महाराष्ट्रातील वने

     महाराष्ट्रातील वने

            महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे. महाराष्ट्राच्या वनस्पती वितरणावर प्राकृतिक रचना, हवामान, मृदा,पर्जन्य प्रमाण तसेच नदी प्रणाली  हे घटक परिणाम करतात. राज्यात ६१,५७९ चौ.कि.मी. नोंदणीकृत वनक्षेत्र आहे.त्यामध्ये राखीव वनांचे क्षेत्रफळ ४९५४६ चौ.कि.मी. आहे ते एकूण नोंदणीकृत वनक्षेत्राच्या ८०.४६% आहे.संरक्षित वनांचे क्षेत्रफळ ६७३३ चौ.कि.मी. आहे तर अवर्गीकृत वने यांचे क्षेत्रफळ ५३०० चौ.कि.मी. आहे. संरक्षित वनांमध्ये राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य व संवर्धन राखीव क्षेत्र यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील खारफुटी(कांदळवन ) यांचे एकूण ३२०.२७ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. २०१७ च्या अहवाल नुसार ते ३०४ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. राज्य वनविभागाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

सर्वाधिक खारफुटी वने असलेले जिल्हे 

१. रायगड 

२. ठाणे

३. मुंबई उपनगर 

४.रत्नागिरी 

५. सिंधुदुर्ग 

६. मुंबई शहर 


सर्वाधिक वनक्षेत्र जिल्हे 

१. गडचिरोली (६८.८१%०

२.सिंधुदुर्ग (५४.३१%)

३. रत्नागिरी (५१.३३%)

४.रायगड (४१.०१%)

५.गोंदिया (३७.०४%)


सर्वात कमी वन असलेले जिल्हे 

१. लातूर (०.१८%)

२.सोलापूर (०.३३%)

३.जालना (०.४७%)

४.परभणी(०.६५%)

५.उस्मानाबाद (०.६५%)

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार – 

  • उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
उष्ण कटिबंधीय सदाहरित वने २०० सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात असतात. ह्या प्रदेशात जांभी मृदा आढळते. या प्रदेशात हवामान आर्द्र आणि उष्ण असते.
सह्याद्री पर्वताचा घाटमाथा, महाबळेश्वर , पाचगणी, सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड.ठाणे, पालघर जिल्ह्याचा पश्चिम भाग 

वृक्षांचा प्रकार – जांभूळ, फणस,आंबा,अंजन,हिरडा,पैसा,बांबू,नागचंपा,पंधरा सीडार

उष्ण कटिबंधीय वनांची वैशिष्ट्ये :
१. घनदाट वनांचे आच्छादन असते. 
२. वृक्षांची उंची साधारणतः ४० ते ६० मीटर असते.
३.हि वने नेहमी सदाहरित असतात.

आर्थिक महत्त्व
वृक्षांचे लाकूड कठीण व जाड असल्यामुळे आर्थिक महत्व कमी असते.
या वनांमध्ये काही प्रमाणात फळे,कंदमुळे, डिंक इ. गोळा करण्याचे व्यवसाय चालतात.

  • उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने 
ज्या प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्य १५० ते २०० सें.मी. असते, त्या भागात उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने असतात. या प्रदेशातील सरासरी तापमान २०0 ते ३० से.असते. या वनांनी राज्यातील ८ % क्षेत्र व्यापलेले आहे.
सह्याद्रीच्या पायथ्यालागतच्या प्रदेशात हि वने आढळतात.

वृक्षांचा प्रकार – कदंब, शिसम, किंडल, रणफणस, किंजल, बेहडा, सावर, बिबळा, बेन, शिसव, बांबू, नारळ, सुपारी, आंबा 

उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वनांची वैशिष्ट्ये :
१.  वृक्षांची उंची साधारणतः २० ते ३० मीटर असते.
२. हि वने सलग पट्ट्यात व तुटक स्वरूपात आढळतात.
३. या वनातील वृक्षांची पाने विशिष्ट कालावधीत गळतात.
४. हि वने आर्थिक दृष्ट्या महत्वाची असतात.

सर्पगंधा वनस्पती हे रक्तदाबावर गुणकारी आहे तर धावल वनस्पती हे दम्याच्या विकारासाठी गुणकारी आहे .

  • उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने 
उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने वार्षिक सरासरी पर्जन्य १०० ते १५० सें.मी. असणाऱ्या प्रदेशात असतात. या प्रदेशातील सरासरी वार्षिक तापमान २०0 ते ३० से.असते.  सह्याद्रीच्या उपरांगा,कोल्हापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली येथे हि वने आढळतात.
या वनांनी राज्यातील १६% क्षेत्र व्यापलेले आहे.

वृक्षांचा प्रकार – साग, हिरडा, तेंदू, ऐन, तिवस , साल, सेलम, सिरीस, कुसुम, वड, पिंपळ, चंदन, अर्जुन, पळस, कांचन, आवळा,किंडल, बांबू.

उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांची वैशिष्ट्ये :

१.  वृक्षांची उंची साधारणतः ३० ते ४० मीटर असते.
२. हि वने विरळ पट्ट्या - पट्ट्यात आढळतात.
३. गडचिरोली व चंद्रपूर मध्ये या वनांना अल्लापल्ली अरण्य म्हणतात. 
४. ह्या वनांतील वृक्षांची उन्हाळ्यात पानगळ होते तर पावसाळ्यात हिरवेगार होतात.

  • उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने 
ज्या प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्य ५० ते १०० सें.मी. असते, त्या भागात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने  असतात. या प्रदेशातील सरासरी वार्षिक तापमान ३५0 ते ४०0 से.असते. जळगाव,धुळे,बुलढाणा,अमरावती,नागपूर,भांडार,गोंदिया,अकोला,नांदेड,सातमाळा-अजिंठा आणि बालाघाट रांग येथे हि वने आढळतात.
या वनांनी राज्यातील ६०% क्षेत्र व्यापलेले आहे.

वृक्षांचा प्रकार – साग, शिसम, पळस, खैर, हिरडा, बेल, तेंदू, आंबा, अंजन, धावडा, बीजसाल, तिवस, चारोळी, धामण, आपटा, टेंभुर्णी, बोर, बाभूळ.
   
उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनांची वैशिष्ट्ये :

१.  वृक्षांची उंची कमी असते.
२. हि वने अतिशय विरळ असतात.
३. हया वनातील वृक्षांची उन्हाळ्यात पानगळ तर पावसाळ्यात नवीन पाने येतात.
सागवान हे एक आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वृक्ष आहे. तेंदूच्या पानापासून विडी व्यवसाय चालतो.
मध,डिंक, लाख, कात हे या वनातून गोळा केले जातात वर यावर आधारित व्यवसाय येथे चालतात.
या वनात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आढळते.

  • उष्णकटिबंधीय काटेरी वने 
ज्या प्रदेशात वार्षिक पर्जन्य ५० सें.मी. कमी असते, त्या भागात उष्णकटिबंधीय काटेरी वने आढळतात. महाराष्ट्रच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात हि वने आढळतात. अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, कोल्हापूर येथे हि वने आढळतात. या वनांनी राज्यातील १७% क्षेत्र व्यापलेले आहे.

वृक्षांचा प्रकार – बाभूळ, कडुनिंब,बोर, चिंच,तरवड,खैर,हिवर,निवडुंग,कोरफड, निर्मळी,शेर,धामण.

उष्णकटिबंधीय काटेरी वनांची वैशिष्ट्ये :

१.  वृक्षांच्या पानांचा आकार लहान असतो.
२. वृक्षांची मूळे खोल जमिनीत जातात.
३. या वृक्षांची साल जाड असते तर लाकूड टणक असते.
४. पानांच्या टोकावर काटे असतात.

  • खारफुटी वने 

या वनांना कांदळवने,खांजणवने असेही म्हणतात.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगत भरती ओहोटीच्या भागात, नद्यांच्या मुखाजवळील खाड्यांमध्ये हि वने आढळतात.
पालघर,ठाणे,मुंबई शहर, मुंबई उपनगर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हि वने आढळतात.
रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त खारफुटी वने आहेत.
महाराष्ट्रात या वनांचे प्रमाण ०.५% आहे.
या वनांमध्ये समुद्रातील प्राण्यांची प्रजनन व पोषणाची सोय होते.
या वनांतील वृक्षांना सुंद्री म्हणतात.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या