नर्मदा नदी

नर्मदा नदी 

            नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे सातपुडा पर्वतरांगेत होतो. तिची एकूण लांबी १३१२ किमी  आहे तर महाराष्ट्रातील लांबी ५४ किमी आहे. नर्मदा नदी प्रवाह मध्य प्रदेश, महाराष्ट्र नंतर गुजरात मधील भरूच येथे खंबायतच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. 

नर्मदा नदी भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. अरुंद अशा खोल घळईतून तसेच खचदरीतून वाहते म्हणून तिला रेवा नदी सुद्धा म्हणतात.नर्मदा नदीच्या उगमापासून काही अंतरावर कपिलधारा हा २५ मीटर उंचीचा धबधबा आहे. जबलपूर येथे धुवांधार हा ३५ उंचीचा धबधबा आहे.

नर्मदा नदी महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्य भागातून वाहते. नर्मदा नदीच्या खोर्याचे एकूण क्षेत्रफळ ९८,७९६ चौ.किमी आहे. हि नदी लांबीनुसार भारतातील पाचव्या क्रमांकाची नदी आहे तर नदीच्या खोऱ्याचा क्षेत्रफळा नुसार भारतात सातवा क्रमांक लागतो. नर्मदा नदीचे महाराष्ट्रातील खोर्याचे क्षेत्रफळ ३९५१ चौ. किमी आहे.

नर्मदा नदी भेडाघाट येथे अरुंद अशा संगमरवरी खडकाच्या घळईतून वाहते.



उपनद्या : 

उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या: हिरण,कोलार, बरना, ओसरंग

दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या : बंजार,शेर,शक्कर,  गंजाल, तवा, कुंडी (महाराष्ट्रातील उपनद्या: उदाई, देवगंगा, देवनाड )

        गुजरात मधील नर्मदा जिल्यात सरदार सरोवर हे धरण आहे त्याचे भूमिपूजन १९६१ मध्ये पंडित नेहरूंच्या हस्ते करण्यात आले होते पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात १९८७ साली करण्यात आली. १७ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सरदार सरोवराची लांबी १.२० किमी तर उंची १६३ मीटर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या