काळा पैसा (Black Money)
घटक, परिणाम आणि उचललेली पावले
काळा पैसा हा जगभरातील अर्थव्यवस्थांसमोर उभा असलेला एक गंभीर आणि जटिल प्रश्न आहे. भारतात ही समस्या विशेषतः महत्त्वाची असून, ती देशाच्या आर्थिक विकासावर, प्रशासनिक पारदर्शकतेवर आणि सामाजिक समानतेवर प्रतिकूल परिणाम घडवते.
काळ्या पैशाचे अचूक प्रमाण निश्चित करणे अवघड असले तरी विविध सरकारी अहवाल आणि अभ्यासांनुसार भारतातील काळ्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
2012 च्या ‘White Paper on Black Money’ आणि इतर अभ्यासांनुसार काळा पैसा हा देशाच्या GDP च्या लक्षणीय टक्केवारीपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या लेखाचा उद्देश काळ्या पैशाची संकल्पना, अर्थ, स्रोत, परिणाम तसेच त्यावर अंकुश ठेवण्यासाठी उचललेली पावले आणि सुचविलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यास करणे हा आहे.
1. काळा पैसा म्हणजे काय? (Meaning of Black Money)
अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, काळ्या पैशाची एकच सर्वमान्य व अधिकृत व्याख्या नाही. “समांतर अर्थव्यवस्था” (Parallel Economy), “अवैध अर्थव्यवस्था” (Illegal Economy), “अघोषित उत्पन्न” (Undisclosed Income) आणि “अनियमित अर्थव्यवस्था” (Unaccounted Economy) हे शब्दप्रयोग काळ्या पैशाशी संबंधित संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरले जातात.
काळा पैसा म्हणजे असा पैसा किंवा उत्पन्न,
- जो कायदेशीर किंवा बेकायदेशीर मार्गाने मिळालेला असतो
- पण तो कर अधिकाऱ्यांना जाहीर केलेला नसतो
- म्हणजेच त्यावर कर भरलेला नसतो
हे असे उत्पन्न आहे जे कर चुकवण्यासाठी जाणीवपूर्वक लपवले जाते.
काळा पैसा निर्माण होण्याचे प्रमुख स्रोत
- भ्रष्टाचार (Bribery)
- गुप्त/रोख व्यवहार (Cash Transactions)
- काळ्या बाजारातील विक्री (Black Market Activities)
- कर चुकवेगिरी (Tax Evasion)
2. काळ्या पैशाचे स्रोत (Sources of Black Money)
भारतातील काळ्या पैशाचे स्रोत मुख्यतः दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकतात:
(A) बेकायदेशीर कृत्यांमधून निर्माण होणारा पैसा
बेकायदेशीर मार्गांनी कमावलेला पैसा सहसा अधिकृत नोंदीत दाखवला जात नाही, त्यामुळे तो थेट काळ्या पैशात मोडतो.
- भ्रष्टाचार (Bribery / Kickbacks)
- तस्करी (Smuggling)
- हवाला व्यवहार (Hawala Transactions)
- बेकायदेशीर खाणकाम (Illegal Mining)
- बनावट चलन (Counterfeit Currency)
- अमली पदार्थ व्यापार (Drug Trafficking)
(B) कायदेशीर परंतु न जाहीर केलेले उत्पन्न
या प्रकारात उत्पन्नाचे स्रोत कायदेशीर असतात, पण ते कर विभागाला पूर्णपणे जाहीर केले जात नाहीत, म्हणजेच कर चुकवला जातो.
- रिअल इस्टेट (Under-reporting of property value)
- व्यापार व सेवा क्षेत्र (Cash transactions)
- आरोग्य सेवा (Hospitals, Clinics)
- शिक्षण संस्था
- खाणकाम व बांधकाम क्षेत्र
- मद्य व लक्झरी वस्तू व्यापार
- आंतरराष्ट्रीय व्यापार (Transfer pricing manipulation)
3. काळ्या पैशाचे परिणाम (Effects of Black Money)
काळ्या पैशामुळे अर्थव्यवस्था, समाज आणि प्रशासन या तिन्ही स्तरांवर गंभीर परिणाम होतात.
(A) सरकारी महसुलाचे नुकसान (Loss of Government Revenue)
- कर चुकवेगिरीमुळे सरकारचा कर महसूल कमी होतो
- परिणामी वित्तीय तूट (Fiscal Deficit) वाढते
- कर दर वाढवावे लागतात
- अनुदान कमी करावे लागते
- कर्ज घ्यावे लागते
वाढत्या कर्जामुळे व्याजाचा बोजा वाढतो आणि विकास खर्चावर मर्यादा येतात.
(B) समांतर अर्थव्यवस्थेची निर्मिती (Parallel Economy)
काळा पैसा औपचारिक अर्थव्यवस्थेबाहेर फिरतो.
- सोने (Gold)
- स्थावर मालमत्ता (Real Estate)
- रोख साठवण (Cash Hoarding)
- उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक कमी होते
- अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता घटते
- संपत्ती काही मोजक्या लोकांकडे केंद्रित होते
(C) महागाई व सामाजिक विषमता वाढ (Inflation & Inequality)
- बेहिशोबी पैशामुळे मागणी वाढते → महागाई वाढते
- महागाईचा सर्वाधिक फटका गरिब आणि मध्यमवर्गीयांना बसतो
- श्रीमंत-गरीब दरी (Income Inequality) वाढते
भारताचा क्रमांक: 93 वा
स्कोअर: 39 / 100
4. काळा पैसा रोखण्यासाठी उचललेली पावले (Measures to Curb Black Money)
काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कायदेशीर, तंत्रज्ञानाधारित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या आहेत.
(A) कायदेशीर उपाययोजना (Legal Measures)
- Black Money Act, 2015 – विदेशी अघोषित मालमत्तेवर कर + दंड (~90%), कारावासाची तरतूद
- Fugitive Economic Offenders Act, 2018 – पळून गेलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्ती
- Benami Transactions Act, 2016 – बेनामी व्यवहारांवर बंदी, 7 वर्षांपर्यंत कारावास
- GST Act, 2017 – Input Tax Credit मुळे transaction trail → कर चुकवेगिरी कमी
- PMLA, 2002 – मनी लाँडरिंगवर नियंत्रण, संशयास्पद व्यवहार नोंद अनिवार्य
- ₹2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहारांवर मर्यादा
- PAN–Aadhaar लिंकिंग
- AIS / TIS द्वारे व्यवहारांचे निरीक्षण
- थर्ड-पार्टी डेटा वापरून तपास
(B) तंत्रज्ञान व डेटा-आधारित उपाय
- CBDT – NUDGE Campaign – करदात्यांना स्वयंस्फूर्त जाहीर करण्यासाठी प्रोत्साहन
- Big Data Analytics – AIS व TIS द्वारे आर्थिक व्यवहार ट्रॅक
- UPI, BHIM, मोबाइल वॉलेट्स
- रोख व्यवहार कमी → पारदर्शकता वाढ
- कर चुकवेगिरीवर नियंत्रण
(C) आंतरराष्ट्रीय सहकार्य
- DTAA व TIEA – दुहेरी कर टाळणे व माहिती देवाणघेवाण
- AEOI (2017 पासून) – परदेशातील खात्यांची माहिती मिळते
- FATCA व CRS – जागतिक आर्थिक माहिती शेअरिंग प्रणाली
- अघोषित विदेशी मालमत्ता शोधणे सोपे
- उच्च-जोखीम प्रकरणे ओळखणे सुलभ
5. सुचवलेले उपाय (Suggested Measures / Way Forward)
काळा पैसा ही अजूनही पूर्णपणे न सुटलेली समस्या आहे. त्यामुळे त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी खालील उपाययोजना आवश्यक आहेत:
(A) कायदेशीर व धोरणात्मक सुधारणा
- Whistle Blowers Protection Act, 2014 ची प्रभावी अंमलबजावणी
- Public Procurement प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे
- कर कायदे अधिक सोपे व स्पष्ट करणे → compliance वाढते
- भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई
(B) संस्थात्मक क्षमता वाढवणे
- CBDT, ED, FIU-India यांसारख्या संस्थांचे बळकटीकरण
- डेटा शेअरिंग व समन्वय सुधारणा
- AI आणि Big Data चा अधिक वापर
(C) निवडणूक सुधारणा
- निवडणूक खर्चावर कठोर नियंत्रण
- राजकीय पक्षांच्या निधीची पारदर्शकता वाढवणे
- बेहिशोबी पैशाचा वापर कमी करणे
(D) डिजिटल व बँकिंग व्यवहारांना प्रोत्साहन
- कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना (UPI, डिजिटल पेमेंट्स)
- बँकिंग चॅनेलद्वारे व्यवहार वाढवणे
- रोख व्यवहारांवर निर्बंध
(E) न्यायव्यवस्था व अंमलबजावणी सुधारणा
- आर्थिक गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालये स्थापन करणे
- प्रकरणांचा जलद निपटारा
- अंमलबजावणी यंत्रणांमध्ये पारदर्शकता
(F) जनजागृती व कर संस्कृती विकसित करणे
- नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत जागरूकता वाढवणे
- “Tax Compliance Culture” विकसित करणे
- प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन
निष्कर्ष (Conclusion)
काळा पैसा ही भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील एक गंभीर आणि दीर्घकालीन समस्या आहे, ज्याचा आर्थिक विकास, सामाजिक समानता आणि प्रशासनिक पारदर्शकतेवर प्रतिकूल परिणाम होतो.
सरकारने विविध कायदे, तंत्रज्ञानाधारित उपाय (जसे NUDGE अभियान), आंतरराष्ट्रीय सहकार्य (AEOI) आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन यांसारख्या उपक्रमांद्वारे या समस्येवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले आहेत.
हे प्रयत्न योग्य दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाऊ शकतात.
तथापि, काळ्या पैशाच्या मूळ कारणांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सातत्यपूर्ण अंमलबजावणी, संस्थात्मक बळकटीकरण आणि नागरिकांमध्ये कर संस्कृती विकसित करणे अत्यावश्यक आहे.
या तीन स्तंभांवर आधारित सर्वसमावेशक धोरण राबविल्याशिवाय न्याय्य व समतोल अर्थव्यवस्था निर्माण करणे शक्य नाही.
.webp)
0 टिप्पण्या