राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - पेपर १


MPSC_2018_prelims_paper1



 1. यादी I आणि यादी II याच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा : 



उत्तर= (3)

 

2. खालील विधानांची सत्यता तपासा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा :

विधान 'अ' : पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांशात फिरते.

विधान ‘ब' : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो. 

पर्यायी उत्तरे : 

विधाने ‘अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत 
विधान ‘अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत 
विधान ‘अ’ बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
विधान ‘अ’ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे
उत्तर= (1)

 

3.खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही ? 

ग्रॅबन
गट पर्वत
अवशिष्ट पर्वत 
खचदरी

उत्तर= (3)

 

4.ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भुरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा :



उत्तर= (3)

 

5.विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणा-या ग्रहीय वायांचा योग्य क्रम ओळखा. 

पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे
व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे
व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे
ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे 

उत्तर= (2)

 

6. खाली दोन विधाने आहेत. त्यापैकी (अ) हे विधान असून (र) हे त्याचे कारण आहे खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

विधान (अ) : विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. 

कारण (र) : विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्टये असलेला आहे. 


(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे
(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही 
(अ) सत्य असून (र) असत्य आहे 
(अ) असत्य असून (र) सत्य आहे 

उत्तर= (1)

 

7.खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही ?

द्रवीकरण
भस्मीकरण (ऑक्सीडेशन) 
कर्बाम्ल क्रिया (कार्बोनेशन)
क्षरण क्रिया

उत्तर= (4)

 

8खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

विधान ‘अ’ : विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले वाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय.

विधान 'ब' : हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल वाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात.

विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत 
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत 
 
विधान ‘अ’ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे

उत्तर= (2)

 

9. खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

विधान (अ) : सागरी क्षेत्रात समतापरेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर जातात. 

कारण (र) : सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते.

(अ) व (र) दोन्ही बरोबर आहेत आणि (र) हे (अ) चे अचूक स्पष्टीकरण आहे 
(अ) व (र) दोन्ही बरोबर आहेत परंतु (र) हे (अ) चे अचूक स्पष्टीकरण नाही
(अ) हे बरोबर आहे परंतु (र) हे चूक आहे 
(अ) हे चूक आहे परंतु (र) हे बरोबर आहे
उत्तर= (1)

 

10. खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा.

ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रूंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात.
उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे.
उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधुन माश्यांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.
भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

पर्यायी उत्तरे :
विधाने अ आणि ब सत्य आहेत
विधाने अ आणि क सत्य आहेत 
विधाने ब, क आणि ड सत्य आहेत 
विधाने अ, ब आणि क सत्य आहेत 

उत्तर= (4)

 

11.विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप _____________ असतो. 

अरूंद पाया आणि रूंद माथा 
 
रूंद पाया आणि अरूंद माथा
अरूंद पाया आणि अरूंद माथा 
उत्तर= (3)

 

12. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :

विधान ‘अ : भारताचा काही भू-भाग उत्तर गोलर्धात असून काही भू-भाग दक्षिण गोलार्धात आहे.

विधान ‘ब : भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 कि.मी. पेक्षा हि जास्त आहे.

विधाने 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत
विधाने 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत
विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे. 

उत्तर= (2)

 

13. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा :

विधान 'अ' : हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालीक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात.

विधान 'ब' : प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदन्यातून वाहतात.

विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत
विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
विधान ‘अ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे
उत्तर= (1)

 

14.पर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्टचे आहेत ?

आवर्ते पर्जन्य
अभिसरण पर्जन्य
प्रतिरोध पर्जन्य 
औष्णिक पर्जन्य 
उत्तर= (3)

 

15. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत ?

जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे
नारळाचे उत्पादन घेतले जाते
मासेमारीसाठी अनुकूल असतो
ड.पर्यटकांसाठी आकर्षक असतो

पर्यायी उत्तरे :
उत्तर-भारतीय मैदानी प्रदेश
प्रायद्वीपीय पठारी प्रदेश 
किनारवर्ती प्रदेश
4.हिमालयीन प्रदेश
उत्तर= (3)

 

16.UNEP च्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा : 





उत्तर= (3)

 

17.संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ?

1 जून
 
1 सप्टेंबर
16 सप्टेंबर

उत्तर= (4)

 

18.खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे ?

 
कार्बन डायऑक्साईड  
नायट्रस ऑक्साईड
4.क्लोरोफ्लूरोकार्बन

उत्तर= (4)

 

19.दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश _________  म्हणून ओळखला जातो. 

इको-झोन
इको-पॉज
इको-टोन
4.इको-टाईप

उत्तर= (3)

 

20.खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो ? 

8000 वर्षापासून होणारी जंगलतोड
आग आणि अतिचरण ह्यांचा वापर
5000 वर्षापासून होणारी खाचरातली भातशेती
ड. औद्योगिक क्रांति

पर्यायी उत्तरे :
फक्त ड 
फक्त क आणि ड
फक्त ब, क आणि इ
वरीलपैकी सर्व

उत्तर= (4)

 

21.दुस-या पंचवार्षिक योजनाकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही ? 

राउरकेला (ओरिसा)
भिलाई (छत्तिसगड)
दुर्गापूर (प. बंगाल)
बोकारो (झारखंड)

पर्यायी उत्तरे :

फक्त अ आणि ब
फक्त क
फक्त ड 
फक्त अ आणि ड
उत्तर= (3)

 

22.किंमतवाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही ?

निर्यातवाढ
साठा
पतनिर्मितीत वाढ 
ड.दुष्काळ

पर्यायी उत्तरे :

फक्त अ आणि ब
फक्त क आणि ड
फक्त ड
4.फक्त क
उत्तर= (4)

 

23.पुढीलपैकी कोणता घटक दारिद्रयनिर्मितीस कारणीभूत नाही ?

भाववाढ
शासकीय खर्चात वाढ
तुटीचा अर्थभरणा
अल्प बचती व भांडवलनिर्मिती

पर्यायी उत्तरे :
फक्त अ आणि क
फक्त अ, क आणि ड
फक्त ब आणि ड
फक्त ब आणि क

उत्तर= (4)

 

24. किमान जीवनावश्यक गरजांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव” याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ?

निरपेक्ष दारिद्रय
सापेक्ष दारिद्र्य 
वरील दोन्ही
यापैकी नाही  
उत्तर= (1)

 

25.अन्न सुरक्षा कायदा, 2013 च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.

अ. हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो.

ब. लाभार्थ्यांना दरमहा प्र.कि. ₹ 3 प्रमाणे तांदुळ, प्र.कि. ₹ 2 प्रमाणे जाडेभरडे धान्य व प्र.कि.₹ 1 प्रमाणे गहु उपलब्ध होणार आहे.

उत्तर= (3)

 

26. भारतीय जनगणना अहवाल, 2011 नूसार एकुण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे ?

16.5 टक्के 
17.3 टक्के 
17.5 टक्के
17.7 टक्के 

उत्तर= ()

 

27.पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे व स्त्रियांचे किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले ?

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 1976

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 1977

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000

लोकसंख्या भविष्यवेध (2001 - 2026) 


उत्तर= (1)

 

28.भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा' या उद्देशाने सुरू केले आहे ?

अ. आम आदमी विमा योजना 

ब. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना

क. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम

पर्यायी उत्तरे :

फक्त अ आणि ब
फक्त ब आणि क 
फक्त क
वरील सर्व

उत्तर= (4)

 

29.हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे (GNI) मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत ?

अ. राष्ट्रीय उत्पन्न

ब. नैसर्गिक संसाधनांमध्ये घट

क. पर्यावरणीय हास

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ आणि क
फक्त अ 
फक्त अ आणि ब
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

30.‘सहस्त्रक विकास लक्ष्ये (MDGs)' यांमध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते ?

अ. दारिद्र्य व भुक

ब. महिला सबलीकरणं

क. पर्यावरणीय शाश्वतता

ड. विकासासाठी जागतिक भागीदारी

पर्यायी उत्तरे :

फक्त अ आणि ब
फक्त क आणि ड 
फक्त अ, ब आणि क
वरील सर्व
उत्तर= (4)

 

31.महिला व बालकल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो ?

अ. अंगणवाडी सेवा योजना

ब. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

क. राष्ट्रीय पोषण अभियान

ड. बाल सुरक्षा योजना

पर्यायी उत्तरे :

फक्त अ आणि ब
फक्त क आणि ड  
फक्त अ, ब आणि क
वरील सर्व
उत्तर= (4)

 

32.द्रारिद्रय घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठीत रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे, कारण

अ. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे.

ब. वेतनरोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील (एम्प्लॉयर) अवलंबित्व वाढवते.

क. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल.

ड. श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील.

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ आणि ब
फक्त ब आणि क
फक्त क आणि ड
वरील सर्व
उत्तर= (4)

 

33.'मानवी दारिद्रय निर्देशांक' ही संकल्पना सर्वप्रथम ___________ या अहवालात मांडली गेली.

मानव विकास अहवाल, 1990

मानव विकास अहवाल, 1997

मानव विकास अहवाल; 2001

मानव विकास अहवाल, 2014

उत्तर= (2)

 

34.‘शिरगणनात्मक शहरे' यांची झालेली भरमसाट वाढ हे एक मोठे आव्हान आहे कारण अशा शहरांमध्ये 

अ. शहर अनुशासन संरचना नसतात

ब. आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात

क. शहरांची वाढ ही वेगाने वाढणाच्या लोकसंख्येमुळे झालेली असते

पर्यायी उत्तरे : 

अ, ब आणि क
अ आणि ब
ब आणि क
अ आणि क
उत्तर= (1)

 

35.बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012-17) मुख्य उद्दिष्ट कोणते होते ?

आर्थिक वृद्धि व स्थिर विकास साधणे
जलद वृद्धी व विकास साधणे 
जलद व अधिक सर्वसमावेशक वृद्धि साधणे
जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वद्धि 
उत्तर= (4)

 

36.खालीलपैकी काय जिओस्टेशनरी ऑरबिट (GEO) चे अचूकपणे वर्णन करते ? 

समुद्रसपाटीपासूनची उंची 20,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 12 तास लागतात. 
समुद्रसपाटीपासूनची उंची 36,000 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात.
समुद्रसपाटीपासूनची उंची 400 कि.मी. व एक कक्षा परिभ्रमणास 90 मिनिटे लागतात. 
यापैकी कुठलेह नाही 
उत्तर= (2)

 

37.फ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये (λ) तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते ?

दोन संलग्न उगमस्थानातील अंतर
फ्रिजची रूंदी
स्लिट व दूरदर्शकाची नेत्रकाच यांतील अंतर
वरील सर्व
उत्तर= (4)

 

38.ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 cm आहे, अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिंगांचे नाभीय अंतर किती असेल ?

50 cm, अंतर्वक्र
50 cm, बहिर्वक्र
25 cm, अंतर्वक्र
25 cm, बहिर्वक्र
उत्तर= (2)

 

39.10 ओहमचा रोध 12 V च्या विद्युतघटास जोडल्यास रोधातून 1:1A विद्युतधारा वाहते. विद्युतघटाचा अंतर्गत रोध काढा. 

10 Ω
0.1 Ω
10.9 Ω
0.91 Ω

उत्तर= (4)

 

40.एकमेकांपासून 1 मिलिमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाच्छीद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तरंगलांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेत्या पक्तींमधील अंतर किती ?

5.0 mm
0.5 mm
5.0 cm
0.05 mm 

उत्तर= (2)

 

41.एका वाफेच्या इंजिनला 3:6 x 109J/min दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5:4 x 108J/min दराने कार्य करते. अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल ?

15%
12.5%
85%
87.5%
उत्तर= (1)

 

42.काही झाडांमधे तांब्याच्या कमतरतेमूळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला ___________ म्हणतात. 

एक्झांथिमा
पांढरा डोळा
डायबँक
पेशीमृत होणे
उत्तर= (1)

 

43.सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात ? 

37
44
60
50 
उत्तर= (3)

 

44.दोन नावे (बायनोमिअल) देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचविली ?

कॅरोलस लिनायस
बॅथम आणि हुकर
थिओफ्रास्ट्स
हचिनसन

उत्तर= (1)

 

45.सर जे.सी. बोस, भारतीय वैज्ञानिक, यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जीवंत पेशीमूळे असेंट ऑफ मॅप__________  ह्या क्रियेमूळे घडते ?

पलसेटरी क्रिया
ट्रांसपिरेशन पूल सिद्धांत
कोहीजन सिद्धांत
मूळ दाब सिद्धांत
उत्तर= (1)

 

46.खालीलपैकी कोणती थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहेत ?

अ. नैसर्गीक निवडीचा सिद्धांत

ब. उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत

क. वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत

ड. वियोग सिद्धांत

पर्यायी उत्तरे : 

अ, ब आणि ड
अ, ब आणि क
अ, क आणि ड
वरील सर्व

उत्तर= (2)

 

47. खालीलपैकी कोणती संप्रेरके पिटरी ग्रंथीची आहेत ?

अ. टि.एस.एच.

ब. एस.टि.एच.

क. एच.सी.जी.

ड. ए.डी.एच.

पर्यायी उत्तरे : 

अ आणि ब
ब आणि क
अ, ब आणि ड
अ, ब आणि क
उत्तर= (3)

 

48. अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते ?

अ. संरक्षण

ब. रक्तोत्पादन/रुधिरजनन

क. हालचाल सुलभता

ड. क्षाराचे संवर्धनासाठी

पर्यायी उत्तरे : 

अ, ब आणि क
ब, क आणि ड 
अ, क आणि ड
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

49.ग्रिगोर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते, कारण त्यांनी प्रथम अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती ? 

फ्रंट फ्लाय (फळ माशी)
ब्रेड मोल्ड (बुरशी) 
वटाण्याचे झाड 
रेसुस माकड

उत्तर= (3)

 

50.'M' हे मुलद्रव्य डोबेरिनर विकके मध्ये Ca, M आणि Ba हे _____________ आहे.

Be
 
Sr 
उत्तर= (3)

 

51.काष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच

मिथेनॉल 
इथेनॉल
बेझिल अल्कोहोल
आयसोप्रोप्रिल अल्कोहोल

उत्तर= (1)

 

52.पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण

ऑक्सिजन चे प्रमाण वाढते 
जंतूना मारणे
गाळ काढण्यासाठी
न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी
उत्तर= (2)

 

53.__________  ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते. 

फक्त भौतिक अभिक्रिया
फक्त रासायनिक अभिक्रिया
दोन्ही (1) व (2) 
कोणतीहि नाही

उत्तर= (2)

 

54.नैसर्गिक वायुमध्ये ___________ चे प्रमाण मुख्यत्वे करून असते. 

ब्युटेन
प्रोपेन
मिथेन
ईथेन
उत्तर= (3)

 

55.नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?

कार्बोदके 
लिपिड
प्रथिन 
टर्पिन

उत्तर= (2)

 

56. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतूदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या ?

अ. नागरिकत्व

ब. निवडणूका (कलम-324)

क. तात्पुरती संसद

ड. मूलभूत अधिकार

पर्यायी उत्तरे : 

अ, ब आणि क 
ब, क आणि ड 
अ आणि क
अ आणि ब
उत्तर= (1)

 

57.खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला ? 

शंकरी प्रसाद विरूद्ध भारत सरकार
गोलकनाथ विरूद्ध पंजाब राज्य
केशवानंद भारती विरूद्ध केरळ राज्य 
मिनव्र्हा मिल्स् लि. विरूद्ध भारत सरकार

उत्तर= (3)

 

58.भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

अ. या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.

ब. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थिती मध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.

क. या पदाच्या निवडणूकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.

पर्यायी उत्तरे : 

यापैकी एकही नाही
उत्तर= (4)

 

59. खालील विधाने विचारात घ्या :

अ. विभागीय परिषदों या घटनात्मक संस्था आहेत.

ब. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात.

क. प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो.

ड. दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केन्द्रीय गृहमंत्री भूषवितो. 

पर्यायी उत्तरे : 

विधाने अ, ब आणि क बरोबर
विधाने ब, क आणि ड बरोबर
विधाने अ, क आणि ड बरोबर
विधाने क आणि ड बरोबर

उत्तर= (4)

 

60.स्थानिक शासनावरील दुस-या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सहाव्या अहवालातील शिफारशी आहेत.

अ. एक दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे.

ब. स्थानिक संस्था लोकपाल-लोकायुक्त स्थापन करावेत.

क. महापौरांची सरळ निवड.

ड. जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिका-यांनी कार्य करावे.

पर्यायी उत्तरे :

अ, ब आणि क
ब, क आणि ड
अ, क आणि ड
अ, ब, क आणि ड   
उत्तर= (4)

 

61.खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मुळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरूस्तीद्वारे झाला ?

अ. उत्पन्नातील विषमता कमी करणे.

ब. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे.

क. समान कामांबद्दल स्त्री पुरूषांना समान वेतन.

ड. समान न्यायाची शाश्वती आणि गरीबांना मोफत कायदेविषयक सहाय्य.

इ . सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे.


अ, ब आणि क
ब, क आणि ड
क, ड आणि इ 
अ, ब आणि इ
उत्तर= (4)

 

62.खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. संसद कर वाढवू शकते.

ब. संसद कर कमी करु शकत नाही.

क. संसद कर रद्द करु शकते.

ड. संसद कर वाढवू शकत नाही.

इ. संसद कर कमी करू शकते. 


अ, क आणि इ 
ब, क आणि ड 
क, ड आणि इ 
क आणि ड
उत्तर= (3)

 

63.शून्य प्रहरा च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?

अ. संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली.

ब. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात.

क. ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली.

ड. शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. 


अ, ब आणि क
अ, क आणि ड
ब आणि क
वरील सर्व 
उत्तर= (4)

 

64.खालील विधाने लक्षात घ्या :

अ. राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतूदी ह्या पाचव्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रांस लागू नाहीत.

ब. पाचव्या परिशिष्टांत समाविष्ट असणा-या क्षेत्रात सात राज्यांचा समावेश होतो.

क. 1996 मध्ये संसदेने अश्या क्षेत्रांसाठी PESA कायदा मंजूर केला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने अचूक आहेत ? 

अ आणि ब 
अ आणि क
फक्त अ
वरील सर्व 
उत्तर= (2)

 

65.राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जवाबदारी केंद्र शासनास दिली आहे ?

कलम 343
कलम 348
कलम 350
 
उत्तर= (4)


66.भारतीय राज्यघटनेच्या दुस-या परिशिष्टामध्ये काही पदाधिका-यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यांत समाविष्ट नाही ?

विधानसभेचे उपसभापती
विधानपरिषदेचे उपाध्यक्ष
भारताचा महाधिवक्ता
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक

उत्तर= (3)

 

67.खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

अ. लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात.

ब. राज्यसभेवर अँग्लो इंडीयन ह्या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे.

क. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही.

ड. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणूकीत मतदान करू शकतात. 


अ आणि ब
क आणि ड
फक्त ब
फक्त क
उत्तर= (4)

 

68.योग्य कथन/कथने ओळखा :

अ. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत.

ब. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. 

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ
फक्त ब 
अ आणि ब दोन्हीही
अ आणि ब दोन्हीही नाही
उत्तर= (3)

 

69.योग्य कथन/कथने ओळखा :

अ. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.

ब. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.

क. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.

ड. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.

पर्यायी उत्तरे :

फक्त अ, ब आणि क
फक्त अ, ब आणि ङ
फक्त अ आणि ब
फक्त अ, क आणि ड 
उत्तर= (1)


70.योग्य क्रमानुसार लावा (राज्यांची निर्मिती) :

अ. मिझोरम

ब. नागालॅण्ड

क. मेघालय

ड. महाराष्ट्र

पर्यायी उत्तरे :

अ, ड, ब, क
ड, ब, क, अ
क, ड, ब, अ
ड, ब, अ, क 

उत्तर= (2)

 

71.उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणे संबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

2005 सालच्या सैम पित्रोदा यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणे ची शिफारस केली होती
यशपाल समिती ने ही उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणे ची शिफारस केली होती.
सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणे ऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाने प्रस्तावित केली आहे. ती यंत्रणा म्हणजे उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक यंत्रणा (HEERA).
सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) हे एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे.

उत्तर= (4)

 

72.पुढीलपैकी योग्य विधान/ने निवडा :

अ. भारतामध्ये प्रत्येकी एक हजार लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे.

ब. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्यचे किमान प्रमाण 3 : 1000 (1000 लोकांसाठी 3 डॉक्टर) असे असावे.

पर्यायी उत्तरे : 

फक्त अ
फक्त ब
अ आणि ब दोन्हीही
अ आणि ब दोन्हीही नाही
उत्तर= (1)

 

73.भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी 'पूर्वलक्षी कृती धोरणा’ संबंधी विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

हे धोरण भारताच्या विस्तारीत शेजारी देश म्हणजेच आशिया-पॅसिफिक प्रदेशावर भर देते.
  
या धोरणाने आशिया-पॅसिफिक प्रदेशाशी ईशान्य प्रांतातून सुधारीत संपर्काचा पुरस्कार केला आहे. 
या धोरणाने कृतीशील राजनयाचा पुरस्कार करत आशिया-पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लश्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे.
उत्तर= (4)

 

74.ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. हा पुरस्कार भारत सरकार द्वारा 1952 पासून प्रायोजित आहे.

ब. 1982 च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता.

क. आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला जातो.

ड. 2017 चा पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित झाला आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?  

अ, ब आणि क
ब, क आणि ड 
अ आणि ड
अ, ब, क आणि ड

उत्तर= (2)

 

75.15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

एन.के. सिंग
एन.के. मिश्रा   
एन.के. राजन
एन.के. त्यागी

उत्तर= (1)

 

76.पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) विषयी चे कोणते विधान चुकीचे आहे ?

यो प्राधिकरणचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत.
यो प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झाली आहे.
महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते.
या प्राधिकरणाने दळणवळण, गृह निर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विभागांमधे सुधारणा
घडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

उत्तर= (3)

 

77.डॉ. धीरेन्द्रपाल सिंह इतक्यात बातम्यांमधे होते. त्यांच्याबाबत काय खरे नाही ?

ते नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद) चे संचालक होते. 
ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते. 
त्यांची UGC च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

उत्तर= (3)

 

78.महाराष्ट्रातील डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे ? 

आदिवासी भागातील उच्च शिक्षण संस्थांमधे चौरस आहार पुरवण्याबाबत. 
आदिवासी भागातील माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चौरस आहार पुरवण्याबाबत. 
आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत. 
अंगणवाडी सेविकांना चौरस आहार पुरवण्याबाबत.
उत्तर= (3)

 

79.जोड्या लावा: 



उत्तर= (1)

 

80. 2017 साहित्याचे नोबेल पारितोषिक काझुओ इशिगुरो यांना मिळाले आहे. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्याची नाही ?

अ. द रिमेन्स ऑफ द डे

ब. ए पेल व्हू ऑफ हिल्स

क. अँन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड

ड. नॉर्वेजियन वूड

इ. काफ्का ऑन द शोअर

पर्यायी उत्तरे : 

अ, ब, क, ड, इ
ब, क आणि ड 
ब, क आणि इ
ड आणि इ

उत्तर= (4)

 

81.अयोग्य विधान ओळखा.

अ. प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली गेली.

ब. चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली गेली.

क. पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केली गेली.


वरीलपैकी कोणतेही नाही 
उत्तर= (2)

 

82.अयोग्य विधान ओळखा.

अ. प्रत्येक वर्षी 10th ऑक्टेबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो.

ब. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही होती.

क. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 

ड. 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना नैराश्य' अशी होती. 


वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर= (4)

 

83.भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसांचा कालखंड ______________ म्हणुन साजरा केला.

पर्यटन पर्व
स्वच्छता पंधरवडा 
राष्ट्रीय एकात्मता पर्व
मानसिक आरोग्य जागृति अभियान 

उत्तर= (1)

 

84.भारत शासनाचा 'भारत नेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम _________ शी संबंधीत आहे. 

भारतातील ग्रामीण आणि सुदूर भागांमध्ये ब्राडबैंड सेवा पुरवणे
भारतातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना ब्राडबैंड सेवा पुरवणे
भारतातील सर्व रेल्वे स्टेशनांवर ब्रॉडबैंड सेवा पुरवणे 
भारतातील सर्व सरकारी रूग्णालयांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे 
उत्तर= (1)

 

85.महाराष्ट्र शासनाची सुमतिबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे ? 

(अनुदान पात्र झालेल्या) पात्र महिला स्वयंसहाय्यता समुहांना व्याज अनुदान देण्याबाबत 
महिला उद्योजिकांना जमिन खरेदीसाठी कर्ज पुरवठा
मुंबई आणि नागपूर मधील महिला उद्योजिकांना कर माफी
महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता समुहांना 4% दराने कर्ज पुरवठा करणे 
उत्तर= (1)

 

86.पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली ?

दुसरा चंद्रगुप्त
समुद्रगुप्त
कुमारगुप्त
स्कंदगुप्त 
उत्तर= (3)

 

87.जोड्या लावा


उत्तर= (3)

 

88.खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा :

अ. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

ब. राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्यप्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादि ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

पर्यायी उत्तरे   

दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चुकीची आहेत
विधान अ बरोबर आहे, परंतू विधान ब चुकीचे आहे
विधान ब बरोबर आहे, परंतू विधान अ चुकीचे आहे
उत्तर= (1)

 

89.दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?

पुरोहित व विश्वामित्र
विश्वामित्र व भरत जमात
सुदास व वशिष्ठ
पुरु व विश्वामित्
उत्तर= (2)

 

90.खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या ‘धम्म' ची माहिती आहे ?

छोटे शिलालेख
भाब्रु शिलालेख 
कलिंग शिलालेख
चौदा शिलालेख
उत्तर= (1)

 

91.चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे चार प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या जुळवा : 



उत्तर= (3)

 

92.खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :

अ. विशाल साम्राज्याचा संस्थापक,

ब. सुसंस्कृत, विद्वान आणि कवी.

क. प्रसिद्ध कवि हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्धपंडीत वसुबंधू त्याच्या दरबारात होता.

ड. भारतीय नेपोलियन' अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात.

पर्यायी उत्तरे : 

हरिसेन
कनिष्क
समुद्रगुप्त
चंद्रगुप्त मौर्य
उत्तर= (3)

 

93.खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :

अ. त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले.

ब. तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता.

क. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा.

ड. त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता.

पर्यायी उत्तरे :  

अल्तमश
महमंद तुघलक
अल्लाउद्दीन खिलजी
कुतुबुद्दीन ऐबक  
उत्तर= (3)

 

94.खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :

अ. या राजास ‘आंध्रभोज' ही पदवी देण्यात आलेली होती.

ब. त्याच्या दरबारात आठ प्रसिद्ध तेलगु कवी होते.

क. 'नागलपूरम' नावाचे नगर त्याने स्थापन केले होते.

ड. बिदर, गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.

रामदेव राय
पुलकेशी प्रथम
पहिला परान्तक
कृष्णदेवराय
उत्तर= (4)

 

95.टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टन तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?

टीपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. 
टीपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे.
टीपूची दोन मुले इंग्रजाकडे ओलीस राहतील.
टीपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. 

उत्तर= (4)

 

96.___________ यांनी रोम आणि पॅरिस मधेही फ्री इंडिया सेंटर्स' सुरु केली होती. 

सुभाष चन्द्र बोस 
मॅडम कामा
अॅनी बँझंट
श्यामजी कृष्णवर्मा

उत्तर= (1)

 

97.पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?

अ. ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती.

ब. ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती.

क. ती मीरा बेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे. 

सिस्टर निवेदिता
मिस कार्पेटर
मिस स्लाद
मिस नाइटिंगेल
उत्तर= (3)

 

98.खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा : 

अ. भारतातील विविध नविन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्विकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या.

ब. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते.

दोन्ही विधाने बरोबर व विधान ब विधाना अ चे योग्य स्पष्टीकरण आहे
दोन्ही विधाने चुकीची आहेत
दोन्ही विधाने बरोबर परंतु विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही 
विधान अ बरोबर पण विधान ब चूक 
उत्तर= (3)

 

99.पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा :

अ. त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाच्या कबीराच्या शिकवणूकीवर विश्वास होता.

ब. त्यांचे वडिल सैन्यात होते आणि ते सुभेदार-मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

क. त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे.

ड. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत. 

महात्मा ज्योतीबा फुले 
श्री जवळकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
श्री घोलप
उत्तर= (3)

 

100.पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे ? 

अ. त्यांना अमेरिकन युनिटेरीयन अॅसोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.

ब. अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते दोन वर्षाकरीता इंग्लडला गेले होते.

क. अॅमस्टरडॅम येथील धर्मपरिषदेला ते उपस्थित होते.

ड . सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विट्ठल रामजी शिंदे
भाऊराव पाटील
बाबूराव जेधे 
उत्तर= (2)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या