राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

 

MPSC-Main-2018-GS-1

MPSC-Mains-2018-GS-I-Final-key



1.इ.स. 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर एल्फिन्स्टननी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. ते भाग व अधिकारी यांच्या जोड्या जुळवा.


उत्तर= (1)

 

2.जोड्या जुळवा.


उत्तर= (1)

 

3.भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्त्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते ?

(a) व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट

(b) आर्मस् अ‍ॅक्ट

(c) लायसन्स् अ‍ॅक्ट

(d) लँडस् अ‍ॅक्ट

पर्यायी उत्तरे : 

(a) आणि (c) फक्त
(b), (c) आणि (d) फक्त 
(a), (c) आणि (d) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त 

उत्तर= (4)

 

4. जोड्या जुळवा.


उत्तर= (1)

 

5."ब्राम्होसमाज'' स्थापन करण्यापूर्वी राजा राममोहन रॉय यांनी इ.स. 1815 साली 'आत्मीय सभा' स्थापन केली, त्यावेळी त्यांच्या बरोबर खालील कोणते सहकारी होते ?

(a) द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर

(b) डॉ. राजेंद्रलाल मिश्र, राजा कली 

(c) शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी

(d) केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (d) फक्त
(b), (c) आणि (d) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त
(d) फक्त

उत्तर= (3)

 

6.1842 साली ______ या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती.

दर्पण 
ज्ञानोदय
मराठा 
दीनबंधु

उत्तर= (2)

 

7.________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता. 

राजा राममोहन रॉय
स्वामी दयानंद सरस्वती
बाळ गंगाधर टिळक
गोपाळ गणेश आगरकर

उत्तर= (3)

 

8.म. गांधीपूर्वी 'स्वदेशीचा' पुरस्कार 40-50 वर्षा अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तिनी केला होता?

(a) गणेश वासुदेव जोशी 

(b) वासुदेव बळवंत फडके

(c) दादोबा पांडुरंग तर्खडकर

(d) आत्माराम पांडुरंग तर्खडकर

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) फक्त
(b) आणि (c) फक्त
(c) आणि (d) फक्त
(a) आणि (d) फक्त

उत्तर= (1)

 

9.जोड्या जुळवा.



उत्तर= (2)

 

10.महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख, सक्रिय कार्यकर्ते कोण होते?

डॉ. विश्राम धोले, कृष्णराव भालेकर, नारायण मेधाजी लोखंडे, मामा परमानंद
कृष्णराव भालेकर, नारायण मेधाजी लोखंडे, डॉ. विश्राम धोले, हरी चिपळूणकर
नारायण मेधाजी लोखंडे, डॉ. विश्राम धोले, हरी चिपळूणकर, मामा परमानंद 
कृष्णराव भालेकर, डॉ. विश्राम धोले, मामा परमानंद, हरी चिपळूणकर

उत्तर= (2)

 

11.पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?

(a) त्यांचा जन्म राधानगर गावात झाला.
(b) त्यांनी फारसी आणि अरबी भाषांचा पटना येथे अभ्यास केला होता,
(c) सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता.
(d) त्यांनी मूर्ती पूजे विरुद्ध पुस्तक लिहीले होते. त्यांच्या वडीलांनी त्यांना घराबाहेर काढले.
(e) ते तिबेटला गेले व परत आल्यावर त्यांनी संस्कृत व हिंदू पवित्र वाङमयाचा अभ्यास केला.
(f) त्यांनी तुहफत-ऊल-मुवाहिहदीन हे पुस्तक फारसीत लिहीले.

पर्यायी उत्तरे :

 
 
राजा राममोहन रॉय
 
उत्तर= (3)

 

12.जोड्या जुळवा.



उत्तर= (2)

 

13. लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्त्वातील आवडीचा _______ यांनी त्यांच्या 'हिस्टॉरिकल म्युझियम' या पुस्तकात उपहास केला होता.

लोकमान्य टिळक
विष्णूशास्त्री चिपळूणकर
शिवराम महादेव परांजपे
महादेव गोविंद रानडे 

उत्तर= (3)

 

14.'बांग-ए-दरा' हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला?

सय्यद अहमद खान
महमंद इकबाल
चिराग अली
4.नाझिर अहमद
उत्तर= (2)

 

15. जोड्या जुळवा.


उत्तर= (1)

 

16.पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?

(a) ते उत्तम वक्ते होते. 

(b) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते.

(c) 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

(d) त्यांनी 'क्रांतीचे रणशिंग' हे पुस्तक लिहीले होते, ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते.

पर्यायी उत्तरे :

सिद्धप्पा कांबळी
दिनकरराव जवळकर
 भास्करराव जाधव
4.केशवराव जेधे

उत्तर= (2)

 

17.इ.स. 1871 पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?

(a) लोकांचा धर्म
(b) लोकांची जात
(c) लोकांचा व्यवसाय
(d) लोकांचे दारिद्र्य

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) फक्त
(b) आणि (d) फक्त 
(a), (b) आणि (c) फक्त
4.सर्व बरोबर आहेत 

उत्तर= (3)

 

18.1919 चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट म्हणजे ________.

(a) माँट-फोर्ड सुधारणा कायदा.

(b) 1909 च्या कायद्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारित केलेला कायदा.

(c) या कायद्याने भारतात जबाबदार राज्य पध्दतीची पाया भरणी केली.

(d) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा.

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (d) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त
 
4.(b), (c) आणि (d) फक्त 

उत्तर= (2)

 

19.दादासाहेब फाळके हे केवळ चित्रपट निर्मातेच होते असे नाही, तर त्या व्यतिरिक्त ते पुढीलपैकी कोण होते?

(a)  रंगभूषाकार, नेपथ्यकार होते

(b)  छाया चित्रकार होते

(c)  कथाकार, नृत्यतज्ञ होते

(d)  अभिनेते होते

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) फक्त
(b) आणि (c) फक्त
(c) आणि (d) फक्त
4.(a) आणि (d) फक्त

उत्तर= (1)

 

20. लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्त्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली?

(a)  सातारा  

(b)  जैतपूर

(c)  भगत

(d)  बडोदा

पर्यायी उत्तरे :

(a), (b), (c), (d)
फक्त (b) आणि (c) 
(a) आणि (b) फक्त
4. (a), (b), (c) फक्त

उत्तर= (4)

 

21.1875 मध्ये बाबू शिशिर घोष यांनी 'इंडियन लीग' नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती ? 

(a) लोकांना राजकीय शिक्षण देणे

(b) लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे

(c) जमिनदारांच्या हिताचे रक्षण करणे

(d) जनतेला त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देणे

पर्यायी उत्तरे :

(a), (b) फक्त
(c) आणि (d) फक्त 
(b) आणि (c) फक्त
4.(a) आणि (c) फक्त
उत्तर= (1)

 

22.विधाने वाचून पर्याय निवडा.

विधान (A) : मुंबई प्रांतातील संस्थात्मक व्यवहारात लोकशाही प्रथा मूळ धरू लागल्या.

विधान (B) : 1852 साली मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री. मोहम्मद मकबा निवृत्त झाले, तेव्हा त्याजागी डॉ. भाऊ दाजी हे निवडून आले.

पर्यायी उत्तरे :

(A) आणि (B) यांचा परस्पर संबंध नाही. 
(A) हा निष्कर्ष आहे, (B) हे निरीक्षण आहे.
(A) बरोबर आहे, (B) चूक आहे.
4.(A) हे निरीक्षण आहे, (B) हा निष्कर्ष आहे.
उत्तर= (2)

 

23. 1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री-सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत ________ सहभागी होत्या.

बेबी कांबळे
ताराबाई शिंदे 
शांताबाई दाणी
आवंतिकाबाई गोखले  

उत्तर= (3)

 

24. _______ यांनी 'नॅशनल इंडियन असोसिएशनची' स्थापना केली.

मेरी कारपेंटर
सिस्टर निवेदीता
मॅडम कामा
डॉ.अ‍ॅनी बेझंट  
उत्तर= (1)

 

25.न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते ______ ही होते.

(a) इतिहासकार

(b) अर्थशास्त्रज्ञ

(c) शिक्षणतज्ञ

(d) कवी

उत्तर= (4)

 

26. 1839 च्या सुमारास भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळी वृत्तपत्रे/पत्रिका प्रकाशित होवू लागल्या. पुढे दिलेली ठिकाणे आणि तेथून प्रकाशित होणा-या वृत्तपत्रांची/पत्रिकांच्या संख्या यांच्या जोड्या जुळवा.



उत्तर= (3)

 

27.जोड्या जुळवा.



उत्तर= (2)

 

28. एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसुल निश्चितीची पद्धत म्हणजे ________ यांचा समन्वय होता.

मक्ता, रयतवारी, कायमधारा 
रयतवारी, महालवारी, मौजेवारी 
मौजेवारी, कायमधारा, रयतवारी
मक्ता, मौजेवारी, महालवारी


उत्तर= (3)

 

29.पुढीलपैकी कोणते मुद्दे ब्रिटीश राजवटीचा भारतीय आर्थिक जीवनावर झालेला प्रभाव दर्शवितात?

(a) शेतीचे व्यापारीकरण

(b) जमीन विक्रीयोग्य वस्तू बनली

(c) नगदी पिकांचा तुटवडा

(d) महसुल पद्धतीत बदल

पर्यायी उत्तरे : 

(a), (b) आणि (d) फक्त
(a), (c) आणि (d) फक्त
(a), (b) आणि (C) फक्त
(a), (b), (c) आणि (d)
उत्तर= (1)

 

30.पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?

(a) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल् -अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.

(b) वयाच्या चौविसाव्या वर्षी त्यांनी अल्-हीलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते.

पर्यायी उत्तरे :

महमद इक्बाल
बॅरिस्टर जिन्हा
 
शौकत अली
उत्तर= (3)

 

31.1980 नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण :

(a) खलिस्तानची मागणी.

(b) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थानशी तंटा.

(c) चंदिगडची पंजाबसाठी मागणी.

(d) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी.

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (d) फक्त
(b), (c) आणि (d) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त
वरील सर्व
उत्तर= (3)

 

32.अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात काय खरे आहे ?

(a) त्यांनी 'लाल बावटा कलापथक' स्थापन केले.

(b) त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

(c) फकिरा कादंबरीत त्यांनी वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले.

(d) 'माझा अमेरिका प्रवास' हे त्यांचे प्रवासवर्णन आहे.

पर्यायी उत्तरे : 

(a), (b), (c) फक्त
(b), c), (d) फक्त 
(a), (b), (d) फक्त
(a), (b), (c) आणि (d)
उत्तर= (1)

 

33.पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीले नाही ?

वक्तृत्त्व - कला आणि साधना

आमच्या आठवणी

दगलबाज शिवाजी

माझी जीवन गाथा

उत्तर= (2)

 

34.होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?

खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.

अमरावती होमरूल लीगचे खापर्ड अध्यक्ष होते. 

यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते

नागपूरच्या परिसरात मुंजेनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या


उत्तर= (3)

 

35.पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?

(a) त्यांनी 1980 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले.

(b) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली.

(c) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.

पर्यायी उत्तरे :

चारु मुजूमदार
कोडापल्ली सितारामय्या 
कानू सन्याल
कन्हई चॅटर्जी
उत्तर= (2)

 

36.ते लहूजींचे शिष्य होते.

लहूजींना त्यांचा अभिमान होता.

ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.

त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता.

ते कोण?

जोतीबा फुले 
यशवंत फुले
मेघाजी लोखंडे
नारायण लोखंडे
उत्तर= (1)

 

37.________  ने संसदेतील बहुमताचा वापर करून 19 डिसेंबर 1978 रोजी इंदिरा गांधींना संसदेतून निष्कासित केले व एका आठवड्यासाठी तुरुंगात पाठविले.

काँग्रेस (देवराज अर्स)
 
जनता पक्ष
जन संघ
उत्तर= (4)

 

38.खालील व्यक्तींपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?

(a) बी.जी. टिळक

(b) जी.के. गोखले

(c) धों.के. कर्वे

पर्यायी उत्तरे :

(a), (b) फक्त 
(b), (c) फक्त
(a), (c) फक्त
(a), (b), (c)
उत्तर= (4)

 

39.जोड्या जुळवा.



उत्तर= (2)

 

40.पुढील वाक्ये कोणत्या भाषे विषयीची आहेत ?

ही भाषा एक खास आहे.

ही भाषा भारतातील सर्वाधिक अल्पसंख्याकांची आहे.

ही भाषा बोलणारे लोक उ.प्र. बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आहेत.

हिंदी 
भोजपुरी 
उर्दू 
हिंदूस्थानी 

उत्तर= (3)

 

41.स्वराज पक्षाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते ?

(a) न.चि. केळकर

(b) शांताराम दाभोळकर

(c) पुरूषोत्तमदास त्रिकमदास

(d) भूलाभाई देसाई 

(e) जाफरभाई लालजी

पर्यायी उत्तरे :

(a), (b), (c) फक्त
(c), (d), (e) फक्त
(a), (b), (c) आणि (d) फक्त 
(a), (b), (c), (d) आणि (e)
उत्तर= (4)

 

42.लहानपणापासूनच ते शस्त्रांच्या सोबत खेळत असत, त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भिती वाटत नसे. कमी कालावधीत ते शस्त्र वापरण्यात पारंगत झाले. ते अती वेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत. त्यांचे वडील त्यांना पुरंदरचा किल्ला पहायला नेत. ते कोण होते?

राघोजी साळवे
लहूजी साळवे
शिवाजी साळवे 
राणोजी साळवे
उत्तर= (2)

 

43.पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.

(a) ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी

(b) द डिस्कवरी ऑफ इंडिया

(c) अँन ऑटोबायोग्राफी

पर्यायी उत्तरे :

 
(b), (c), (a)
(c), (a), (b) 
(a), (c), (b)
उत्तर= (4)

 

44.'रयत शिक्षण संस्थेचे' _______ हे उद्दिष्ट नव्हते.

मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे. 
मुलाना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनविणे. 
मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण देणे.
समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्रि-पुरुषांचे संघ निर्माण करणे.

उत्तर= (4)

 

45.1942 च्या भूमिगत क्रांतीकारकांचे नेतृत्व केल्या बद्दल दैनिक ट्रिब्यूनने '1942 ची झाँशीची राणी' म्हणून कोणाचा सन्मान केला होता?

सुचेता कृपलानी
मृदूला साराभाई
अरुणा असफ अली
लीलाताई पाटील
उत्तर= (3)

 

46._________ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.

शंकरराव देव
जमनालाल बजाज 
के.एफ्. नरिमन
किशोरलाल मश्रूवाला 

उत्तर= (1)

 

47. अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेत व्हॉईसरायकडे एक प्रतिनिधीमंडळ पाठविण्याचे ठरले. त्यांनी 19 जानेवारी 1920 रोजी व्हॉईसरायना देण्याच्या पत्रावर सुप्रसिद्ध हिंदू राजकारणी पुढा-यांनी सह्या केल्या होत्या. पुढीलपैकी ते पुढारी कोण होते ?

(a) गांधीजी

(b) स्वामी श्रद्धानंद

(c) पंडित मोतीलाल नेहरू

(d) पंडित मदन मोहन मालवीय

(e) पंडित जवाहरलाल नेहरू

पर्यायी उत्तरे : 

(a), (c), (d), (e) फक्त
(b), (C), (d), (e) फक्त 
(a), (b), (c), (d) आणि (e)
(a), (b), (c) आणि (d) फक्त
उत्तर= ()

 

48. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

(a) जयप्रकाश नारायण यांनी कॉलिफोर्निया, आयोवा, विन्स्काँसन व ओहिओ विद्यापीठात अध्ययन केले.

(b) जयप्रकाश नारायण विन्स्काँसिन विद्यापीठात शिकत असताना समाजवादी विचारधारेकडे वळले.

पर्यायी उत्तरे : 

(a) बरोबर (b) चूक
(a) चूक (b) बरोबर  
दोन्ही बरोबर
दोन्ही चूक
उत्तर= (3)

 

49.महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.

अहमदाबाद, चंपारण, खेड़ा
खेडा, अहमदाबाद, चंपारण
चंपारण, अहमदाबाद, खेड़ा
चंपारण, खेडा, अहमदाबाद

उत्तर= (3)

 

50.गो.ग. आगरकरांविषयी काय खरे नाही?

धर्माच्या चौकटित राहूनच विवेकाचे पालन केले पाहीजे.
नीतीमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही.
प्रखर बुद्धिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
'कवि, काव्य व काव्यरति' हा त्यांचा निबंध आहे.
उत्तर= (1)

 

51. (a) ते 1960 च्या शेवटी निर्माण केले.

(b) त्याचे मुख्यमंत्री डॉ. वाय्. एस्. परमार होते.

(c) त्यांनी त्यांच्या राज्यात शिक्षणाच्या प्रसाराला महत्त्व दिले.

(d) भारताच्या इतर कोणत्याही भागापेक्षा येथील शिक्षक - विद्यार्थी यांचे गुणोत्तर अधिक होते.

वरती कोणत्या राज्याचा उल्लेख केला आहे?

हरियाणा
आसाम
हिमाचल प्रदेश
मेघालय

उत्तर= (3)

 

52. आसाममधील असंतोषाबाबत पुढीलपैकी काय खरे होते ?

(a) आसाममध्ये ऑल आसाम स्टुडंट्स युनियन व आसाम गण परिषदेने आसामातील बांगलादेशी शरणार्थीना परत पाठवावे याकरिता मोठे आंदोलन केले.
(b) ऑल आसाम ट्रायबल युथ लीगने आसामातील इतर आंदोलनाला विरोध करून शेतजमीनीची फेरवाटणी आदिवासीत केली जावी यासाठी आंदोलन केले.

(c) आसामी आंदोलक व आदिवासी यांच्यातील तणावाने गंभीर आणि तीव्र रूप धारण केले.

(d) आसामीनी तेथे कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

पर्यायी उत्तरे :

 
(a), (b) आणि (d) फक्त 
(a) आणि (d) फक्त
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

53.साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ________ येथे होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हालविण्यात आला.

कोचार्ज 
आनंदपुरा
जालीसाना 
दलोद

उत्तर= (1)

 

54. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंब-यांचे लेखक म्हणून ना.सी. फडके प्रसिद्ध होते. त्यांनीं चले जाव चळवळीच्या पाश्र्वभूमीवर आधारित _______ नावाची कादंबरी लिहिली होती.

झंझावात
अखेरचे बंड
तूफान
अल्ला हो अकबर
उत्तर= (1)

 

55.विधान (A) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेत असे सुचवले की भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी.

कारण (B) : संस्कृतवर प्रभुत्व असल्याखेरीज प्राचीन भारतीय साहित्य आणि अन्य ज्ञानशाखांत भारतीयांनी किती महत्त्वाचे योगदान दिले होते हे कळणार नाही.

पर्यायी उत्तरे :

(A) आणि (B) दोन्ही चुकीचे आहेत.
(A) आणि (B) दोन्ही बरोबर आहेत.
(A) चुकीचे आहे, (B) बरोबर आहे.
(A) बरोबर आहे, (B) चुकीचे आहे. 

उत्तर= (2)

 

56.असहकार चळवळीच्या काळात सरकारने दडपशाहीचे धोरण अंगिकारले होते. 

पुढे दिलेल्या व्यक्ति व त्यांच्या विरूद्ध दडपशाहीने केलेली कारवाई यांच्या जोड्या जुळवा.



उत्तर= (3)

 

57. 1969 मध्ये काँग्रेस मध्ये फुट कोणत्या गोष्टीमुळे पडली ?

(a) खालावलेली सामाजिक व आर्थिक स्थिती

(b) यू.एस्. कडून मिळणारी मदत कमी होवून 1964-65 च्या मदतीच्या निम्मे झाली होती.

(c) काँग्रेस मध्ये अंतर्गत राजकीय ताण-तणाव होता.

(d) मंत्र्यांचे न सोडवलेले प्रश्न.

पर्यायी उत्तरे :

 
(b) आणि (d) फक्त
(c) आणि (d) फक्त
(a), (b), (c) आणि (d)

उत्तर= (4)

 

58. हरिजन साप्ताहिकाबद्दल काय खरे आहे ? 

(a) त्याच्या पहिल्या अंकासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'द क्लीन्सर' ही कविता दिली होती.

(b) डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला.

(c) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हते त्याच्या मालकी हक्का विषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते.

(d) गांधीजींनी डॉ. आंबेडकरांना सांगितले की साप्ताहीक जसे कुठल्याही हिंदूचे आहे तितकेच आंबेडकरांचेही आहे.

पर्यायी उत्तरे :

(a), (b), (c) फक्त
(a), (b), (d) फक्त 
(b), (c), (d) फक्त
(a), (b), (c) आणि (d)
उत्तर= (4)

 

59. पहिल्या गोलमेज परिषदे विषयी काय खरे आहे ?

(a) 12 नोव्हेंबर 1930 रोजी तिचे उद्घाटन झाले.

(b) ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.

(c) काँग्रेस धरून 57 ब्रिटीश अमला खालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.

(d) परिषदेस एकूण 89 सभासद होते.

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) फक्त
(a), (b) आणि (d) फक्त
(b), (c) आणि (d) फक्त
(c) आणि (d) फक्त 

उत्तर= (2)

 

60.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती ?

समता, गुलामी, जनता
बहिष्कृत भारत, जनता, गुलामी
बहिष्कृत भारत, जनता, समता
बहिष्कृत भारत, समता, गुलामी 
उत्तर= (3)

 

61.महाराष्ट्रातील गावांची घनता प्रति 100 चौ.कि.मी. ही 14 एवढी आहे. खालील नमूद ज्यांची महाराष्ट्रातील गावांची घनतेपेक्षा जास्त व पेक्षा कमी अशा दोन गट विभागणी करा :

(a) पंजाब

(b) मणीपूर

(c) राजस्थान

(d) पश्चिम बंगाल

(e) गुजरात

(f) आसाम

(g) ओडीशा

(h) सिक्कीम

पर्यायी उत्तरे :

> (a) (f) (h) (d), < (b) (c) (e) (g)

> (a) (f) (g) (d), < (b) (c) (e) (b)

> (a) (b) (g) (d), <  (c) (e) (f) (h)

> (b) (c) (e) (h), < (a) (f) (g) (d)
उत्तर= (4)

 

62. कोळशांच्या साठ्याकरीता ओळखले जाणारे नदी खोरे _________.

कृष्णा खोरे
वैनगंगा आणि वर्धा खोरे
पूर्णा खोरे
वैतरणा खोरे
उत्तर= (2)

 

63. मुंबई शहरात स्थलान्तरणामुळे निर्माण झालेल्या समस्या :

(a) लोकसंख्येची आत्यंतिक घनता

(b) निवास स्थानाचा प्रश्न

(c) बेसुमार झोपडपट्टीची वाढ

(d) वाहतुक कोंडी

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b)
(a), (b) आणि (c)
(b), (c) आणि (d)
वरील सर्व
उत्तर= (3)

 

64. मुंबईत असलेल्या प्रसिद्ध मशिदींच्या, त्या असलेल्या क्षेत्राप्रमाणे जोड्या लावा :



उत्तर= (3)

 

65. समुद्भजल पातळीत वाढ होण्याची महत्वाची कारणे :

(a) त्सुनामी लाटा

(b) जागतिक तापमान वृद्धि

(c) समुद्री जलचर

(d) हरितगृह परिणाम

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (d) बरोबर आहेत.
(b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
(a), (b) आणि (C) बरोबर आहेत.
वरील सर्व बरोबर 
उत्तर= (1)


66. (a) पृथ्वी वरील सर्वोच्च बिंदू 8848 मी. असला तरी, खंडांची सरासरी ऊंची ही केवळ 875 मीटर एवढीच आहे.

(b) सागराचा सर्वात खोल बिंदू 11350 मी. असला तरी महासागरांची सरासरी खोली ही समुद्र सपाटी पासून 3729 मी. एवढी भरते.

पर्यायी उत्तरे : 

(a) आणि (b) बरोबर
(a) बरोवर (b) चूक
(a) चूक (b) बरोबर
(a) आणि (b) चूक

उत्तर= (1)

 

67.पुढील विधान/विधाने पैकी कोणते बरोबर आहे आहेत ?

(a) वाण्याचा वेग जेव्हा मंद होतो, तेव्हा वाळू कण (रेती) एक ठिकाणी जमा होतात, त्यालाच वालुका गिरी म्हणतात.

(b) वालुका गिरी निर्मिती करीता वारा एका दिशेने वाहणे आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे :

फक्त (a)
फक्त (b)
दोन्ही
एक ही नाही
उत्तर= (4)

 

68. खालीलपैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पूरांकरिता कारणीभूत ठरतात ?

(a) अतिवृष्टी

(b) ढगफुटी

(c) उष्णकटिबंधीय वादळ

(d) जंगलतोड/निरवणीकरण

(e) मोठे पाणलोट क्षेत्र

(f) पाण्याचा अपूरा निचरा 

पर्यायी उत्तरे : 

(a), (b) आणि (c)
(a), (b), (c) आणि (d)
(d), (e) आणि (f)
(e) आणि (f) फक्त 
उत्तर= (4)

 

69.खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

(a) कोल्हापूर - लघु इंजिनिअरिंग उद्योग

(b) बल्लारपूर - कागद निर्माण उद्योग

(c) सोलापूर - पावर लूम आणि हातमाग उद्योग

(d) इचलकरंजी - रासायनिक उद्योग

पर्यायी उत्तरे :

(a), (b) आणि (c)
(a) आणि (b)
फक्त (d)
फक्त (a)
उत्तर= (3)


70. खालीलपैकी कुठला/ले हिमखंड हे/हा कांचनजंगा एव्हरेस्ट ह्या क्षेत्राचा भाग नाही/नाहीत?

(a) झेमू

(b) खुबु

(c) कॅगशृंग

(d) तोलाम वाऊ

(e) गाशेर ब्रुम

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (e)
(b) आणि (d) 
फक्त (c) 
फक्त (e)

उत्तर= (4)

 

71. खालीलपैकी कोणते भूरूप हे चूनखडी प्रदेशाशी निगडीत नाही ?

विलयन विवर
हिमोढ 
आर्टेशियन विहिर
शुष्क दरी

उत्तर= (4)

 

72.नागरीकरणाचे नकारात्मक प्रभाव :

(a) सुखसुविधांची कमतरता

(b) झोपडपट्टीची निर्मिती

(c) पर्यावरणीय समस्या

(d) लोकसंख्येची वाढ

पर्यायी उत्तरे : 

(a), (b) आणि (c)
(a), (b) आणि (d)
(a), (c) आणि (d)
वरील सर्व
उत्तर= (1)

 

73.खालीलपैकी कुठले घटक हे हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत?

(a) हिंद महासागरालगत असलेले अनेक देश हे लहान व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत.

(b) येथील ब-याच शेजा-यांमध्ये असलेले वितुष्टांचे राजकीय संबंध,

(c) चीन व जपान ह्यांचा वाढता हस्तक्षेप.

(d) मुसलमान राष्ट्रांमध्ये वाढणारा दहशतवाद.

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (c)
(b) आणि (c)  
(c) आणि (d)
यापैकी कुठलेही नाही 
उत्तर= (4)

 

74. महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात खालीलपैकी _______ या हवामान घटकाची भूमिका महत्वाची आहे.

अभ्राच्छादन
आर्द्रता
पर्जन्य 
तापमान

उत्तर= (3)

 

75. वैद्यकीय सोयी-सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेले परंतु सध्या जेथे वैद्यकीय उपकरणे व स्टोल फर्निचरचे उत्पादन केले जाते असे शहर :

मिरज
औरंगाबाद   
सांगली 
वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर= (1)

 

76. मृदा संवर्धनासाठी खालील कोणते उपाय योजणे आवश्यक आहे ?

(a) वनस्पती आवरण आणि संरक्षित वृक्षारोपण

(b) पाय-या-पाय-याची शेती

(c) स्थलांतरीत शेतीवर प्रतिबंध

(d) पिकांची चक्रीय पद्धत

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) बरोबर आहेत.
(a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
(c) आणि (d) बरोबर आहेत.
(a) आणि (d) बरोबर आहेत.

उत्तर= ()

 

77.(a) अंतर्गत शक्तींचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून होत असते.

(b) बाह्य शक्तींचा उगम बाह्यस्थ स्रोतातून होतो (सूर्य) व ह्या भूपृष्ठाच्या झीजेस नदी, वारे व इतर बाह्य कारके कारणीभूत असतात.

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) बरोबर
(a) बरोबर (b) चूक
(a) चूक (b) बरोबर
(a) आणि (b) चूक 

उत्तर= (1)

 

78. भूखंड वहनाचे खालील कोणते महत्वाचे पुरावे आहेत ?

(a) भौगोलिक पुरावा

(b) हवामानाचा पुरावा

(c) जीवाश्माचा पुरावा

(d) औष्णिक शक्ती

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) बरोबर आहेत.
(c) आणि (d) बरोबर आहेत. 
(a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
(b) आणि (d) बरोबर आहेत .
उत्तर= (3)

 

79. नदीच्या क्षरणामुळे निर्मित भूविशेष कोणते ?

(a) कुंभगर्ता किंवा कुंभ खळगे

(b) धावत्या

(c) धबधबा

(d) टेकडी

पर्यायी उत्तरे :

फक्त (a) बरोबर
(b) आणि (c) बरोबर 
(a), (b) आणि (c) बरोबर
(d) आणि (b) बरोबर

उत्तर= (3)

 

80. (a) महाराष्ट्रात, एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते. ह्याची ही दोनचे मुख्य क्षेत्रे आहेत.

(b) पूर्व विदर्भात, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया, तट कोंकण आणि दक्षिण महाराष्ट्रात,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर अशी क्षेत्रे आहेत.

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) बरोबर
(a) बरोबर (b) चूक 
(a) चूक (b) बरोबर
(a) आणि (b) चूक

उत्तर= (3)

 

81. (a) कोयना जलविद्युत प्रकल्प, हा कृष्णा नदीच्या उपनदी कोयना, ह्यावर उभारला असून, ह्या धरणाच्या जलाशयाला ‘शिवसागर' अशा नावाने ओळखले जाते. 

(b) कोयना नदीचे पूर्वेकडील वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळवून चिपळूण तालुक्यात पोफळी येथे एक मोठे वीज
निर्मिती केंद्र उभारले आहे. 

पर्यायी उत्तरे :

(a) व (b) बरोबर
(a) बरोबर (b) चूक
(a) चूक (b) बरोबर
(a) व (b) चूक
उत्तर= (1)

 

82. खालीलपैकी कुठली धार्मिक/सांस्कृतीक प्रेक्षणीय स्थळे पुणे जिल्ह्यात नाहीत ?

(a) महादजी शिंदे छत्री

(b) चतुःशृंगी

(c) तळ्यातला गणपती

(d) शनिवार वाडा

(e) कसबा गणपती

पर्यायी उत्तरे :

(b) आणि (c)
(b) आणि (d)
(c) आणि (a)
वरीलपैकी कुठलेच नाही

उत्तर= (4)

 

83. जल निस्सार पद्धतीत प्रदेशातील भूवैज्ञानिक संरचना व नदी प्रवाह यांच्यात कोणताही संबंध आढळत नाही त्याला म्हणतात :

वृक्षाकृती निस्सार प्रारूप 
जाळीदार निस्सार प्रारूप
आयताकृति निस्सार प्रारूप
अध्यारोपित निस्सार प्रारूप 

उत्तर= (4)

 

84. महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिजसंपत्तीचे मुख्यक्षेत्रे कोणती ?

(a) सिंधुदुर्ग - रत्नागिरी

(b) नागपूर - भंडारा

(c) कोल्हापूर - ठाणे

(d) गोंदिया - गडचिरोली

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) बरोबर आहेत.
(b) आणि (d) बरोबर आहेत.
(a) आणि (C) बरोबर आहेत.
(b) आणि (c) बरोबर आहेत.
उत्तर= (3)

 

85.खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

(a) महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी लोकसंख्येचा वाटा क्रमशः 55 व 45% असा आहे. 

(b) 2001-2011 ह्या दशकातील वाढ ही साधारण 16% असली, तरी ही वाढ शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा
दुप्पट पेक्षा जास्त आहे. 

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b) बरोबर
(a) बरोबर (b) चूक 
(a) चूक (b) बरोबर
(a) आणि (b) चूक
उत्तर= (1)

 

86. योग्य जोड्या जुळवा :



उत्तर= (1)

 

87. खालीलपैकी कोणते विधान/विधाने चूक किंवा बरोबर आहे/आहेत ?

(a) राज्यवार राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये, राजस्थान व तामीळनाडू पेक्षा जास्त आहे.

(b) राज्यवार राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये, गुजरात व कर्नाटक पेक्षा कमी आहे.

पर्यायी उत्तरे : 

(a) आणि (b) बरोबर
(a) बरोबर (b) चूक
(a) चूक (b) बरोबर
(a) आणि (b) चूक 

उत्तर= (2)

 

88.खालील नमूद जिल्ह्यांचे घरगुती विजेच्या दरडोई वापरा प्रमाणे उतरत्या क्रमाने क्रम लावा :

(a) नागपूर जिल्हा

(b) अहमदनगर जिल्हा

(c) वर्धा जिल्हा

(d) पूणे जिल्हा

(e) ठाणे जिल्हा

पर्यायी उत्तरे   

(d), (e), (b), (a), (c)

(e), (d), (a), (c), (b)

(e), (d), (b), (a), (c)

(e), (b), (d), (a), (c)
उत्तर= (2)

 

89.मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी ________ हा घाट अत्यंत उपयुक्त आहे.

(a) फोंडा आणि आंबोली

(b) थळघाट व बोरघाट

(c) आंबा घाट

(d) आंबेनळी

पर्यायी उत्तरे :

फक्त (a) बरोबर
 
(b) आणि (c) बरोबर
(c) आणि (d) बरोबर
उत्तर= (1)

 

90. टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे _______ च्या कार्याशी संबंधित आहेत.

वारा
सागरी लाटा
हिमनदी 
भूमिगत पाणी
उत्तर= (2)

 

91. अन्नसाखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुतीची असून ती अनेक स्रोतातून होते, तेव्हा त्याला ______ म्हणतात.

अन्न जाळे
जैव आकार
अन्न स्तूप
वरीलपैकी कोणतेही नाही 

उत्तर= (1)

 

92. खालीलपैकी कोणत्या वायास ''स्नो ईटर' म्हटले जाते ? 

फॉन
चिनुक 
आंधी 
बर्ग
उत्तर= (2)

 

93.हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम :

(a) मानवी समाज आणि शेतीवर होतो

(b) पर्जन्य न्यूनता

(c) सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो

(d) सागराची पातळी वाढते

पर्यायी उत्तरे :  

(a) व (b)
(c) व (d)
वरील सर्व
(a) व (d)
उत्तर= (3)

 

94. नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात _______.

अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरील वारे
हिंदी महासागर व अरबी समुद्रावरील वारे
बंगालचा उपसागर व हिंदी महासागरावरील वारे 
वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर= (1)

 

95. वातावरणातील कोणता थर ध्वनी लहरी परावर्तित करतो ?

तपांबर
आयनांबर
ओझोन थर 
स्थितांबर 

उत्तर= ()

 

96.'परिसंस्था' ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली ?

ए. टान्सले 
जी. डार्विन
आय. न्यूटन
रूदरफोर्ड

उत्तर= (1)

 

97. भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

 
आवर्त 
प्रतिरोध
यापैकी नाही
उत्तर= (3)

 

98. तपांबर मध्ये तापमान 6.4°C ने दर _______ मीटरला कमी होते.

5000 मी 
500 मी
100 मी
1000 मी

उत्तर= (4)

 

99. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजुला कमी दाबाचा पट्टा, जो साधारणपणे 5 ते 30° अक्षांशापर्यंत आढळतो त्याला __________   म्हणतात .

डोलड्रम
व्यापारी वा-याचा पट्टा
 
ध्रुवीय पूर्वी वारे
उत्तर= (2)

 

100. खालीलपैकी कोणती संघननाची रूपे नाहीत?

पर्जन्य
देव
दहिवर 
सर्व प्रकाराचे मेघ

उत्तर= (1)

 

101. 1979 मध्ये यु.एस.ए. मधील कोणत्या अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पात अपघात झाला होता ?

थ्री माईल आयलंड
डेट्राइट
ओहीओ
जॉर्जीया
उत्तर= (1)

 

102. खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो?

कार्बन डायऑक्साइड
सल्फर डायऑक्साइड 
क्लोरोफ्लोरोकार्बन
नाइट्रोजन डायऑक्साइड
उत्तर= (3)

 

103. शास्त्रीय अनुमानानुसार दर मिनिटाला दर चौरस से.मी. पृष्ठभागावर 1.94 कॅलरी सौरऊर्जा शोषली जाते त्यास काय म्हणतात?

सौरस्थिरपद/सौरस्थिरांक
पृथ्वीची भूधवलता
सौरशक्तीचे परावर्तन
वरीलपैकी नाही
उत्तर= (1)

 

104. उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतात :

(a) मिथेन

(b) नायट्रस ऑक्साइड

(c) क्लोरोफ्लोरोकार्बन

(d) हायड्रोजन सल्फाइड

पर्यायी उत्तरे :

(a), (b), (c) 

(a), (c), (d)

(b), (C), (d)

वरील सर्व
उत्तर= (1)

 

105. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?

अ‍ॅन्थ्रासाईट
 बिटूमिनस
लिग्नाईट 
पीट
उत्तर= (1)

 

106. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

सातपुडा, हरिश्चंद्रगड, सातमाळ, शंभूमहादेव
सातपुडा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव 
शंभूमहादेव, सातमाळ, सातपुडा, हरिश्चंद्रगड
सातपुडा, सातमाळ, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड
उत्तर= (2)

 

107. उष्मागतिक रूपांतरणाचा वायूराशीवर होणारा परिणाम :

शीत किंवा उबदार
स्थिर व अस्थिर
शीत व स्थिर
उबदार व अस्थिर
उत्तर= (1)

 

108. कोरड्या व ओल्या फुग्याचा तापमापक कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरतात ? 

हवेचा भार
तापमान 
सापेक्ष आर्द्रता
वृष्टी 
उत्तर= (3)

 

109. वस्तीचे मुख्य भाग आहेत :

(a) समरूप भाग

(b) मध्य भाग

(c) परिसंचरण भाग

(d) विशिष्ट भाग

पर्यायी उत्तरे :

(a) आणि (b)
(a), (c) आणि (d)
(b), (c) आणि (d)
वरील सर्व
उत्तर= (4)

 

110. खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ?

मेंढी 
ससा 
साप
हरिण
उत्तर= (3)

 

111. महाराष्ट्रातील प्रादेशिक वार्षिक पर्जन्यमान.


उत्तर= (2)

 

112. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

तपांबर
स्थितांबर 
बाह्यांबर
दलांबर
उत्तर= (2)

 

113. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

भिमा, निरा, कृष्णा, वारणा
वारणा, कृष्णा, भिमा, निरा 
कृष्णा, वारणा, भिमा, निरा
 
उत्तर= (4)

 

114. बाष्पसंपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता किती असते ?

25 ग्रॅम
100 ग्रॅम
25 टक्के
100 टक्के
उत्तर= (4)

 

115. जोड्या लावा :


उत्तर= (2)

 

116. _________ या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते.

मॉलीबडेनम
जस्त
मँगनीज
बोरॉन
उत्तर= (4)

 

117. खालीलपैकी हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते ?

(a) उर्जेचा कमी वापर

(b) उर्जेचा अधिक सक्षम वापर

(c) सौर व पवन उर्जा वापर

(d) प्रदूषण सहनशील वनस्पतींची लागवड करणे

पर्यायी उत्तरे :

(a), (b) फक्त
(c) फक्त
(d) फक्त
वरीलपैकी सर्व
उत्तर= (4)

 

118. पावसाच्या पडणाच्या थेंबामुळे होणा-या माती धुपीस _______ असे म्हणतात.

ओघळपाडी धूप
घळपाडी धूप
सालकाढी/चादर धूप
शिंतोड़ी धूप 
उत्तर= (4)

 

119. डायअमोनियम फॉस्फेट या खतामधे P2O5 चे प्रमाण ______ टक्के आहे.

30
41
46 
51
उत्तर= (3)

 

120. ________ हा न्युक्लीक आम्ल, फायटीन आणि फॉस्फोलिपिडचा महत्वाचा घटक आहे. 

फॉस्फरस
नायट्रोजन
पोटॅशियम 
कॅल्शियम
उत्तर= (1)

 

121. कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल?

साखर 
पिष्टमय पदार्थ
स्निग्ध पदार्थ 
प्रथिने
उत्तर= (3)

 

122. खालीलपैकी एकूण पिक कालावधीमध्ये कमी पाणी लागणारे पिक कोणते?

रब्बी ज्वारी
मिरची 
गहू 
उन्हाळी मूग
उत्तर= (4)

 

123. _______ हे आम्लधर्मीय जमिनीत चल तर अल्कधर्मीय जमिनीत अचल असते.

जस्त 
शिसे
कॅडमिअम
अर्सेनिक
उत्तर= (3)

 

124. खालीलपैकी काय प्रति पर्ण क्षेत्र प्रती काल शुष्क पदार्थ साठवणुकीचा दर दर्शविते ?

PAR (फोटोसिंथेटिकली अ‍ॅक्टिव रॅडिएशन)
NAR (नेट अ‍ॅसिमिलेशन रेट)
CGR (क्रॉप ग्रोथ रेट)
RCR (रिलेटिव ग्रोथ रेट)
उत्तर= (2)

 

125. ________ हा वायु जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात आढळतो तथापी, त्याचे जास्तीत जास्त प्रमाण जमिनीपासून 16 ते 30 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अक्षांशावर आढळून येते.

कार्बन डायऑक्साइड
नायट्रोजन
हायड्रोजन
ओझोन
उत्तर= (4)

 

126. _______ हा कोरडवाहू शेतीपुढील एक मुख्य प्रश्न आहे.

पावसाची (मान्सूनची) लवकर सुरुवात आणि लवकर शेवट
पावसाची (मान्सूनची) लवकर सुरुवात आणि उशिरा शेवट
पावसाची (मान्सूनची) उशिरा सुरुवात आणि लवकर शेवट
पावसाची (मान्सूनची) उशिरा सुरुवात आणि उशिरा शेवट
उत्तर= (3)

 

127. पाण्याचे उष्णता प्रदूषण _______ यामुळे होते.

मैला
कृषि रसायने
औद्योगिक सांडपाणी
कृत्रिम धुलाई पावडर
उत्तर= (3)

 

128. इक्रीसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे ?

कर्नाटक
तामिळनाडु
आंध्र प्रदेश
 तेलंगाणा
उत्तर= (4)

 

129. खालीलपैकी हरीत गृह वायू कोणते आहेत ?

(a) O2

(b) N2O

(c) CO2

(d) CH4

पर्यायी उत्तरे :

(a), (b), (c)
(b), (c), (d)
(c), (d), (a)
(d), (a), (b)
उत्तर= (2)

 

130. मृदा आणि पाणी संवर्धनाचे हे कृषिविद्या विषयक उपाय आहेत :

(a) पट्टामेर पद्धत

(b) समपातळीत लागवड

(c) आच्छादनांचा वापर

(d) समपातळीतील बांध

पर्यायी उत्तरे :

(c), (b) आणि (a) फक्त
(c), (b) आणि (d) फक्त 
(d), (c) आणि (a) फक्त 
(a), (b), (c) आणि (d) सर्व
उत्तर= (1)

 

131. माती नुकसानीचे सूत्र A = RKSLCP मध्ये 'K' काय दर्शवितो?

पिक घटक
अपधाव घटक
जमिन धूप घटक 
पाऊस घटक
उत्तर= (3)

 

132. जमिनीतील वाफशाच्या वेळची जलमर्यादा (-1/3 बार) आणि वनस्पती सुकण्याच्या वेळची जलमर्यादा (-15 बार) या दोनमधील पाण्याच्या भागास ______ म्हणतात.

केशाकर्षण पाणी
आर्द्रता शोषक पाणी ( हैयग्रॉस्कोपिक पाणी)
उपलब्ध पाणी
गुरुत्वाकर्षणाचे पाणी
उत्तर= (3)

 

133. ________ वायु कोळसा, पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जिवाश्म अर्धवट जळण्यामुळे निर्माण होतो.

मिथेन
कार्बन मोनोक्साईड
नायट्रस ऑक्साइड
क्लोरोफ्लोरोकार्बन
उत्तर= (2)

 

134. दैनंदिन तापमानातील लयबद्ध चढउतारास वनस्पतीचा प्रतिसाद मिळतो त्यास _______ म्हणतात.

थरमोस्टॅटिक्स्
थरमोडायनॅमिक
थरमोपिरयाडिझम
यापैकी एकही नाही
उत्तर= (3)

 

135. वाऱ्याची गती या साधनाने मोजतात : 

सायक्रोमीटर 
विंड व्हेन (वातकुक्कूट)
अनेमोमीटर
बॅरोमीटर
उत्तर= (3)

 

136. मैला मिश्रण हे ________ धातुचा मुख्य स्रोत आहे कि जो अत्यंत विषारी आहे.

शिसे
कॅडमियम
तांबे 
जस्त
उत्तर= (2)

 

137. खालीलपैकी कोणता निर्देशांक सर्वात कार्यक्षम आंतरपिक पद्धती ठरविण्या करीता उपयुक्त आहे ?

एल.ई.आर. (लँड इक्विव्हॅलंट रेषो)
एल.ए.आर. (लीफ एरिया रेषो)
पी.ए.आर. (फोटोसिंथेटिकली अ‍ॅक्टिव रॅडिएशन
आर.जी.आर. (रिलेटिव ग्रोथ रेट)
उत्तर= (1)

 

138. 2, 4-डी तणनाशक जमिनीत _______ दिवस अवशेष स्वरूपात राहते.

14 ते 30
35 ते 45
46 ते 60 
61 ते 75
उत्तर= (1)

 

139. पाणी मोजण्याच्या प्रमाणानुसार, 1 टीएमसी = _______.

10 घन मीटर
109 घन फुट
10घन मीटर
1010 घन फुट
उत्तर= (2)

 

140. जमिनीची घनता _______ या एककात मोजतात.

मिलीग्रॅम प्रति मीटर
ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर
घन सेंटीमीटर प्रति ग्रॅम
घन मिलिमीटर प्रति ग्रॅम
उत्तर= (2)

 

141. जमिनीच्या पोयटा कणाचा व्यास किती असतो ? 

0.2 - 0.02 मी.मी.
0.02 - 0.002 मी.मी.
2 मी.मी. 
> 2 मी.मी.
उत्तर= (2)

 

142. वनस्पती प्रामुख्याने नत्र _______ या स्वरूपात शोषतात.

नायट्रेट
नायट्राईट
अमाईड 
यापैकी एकही नाही
उत्तर= (1)

 

143. खोल जमिनीमध्ये उभ्या अच्छादनाचा वापर ________ वाढण्यासाठी करतात.

अपधाव
जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण 
धूप
जमिनीची खरावी
उत्तर= (2)

 

144. बहुतांश पिकांमध्ये जेथे जमिनीला बराच ऊंच सखलपणा आणि उतार असतो अशा वेळी _________ ही पाणी देण्याची पद्धत वापरता येते.

ठिबक सिंचन 
तुषार सिंचन
सारा 
आळे
उत्तर= (2)

 

145. ज्वारी पिकाची जल वापर क्षमता साधारणपणे ________ आहे.

9.0 किलो ग्रॅम प्रति हेक्टर मीलीमीटर 
13.4 किलो ग्रॅम प्रति हेक्टर मीलीमीटर
3.7 किलो ग्रॅम प्रति हेक्टर मीलीमीटर 
वरीलपैकी नाही
उत्तर= (1)

 

146. धूळ, पराग कण, धूर आणि पाण्याची वाफ ह्यामुळे कोणत्या प्रकारचे स्कॅटरिंग (विखुरणे) होते ?

रँले विखुरणे
मई विखुरणे 
गैर पसंतीचे विखुरणे
एकत्रित विखुरणे
उत्तर= (2)

 

147. जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेमध्ये कार्यरत भागांमध्ये खालीलपैकी कोणता/कोणते भाग समाविष्ट आहे?

अवकाश विभाग
नियंत्रण विभाग
वापरकर्ता विभाग
वरील सर्व
उत्तर= (4)

 

148. लँडसॅट 1,2 व 3 वरील बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली 185 कि.मी. ची स्वॅथ रुंदीत कोणत्या चार तरंगलांबींचा अंतर्भाव करते?

दृष्यमान वर्णपटातील 0.5 - 0.6 μm व 0.6 - 0.7 μm
    अवरक्त वर्णपटातील 0.7 - 0.8 μm व 0.8 - 1.1 μm
दृष्यमान वर्णपटातील 0.3 - 0.4 μm व 0.5 - 0.6 μm
    अवरक्त वर्णपटातील 0.7 - 0.8 μm व 0.9 - 1.1 μm
दृष्यमान वर्णपटातील 0.6 - 0.7 μm व 0.7 - 0.8 μm
    अवरक्त वर्णपटातील 0.7 - 0.9 μm व 1.0 - 1.1 μm
दृष्यमान वर्णपटातील 0.4 - 0.7 μm व 0.8 - 1.1 μm
    अवरक्त वर्णपटातील 1.1 - 1.2 μm व 1.3 - 1.4 μm
उत्तर= (1)

 

149. जी.आय.एस. मधे कोणत्या उपप्रणालींचा समावेश होतो ?

(a) अशी प्रणाली की ज्यामधे माहिती गोळा करणे व त्याचे विशिष्ट उद्देशासाठी पृथ:करण करणे शक्य होते.

(b) अशी प्रणाली की ज्यामधे संगणकाचे हार्डवेअर व संगणकाची आज्ञावली माहिती साठवून त्याचे व्यवस्थापन व पृथ:करण करता येते तसेच सदर माहिती संगणकाच्या मॉनिटर वर दाखवता येते.

(c) अशी माहिती उत्पादन प्रणाली की जी हार्डकॉपी व इतर गोष्टी तयार करू शकते.

पर्यायी उत्तरे : 

फक्त (a) 
फक्त (b) 
फक्त (a) आणि (b) 
वरीलपैकी सर्व 
उत्तर= (4)

 

150. खालील उपग्रहांचे कालक्रमानुसार असलेले अचूक उत्तर शोधा :

कार्टोसॅट-28, आयएमएस 1, आय आर एस-1C, आय आर एस-P2
आय आर एस-P2, कार्टोसॅट-2B, आयएमएस 1, आय आर एस-1C
आय आर एस-P2, आयआरएस-1C, आयएमएस 1, कार्टोसॅट-2B 
आय आर एस-1C, आयआर एस-P2, आयएमएस 1, कार्टोसॅट-2B

उत्तर= (3)

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या