📘म्हणी व त्यांचे अर्थ

📘 म्हणी व त्यांचे अर्थ

  • झाकली मूठ सव्वा लाखाची - आपली परिस्थिती गुप्त असे पर्यंतच आपली प्रतिष्ठा राहते.
  • झाड जावो पण घड ना जावो - नुकसान सोसावे पण धर्म त्याग करू नये.
  • झोपला धोंडा भुकेला कोंडा - भूक लागली की कण्या कोयंडाही चालतो थकल्यावर कुठेही झोप येते.
  • झूटा न बोले तो पेट फुले - खोटे बोलले नाही तर पोट फुगते.
  • झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी - ज्या शक्य नाही अशा गोष्टी करणे.

  • टाकीचे घाव सोसल्या विना देवपण येत नाही - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
  • टिटवी देखील समुद्र आटविते - अशक्य गोष्ट दीर्घ परिश्रमाने शक्य होऊ शकते. क्षुल्लक माणूस सुद्धा परिश्रम करून पराक्रमाची कामे करू शकतो.
  • टक्के टोणपे खाल्ल्या वाचून मोठेपण येत नाही - अनुभव आल्याशिवाय व्यवहारात पडून काही ठेचा खाल्ल्याशिवाय माणसाला थोरपण प्राप्त होत नाही.

  • डोळ्यात केर आणि कानात फुंकर  - रोगाला अनुसरून उपाय न करता भलतेच उपाय करीत राहणे.
  • डोळे पापी - डोळ्याआड कितीही वाईट गोष्टी झाल्या तरी चालतात, पण डोळ्यादेखत एखादी क्षुल्लक चूक झाली तरी ती आपल्याला खपत नाही.
  • डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये - आपले वर्तन प्रामाणिकपणाचे असावे, पण त्याचा गर्वही करू नये, त्याबरोबरच स्वतःला कोणापुढे वाकण्याचा प्रसंगही येऊ देऊ नये.
  • डोंगर पोखरून उंदीर काढणे - डोंगरा एवढे (खूप) कष्ट करून लहानसा मोबदला मिळणे.
  • डोंगराचे आवळे व सागराचे (समुद्राचे) मीठ (लोणचे घालताना) - दोन असंभवनीय गोष्टी सुद्धा कधी कधी घडू शकतात.
  • डोळ्यापुढे काजवे दिसणे - खूप भीती वाटणे, त्रास होणे.
  • डोळ्यावर कातडे ओढणे - जाणून बुजून दुर्लक्ष करणे.
  • डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही - अत्यंत दारिद्र्याची स्थिती असता चोचले करणे.
  • डोक्यावर पदर दिलावर नजर- विनयाचा मोठा आव आणायचा त्याचवेळी अनीतीमय गुप्त कारस्थाने करीत असायचे.
  • डोळ्यात आसू तोंडावर हसू - एखाद्या गोष्टीबद्दल दुःख परंतु त्याच गोष्टीबद्दल दुसन्या दृष्टीने आनंद.
  • डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा - व्यभिचारी स्त्रीचा डाग आता पुराणा झाला म्हणून ती आपल्याला लोकांनी पतिव्रता म्हणावे असा आग्रह धरते.
  • डोंगराएवढी हाव तिळाएवढी धाव - महत्त्वाकांक्षा मोठी परंतु ती पूर्ण करण्यास कुवत नसणे.

  • ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला- संगतीमुळे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो.
  • ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा - वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.
  • ढोरात ढोर पोरात पोर- वाटेल तेथे सामावणारा मनुष्य.
  • ढोंग धतोरा, हाती कटोरा- ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास नुकसानच होते.

  • तळे राखी तो पाणी चाखी - ज्याच्याकडे एखादे काम सोपविले तर तो त्यातून थोडा तरी फायदा करून घेतल्या शिवाय राहत नाही.
  • ताटात काय नि द्रोणात काय! - एकाच हित संबंधातील माणसांचा लाभ एकच
  • ताटात सांडले काय आणि वाटीत सांडले काय एकच -एकाच हित संबंधातील माणसांचा लाभ एकच
  • तहान लागल्यावर विहीर खणणे - दूरदृष्टी नसणे, आयत्यावेळी कोणतीही गोष्ट होत नसते.
  • ताकाला जाऊन भांडे लपविणे - मनातील हेतू स्पष्ट न करता आढेवेढे घेऊन नंतर सांगणे.
  • ताकापुरते रामायण - आपले काम होईपर्यंतच दुस-याला सुष करणे.
  • तण खाई धन - वरवर क्षुल्लक दिसणारी गोष्ट पुढे घातक ठरू शकते.
  • ता म्हणता ताकभात समजावा - थोड्याशा सांगण्यावरून सर्व गोष्टी अंदाजाने समजावून घेणे.
  • तापल्या तव्यावर भाकरी (पोळी) भाजून घ्यावी - संधीचा लाभ उठविणे.
  • ताटावरचे पाटावर, पाटावरचे ताटावर - श्रीमंताच्या बायकांचा डौल व त्यामुळे आळस.
  • तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही - दोन आवश्यक गोष्टी पैकी एक अनुकूल असल्यास दुसरी नसणे.
  • तुला फें तुझ्या बापाला फें - दोघांची ही पर्वा न करणे.
  • तुम्ही आम्ही एक, कंठाळीला मेख - महत्त्वाच्या गोष्टी सोडून एरव्ही सगळे सारखेच (एकच). (तोंड बंद केलेल्या पिशवीला मात्र हात लावायचा नाही.)
  • तुरूत दान महापुण्य - योग्य वेळी दानधर्म करणे किंवा देवाण घेवाण करणे केव्हाही चांगले. (तुरूत-त्वरीत)
  • तेरड्याचा रंग तीन दिवस - एखाद्या दुष्ट माणसाने चांगुलपणा दाखवला किंवा कोणी पोकळ श्रीमंतीचा भपका दाखवला तर तो फार काळ टिकत नाही.
  • तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे - स्वताःच्या मुर्खपणामुळे दोन्ही कडून नुकसान होते व हाती काहीच राहत नाही.
  • तो पाप देणार नाही, तर पुण्य कोठून देणार? - एखादी वाईट गोष्ट सुद्धा दुस-याना न देणारा कंजूस माणूस चांगली गोष्ट कोठून देणार?
  • तोबाच्याला पुढे, लगामाला मागे - (चुकारपणा करणे), खाण्यात पुढे, पण कामात मागे.
  • तोंड धरून बुक्क्यांचा मार - स्वतःचा अपराध असूनही दुस-याला विनाकरण शिक्षा करून त्यासाठी त्याला तक्रारही करू न देणे.
  • तीर्थी गेल्या वाचून मुंडन होत नाही - काहीतरी कष्ट केल्यावाचून फळ मिळत नाही. श्रम केल्याशिवाय विद्या येत नाही.
  • तीळ खाऊन व्रत मोडणे - एखादा क्षुल्लक फायदा होणार म्हणून अयोग्य काम करणे.
  • तळहातास केस आले नाहीत - अजून काम करण्याची अंगात धमक असणे.
  • ताज्या घोड्यावरच्या गोमाशा - जोपर्यंत एखाद्याची भरभराट असते तोपर्यंतच त्याच्यापुढे स्तुती करणारेच लोक जास्त असतात.
  • तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला - भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
  • ताकापुरती आजीबाई - आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे.
  • तरण्याचे कोळसे, म्हाताऱ्याला बाळसे - अगदी उलट गुणधर्म दिसणे.
  • तट्टाला टूमणी, तेजीला इशारत - जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.
  • तीन दगडात त्रिभुवन आठवते - संसार केल्यावरच खरे मर्म कळते.
  • तीर्थ आहे तर भट नाही, भट आहे तर तीर्थ नाही - चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.
  • ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असणे.
  • तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणे - योग्य संधी मिळताच आपले काम करून घेतले पाहिजे.
  • तू मला अन् मी तुला - आपलाच एकमेकाला आधार.
  • तिळगूळ घ्या गोड गोड बोला - गोड गोड बोलून वैरभाव नष्ट करणे.
  • तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना -  एकमेकांशी झगडत जाणे पण एकमेकां खेरीज न करमणे.
  • तोफेच्या तोंडी देणे - संकटात लोटणे.
  • तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो - एकाचे कार्य दुसऱ्या करिता हानिकारक ठरते.
  • तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे  - आपले काम सोडून दुसऱ्याचे काम करण्यास जाणे.
  • तूप खाऊन रूप येत नाही - कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम दिसत नाही.

  • थेंबे थेंबे तळे साचे - हळूहळू संचय करणे.
  • थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान - मोठ्या माणसांच्या आश्रयाचा प्रभावही मोठा असतो.
  • थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते -  थंडीने आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी पाय फुटतात.
  • थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने वागावे.
  • थोडे बोलणे बहुत करणे - बोलावे थोडे पण कृतीच पुष्कळ करावी.
  • थोराचे दुखणे आणि मनभर कुंथणे - मोठ्यांच्या आजाराची सर्वत्र चर्चा होत असते.

  • दगडाचा देव होत नाही - अंगी कर्तृत्व नसल्यास मोठेपणा मिळत नाही.
  • दगडावरची रेघ - खात्रीची गोष्ट.
  • दगडापेक्षा वीट मऊ - निरूपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानीचे म्हणून स्वीकारणे.
  • दगडाचे नाव धोंडा आणि धोंड्याचे नाव दगड - दगड म्हणा किंवा धोंडा म्हणा एक गोष्ट स्पष्ट आहे की ती वस्तू एकच आहे, वाटाघाटी करण्याचे काही कारण नाही.
  • दगडाचे पेव घालता चळवळ, काढता वळवळ - निरुपयोगी वस्तूसाठी त्रास करून घेणे योग्य नाही.
  • दृष्टीआड सृष्टी - आपल्या मागे काय चालले आहे ते दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करणे.
  • दाम करी काम, बिबी करी सलाम - पैसा आहे तर मान आहे, पैशाने खूपशी कामे पार पाडता येतात.
  • दांड्याने पाणी तोडले म्हणून निराळे होत नाही - लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी खरे मित्र वेगळे होऊ शकत नाहीत.
  • दात कोरून कोठे पोट भरत असते ? - मोठ मोठ्या व्यवहारात लहानशा काटकसरीचा कधी उपयोग होतो ?
  • दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत -एक गोष्ट अनुकूल असली तर तिचा उपयोग करून घेण्यास आवश्यक असलेली दुसरी गोष्ट नसते.
  • द्यावे तसे घ्यावे, करावे तसे भोगावे - आपण चांगले काम केल्यास फळ ही चांगले मिळते.
  • दिवस बुडाला, मजूर उडाला - दुस-यांच्या कामाबद्दल कळकळ नसली म्हणजे ते काम यशस्वी होऊ शकत नाही (मनापासून काम न करणारा मनुष्य).
  • दिल में चंगा कथौटी में गंगा- आपले मन निर्मळ असल्यास आपल्या जवळ पवित्र गंगा असल्याप्रमाणेच होय.
  • दिव्याखाली अंधार - दिवा दुस-याना उजेड देत असला तरी त्याच्याखाली अंधारच असतो, तसेच चांगल्या माणसात सुद्धा एखादा दोष असू शकतो.
  • दगडाखाली हात सापडणे - अडचणीत असणे.
  • दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - मुद्दाम स्वतःचे पैसे खर्च करून दुस-यांचे भांडण लावून देणे.
  • द्राविडी प्राणायाम - सोपे असलेले काम कठीण करून करणे.
  • दुधाने तोंड भाजले, तो ताक सुद्धा फुकून पितो - एकदा अद्दल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीत सुद्धा काळजी घेतो.
  • दुरून डोंगर साजरे - अडचणीची गोष्ट लांबून सोपी वाटते, पण प्रत्यक्ष करायला गेल्यास त्यातील अडचणी कळून येतात.
  • दुष्काळात तेरावा महिना - संकटात सापडलेल्या माणसावर आणखीन एका संकटाची भर पडणे.
  • दुभत्या गाईच्या लाथा गोड - आपल्याला ज्याच्यापासून फायदा होतो, त्याने आपला कितीही तिरस्कार केला तरी तो मुकाट्याने सोसणे.
  • दुस-याच्या डोळ्यात भसकिनी बोट शिरते - दुस-यांच्या दोषांवर टीका करावयास मनुष्य नेहमी तयार असतो.
  • दुस-याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही - दुस-यांची क्षुल्लक चूक असली तरी ती दिसते, पण स्वतःच्या अंगी असलेला मोठा दोष दिसत नाही.
  • दुधात साखर - चांगल्या गोष्टी घडलेल्या असताना आणखीन चांगल्या गोष्टीची भर पडणे.
  • देखल्या देवा दंडवत - समोर दिसले म्हणून केलेले काम मनापासून होत नाही.
  • दे माय धरणी ठाय - अतिशय त्रास होणे.
  • देणे नास्ति, घेणे नास्ति - देण्याघेण्याचा कोणताही व्यवहार न करणे.
  • देश तसा वेश - परिस्थितीप्रमाणे वागण्यास शिकले पाहिजे.
  • देह त्यागिता कीर्ती मागे उरावी - एखाद्याचे मरणानंतर देह नष्ट होतो, पण त्याने केलेल्या चांगल्या गोष्टीची मात्र कायम लोकांच्या मनात आठवण राहते.
  • दैव देते पण कर्म नेते - सुदैवाने एखादी गोष्ट लाभते, पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसानही होऊ शकते.
  • दोन्ही घरचा पाहुणा उपाशी - दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणून नेहमी फसतो.
  • दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी - जवळ असलेल्या गोष्टी सहज उपलब्ध न होणे.
  • दहा गेले, पाच उरले - आयुष्य कमी उरणे.
  • दाखविलं सोनं हसे मुल तान्हं - पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.
  • दिल्ली तो बहुत दूर है - झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.
  • देव तारी त्याला कोण मारी - देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.
  • दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी - नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.
  • दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला - नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे
  • देव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई - नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
  • दोन मांडवांचा वन्हाडी उपाशी - दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या ज्या चे काम होत नाही.
  • दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती - जेथे दया, क्षमा, शांती आहे तेथे परमेश्वर वास करतो.
  • दही खाऊ की मही खाऊ  - हे करू की ते करू.
  • दमडीची कोंबडी रुपयाचा मसाला - क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च.
  • दक्षिणा तशी प्रदक्षिणा - जशी दक्षिणा देतात तसाच भाव देतात.
  • दाट पेरा देई नुसता चारा - खूप दाट पेरणी केल्यास केवळ चारच होतो.
  • दिल्या भाताचा हलक्या हाताचा - सांगकाम्या मनुष्य.
  • दिवसा चूल आणि रात्री मूल - एवढे काम की मुळीच वेळ नसणे.
  • दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा - दुसऱ्याची चाकरी पत्करून मिळेल ते अन्न खाऊन जगणे.
  • दिसते तसे नसते म्हणून जग फसते - बाहेरून अनेक वस्तू सुंदर दिसतात पण आतून त्या तशा नसतात.
  • दिसायला काम नाही बसायला वेळ नाही - सतत कामात असणे पण काम दिसून न येणे.
  • दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा - दिसायला भोळा पण मतलबाचा पक्का.
  • दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना - दुःख स्वतःच पचवावे, सुख मात्र सर्वाना सांगावे.
  • दुसऱ्याच्या माथे तुळजापूरला जाते - दुसऱ्याच्या जीवावर मौजमजा करणे.
  • दुहेरी बोलाची कवडी मोलाची - दोन्हीं कडून बोलणाऱ्यांची किंमत कमी करणे.
  • देवाची करणी नारळात पाणी - परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही.
  • देवाला फूल घराला मूल - ज्याप्रमाणे देवाच्या मूर्तीवर फूल शोभून दिसते त्याप्रमाणे घरात मुलाने शोभा येते.
  • दहा मरावे पण दहांचा पोशिंदा मरू नये - शेकडो सामान्य माणसे मेली तरी इतके वाईट वाटत नाही पण ज्यावर शेकडो लोक अवलंबून असतात तो जर मरण पावला तर अतिशय वाईट वाटते.
  • दादा राम राम - फक्त कामापुरता संबंध.
  • दानधर्म किल्ली स्वर्गदार उघडावी - दानधर्म केल्याने स्वर्गाची प्राप्ती होत असते.
  • दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो - थोडे थोडे काम केल्यास बरेच मोठे काम होते.
  • दारू चढते अक्कल जाते - दारूची नशा आली म्हणजे बुद्धी नष्ट होते.
  • दिवस जातो पण बोल उरतो - काळ निघून जातो पण वाईट शब्द कायम राहतात.
  • दिवस सर्व सारखे नसतात - मनुष्याचा काळ नेहमी सारखा नसतो.
  • दिसताच पूर सगळे गिळे - थोडासुद्धा धीर नसणे.
  • दीड हळकुंडात दिपवाळी - थोडेसे मोठेपण मिळाले की बिवरणे.
  • दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा - दुष्ट मनुष्यासोबत संगत केल्यापेक्षा एकटे बसणे बरे.
  • दुष्ट मेला, विटाळा गेला - दुष्ट माणूस मेला तर लोकांना वाटते बरी बला गेली.
  • देवळात दाटी अंगारा साठी - क्षुल्लक गोष्टीसाठी धडपड.
  • दो बोला साख झेली - तोंड चोपडी
  • दोन्ही हाती पुऱ्या नवसाबाई खऱ्या - फायदा होत असेल तर स्तुती करणे.
  • दसकी लकड़ी एकका बोजा - प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावल्यास सहकायनि मोठे काम पूर्ण होते.
  • दुनिया झुकती है। झुकानेवाला चाहिये - लोकांना मूर्ख बनवणारा अगर फसविणारा एखादा उकसेन असला तरी फसले जाणारे अनेकजण या जगात आहेत.

  • धर्म करता कर्म उभे राहते - दुस-यावर उपकार करावयास जाऊन स्वतःवरच संकट ओढवून घेणे.
  • धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा - एखाद्या वस्तूवर ज्याचा हक्क आहे, ती वस्तू त्याला न मिळता भलत्याच माणसाला मिळणे किंवा त्याचा उपभोग होणे.
  • धर्माचे गाई आणि दात कामे नाही - फुकट मिळालेल्या वस्तूला कधीही नावे ठेऊ नये.
  • धर्मावर सोमवार सोडणे - स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागविणे.
  • धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंड्यापाशी - कोणत्याच कामाचे नसणे.
  • घिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या - गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.
  • घड दिसेना नि मन बसेना - वस्तू जर चांगली नसेल तर तिच्याबद्दल आवड उत्पन्न होत नाही.
  • घरले तर चावते, सोडले तर पळते - काहीच उपयोगाचे नसणे
  • धर्माची डाळ म्हणून पाखडून घाल - दानात मिळालेली वस्तू पाहूनच उपयोगात आणावी.
  • धनाची करी माया उडत्या पाखराची छाया - पैसा आज आहे उद्या नाही.
  • धन्याचे हाल, कुत्रे पडले लाल - मालकापेक्षा दिवाणजीच गब्बर.
  • धीर धरील तो खीर खाईल - जो भला मनुष्य असतो त्याचाच शेवटी फायदा होतो.
  • ध्वनी तसा प्रतिध्वनी - जशी क्रिया तशी प्रतिक्रिया.
  • घर टाक की लाव कागदाला - भरमसाठ वाटेल ते लिहणे.
  • धन दुपारची सावली आहे - पैसा फार थोडा काळ टिकतो.
  • धान्य तेथे घुशी - जेथे द्रव्य असते तेथे लोभी लोक जमतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या