कार्यक्रमात कामगारांना बेरोजगारीचा विमा, वृद्धांना निवृत्ती वेतन, परावलंबी बालकांना मदत, गरजवंतांना काही लाभ दिले जातात. संघराज्याचा निधी ही राज्य सरकारे वितरित करतात आणि त्या द्वारे या सुरक्षा योजनेत आपले योगदान देतात. या योजनेला कामगार, मालक, राज्य आणि स्थानिक सरकारेदेखील आपले योगदान देतात.

 

31.सामाजिक सुरक्षा कायद्याचा हेतू काय होता ?

कामगार मालक संबंध सुधारणे
पाणी पुरवठा नियमित करणे 
समृद्धी आणणे
लोकांचे सर्वसामान्य अडचणींपासून रक्षण करणे 
उत्तर= (4)

 

32.किमंती कोसळण्यामागे कोणत्या गोष्टीला जवाबदार मानले गेले ?

रिकामी शेते 
शेतीतील अतिरिक्त उत्पादन
लोकांकडे अन्न विकत घ्यायला पैसे नव्हते
द न्यू डील कार्यक्रम

उत्तर= (2)

 

33.अॅग्रिकल्चरल अॅडजस्टमेंट अॅक्ट वर टीका का केली गेली ?

या कायद्याने शेती उत्पादन नियंत्रित केले गेले, पण लोकांना अन्नाची गरज होती
या कायद्याने महामंदीला थांबवता आले नाही 
या कायद्याने अन्नधान्य वितरित झाले, पण लोकांनी त्याचे पैसे दिले नाहीत
वरीलपैकी नाही 

उत्तर= (1)

 

34.खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

गरजवंतांना अन्न देणे राजकीयदृष्ट्या संभवनीय नव्हते.
टीव्हीएने पहिल्या महायुद्धात अलाबामामध्ये दारूगोळा कारखाना उभारला. 
जमिनीच्या संगोपनाबाबत लोकजागृती केल्याने समृद्धीला हातभार लागला. 
सामाजिक सुरक्षा कायदा अजूनही जनतेला सुरक्षा प्रदान करतो.
उत्तर= (2)

 

35.टेनेसी खोप्याचे महामंडळ (टीव्हीए)

ही स्वायत्त सरकारी संस्था होती
हिने 1933 नंतर अमेरिकेत सर्वत्र धरणे बांधली
हिने बेराजगारी विमा पुरवला 
हिला कामगार व मालक सहाय्य करतात

उत्तर= (1)


पुढील उतारावाचून त्यावर आधारित 36 ते 40 प्रश्नांची उत्तरे द्या : .
                                                 मानवी वंशाचे जागतिक वितरण
वंश म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या सर्व मानवी सदस्य, गुणसुत्रे, शारीरिक विशिष्ट्ये समान असलेल्या समूहाला वंश म्हणातात, प्रत्येक मानवाला एक डोके दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान असे अवयव असतात.
विज्ञानाच्या दृष्टीने वंश या घटकाचा विचार केल असता वंशाच्या वर्गीकरणामध्ये त्वचेचा रंग, उंची, डोक्याचा आकार, चेहरा, नाक, डोळे, केसांचा रंग व आकार इ. घटकांचा समावेश होतो.
त्वचेचा रंग - या घटकानूसार जगातील अनेक भागात विविध रंगाच्या त्वचेचे लोक आढळतात. यामध्ये त्वचेचा रंग पांढरा, काळा, पिवळसर, गहूवर्णी असी आढळतो. त्यानूसार उत्तर अमेरिकन लोक पांढ-या रंगाच्या त्वचेचे आहेत. अफ्रिकेमध्ये काळ्या रंगाच्या त्वचेचे लोक आहेत. अणि पिवळसर रंगाच्या त्वचेचे लोक मंगोलिया चीन, जपान, या देशात आढळतात.

उंची - या घटकानुसार सहजपणे उंची मोजता येते. लोकांच्या उंचीनूसार अधिक उंचीचे, मध्यम उंचीचे व कमी उंचीचे लोक असे मांडता येते. यामध्ये साधारणपणे यूरोपीयन व उत्तर अमेरिकन लोक अधिक उंचीचे असून मंगोलियन लोक कमी उंचीचे आढळतात.
डोक्याचा आकार - यामध्ये लोकांच्या डोक्याचा आकार मोजता येतो. त्यानूसार लांब डोक्याचे लोक युरोप व उत्तर अमेरिकेत आढळतात. मध्यम व लहान डोक्याचा आकाराचे लोक आफ्रिका व अशियामध्ये आढळतात.
नाकाचा आकार -नाकाच्या उंचीनूसार लोकांच्यामध्ये विविधता दिसून येते. यामध्ये लांब नाकाचे लोक यूरोपियन प्रदेशात आहेत. अफ्रिकेतील लोकांच्या नाकाचा आकार अधिक असतो. त्यांना निग्रो लोक असेही म्हणतात.

चेह-याचा आकार - चेह-याचा आकाराने, ठेवणाने विविध वंशाची जागतिक ओळख दिसून येते. चेह-यामध्ये लांबट व मोठा आकार दिसून येतो. चीनी व मंगोलियन लोकांच्या चेह-याचा आकार लांबट व मोठा दिसून येतो स्कॅडेनिटीया मध्ये लोकांच्या चेह-यांचा आकार लहान आढळतो.

डोळे - मानवी वंशाची विशिष्ट ओळख ही डोळ्यांमूळे होते. यामध्ये काळे डोळे, घारे डोळे, निळे डोळे असे दिसून येते. काळे डोळे हे अफ्रिकेतील लोकांचे वैशिष्ट्य आहे. घारे डोळे हे मंगोलिया, चीन व जपानी लोकांचे दिसून येतात, आणि निळे डोळे यूरोप व उत्तर अमेरिकन लोकांचे दिसून येतात.
केस-मानवी वंशामध्ये केसांचे महत्त्व आहे. यामध्ये केसांचा आकार, जाड केस, कुरळे केस, सरळ केस अशी विविधता दिसून येते. यामध्ये कॉकेशिअस वंशाच्या लोकांचे केस कुरळे असतात तर निग्रोईड वंशाच्या लोकांचे केस काळे व जाड तर मंगोलाईड वंशाच्या लोकांचे केस सरळ आढळतात.

 

36.मंगोलियन लोकांच्या त्वचेचा रंग कोणता आहे ?

पिवळसर
पांढरा
काळा
गहूवर्गीय
उत्तर= (1)

 

37.विविध वंशाची ओळख खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याच्या आधारे करता येते ?

अ. नाकाची रुंदी व उंची

ब. चेह-याचा आकार

क. केसाचा रंग

ड. त्वचेचा रंग

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ आणि ड
फक्त अ आणि ब
फक्त अ, ब आणि क  
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

38.मानवी वंशाच्या कोणत्या वैशिष्ट्याचे सहजपणे मोजमाप करता येते ?

अ. उंची 

ब. डोक्याचा आकार

क. त्वचेचा रंग

ड. केसाचा रंग

पर्यायी उत्तरे :

फक्त ब आणि क
फक्त अ आणि ब 
फक्त अ, ब आणि ड 
फक्त ब, क आणि ड 
उत्तर= (2)

 

39.उत्तर अमेरिकन लोकांचं वैशिष्ट्ये दर्शविणारा पर्याय निवडा.

पांढरी त्वचा, अधिक उंची, लांबट डोके व निळे डोळे
पांढरी त्वचा, निळे डोळे च सरळ केसांचे 
लांबट डोके, अधिक उंची व जाड केसांचे
रुंद नाकाचे, कमी उंचीचे व काळया डोळयांचे

उत्तर= (1)

 

40.कोणत्या लोकांच्या चेह-याचा आकार मोठा आढळतो ? 

मंगोलियन वे कॉकेशिअसे 
मंगोलियन व जपानी
चीनी वे मंगोलियन
कॉकेशिअस व जपानी
उत्तर= (3)

 

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 41 ते 45 प्रश्नांची उत्तरे द्या :
               ‘ज्ञान हे उपयुक्त असो वा नसो; त्याचे पावित्र्य स्वत:सिद्ध आहे. जिज्ञासापूर्तीचा निरागस आनंद, मानवाच्या अंत:शक्तीचा स्वतंत्र विलास व संपूर्ण विकास हेच ज्ञानाचे खरे प्रयोजन आहे' असा पक्ष हिरीरीने मांडला जातो. पण ज्ञानाचे चिरंतन, पावित्र्य व त्याची देशकालसापेक्ष उपयुक्तता यांमध्ये मुळातच विरोध आहे असे मानण्याचे कारण नाही. मानवी बुद्धीला आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आणून देणारे सत्यज्ञानाचे नवे उन्मेष नि:संशय आनंददायक असतात. त्या वेळी विद्यावंताची मन:स्थिती कळो न ये सुखदुःख । तान हरपली भूक अशी होत असेल. त्याची सामाजिक अस्मिता, किंबहुना बाह्यसृष्टी व मनुष्यत्त्व यांतील द्वैत ही ह्या अनुभवात क्षणभर विरून जात असेल. स्वान्त:सुखाच्या हाा क्षणावरील त्याचा नैसर्गिक हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मात्र ज्ञानसमाधीचा हा फक्त क्षणच असतो, तो ज्ञानोपासकाच्या जीवनाचा स्थायी भाव होऊ शकत नाही. विद्यानंद हा आत्मनिष्ठ व अलौकिक आहे हे मान्य केले, तरी विद्याभिवृद्धीचा सामाजिक संदर्भ, त्यासाठी खर्ची पडलेले सामूहिक श्रम व संपत्ती यांचा विचार लौकिक दृष्टीनेच करावा लागेल. ज्ञानाची निर्मिती, विकास आणि प्रसार ही कार्ये सातत्याने चालू राहायची असतील, तर विद्यावंतांना आपली सामाजिक जबाबदारी टाळता येणार नाही. मात्र त्यासाठी त्यांनी आपले ज्ञानैकनिष्ठेचे ब्रीद सोडण्याची. किंवा विचारस्वातंत्र्याला पारखे होण्याची मुळीच गरज नाही. विज्ञानाची मूळ प्रेरणा जरी मानवाच्या अंतिम हिताची असली, तरी प्रत्येक शास्त्रीय शोध वा सिद्धान्त तात्कालिक दृष्ट्या उपयुक्त ठरलाच पाहिजे असे कोणीही म्हणणार नाही. कोणतीही नवी उपपत्ती जेव्हा मांडली जाते तेव्हा एकंदर सामाजिक जीवनावर तिचे दूरगामी परिणाम काय होतील याची खात्रीशीर निर्णय करणे कोणालाच शक्य नसते. कोणत्याही सिद्धान्ताच्या उपयोजनेसाठी विचाराच्या व व्यवहाराच्या प्रांतांत पुरेसे अनुकूल वातावरण नसेल तर तो काही काळ अगदी निरुपयोगी किंवा विघातकही ठरण्याचा संभव असतो. म्हणून एखाददुस-या सिद्धान्ताच्या उपयुक्तते पेक्षा ज्ञानोपासकांच्या भूमिकेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
              नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांत दुसराही एक मूलभूत फरक आहे. नैसर्गिक शास्त्रे बाह्य सृष्टीचा शोध घेतात. मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे हेच त्यांचे मूळ प्रयोजन होय, शास्त्रीय शोधांचा वापर मानवाच्या सुखासाठी न होता संहारासाठी होऊ लागला म्हणजे ज्ञाननिष्ठ की मानवनिष्ठ असा प्रश्न शास्त्रज्ञां पुढे उभा राहतो. सामाजिक शास्त्रे तर व्यक्ती, जाती, वर्ग, प्रदेश, राष्ट्रे व मानवसमाज यांच्या प्रवृत्तींचा व परस्परसंबंधांचा विचार करतात. हा प्रवृत्ती, हे संबंध, कधी परस्परपूरक तर कधी परस्परविरोधी असतात. एकाला जे लाभदायक ते दुस-याला हानिकारक ठरण्याचा संभव असतो. शिवाय जाती, वर्ग, प्रांत यांसारखा कोणताही घटक पूर्णपणे एकजिनसी नसतो. त्यात एकमेकांना छेद देणारी दद्वे असतात. अशा वेळी समाजजीवनाबद्दल काही निष्कर्ष काढावयाचे तर सामाजिक कलहात औपपत्तिक पातळीवर का होईना; पण निश्चित बाजू घ्यावी लागते.


41.ज्ञानोपासकांची सुखदुःखाची व तहानभुकेची जाणीव का हरपू जात असते ?

अ. बाह्यसृष्टी व मनुष्यत्त्व यातील अद्वैत संपून जात नाही.

ब. सत्यज्ञानाने जिज्ञानासापूर्तीचा आनंद व अंतःशक्तीचा विकास झाल्यामुळे

क. ज्ञान पवित्र व देशकाळ उपयुक्त नसल्याच्या अजाणीवेमुळे

ड. आपल्या सामाजिक जवाबदारीचे भान असल्यामुळे

अ आणि क
ब आणि ड
फक्त ब
फक्त अ
उत्तर= (3)

 

42.सत्यज्ञानावर आधारलेल्या सिद्धांताच्या उपयोजनासाठी कोणती परिस्थिती आवश्यक असते ?

अ. काळावर होणारे दुरगामी परिणाम

ब. वैचारिक व व्यावहारिक क्षेत्रातील अनुकुल वातावरण

क. काळाची समुचितता

ड. ज्ञानोपासकांची भूमिका

अ आणि क 
ब आणि क
अ आणि ड
क आणि ड
उत्तर= (2)

 

43.विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

अ. मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे.

ब. व्यक्ती व मानवसमाज यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करणे.

क. शोधांचा वापर सुखापेक्षा संहारासाठी करणे

ड. सृष्टीतील सत्यांचा शोध घेणे

अ आणि ड
अ आणि ब
अ आणि क
भात 
उत्तर= (3)

 

44.ज्ञानोपासकांना कोणते लौकिक मान ठेवावे लागते ? 

अ. ज्ञाननिर्मिती व प्रसार ही आपली सामाजिक जवाबदारी आहे

ब. ज्ञानसाधना हाच आपल्या जीवनाचा स्थायीभाव आहे.

क. ज्ञानवृद्धीचा सामाजिक संदर्भ कोणता आहे.

ड. ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरलेले समूहाचे श्रम व संपत्ती यांचे मूल्य कोणते आहे. 

 
अ आणि क 
 
 

उत्तर= (3)

 

45.ज्ञानाची पवित्रता आणि देशकाल सापेक्ष उपयुक्तता यामध्ये कोणते नाते असणे आवश्यक आहे ? 

अ. ज्ञानवंत व समूह यांच्या आनंदमयते चे

ब. समन्वयाचे

क. सामाजिक अस्मितेचे

ड. मानव समूहाच्या अंतिम हिताचे

अ आणि ड
ब आणि ड 
क आणि ड
ब आणि क
उत्तर= (2)

 

Read the following passage and answer the questions from 46 to 50:
            In the Soumya case, the Supreme Court acquitted the accused for murder but convicted him to life imprisonment for rape, which Justice Katju criticised in his writing. The subsequent incidents were wholly unwarranted. The court invited the former judge to defend his statements in person, then chose to take umbrage at his writing, issued a contempt notice against him, and then asked security staff to escort him outside the premises. Why did the court have to go through this theatrical public confrontation, when it could have issued a contempt notice on the basis of the blog post alone?
                The second aspect is even more troubling: the relevance of contempt law in a free society where criticism of the judiciary is inevitable. Judges have vast powers and people will not remain silent about the exercise of such powers. Just as decisions of other branches of government attract criticism, judicial decisions would also invite the same.
              The Supreme Court has held that for the judiciary to function effectively, the dignity and authority of the courts must be respected and protected at all costs. But the need to respect the "authority and dignity of the court" is borrowed from a bygone era; it has no basis in a democratic system. The law of contempt should be employed only to enable the court to function, not to prevent criticism. In many countries, contempt jurisdiction is regarded as archaic and exercised sparingly. In the US, courts no longer use contempt to silence comments on judges or legal matters. The First Amendment to the US Constitution forbids imposition of contempt sanctions on a newspaper.
                   The English position is best demonstrated by the Spycatcher's case in the late 1980s. After the House of Lords delivered the Spycatcher judgment, the Daily Mirror published an upside-down photograph of the Law Lords captioned, "You Old Fools". But no contempt action was initiated against the newspaper.


46.The writer feels that criticism of judiciary is inevitable because

a. People live in a free society

b. People will not remain silent

c. Other branches of government also attract criticism

d. Authority of courts is limited

Only a
Only a and b
Only b and d
Only a, b and c
उत्तर= (4)

 

47.Umbrage means

a. Shady

b. Appreciate

c. Resent

d. Offended

Only a, b and c
Only a, c and d
Only a
All of the above

उत्तर= (2)

 

48.Upside-down' means

Crazy
Settled
Straight 
Topsy-turvy
उत्तर= (4)

 

49.Which analogy was used for the judges in the Spycatcher's case ? 

House of Lords
Contempt Jurisdiction
Old Fools
Law Lordship

उत्तर= (3)

 

50.The Supreme Court invited Justice Katju to defend his statements; but then, what did the court do?

a. Took offense and asked him to go away

b. Insulted him by asking the security to remove him

c. Exhibited public confrontation

d. Jailed him

Only a and b
Only b and d
 
All of the above
उत्तर= (3)

 

51. “भारतात बनवा” या अभियानासंदर्भात लेखकाने नोंदवलेले निरीक्षण अभ्यास :

भारतातील श्रम कायदे आणि श्रमांचा दर्जा उच्च गुणवत्तेच्या औद्योगिक उत्पादनांच्या गरजांशी अजिबात ताळमेळ खात नाहीत. उदाहरणार्थ, 100 पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्याला वा उद्योगाला कामगार कमी करण्याची परवानगी मिळायला हवी, जी क्वचितच दिली जाते. यामुळे कंपन्यांना धाडसाने विचार करण्याऐवजी फार काही न करण्याला प्रोत्साहन मिळते. यात भर म्हणून आमच्या कुशल व अकुशल कामगारांकडे आधुनिक उत्पादनांसाठी उपयुक्त क्षमता नसतात. कामगारांचे शिक्षण कमी दर्जाचे असते, तसेच त्यांच्याकडे कारखान्यांत लागणारी कामाची शिस्त नसते. उदयोन्मुख बाजारांत व प्रमुख आग्नेय आशियायी देशांत भारतीय कामगारांची उत्पादन क्षमता सर्वात किमान आहे. वरील माहितीसंबंधातील उचित अर्थनिर्वचन/ने निवडा.

अ. श्रमिक कायदे आणि कामगारांची गुणवत्ता हे, भारतात बनवा' हे अभियान यशस्वी करण्यासंबंधात अडथळे
ठरणारे दोन घटक आहेत.

ब. दर्जाहीन शिक्षणामुळे आणि कारखान्यात काम करण्यासाठीच्या शिस्तीच्या अभावामुळे भारतातील कामगारांची उत्पादकता किमान आहे.

क. कंपन्या छोटा विचार करून कमी पगारात काम करायला तयार असणारे अकुशल श्रमिक नोकरीला ठेवतात
त्यामुळे भारतातील कामगारांची उत्पादकता किमान आहे.

ड. आधुनिक उत्पादनांसाठी आवश्यक क्षमता प्राप्त करण्यासाठी साहाय्य देणा-या शिक्षणाची सुविधा आपल्याकडे नाही.

पर्यायी उत्तरे :

एकही विधान दिलेल्या माहितीच्या संदर्भात सुसंगत नाही. 
क खेरीज एकही दिलेल्या माहितीशी सुसंगत नाही.
फक्त क व ड दिलेल्या माहितीशी तार्किक दृष्ट्या सुसंगत आहेत.
फक्त अ व ब दिलेल्या माहितीशी सुसंगत आहेत. 

उत्तर= (4)

 

52.पुढील विधाने अभ्यास :

जर विक्षिप्त हुकूमशहाने अस्त्राचे बटन दाबले, तर परिणामी सुरू झालेले तिसरे जागतिक युद्ध शक्यतो पटकन संपतानाच संस्कृतींचाही शेवट होईल. फक्त त्याच्यासारख्याच लोकांची दादागिरी आणि अण्विक शक्तिचा गैरवापर या युद्धाला तोंड फोडेल.

पुढील पर्यायांमधून वरील विधानांच्या संदर्भात सर्वात योग्य ठरेल, असे अनुमान निवडा :

सर्व राष्ट्र प्रतिहल्ल्यासाठी अण्विक शस्त्रांसह सुसज्ज आहेत. 
विक्षिप्त असला तरी हुकूमशहाला संस्कृतीचा शेवट करणे आवडणार नाही.
सर्व देशांच्या अण्विक ताकदीची वाढ लवकरच संस्कृतींना नामशेष करेल.
तिस-या जागतिक युद्धानंतर एकही संस्कृती शिल्लक रहाणार नाही.
उत्तर= (4)

 


53. पुढील विधानांचे परीक्षण करा :

अ. या खेड्यातील सर्व कांक्रीटची घरे पांढरी रंगवली आहेत.

ब. काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत.

क. उदारीकरणानंतर बांधलेल्या काँक्रिटच्या घरांना प्रशस्त द्वार मंडप आहेत.

ड. सर्व घरे कांक्रीटची नाहीत.

वरील विधानांच्या आधारे पुढील पर्यायांमधून सर्वात यथार्थ निष्कर्ष निवडा : 

या गावात काही पांढरी कांक्रीटची घरे प्रशस्त द्वारमंडप असलेली आहेत.
या गावात फक्त कांक्रीटची घरे आहेत. 
बहुतेक कांक्रीटची घरे उदारीकरणानंतर बांधलेली आहेत.
जी घरे कांक्रीटने बांधलेली नाहीत, त्यांना प्रशस्त द्वारमंडप असू शकत नाहीत.

उत्तर= (1)

 

54.पुढे दिलेला तीन विधाने व त्याखालील निष्कर्ष अभ्यासा व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्षचा

पर्याय निवडा.

विधान :

I. धनवंतांखेरीज कोणालाही वातानुकूलीत वाहने परवडत नाहीत.

II. वातानुकूलीत वाहनाने प्रवास करणा-यांपैकी काहींना प्रदूषित हवेपासून संरक्षण मिळते.

III. वातानुकूलीत वाहनाने प्रवास करणा-यांपैकी काहींना आरोग्याच्या समस्या नसतात.

निष्कर्ष :

अ. वातानुकूलीत रहित वाहनाने प्रवास करणा-यांना हवा प्रदूषणाचा त्रास होतो.

ब. सर्व धनवंत वातानुकूलीत वाहनाने प्रवास करत नाहीत.

क. सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात.

ड. वातानुकूलीत वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात.

पर्यायी उत्तरे : 

ब, क आणि ड
फक्त क  
फक्त ड 
अ, ब आणि ड
उत्तर= (3)

 

55.  काही मालासह तीन गुन्हेगारांना ताब्यात वेतले. चौकशीच्या वेळी फक्त एकजण खरे बोलत होता आणि इतर दोघांपैकी प्रत्येकजण एकदा खरे आणि आणि एकदा खोटे बोलत होते. ते म्हणाले

अनी : जानूने दरवाजा तोडला. मनूने किमती सामान गोळा केले.

मनू : अनीने दरवाजा तोडला. मी किमती सामान गोळा केले.

जानू : मी पिशव्या दुकानाबाहेर आणल्या. मनूने दरवाजा तोडला.

किमती सामान कोणी गोळा केले ?

अनी
जानू
मनू 
अनी किंवा जानू यापैकी एक

उत्तर= (3)

 

56.पुढे दिलेलो विधान व निष्कर्ष अभ्यासा व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष चा पर्याय निवडा.

विधान :

एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचा-यांना त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्यास सांगितले. परंतु कर्मचारी संघटनेने त्याला जोरदार विरोध केला आणि एकाही कर्मचा-यांने त्याचे/तिचे उत्पन्न घोषित केले नाही. निष्कर्ष :

I. या कंपनीतील कर्मचा-यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलले दिसून येत नाही.

II. सर्व वरिष्ठ अधिका-यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे, अशी कर्मचारी संघटनेची इच्छा आहे.

पर्यायी उत्तरे :  

फक्त निष्कर्ष I लागू
फक्त निष्कर्ष II लागू
निष्कर्ष I आणि II दोन्ही लागू
कोणताही I किंवा II निष्कर्ष लागू नाही
उत्तर= (4)

 

57.जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधी चौकशी केली, तेव्हा पिया, दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली.

पिया : सेतू किंवा लालू यापैकी एकजण शर्यत जिंकला.

दिया : सेतू शर्यत जिंकला.

निया : सेतू किंवा लालू यापैकी एकानेही शर्यत जिंकली नाही.

जर फक्त व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी शर्यत जिंकली ?

सेतू
लालू
दोघेही
एकही नाही

उत्तर= (1)

 

58.ल्युसीकडे, झीनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. जयाकडे झीनतच्या दुप्पट नारळ आहे. जर ल्युसीने झीनतला 15 व जयाला 5 नारळ दिले, तर झीनत व जया यांच्याकडे प्रत्येकी ल्युसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्येइतके नारळ असतील. झीनंतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. 

10
15 
20
25
उत्तर= (1)

 

59.शहर A पासून शहर B चे दोन तिकिटांचे आणि शहर A ते शहर c चे तीन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 77 आहे. परंतु शहर A पासून शहर B चे तीन तिकिटांचे व शहर A ते शहर c चे दोन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 73 आहे. तर शहर A पासून शहर B व शहर C चे अनुक्रमे बस भाडे किती होईल ? 

₹14, ₹ 23
₹13, ₹ 17
₹15, ₹ 14
₹17, ₹ 13

उत्तर= (2)

 

60.102 सेमी, 136 सेमी, 153 सेमी व 289 सेमी लांबी असलेल्या चार कांबी आहेत. सगळया कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. 

45
41
40
38
उत्तर= (3)

 

61. 2, 3, 5, 6, 7 आणि 9 या अंकापासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता, अशा तीन अंकी किती संख्या तयार होवू शकतील ? 

5
10
15
20
उत्तर= (4)

 

62. A व B या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा.

लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाच्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. 

 राशी A                  राशी B              

लालूचा वेग             जॉनचा वेग 

दोन्ही राशी समान आहेत
राशी A लहान आहे 
राशी B लहान आहे
राशींतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही
उत्तर= (2)

 

63. सविता आणि कविता यांच्या आजच्या वया चे गुणोत्तर 3 : 4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4: 5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा. 

सविता 20 वर्षे आणि कविता 15 वर्षे 
सविता 15 वर्षे आणि कविता 20 वर्षे
सविता 20 वर्षे आणि कविता 25 वर्ष
सविता 25 वर्षे आणि कविता 20 वर्षे
उत्तर= (2)

 

64.3 मी, 5 मी 10 सेमी, 12 मी 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी, हे शोधा.

30 सेमी 
60 सेमी
45 सेमी
35 सेमी 
उत्तर= (1)

 

65.


आकृति B आकृति A व B ही चौरस क्षेत्रे आहेत. A चौरसाची बाजू 8 सेमी लांब आहे, तर B चौरसाचा कर्ण 8 सेमी लांबीचा आहे. या दोन क्षेत्रफळातील फरक किती ?

16 चौरस सेमी
32 चौरस सेमी
8 चौरस सेमी
शून्य चौरसे सेमी 8 cm
उत्तर= (2)


66. एका रांगेमध्ये 'A' डाव्या बाजूने 11 व्या स्थानावर आहे आणि 'B' उजव्या बाजूने 10 व्या स्थानावर आहे. जर 'A' आणि 'B' यांच्या जागांची अदलाबदल केली तर 'A' डाव्या बाजूने 18 व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये 'A' आणि 'B' खेरीज किती व्यक्ती असतील.

27
26
25
24 

उत्तर= (3)

 

67. रीना ने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने ₹ 1200 कर्ज घेतले जर तिने कर्ज फेडताना ₹ 432 व्याज दिले तर व्याजाचा दर किती होता ?

3.6
6
 
उत्तर= (2)

 

68. जर a 60% b आहे, b 40% c आहे, c 20% d आहे, तर 6d हे 20a च्या किती टक्के आहे ?

550
500
600
625
उत्तर= (1)

 

69. राम आणि श्याम हॉकी व व्हॉलीबाल मध्ये चांगले आहेत. सचिन व राम हॉकी माणि बेसबाल मध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम, व्हॉलीबाल व क्रिकेट मध्ये चांगले आहेत, सचिन, गौरव आणि सागर, बेसबाल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. तर बेसबाल, क्रिकेट, व्हॉलीबाल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे ? 

सचिन
श्याम
गौरव
सागर
उत्तर= (3)


70. एका सांकेतिक भाषेत “KAMAL" is 1626142615' असेल तर 'NO' साठी कोणता संकेत राहील ? 

 
1415
1213
1514

उत्तर= (1)

 

71. जर A $ B चा अर्थ A हे B चे वडील आहेत; A # B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A * B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे; आणि A @. B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर R, T व M ही भावंडे आहेत हे दर्शवणारी नातेसाखळी निवड़ा ? 

Q $ R @ T * M
Q @ R $ T # M 
Q $ R* T # M
 

उत्तर= (4)

 

72. X या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा.








उत्तर= (1)

 

73. दिलेल्या पर्यायी आकृत्यातून अशी आकृती निवडा कि ज्या आकृतीमुळे आकृती (X) पूर्ण होईल.





उत्तर= (3)

 

74. दिलेल्या चौरसात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?


2T
2R 
4T
4R

उत्तर= (2)

 

75. खाली दोन विधाने आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षाबाबतचा योग्य पर्याय निवडा.

विधान : 

I. काही झाडे फांद्या आहेत.

II. सर्व फांद्या टोप्या आहेत.

विधान ।।

A. काही झाडे टोप्या आहेत.

B. काही टोप्या झाडे आहेत.

C. सर्व टोप्या फांद्या आहेत. 

D. सर्व फांद्या टोप्या आहेत.

पर्यायी उत्तरे ;  

फक्त A, B व D बरोबर आहेत
फक्त B, C व D बरोबर आहेत
फक्त A व B बरोबर आहेत
सर्व बरोबर आहेत

उत्तर= (1)

 

76. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे परीक्षण करताना एका गृह वसाहतीतील इमारतीवर तुम्हाला ITI चा भक्कम नामफलक आढळला. या केंद्राने संपूर्ण जागा व्यापली आहे असे हा फलक सुचवत होता. कोप-यातल्या एक खोली असलेल्या जागेतून संस्था चालवली जात आहे हे संस्थेत तुम्हाला पाऊल ठेवताच आढळले. जेव्हा कचेरी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला साहाय्य देण्यासाठी अनिवार्य असलेल्या प्रयोगशाळेबाबत विचारणा केली, तेव्हा प्रभारी व्यक्तीने संस्थेची प्रयोगशाळा असल्याचा दावा करून तुम्हाला तळमजल्यावरील स्कूटर दुरुस्ती गॅरेजमध्ये नेले. या व्यक्तीने तुम्हाला आदर्श ITI साठी आवश्यक असणाच्या प्रशस्त सुविधांची सर्व प्रमाणपत्रे दाखवली. तुम्ही; 

प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांचे नुकसान टाळावे, म्हणून संस्थेला मान्यता मिळवण्यासाठी कबूल केलेल्या भौतिक सुविधा तीन वर्षांच्या कालावधीत जुळवून आणण्यास सांगाल. 
आवश्यक क्षमता प्राप्त केल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळणे टाळण्यासाठी संस्थेची शासन मान्यता रद्द कराल.
काम मिळण्यासाठी आवश्यक अनुभवाधारित कौशल्ये प्राप्त करण्यासंबंधातील समस्या सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांचे नियमन करणारी समिती नेमण्यासाठी विद्यार्थी, पालक, अध्यापक आणि व्यवस्थापक यांची बैठक बोलवाल.
व्यवस्थापनाला अतिरिक्त शुल्क न लादता काम मिळवण्यासाठी आवश्यक असे प्रत्यक्ष अनुभव घ्यायला विद्याथ्र्यांना साहाय्य देण्यासाठी व्यवस्था करण्याचा आदेश द्याल.

उत्तर= (3)

 

77. तुम्ही विविध कामांसाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान वापरण्याचे निर्णय घेण्यासाठी जबाबदार असणा-या विभागाचे प्रमुख आहात. जरी तुमच्या हाताखालील बहुसंख्य लोक चलाख फोन्सचा (smartphones) वापर करत असले तरी ते जनतेचे सेवक म्हणून त्यांच्या अडीअडचणींचा परिचय होण्यासाठी त्यांच्या संपर्कात असणे आवश्यक आहे या बहाण्याखाली सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरवण्याच्या विरोधात आहेत. तुम्ही याच्याशी संबंधित त्यांच्या पळवाटांशी परिचित आहात. पण तरीही तुम्ही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, त्यांची शक्ती व पैसे वाचवण्यासाठी अणि लोकांना विविध स्वरूपाच्या छळापासून मुक्त करण्यासाठी जनतेला ऑनलाइन सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे. तुम्ही.

तुमच्या कनिष्ठांची मते विचारात न घेता तुमचे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेली सर्व व्यवस्था कराल.
पुढाकार घेऊन जनतेच्या सेवकांच्या आडमुठेपणामुळे तो द्याव्या लागणाच्या अडचणींबाबत संवेदनशील व्हायला तुमच्या हाताखालील लोकांना मदत द्याल.
सामान्य व्यक्तींना आपण पदाधिका-यांच्या दयेवर अवलंबून आहोत व त्याचा मोबदला आपण द्यायला हवा अशी भावना निर्माण करणाच्या प्रत्येकाला लेखी ताकीद द्याल. 
ब-याच अनौपचारिक बैठकी घेऊन तुम्ही तुमच्या कनिष्ठांचे एक जवाबदार आणि प्रमाणिक जनता सेवक म्हणून सेवा देणारे मंडळ स्थापण्यासाठी प्रयत्नशील रहाल.

उत्तर= (4)

 

78. क्षणाचाही वेळ न लागता दंगली उसळणाच्या भागात व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची कामगिरी तुमच्यावर आहे. या भागात रहाणाच्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसच्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादगिरी करू पाहतात. सकाळीच दादागटाने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी तेथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलिस अधिका-याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलीस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजूत झाली. सायंकाळी लाठ्या व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही;


जमाव आक्रमक असल्यामुळे तो ठाण्याची इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाला गोळीबार करण्यासाठी सज्ज रहाण्यास सांगाल.  
कोणत्याही प्रकारे चकमक होणार नाही त्यांचा नेता सुरक्षित आहे याची जमावाला खात्री द्याल आणि काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलण्याची विनंती कराल.
अटक केलेल्या नेत्याशी बोलून त्याने स्वत: तो सुरक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे घोषित करावे यासाठी त्याची समजूत घालाल.
त्या भागातील नगरसेवक, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची विनंती करा. 
उत्तर= (3)

 

79.तुम्ही शहराच्या प्रदूषण नियंत्रणावर देखरेख करणा-या विभागाचे प्रमुख आहात. ‘ग्लोबल (जागतिक) हवा 2017 अहवाल वाचतांना तुमच्या लक्षात आले की भारतातील ओझोनशी संबंधित बालमृत्युंत वाढ होते आहे. तुम्ही,

या समस्येबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक माहिती गोळा कराल आणि गरज असल्यास आरोग्य विभागाच्या सहकार्याने उपक्रम कार्यान्वित करण्याचा निर्णय घ्याल.
शहराच्या वाहतुक विभागाच्या साहाय्याने वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भरवशाची सार्वजनिक वाहतुक पुरवण्याची योजना आखाल.
वाहन प्रदूषण नियंत्रणाची रणनीति आखण्याबरोबरीने शहरात तसेच शहराभोवती आढळणाच्या सर्व प्रकारच्या कच-याचे व्यवस्थापन करण्याची प्रणाली मिळवाल.
वाहतुक विभागाच्या मदतीने दर दिवशी रस्त्यावर येणारी वाहने नियंत्रित कराल आणि शहरापासन दूरवर असलेल्या ठिकाणी कचरा वाहून नेण्यासाठी उत्तम सेतुजाल संघटित कराल.
उत्तर= (2)

 

80.तुमच्या कचेरीत तुम्ही सर्वात उच्च पदावर आहात. तुमच्या हाताखालील दोन व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी कचेरीत येत असताना अपघात होऊन त्यांना किरकोळ दुखापतींचा त्रास झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी अनुभवांना टाळण्यासाठी त्यांच्या संघटनेचा नेता तुमच्याकडे एका प्रसिद्ध वास्तु तज्ञाचा सल्ला घेऊन कचेरीच्या परिसरात योग्य ते बदल करून घेण्याची विनंती करत आहे. या क्षेत्राच्या जलवायूमानाची (हवामानासंबंधीची) व भौगोलिक परिस्थितीची काळजी घेणा-या वास्तुविद्याविशारदने (आर्किटेक्ट) हे माणूसस्नेही व पर्यावरण संवेदनशील परिसर रचले आहे.

तज्ञाचा सल्ला घेण्याची त्याची विनंती स्वीकाराल आणि भविष्यात अशा अपघातांमुळे खर्च वाचवाल.
या गोष्टीसंबंधातील सर्व कर्मचा-यांच्या वृत्तीचा परिचय करून घेण्यासाठी व त्याच्या विनंतीबाबत समंजपणे निर्णय घ्यायला मदत देण्यासाठी त्यांची बैठक आयोजित कराल.
कर्मचा-यांना वस्तुस्थितीचा परिचय करून देऊन असे सल्ले निरुपयोगी असतात हे समजून घ्यायला मदत देणारी कार्यशाळा मालिका आयोजित कराल.
तुमचा अशा शास्त्रांवर विश्वास नसल्याचे सांगत त्याची विनंती तत्काळ घुडकावून लावाल.

उत्तर= (3)

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या