📘म्हणी व त्यांचे अर्थ - 3

📘 म्हणी व त्यांचे अर्थ

  • लकडी वाचून मकडी वठणीस येत नाही - व्दाड माणसाला सुधारण्यास कडकच उपाय योजावे लागतात.
  • लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. दुस-यांच्या श्रीमंतीचा आपल्याला फायदा नसतो.
  • लष्कराच्या भाकरी भाजणारा - निष्कारण दुस-यांच्या उठाठेवी करणारा.
  • लाथ मारीन तेथे पाणी काढीन - सामर्थ्यवान व हुशार मनुष्य.
  • लाज नाही मना कोणी काही म्हणा -निर्लज्ज माणूस दुस-यांच्या टीकेची पर्वा करीत नाही.
  • लाडे लाडे केले वेडे - मुलाचे फार लाड केले म्हणचे ते वेडे चाळे करू लागते.
  • लेकीस बोले सुनेस लागे - एकाला उद्देशून पण दुस-याला लागेल असे बोलणे.
  • लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण - इतरांना उपदेश करायचा, आपण मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.
  • लाभो भागो दिवाळी - नफा होवो वा तोटा धाडस करून काम करणे.
  • लोभी धनी सज्जनाला अवमानी - लोभी माणसाला स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही.
  • लोकाले सांगे अन कुपाले वांगे - ढोंगी माणूस.
  • लोभ लचकला नि डोळा पिचकला - कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्याचे दोष दिसु लागतात.
  • लोजे दान की दिजे प्राण - शरण किंवा मरण पत्करणे.
  • लाभ ना नफा, रिकामा धका - ज्यात लाभ नाही अशी व्यर्थ खटपट.
  • लाभालाभौ जयाजयौ - सुख-दुःख जय-पराजय हि सर्व आयुष्यात एकामागून एक येत असतात.
  • लांडगा आला भेटीला कुत्रा गेला गावाला - पाहुण्याची  परस्पर बोळवण करणे.
  • लग्नाला गेली अन बारशाला आली -  अति संथ गतीने चालणारी स्त्री.
  • लहानाचे लहानच सोयरे - प्रत्येकाची मिळकत त्याच्या कुवती प्रमाणे असते.

  • वराती मागून घोडे - योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.
  • वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकावरचा राग दुस-यावर काढणे.
  • वडाची साल पिंपळाला लावणे - ख-याचे खोटे व खोट्याचे खरे करून सांगणे.
  • वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही - हलक्या माणसाने कितीही थोर होण्याचा प्रयत्न केला तरी ते होणे शक्य नाही.
  • वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी माणसात थोडासा शिकलेला माणूस ही पंडित म्हणून घेतो.
  • वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो -एखाद्याशी उर्मटपणाने वागणे किंवा सौम्यपणाने वागणे दोन्ही सारखेच व्यर्थ ठरते.
  • वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही - सरळ मार्गाने योग्य कार्य साधत नसेल तर वक्र मार्गाचा अवलंब करावा लागतो.
  • वारा पाहून पाठ द्यावी - देश, काल, वर्तमान पाहून वर्तन (वागणूक) करीत रहावे.
  • वळणाचे पाणी वळणानेच जाणार - निसर्ग नियमाप्रमाणेच सर्व गोष्टी होतात.
  • वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे - सर्व गोष्टींची संधी आली असता, होईल तो फायदा करून घ्यावा.
  • वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ - पैसे दानधर्म केले तर पुण्यसंचय होईल, तेच आपल्याजवळ राहिले तर आपल्यालाच उपयोगी पडतील.
  • वा-यावर वरात आणि दर्यावर घाला - बेजबाबदारपणे काम करणे.
  • वाणला तितका घाणला - एखाद्याची जितकी जास्त स्तुती करावी तितका अधिक तो बिघडण्याची शक्यता.
  • व्याप तितका संताप - जितका पसारा जास्त असतो, तितकी अधीक काळजी असते.
  • विंचवाचे बि-हाड पाठीवर - निश्चित निवारा नसणे, थोडासाच संसार नेहमी आपल्या बरोबर बाळगणे.
  • विटले मन आणि फुटले मोती सांधत नाहीत - एखादी वस्तू आपल्याला आवडेनाशी झाली की पुन्हा आवडती होणे शक्य नसते.
  • विशी विद्या तिशी धन - एखाद्या माणसाला विद्या कितपत आली याचा अंदाज वीस वर्षानंतर व पैसा कितपत कमाऊ शकेल याचा अंदाज तीस वर्षानंतर करता येतो.
  • विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणे - आपल्या मागे मुद्दाम काहीतरी उपद्व्याप किंवा लचांड लावून घेऊन त्रास भोगीत बसणे.
  • व्यक्ती (मूर्ती) तितक्या प्रकृती - माणसा माणसांच्या स्वभावात फरक असतो.
  • वैद्याची पोर गालगुंडाने मेली - आपल्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग नसणे.
  • वेताळाचे मागे भुतावळ -  जसा पुढारी तसे अनुयायी.
  • विटले मन आणि फुटले मोती सांधत नाही - दुभंगलेली मने पुन्हा जोडणे कठीण असते.
  • विहीन झाले नाही तरी मंडपाखालून गेले आहे - प्रत्यक्ष अनुभव नसेल,पण दुसऱ्याचे पाहून माहिती करून घेतलेली आहे.
  • विकतचे श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणे - मुद्दाम काही तरी उपद्व्याप करून त्रास भोगत बसणे.
  • वाटेला नाही फाटा,तर वाटे हेलपाटा - सरळ रस्ता कंटाळवाणा वाटत असतो.
  • वाकड्या मेंढीस, वाकडा नेम - जशास तसे
  • वऱ्हाडणीला पापड जड - जाणूनबुजून नाजूकपणा दाखवणे.

  • शहाण्याला शब्दांचा मार - शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दांनी समज दिली तरी पुरेसे असते.
  • शिकाविलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार वेळ पुरत नाही - मनुष्याला उपजत बुद्धीच पाहिजे. दुस-याने दिलेले पुरत नाही.
  • शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची कल्पना करता येते.
  • शिळ्या कढीला ऊत आणणे - जुन्या गोष्टीला नवे स्वरूप देऊन किंवा स्मरणातून गेलेले प्रसंग उकरून काढून, त्याबद्दल वाटाघाटी करणे.
  • शिंक्याचे तुटले बोक्याचे पटले - अकल्पित रीतीने एखादी गोष्ट झाली व त्याच्यामुळे एखाद्याला पाहिजे होते, ते आयतेच मिळणे.
  • शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? - दुस-यानी (शेजारणीने) कितीही दिले तरी आपले मन तृप्त होऊ शकेल काय ?
  • शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड - कष्ट करणारा कष्ट करीत राहतो. पण ज्याच्यासाठी कष्ट करतो त्याला त्याचे काहीच वाटत नसते. उलट तो दोषच काढीत असतो.
  • शेंडी तुटो, की पारंबी तुटो - कसलाही प्रसंग आला तरी, किती अडचणी किंवा संकटे आली तरी, जिवावर उदार होणारा माणूस धाडसी व दृढनिश्चयी असतो.
  • शेरास सव्वाशेर - प्रतिपक्षापेक्षा वरच्या प्रतीचा, एक वस्ताद तर दुसरा त्याहून सरस.
  • शीर सलामत तर पगड्या पचास - जिवंत राहिलो तर पैसे कसेही मिळविता येतात.
  • शिमगा गेला नि कवित्व राहिले - वाईट गोष्ट घडली तरी तिचे परिणाम काही दिवस दिसतातच.
  • शिष्य पडला,गुरु अडला - दुसऱ्याच्या चुकांवरून शहाणपण शिकणे.
  • शरम करी नरम आणि भरम करी गरम - मनुष्य लज्जेने नम्र होतो तर भ्रमाने रागावतो.
  • शब्दांचा सिंधु व अकलेचा बिंदू - अर्थहीन वाचाळपणा.
  • शहाण्याचे व्हावे चाकर मूर्खाचे होऊ नये धनी - शहाण्या माणसाचे ऐकावे, मूर्ख माणसाला मात्र काही सांगू नये.

  • षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे - एखाद्या गोष्टीचा गाजावाजा केल्याने कार्यनाश होतो. दोन माणसात एखादी गोष्ट गुप्त राहू शकते, पण तीन माणसात तीच गोष्ट गुप्त राहू शकत नाही.

  • सत्तेपुढे शहाणपणा नाही - ज्याच्या हाती अधिकाराचे बळ असते, त्याच्यापुढे शहाण्या माणसाचे काही चालत नाही.
  • सरड्याप्रमाणे घटकेत तीन रंग पालटणे - वरचेवर आपले स्वरूप बदलत राहणे.
  • सरड्याची धाव कुंपणापर्यंत - अल्प बद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप अल्पच असते.
  • स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही - स्वतः अनुभवल्या शिवाय एखाद्या गोष्टीची पूर्ण कल्पना येत नाही.
  • सगळे मुसळ केरात - महत्त्वाच्या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेले सर्व काम व्यर्थ होते.
  • समुद्राच्या खार्‍या पाण्याने तोंड धुवून ये - एखादी गोष्ट आपणाला करावयाची नसली, आणि ती करण्याविषयी एखाद्याचा फार आग्रह असला तर काहीतरी भलतीच अट घालून आपले काम टाळणे.
  • सरासरी गुडघाभर पाणी - ‘सरासरी' ही पुष्कळ वेळा फसवणूक करणारी गोष्ट असते.
  • सारी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही - सर्व प्रकारच्या स्थितीची जुळवाजुळव करता येते, पण श्रीमंतीची बतावणी करता येत नाही.
  • समुद्रात जाऊन कोरडा - अनुकूल परिस्थिती असून सुद्धा एखाद्याने स्वतःचा फायदा करून न घेणे.
  • सगळ्या गलबतात अर्धी सुपारी माझी - भलतीच एखादी मागणी करून तिच्यासाठी हट्ट धरून बसणे.
  • सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा - सांगकाम्या, सांगितलेले काम व दिलेले वेतन मुकाट्याने घेणारा.
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीची अनुकूलता असते.
  • साखरेवरले मुंगळे - जोपर्यंत आपले उत्कर्षाचे दिवस असतात तोपर्यंत मित्र गोळा होतात.
  • साप म्हणून दोरखंड झोडपणे - (साप साप म्हणून भुई धोपटणे) - एखाद्यावर निष्कारण आळ घेऊन शिक्षा करणे.
  • सांग काम्या ओ नाम्या - सांगेल तेवढेच काम करणे.
  • सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक वस्तू वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश पत्करणे योग्य नाही.
  • सुंभ जळेल पण पीळ जळणार नाही - हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले, तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.
  • सुताने स्वर्ग गाठणे - क्षुल्लक गोष्टीवरून नको त्या गोष्टींचा उठाठेव करणे.
  • सोन्याहून पिवळे- फारच उत्तम.
  • सोनाराने कान टोचणे - तिर्‍हईताने कान उघडणी करणे.
  • सोन्याचा धूर निघणे - अतिशय संपत्तीमान होणे.
  • स्वर्ग दोन बोटे उरणे - वैभवाचा कळस झाल्यासारखे वाटून गर्व होणे.
  • संन्याशाच्या लग्नाला शेंडी पासून तयारी - एखादे कार्य करावयाचे झाल्यास त्याची अगदी प्राथमिक अवस्थपासून सुरूवात करणे.
  • साठी बुद्धी नाठी - म्हातारपणी बुद्धी भ्रष्ट होते.
  • सासु मेली उन्हाळ्यात आसू आले पावसाळ्यात - एखादया गोष्टीचा संबंध भलतीकडेच लावणे.
  • स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे? - बाह्य अवडंबराने पुण्य मिळत नाही.
  • साखर हातावर कातर मानेवर - गोड बोलून गळा कापणे. 
  • समुद्राच्या खाऱ्या पाण्याने तोंड धुऊन ये म्हणे - एखादी गोष्ट करायची नसली की भलत्याच अटी घालणे.
  • सगळ्याची गाय आणि माळ्याचे वासर - एखादया कामासाठी लागणारी साधनसामग्री विविध ठिकाणांहून गोळा करणे.
  • स्वर्गातल्या देवाची तुटली दोरी,पृथ्वीवरील बोंबटया मारी - स्वर्गातल्या देवाची ज्याला पर्वा नाही त्याला ऐऱ्या गैऱ्याची पर्वा नाही. 
  • संशयाचे भूत तेथे काय करी धूप - एकदा मनात संशय जडला कि काही केल्या तो जात नाही.
  • संसाराचं दोड, जे जे करिन ते थोडं - कितीही केलं तरी कमीच पडणे.
  • श्रीखंडाचा बेरा, दह्याला त्रास - भलत्याच मनुष्याची किरकिर.
  • सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक गोष्टींसाठी  मौल्यवान गोष्टींचा नाश करू नये.
  • सुसरीबाई तुझीच पाठ मऊ - प्रसंग पडला कि दृष्टाचीही स्तुती करावी लागते.
  • सोंग केले सजून दिवटी गेली विझून - ऐन वेळेवर काहीतरी अडचणी येऊन काम बिघडणे.

  • हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते - आजार किंवा विपत्ती येताना लवकर येतात, पण जाताना सावकाश जातात.
  • हजीर तो वजीर - जो ऐन वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो.
  • हत्ती दारात झुलणे - एखाद्याची स्थिती वैभव संपन्न असणे.
  • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - दुस-याची वस्तू परस्पर तिस-याला देणे, (स्वतःला झीज लागू न देणे).
  • हत्ती गेला पण शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि थोडासा भाग व्हायचा राहिला.
  • हपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट घेऊन मिळविलेले द्रव्य झपाट्याने नाहिसे होते.
  • हरी जेवण आणि मठी निद्रा - स्वतःचे घरदार सोडून कोठे तरी जेवायचे आणि कोठे तरी झोपायचे.
  • हसतील त्याचे दात दिसतील - लोकांच्या हसण्याची पर्वा न करणे. 
  • हात ओला तर मित्र भला - जोपर्यंत मनुष्य दुस-याला काही ना काही देऊ शकतो तोपर्यंत त्याच्याशी सगळे मित्रत्वाने वागतात.
  • हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये - जे खात्रीने आपले आहे ते सोडून जे अनिश्चित आहे ते मिळविण्याच्या नादी लागू नये.
  • हातच्या काकणाला आरसा कशाला - जी गोष्ट स्पष्ट किंवा उघड आहे ती दाखविण्यासाठी पुराव्याची जरूरी लागत नाही.
  • ह्या हाताचे याच हातावर - (येथल्या येथेच) वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.
  • हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे आणि तोंड फिरे तिथे अवदसा फिरे - उद्योगशील मनुष्याच्या घरी संपत्ती नांदते, उद्योग न करता नुसती वटवट करतो त्याच्या घरी दारिद्र्य येते.
  • हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
  • हात दाखवून अवलक्षण - शहाणपणा दाखविण्यासाठी बोललेली गोष्ट अंगाशी येते.
  • हाती धरल्या रोडका, आणि डोई धरल्या बोडका -ज्याच्यापासून कोणत्याही उपायानी काहीही प्राप्त व्हावयाचे नाही.
  • हां हां म्हणता - अत्यल्प काळात.
  • हिरा तो हिरा आणि गार ती गार - साधू कितीही विपन्न स्थितीत असला आणि दुष्ट किती ही वैभवशाली असला तरी ही मनाच्या उदारतेवरून साधू आपणास सहज ओळवता येतो.
  • होळी जाळली अन थंडी पळाली -  होळीचा सण संपला की उन्हाळा सुरू होतो.
  • हैवही गेले नि दैवही गेले - दोन्हीकडून नुकसान होणे.
  • हा सूर्य हा जयद्रथ -  प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करने.
  • हातभर काम,भाराभर दाम - पुष्कळ काम केल्यावर मजुरीही पुष्कळच मिळते.
  • हौसेने केला पती त्याला भरली रगतपिती -  हौसेने एखादी गोष्ट करावी,परंतु निराशाच पदरी यावी.
  • हातावर कमवावे पानावर खावे - रोजच्या रोज श्रम करून निर्वाह करणे.
  • हिंमत-ए-मर्दा तो मदद -ए-खुदा - धाडसी माणसालाच परमेश्वर मदत करतो.
  • हिरा ठेविता ऐरणी,वाचे मारता तो घणी - थोर माणसे संकटातून गेली तरी त्यांचे थोरपण जात नाही.
  • हातात कवडी, विदया दवडी -  जुगार खेळणाऱ्याचे शिक्षणात लक्ष नसते.
  • हत्तीचे दात नाही मागे जात - मोठा मनुष्य उच्चारलेला शब्द कधीच मागे घेत नाही.
  • हरवलेले गुरु करमळीच्या तळ्यात - काही व्यक्तींची ठिकाणे निश्चित असतात.
  • हसे त्याला बाळसे - जो नेहमी हसतमुख असतो तो सदा निरोगी असतो.
  • हत्तीच्या दाढेमध्ये मियाचा दाणा - मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या