पल्लव राजवंशाची माहिती | इतिहास, राजे, आणि स्थापत्यकला

पल्लव राजवंश

पल्लव राजवंश हा दक्षिण भारतातील एक प्रभावशाली राजघराणे होते, ज्यांनी इ.स. 3र्या ते 9व्या शतकापर्यंत कांचीपुरम येथे राज्य केले. यांनी कला, स्थापत्य आणि साहित्य क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.

पल्लव शासकांनी द्रविड स्थापत्यशैलीचा पाया घातला, जो नंतर चोल आणि इतर दक्षिण भारतीय राजवंशांनी विकसित केला.

महत्त्वाचे शासक

सिंहविष्णू (575–600 इ.स.)

  • पल्लवांचे खरे संस्थापक मानले जातात.
  • चोल, पांड्य, चेर आणि कलभ्र यांना पराभूत करून साम्राज्य विस्तारले.
  • वैष्णव धर्मीय असून, मामल्लपुरम (महाबळीपुरम) येथे वराह गुफा मंदिर बांधले.
  • संस्कृत कवी भारवी (किरातार्जुनीयम्) त्यांच्या दरबारात होते.

महेंद्रवर्मन पहिला (600–630 इ.स.)

  • मत्तविलास प्रहसन (संस्कृत नाटक) लिहिले.
  • "गुणभर", "शत्रुमल्ल" आणि " लिलतांकुर" सारखी इतर पदव्या.
  • ते प्रसिद्ध संगीतकार रुद्राचार्य यांचेही शिष्य होते.
  • जैन धर्म सोडून शैव धर्म स्वीकारला.
  • महेंद्र शैलीतील गुहा मंदिरे (मक्कोंडा मंदिर आणि अनंतेश्वर मंदिर) बांधली.
  • चालुक्य राजा पुलकेशी II याच्याशी झालेल्या युद्धात पराभव पत्करावा लागला.

नरसिंहवर्मन पहिला (630–668 इ.स.)

  • पल्लवांचा सर्वात शक्तिशाली शासक."मामल्ल"(महामल्ल) ही पदवी धारण केली.
  • वातापीचा पराभव करून चालुक्य राजा पुलकेशी II याला मारले.त्यामुळे "वातापीकोंडा" ही पदवी मिळाली.
  • महाबळीपुरम (मामल्लपुरम) वसवले.येथे धर्मराज मंदिर आणि सात पेरू मंदिर देखील बांधले गेले.
  • सप्त पगोडा (अखंड रथ मंदिरे) बांधली.
  • चीनी प्रवासी ह्युएन त्सांग त्याच्या कारकिर्दीत कांचीला आला.

महेंद्रवर्मन दुसरा (668-670 इ.स.)

  • वडील नरसिंह वर्मन प्रथम यांच्या मृत्युनंतर ते राज्यकर्ता बनले.
  • त्याच्या कारकिर्दीत पल्लव आणि चालुक्य यांच्यातील संघर्ष सुरूच होता.
  • चालुक्य राजवंशाचा शासक विक्रमादित्य पहिला याच्याशी झालेल्या युद्धात त्याचा मृत्यू झाला.

परमेश्वरवर्मन पहिला (670–695 इ.स.)

  • त्यांनी एकमल्ल, लोकादित्यु आणि गुणभाजन  ही पदव्या धारण केल्या.
  • चालुक्य राजा विक्रमादित्य याच्याशी झालेली सर्व युद्धे कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली.
  • त्यांच्या पूर्वजांप्रमाणे तेही शैव होते. त्यांनी मामल्लापुरममध्ये गणेश मंदिर बांधले.

नरसिंहवर्मन दुसरा (695–720 इ.स.)

  • कैलाशनाथ मंदिर (कांचीपुरम),ऐरावतेश्वर मंदिर,वैकुंठ पेरुमल मंदिर बांधले.
  • राजसिंह शैलीचा विकास केला (दगडी विटांनी मंदिरे).
  • त्याने राजसिंह, आगमप्रय आणि शंकर भक्त ह्या पदव्या धारण केल्या.
  • संस्कृत विद्वान दंडी त्याच्या दरबारात होता.
  • इ.स. 720 मध्ये त्यांनी चीनला एक शिष्टमंडळ पाठवले.

परमेश्वरवर्मन दुसरा (720–730 इ.स.)

  • चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा याच्या अपमानास्पद तहाच्या प्रस्तावाला न स्वीकारल्यामुळे, चालुक्य राजाने गंग राजाच्या मदतीने युद्धात याचा पराभव केला आणि याला ठार मारले.
  • याच्या मृत्यूनंतर, पल्लव राजघराण्यात कोणताही सक्षम शासक नसल्याने, चालुक्यांनी कांची ताब्यात घेतली.

नंदीवर्मन दुसरा (730–795 इ.स.)(भीम राजवंश)

  • पल्लव घराण्याचा शेवटचा शासक परमेश्वरवर्मन यांच्या मृत्युनंतर, सिंहासनासाठी यादवी युद्ध सुरू झाले. सक्षम उत्तराधिकारी नसल्याने, भीम घराण्याचा शासक (पल्लवांचा मित्र) नंदीवर्मन याने सत्ता हाती घेतली.
  • त्यांनी पल्लवांच्या लष्करी ताकदीची पुनर्रचना केली आणि कांचीला चालुक्यांच्या वर्चस्वातून मुक्त केले.
  • राष्ट्रकूट राजवंशातील दंतीदुर्गाने इ.स. 750 मध्ये नंदीवर्मण दुसरा यावर हल्ला करून त्याचा पराभव केला. युद्धानंतर, एका करारानुसार, नंदीवर्मण दुसरा आणि दंतीदुर्गाची मुलगी रेवा यांचे लग्न झाले.
  • वैष्णव धर्माचे अनुयायी होते.
  • मुक्तेश्वर मंदिर (नंदीवर्मन शैली) बांधले.
  • प्रसिद्ध वैष्णव संत थिरुमंगई अलवर हे त्यांचे समकालीन होते.

दंतिवर्मन (796–847 इ.स.)

  • नंदीवर्मन दुसरा आणि रेवा यांचा मुलगा. त्याचे आजोबा दंतीदुर्ग यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले.
  • प्रसिद्ध तत्वज्ञानी शंकराचार्य हे त्यांचे समकालीन होते.

नंदीवर्मन तिसरा (847–872 इ.स.)

  • त्याच्या कारकिर्दीच्या काळापर्यंत, पल्लव घराण्याची शक्ती बरीच कमकुवत झाली होती.
  • त्याने पल्लांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला आणि युद्धात पांड्यांचा पराभव केला.
  • त्याच्या आजोबांप्रमाणेच, त्याने राष्ट्रकूट राजवंशातील राजा अमोघवर्षाची मुलगी शंखा हिच्याशी लग्न केले.

नृपतुंग वर्मन (872–882 इ.स.)

  • तो नंदीवर्मन तिसरा आणि त्याची राष्ट्रकूट राणी शंखाचा मुलगा होता.
  • त्याच्या कारकिर्दीत, त्याने पांड्य राजा वरगुण दुसरा याचा पराभव केला.

अपराजित वर्मन (882–897 इ.स.)

  • पल्लवांचा शेवटचा शासक.
  • तो एक अक्षम आणि कमकुवत शासक होता.
  • या परिस्थितीचा फायदा घेत, चोल घराण्यातील त्याचा सामंत आदित्य पहिला याने त्याचा खून केला आणि पल्लव राज्य त्याच्या चोल साम्राज्यात विलीन केले.

सांस्कृतिक योगदान

स्थापत्यकला

महेंद्र, मामल्ल, राजसिंह आणि नंदीवर्मन शैलीतून द्रविड मंदिरांचा पाया घातला.

साहित्य

संस्कृत नाटके (मत्तविलास), काव्ये (भारवीचे किरातार्जुनीयम्).

कला

महाबळीपुरमचे "अर्जुनाची तपस्या" (गंगावतरण) शिल्प.

पल्लवांचा अंत

इ.स. 9व्या शतकात चोल राजा आदित्य I याने पल्लव शासक अपराजित वर्मन याचा पराभव करून पल्लव साम्राज्याचा अंत केला.

पल्लवांनी दक्षिण भारताच्या इतिहासात एक सांस्कृतिक आणि राजकीय वारसा निर्माण केला, जो चोल आणि पांड्यांनी पुढे नेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या