महाराष्ट्र जलसिंचन

 महाराष्ट्र जलसिंचन 



        पिकासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज जेव्हा कृत्रिमरीत्या पूर्ण केली जाते त्याला जलसिंचन म्हणतात.

पृष्ठीयजल आणि भूजल असे दोन भाग जलसिंचनाचे महाराष्ट्रात करता येतील.

पृष्ठीयजल :- महाराष्ट्रातील प्रमुख नद्या,उपनद्या यांना येऊन मिळणारे ओढे, नाले, प्रवाह यातून वाहणारे पाणी व तलाव सरोवर जलाशये यामध्ये असणारे पाणी.

भूजल :- पावसाचे पाणी जमिनीवरून वाहत असताना जमिनीत मुरते. मुरलेलं काही पाणी खोल जमिनीत जाऊन साठते त्यास भूजल म्हणतात. उदा. विहीर,कूपनलिका.


पाण्याच्या उपलब्धते नुसार शेतीचे प्रकार
  • शुष्क शेती
हि शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्य ७५ सेमी.पेक्षा कमी असते.

  • जिरायती / कोरडवाहू शेती
हि शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. या ठिकाणी वार्षिक सरासरी पर्जन्य ११५ सेमी.पेक्षा जास्त असते.

  • बागायची शेती 
बागायती शेती हि कृत्रिम जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या प्रदेशात केली जाते.

महाराष्ट्रातील जलसिंचनाची साधने
विहीर जलसिंचन   ५५%
कालवे जलसिंचन   २२%
तलाव जलसिंचन   १५%
उपसा जलसिंचन   ०८%

  • विहीर जलसिंचन
    महाराष्ट्रात विहीर जलसिंचन क्षेत्र ५५% हुन अधिक आहे. विहिरींची संख्या अहमदनगर,नाशिक पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
विहिरींची सर्वाधिक घनता सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आहे

  • कालवे जलसिंचन 
    राज्यातील एकूण सिंचित क्षेत्राच्या २२% जलसिंचन  कालव्याद्वारे होते.
गोदावरी, भीमा, कृष्णा आणि त्यांच्या उपनद्या यावर धरणं बांधून कालव्याद्वारे
जमिनीला पाणीपुरवठा केला जातो. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.
कालव्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त असल्याने तेथे जलसिंचन मोठ्या प्रमाणात होते.

  • तलाव जलसिंचन 
    राज्यातील एकूण सिंचित क्षेत्राच्या १५% जलसिंचन तलावाद्वारे होते. गोंदिया, भंडारा,गडचिरोली,नागौर,चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक तलावांची संख्या आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तलाव आहेत. गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात. नवेगाव बांध हा सर्वात मोठा तलाव गोंदिया जिल्ह्यात आहे.

  • उपसा जलसिंचन 
    महाराष्ट्रातील एकूण सिंचित क्षेत्रापैकी ८% क्षेत्र उपसा सिंचनाद्वारे ओलिताखाली आहे.
कोल्हापूर, सातारा ,सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदनगर ह्या जिल्ह्यात जलसिंचनासाठी उपसा जलसिंचन पद्धतीचा वापर केला जातो. 


 पारंपरिक सिंचन पद्धती
  • वाफे पद्धत 
  • सारे पद्धत 
  • सारी पद्धत 
  • आळे पद्धत 
आधुनिक सिंचन पद्धती 
  • ठिबक सिंचन - इस्राईल मधील कृषीतज्ञ सिम्चा ब्लास यांनी ठिबक सिंचनाचा शोध १८५९ लावला.
  • तुषार सिंचन - जळगाव आणि अमरावती हे जिल्हे तुषार सिंचनामध्ये अग्रेसर आहेत.
  • रेनगन सिंचन 

महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प 
  • कोकण विभाग
    • ठाणे
      • भातसा प्रकल्प- भातसा नदी
      • मध्य वैतरणा - वैतरणा नदी
    • पालघर
      • सूर्या धामणी - सूर्या नदी 
      • सूर्या कवडास- सूर्या नदी 
    • सिंधुदुर्ग
      • तिल्लारी घाट प्रकल्प - तिल्लारी नदी
  • पुणे विभाग 
    • पुणे 
      • तानाजीसागर प्रकल्प - अंबी नदी 
      • पवना प्रकल्प - पवना नदी 
      • वीरबाजी पासलकर प्रकल्प - मोसी नदी 
      • माणिकडोह प्रकल्प - कुकडी नदी 
      • खडकवासला प्रकल्प - मुठा नदी
      • टेमघर प्रकल्प - मुठा नदी
      • भाटघर प्रकल्प - वेळवंडी नदी 
      • डिंभे प्रकल्प - घोड नदी 
      • नीरादेवघर प्रकल्प - नीरा नदी 
    • सातारा 
      • धोम प्रकल्प - कृष्ण नदी
      • कोयना प्रकल्प - कोयना नदी
      • कण्हेर प्रकल्प - वेण्णा नदी
    • सोलापूर 
      • उजनी प्रकल्प - भीमा नदी
    • कोल्हापूर 
      • तिल्लारी प्रकल्प - तिल्लारी नदी
      • राधानगरी प्रकल्प - भोगावती नदी
  • नाशिक विभाग 
    • धुळे 
      • अनेर प्रकल्प - अनेर नदी
    • जळगाव 
      • हतनूर प्रकल्प - तापी नदी
      • वाघूर प्रकल्प - वाघूर नदी
    • नाशिक 
      • चणकापूर प्रकल्प - गिरणा नदी
      • गंगापूर प्रकल्प - गोदावरी नदी
      • दारणा प्रकल्प - दारणा नदी
      • अप्पर वैतरणा प्रकल्प - वैतरणा नदी 
      • करंजवण प्रकल्प - कादवा नदी
      • गिरणा प्रकल्प - गिरणा नदी
      • पालखेड प्रकल्प - कादवा नदी 
    • अहमदनगर 
      • भंडारदरा प्रकल्प - प्रवर नदी
      • मुळा प्रकल्प - मुळा नदी 
  • औरंगाबाद विभाग 
    • औरंगाबाद 
      • जायकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी 
    • बीड 
      •  मांजरा प्रकल्प - मांजरा नदी
      • माजलगाव प्रकल्प - सिंदफणा नदी 
    • हिंगोली 
      • येलदरी प्रकल्प - पूर्णा नदी
    • नांदेड 
      • इसापूर प्रकल्प - पैनगंगा नदी 
  • अमरावती विभाग
    • बुलढाणा 
      • नळगंगा प्रकल्प - नळगंगा नदी
      • सिद्धेश्वर प्रकल्प - पूर्ण नदी
    • अकोला 
      • काटेपूर्णा प्रकल्प - काटेपूर्णा नदी
    • यवतमाळ 
      • अप्पर पुस प्रकल्प - पुस नदी
      • बेंबळा प्रकल्प - बेंबळा नदी
      • अरुणावती प्रकल्प - अरुणावती नदी
  • नागपूर विभाग 
    • नागपूर 
      • पेंच प्रकल्प - पेंच नदी
      • तोतलाडोह प्रकल्प - पेंच नदी
    • भंडारा 
      • गोसीखुर्द प्रकल्प - वैनगंगा नदी 
    • गोंदिया 
      • इटियाडोह प्रकल्प - गाढवी नदी
      • सिरपूर प्रकल्प - बाघ नदी
    • वर्धा 
      • लोअर वर्धा प्रकल्प - वर्धा नदी
      • बोर प्रकल्प - बोर नदी
    • चंद्रपूर 
      • ईरई प्रकल्प - ईरई नदी 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या