महाराष्ट्राची भूगर्भ रचना
द्वीपकल्पीय पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि स्थिर असा भूभाग आहे.
द्वीपकल्पीय पठाराचा एक भाग महाराष्ट्र पठार आहे.
महाराष्ट्र राज्याचा एकूण क्षेत्रफळाच्या ८६.७ % क्षेत्रफळ द्वीपकल्पीय पठाराने व्यापलेले आहे.
द्वीपकल्पीय पठाराचा स्थिर पाया प्रीकॅम्ब्रियन खडकापासून बनला आहे.
प्रीकॅम्ब्रियन खडकावर अनेक थर साचत गेले.
भूशास्त्रीय कालमापनश्रेणी
पृथ्वीच्या निर्मितीपासून ५७० दशलक्ष वर्षांपूर्वीचा काळाला कॅब्रियन पूर्व महाकल्प असे म्हणतात.
या कालखंडात वातावरण व महासागर निर्माण होऊ लागले.
जिवाणू ,नील हरित शैवाल, कृमी, जेलीफिश अपृष्ठवंशीय प्राणी निर्माण होऊ लागले.
पृथ्वीच्या निर्मितीपासून ५९० दशलक्ष वर्षांपूर्वी पासून ते २४५ दशलक्ष वर्षपर्यंतचा कालखंड पॅलिओझाईक कल्प म्हणून ओळखला जातो.
हा कालखंड मत्स्ययुग म्हणून ओळखला जातो.
या कालखंडात अनेक प्रकारचे अपृष्ठवंशीय प्राणी विकसित झाले.
पृथ्वीच्या निर्मितीपासून २४५ दशलक्ष वर्ष पूर्व ते ६५ दशलक्ष वर्षापर्यंतचा काळ.
मेझोझॉईक कल्प तीन कालखंडात विभागाला जातो.
- ट्रायसिक - या कालखंडात पैंजियाचे तुकडे पडून खंड निर्माण झाले.
- जुरासिक - याच कालखंडात डायनासोर प्राणी निर्माण झाले.
- क्रिटेशियस
मेझोझॉईक कल्प कालखंडात अटलांटिक समुद्र आणि रॉकी पर्वताची निर्मिती झाली.
पृथ्वीच्या निर्मितीपासून ६५ दशलक्ष वर्ष पूर्व कालखंड म्हणजे सिनोझॉईक कल्प.
सध्या अस्तित्वात असलेले बहुतांश प्राणी याच काळात निर्माण झाले.
आल्प्स पर्वत,हिमालय पर्वत अँडीज पर्वत या काळात निर्माण झाले.
महाराष्ट्रात आढळणारे खडक खालील प्रमाणे :
- आर्कियन खडक
- धारवाड खडक
- कडप्पा खडक
- विंध्य खडक
- गोंडवाना खडक
- दख्खन लाव्हा खडक
- गाळाचे खडक
आर्कियन खडकाची निर्मिती ४६० ते २५० कोटी वर्षांपूर्वी झाली.
आर्कियन हा प्राचीन खडक आहे.
या खडकात मुख्यतः ग्रॅनाईट,नीस,शीस्ट या रूपांतरित खडकांचे प्रमाण जास्त आहे.
आर्कियन खडक महाराष्ट्राच्या दक्षिण व पूर्व भागात आढळतो.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात आढळतो.
मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा पूर्व भागात आर्कियन खडक आढळतो.
तसेच कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ला या तालुक्यात आर्कियन आढळतो.
या खडकात प्रामुख्याने लोहखनिज सापडते. चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात लोहखनिज साठे आहेत.
धारवाड खडकाची निर्मिती सुमारे २०० ते २५० कोटी वर्षांपूर्वी झाली.
अग्निजन्य खडकाची रूपांतरित व स्तरित खडकाशी प्रक्रिया होऊन धारवाड खडक निर्माण झाला.
हा खडक सर्वप्रथम कर्नाटकातील धारवाड येथे आढळला म्हणून त्यास धारवाड खडक म्हणतात.
या खडकात ग्रॅन्युलाईट्स, डोलोमाईट,अभ्रक,सिलीमॅनाईट,हॉर्नब्लेंड,शिस्ट आढळतात.
महाराष्ट्रात धारवाड श्रेणीचा खडक दोन भागात आढळतो.
अ) पूर्व नागपूर व उत्तर, दक्षिण भंडारा या ठिकाणातील खडकात क्लोराईट, क्वार्टझाईट व हेमेटाईट आढळतात.
या खडकात मँगॅनीजचे साठे विपुल प्रमाणात आढळतात.
ब) कोकण
या ठिकाणातील खडकात वालुकाश्म,क्वार्टझाईट,ग्रीन हॉर्नब्लेंड, शिस्त यांचा समावेश होतो.
कणकवली व सावंतवाडीत क्रोमाईटचे साठे आढळतात.
महाराष्ट्रात धारवाड श्रेणीचा खडक भंडारा ,गोंदिया,सिंधुदुर्ग, कणकवली,सावंतवाडी,चंद्रपूर येथे आढळतो.
लोअर पॅलिओझाईक काळात कडप्पा खडकांची निर्मिती झाली.
या श्रेणीतील खडकांना महाराष्ट्रात स्थानिक नावे आहेत ती पुढील प्रमाणे.
अ) कलाडगी श्रेणी खडक
हि श्रेणी दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात नेसरी गडहिंग्लज व आचरा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा घाटाच्या पायथ्याशी मालवण परिसरात दिसून येते.
ब) पैनगंगा श्रेणी
यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा श्रेणीचे थर आढळतात.
कोल्हापूर व यवतमाळ जिल्ह्यातील कडप्पा श्रेणीचे प्रस्तर क्वार्टझाईट व शेल स्वरूपात आहे.
हा खडक आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात आढळतो म्हणून याला कडप्पा खडक म्हणतात.डोलोमाईट व चुनखडी आर्थिक दृष्ट्या महत्वाचे खनिज या खडकात सापडतात.
कडप्पा श्रेणीतील खडक महाराष्ट्रात यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा खोऱ्यात तसेच सिन्धुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात आढळतो.
विंध्य खडकाची निर्मिती ६० कोटी वर्षपूर्वी लोअर पॅलिओझाईक काळात परंतु कडप्पा श्रेणीच्या खडकानंतर झाली.
विंध्ययन श्रेणीचे खडक कडप्पा श्रेणीच्या खडकावर आढळतात.
महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात क्वचित प्रमाणात आढळतात.
या खडकाचा उपयोग इमारत बांधणीसाठी होतो. लाल किल्ल्याचे बांधकाम याच खडकाच्या दगडापासून झाले आहे.
गोंडवाना खडकाची निर्मिती ६० ते २४ किती वर्षांपूर्वी झाली.
गोंडवाना खडक महाराष्ट्रात यवतमाळ, गडचिरोली,नागपूर,चंद्रपूरव अमरावती जिल्ह्यात आढळतो.
या खडकात दगडी कोळशा मोठ्या प्रमाणात आढळतो.
या खडकाची निर्मिती दशलक्ष वर्षांपूर्वी झाली.
क्रिटेशियस कालखंडात प्रचंड मोठया प्रमाणात ज्वालामुखीच्या उद्रेकातून तप्त लाव्हारस बाहेर पडून दख्खन लाव्हा खडक निर्माण झाला.
२९ वेळा लाव्हारसाच्या उद्रेकातून दख्खन खडक तयार झाला.
बेसॉल्ट खडक हे ज्वालामुखीय खडकाचे मुख्य उदाहरण आहे.
महाराष्ट्र पठाराचा ४०% भाग बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे.
0 टिप्पण्या