📜 दिल्ली सल्तनत - मामलुक (गुलाम) वंश
कुतुबुद्दीन ऐबक हा मुहम्मद घोरीचा गुलाम होता. त्याने भारतात स्थापन केलेल्या राजवंशाला गुलाम वंश (Slave Dynasty) म्हणतात. या वंशाने 1206 ते 1290 पर्यंत 84 वर्षे राज्य केले. या वंशाचे शासक किंवा संस्थापक राजे नसून गुलाम होते. म्हणूनच त्याला राजवंशाऐवजी फक्त गुलाम वंश म्हटले जाते.
👑 गुलाम वंशातील शासकांची यादी
- कुतुबुद्दीन ऐबक (1206 - 1210)
- आरामशाह (1210)
- इल्तुतमिश (1210 - 1236)
- रुकनुद्दीन फिरोजशाह (1236)
- रझिया सुलतान (1236 - 1240)
- मुइझुद्दीन बहरामशाह (1240 - 1242)
- अलाउद्दीन मसूदशाह (1242 - 1246)
- नसिरुद्दीन महमूद (1246 - 1266)
- घियासुद्दीन बलबन (1266 - 1286)
- कैकुबाद (1286 - 1290)
- शमसुद्दीन क्यूम़र्श (1290)
⚔️ कुतुबुद्दीन ऐबक (1206 - 1210)
दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान व गुलाम वंशाचा संस्थापक.
मुख्य योगदान :
- दिल्ली सल्तनतची स्थापना केली.
- 'लाख बख्श' या उपाधीने ओळखले गेले.
- कुबत-उल-इस्लाम मशीद (दिल्ली) व ढाई दिन का झोंपड़ा (अजमेर) बांधले.
- कुतुबमिनारचा पहिला मजला बांधला.(गुरु ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काका याच्या स्मरणार्थ)
- फर्रुखमुद्दार आणि हसन निजामी दरबारातील प्रसिद्ध विद्वान.
मृत्यू: 1210 मध्ये लाहोर येथे पोलो खेळताना घोड्यावरून पडल्यामुळे मृत्यू.
🏹 इल्तुतमिश (1210 - 1236)
- तुर्किस्तानच्या इल्बारी जमातीचा. खरे नाव 'अल्तमाश'.
- खोखरांविरुद्ध इल्तुतमिशच्या कार्यक्षमतेने प्रभावित होऊन, मुहम्मद घोरीने त्याला 'अमीरुल उमरा' हे महत्त्वाचे पद.
- राजधानी लाहोरहून दिल्लीला हलवली.
- सल्तनतचे तीन महत्त्वाचे भाग इक्ता(पगार पैशाऐवजी जमीन), सैन्य आणि चलन व्यवस्था निर्माण.
- चलन व्यवस्था : चांदीचा टंका व तांब्याचा जितल.
- 'तुर्कान-ए-चिहालगानी' म्हणजे 40 सरदारांचा गट स्थापन केला.
- कुतुबमिनार पूर्ण केली.बदायूंमध्ये जामा मशीद आणि नागौरमध्ये अतारकिन गेट बांधले.
- 1230 मध्ये मेहरौली येथे हौज-ए-शमशी (शमसी ईदगाह) जलाशय बांधला.
- त्यांची मुलगी रझिया सुलतान होती.
- खोखरो मोहिमेला दडपताना इ.स. १२३६ मध्ये मृत्यु.
👑 रझिया सुलतान (1236 - 1240)
दिल्ली सल्तनतची पहिली व शेवटची महिला सुलतान.
- पुरुषांसारखा पोशाख परिधान करून राज्य केले.
- जनतेची काळजी व राजकीय दूरदृष्टी यासाठी प्रसिद्ध.
- 1240 मध्ये भटिंडा येथे अल्तुनियाशी झालेल्या संघर्षात मृत्यू.
🛡️ घियासुद्दीन बलबन (1266 - 1286)
पदवी : "जिल्ले इलाही" (देवाची सावली)
- चाळीसांची प्रथा (Turkan-e-Chihalgani) रद्द केली.
- इल्तुतमिशच्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांचा नाश केला.
- सुलतानाला देवाचा प्रतिनिधी मानले.
- सुलतान सामान्य लोकांना भेटत नसे.
- नाण्यांवर त्याचे नाव कोरले गेले व खुत्ब्यात खलिफाचे नाव वाचले जाई.
- फक्त उच्च वंशाच्या लोकांना अधिकारी बनवले जात.
- मद्यपान व मनोरंजन बंद केले.
- दरबारात दंडवत घालण्याची प्रथा सुरू केली.
- हास्य कर
मृत्यू: १२८६ मध्ये (मंगोल संघर्षात त्यांच्या ज्येष्ठ मुलाच्या मृत्यूच्या शोकात)
👉 निष्कर्ष - गुलाम वंशाने दिल्ली सल्तनतची पायाभरणी केली आणि भारतात इस्लामी शासनाचा पाया घातला. या काळात प्रशासकीय व्यवस्था, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक विकास झाला. रझिया सुलतान सारख्या महिला शासकाचा उदय हा या काळातील एक महत्त्वाचा भाग आहे. शेवटी, जलालुद्दीन फिरोज खिलजीने शमसुद्दीन क्यूम़र्शची हत्या करून खिलजी घराण्याची स्थापना केली.
0 टिप्पण्या