प्रस्थापना आणि उत्कर्ष
राष्ट्रकूट राजवंश हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा साम्राज्यवादी घराणा होता. त्यांचे मूळ निवासस्थान लातूर जिल्ह्यातील बिदर येथे असले तरी नंतर त्यांनी एलिचपूर आत्मची बेरार येथे राजधानी स्थापन केली. सुरुवातीला हे बदामीच्या चालुक्यांचे सामंत होते, पण दंतीदुर्ग या शूर सेनापतीने 752 मध्ये चालुक्य शासक कीर्तिवर्मन याचा पराभव करून स्वतंत्र राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना केली.
राष्ट्रकूटांचे सांस्कृतिक योगदान
राष्ट्रकूट शासकांनी कलेला उत्तेजन दिले. त्यांच्या काळातील काही अप्रतिम कर्तृत्वे:
वेरूळ आणि एलिफंटा गुहा मंदिरे
- एकूण 34 गुहा आहेत, ज्यात बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माचे अद्भुत शिल्प कोरीव काम आहे
- कैलास मंदिर (वेरूळ) हे जगातील सर्वात मोठे एकाच खडकात कोरलेले मंदिर आहे, जे कृष्ण पहिल्याने बांधले
- विश्वकर्मा गुहा ( बौद्ध) नरसिंह मूर्ती ( हिंदू) आणि जैन तीर्थंकरांच्या मूर्ती यांसारख्या कलाकृतींनी ही मंदिरे अलौकिक बनली आहेत
धार्मिक सहिष्णुता
- राष्ट्रकूट शासक शैव,, ,वैष्णव आणि जैन धर्मीय होते
- त्यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय आणि धर्मप्रसाराची मुक्तपणे परवानगी दिली
राष्ट्रकूटांचे महान शासक
1. दंतीदुर्ग (735-756 इ.स)
संस्थापक शासक
- चालुक्यांवर विजय मिळवून स्वतंत्र राज्य स्थापन केले.
- मान्यखेत (मालखेड, सोलापूर) ही नवीन राजधानी बनवली.
- उज्जैनीमध्ये हिरण्यगर्भ यज्ञ केला, जो महादान म्हणून प्रसिद्ध.
2. कृष्ण पहिला (756-774 इ.स)
- वातापीच्या चालुक्यांना पूर्णतः पराभूत केले..
- कैलास मंदिर बांधले, जे जगप्रसिद्ध ठरले.
3. ध्रुव धारावर्ष (780-793 इ.स)
- उत्तर भारतातील त्रिपक्षीय संघर्षात विजयी – प्रतिहार आणि पाल शासकांना हरवले.
- गंगा-यमुना चिन्ह स्वीकारले, ज्यामुळे त्याचे साम्राज्य विस्तारले.
4. गोविंद तिसरा (793-814 इ.स)
- हिमालयापर्यंत विजय मोहीम राबवली.
- पल्लव, पांड्य, गंग आणि चोल यांना आपल्या ताब्यात घेतले.
5. अमोघवर्ष पहिला (814-878 इ.स)
राष्ट्रकूटांचा सर्वश्रेष्ठ शासक
- कवी, विद्वान आणि धर्मसहिष्णू शासक
- कन्नड भाषेतील 'कविराजमार्ग' हा ग्रंथ लिहिला
- त्याच्या दरबारात जिनसेन (आदिपुराण लेखक), शाकटायन, ,महावीराचार्य यांसारख्या विद्वानांना आश्रय मिळाला.
- सम्राट अशोकासारखा शांतताप्रिय होता.
6. कृष्ण तिसरा (939-967 इ.स)
- अखेरचा महान राष्ट्रकूट.
- चोल शासक परांतक पहिल्याचा पराभव करून तंजावर जिंकले.
- ''तंजयमाकोंडा" ही पदवी धारण केली.
- रामेश्वरम येथे विजय स्तंभ उभारला.
**राष्ट्रकूट साम्राज्याचा पतन**
- कर्क दुसरा (972-973 इ.स). हा शेवटचा राष्ट्रकूट शासक होता.
- कल्याणीच्या चालुक्य शासक तैलप दुसऱ्याने त्याचा पराभव करून राष्ट्रकूट साम्राज्याचा अंत केला.
निष्कर्ष
राष्ट्रकूट राजवंशाने 200 वर्षे दक्षिण भारतावर प्रभुत्व गाजवले. त्यांच्या युद्धकौशल्य, प्रशासन क्षमता, कला-साहित्य प्रेम आणि धार्मिक सहिष्णुतेमुळे हा काळ भारतीय इतिहासात सुवर्णयुग मानला जातो. वेरूळ, एलिफंटा, कैलास मंदिर यांसारखी अद्भुत कलाकृती आजही त्यांच्या वैभवाची साक्ष देतात.
महत्त्वाचे: राष्ट्रकूट हे कन्नड, संस्कृत आणि मराठी प्रदेशांचे संरक्षक होते. त्यांनी भारतीय संस्कृतीला अमूल्य वारसा दिला.
0 टिप्पण्या