राष्ट्रीय उत्पन्न (National Income – NI) - अर्थ, मोजमाप, लेखापद्धती आणि संकल्पना
भारतीय अर्थव्यवस्था घटक | MoSPI नवीन GDP मालिका — आधार वर्ष 2022-23 (27 फेब्रुवारी 2026)
| Real GDP FY2024-25 | Nominal GDP FY2024-25 | GDP वाढी FY2025-26 अंदाज | नवीन आधार वर्ष |
| ₹299.89 लाख कोटी (7.1%) | ₹318.07 लाख कोटी (9.7%) | 7.6% (Real GDP) | 2022-23 |
1. राष्ट्रीय उत्पन्न (NI) म्हणजे काय?
राष्ट्रीय उत्पन्न (National Income) ही अर्थशास्त्रातील एक मूलभूत संकल्पना आहे. एका विशिष्ट कालावधीत (साधारणतः एक आर्थिक वर्ष) देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात.
राष्ट्रीय उत्पन्न लेखांकन (National Income Accounting) ही एक बुककीपिंग प्रणाली आहे जी सरकार देशातील आर्थिक क्रियाकलापांची पातळी मोजण्यासाठी वापरते.
2. राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनातील मूलभूत संकल्पना
A) उत्पन्नाचा वर्तुळाकार प्रवाह
उत्पन्नाचा वर्तुळाकार प्रवाह हा अर्थव्यवस्थेचा एक नमुना आहे ज्यात आर्थिक घटकांमध्ये प्रमुख देवाणघेवाण पैशाच्या, वस्तूंच्या आणि सेवांच्या प्रवाहाच्या रूपात दर्शवली जाते. या नमुन्यानुसार, पैसा आणि वस्तू आणि सेवा विरुद्ध दिशेने वाहतात परंतु बंद सर्किटमध्ये फिरतात. उत्पादन, उपभोग आणि गुंतवणूक हे अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आर्थिक उपक्रम आहेत.
B) देशांतर्गत / आर्थिक प्रदेश
- भारत सरकारद्वारे प्रशासित भौगोलिक प्रदेश
- भारतातील परदेशी दूतावास — आर्थिक प्रदेशाचा भाग नाही
- परदेशातील भारतीय दूतावास — आर्थिक प्रदेशाचा भाग आहे
C) बाजारभाव (Market Price)
बाजारभाव (MP) म्हणजे विक्रेत्याकडून उत्पादन खरेदी करताना ग्राहकाने दिलेली किंमत. बाजारभावात अप्रत्यक्ष कर समाविष्ट औनि अनुदाने वगळलेली आहेत.
D) घटक खर्च (Factor Cost)
घटक खर्च (FC) म्हणजे वस्तू आणि सेवांचे उत्पादन करताना कंपनीने केलेला उत्पादन घटकांचा खर्च. FC मध्ये अप्रत्यक्ष कर वगळलेले, परंतु अनुदाने समाविष्ट आहेत.
E) नाममात्र व स्थिर किंमत
| संकल्पना | स्पष्टीकरण |
| नाममात्र/चालू किंमत (Nominal/Current Price) | चलनवाढ समाविष्ट; सध्याच्या वर्षाचा बाजारभाव वापरतो |
| आधारभूत/स्थिर किंमत (Base/Constant Price) | वेगळ्या वर्षांची तुलना करण्यासाठी; सध्याचे आधार वर्ष 2022-23 |
F) घसारा (Depreciation)
घसारा हा त्याच्या कायम स्वरूपी भांडवलाच्या वापरामुळे (झीज, अपघाती नुकसान आणि अप्रचलितता) स्थिर मालमत्तेच्या मूल्यातील तोटा दर्शवतो. त्याला स्थिर भांडवलाचा वापर (Capital Consumption Allowance) असेही म्हणतात.
G) NFIA (Net Factor Income from Abroad)
NFIA हे तात्पुरते परदेशात राहणाऱ्या भारतीय सामान्य रहिवाशांनी मिळवलेले घटक उत्पन्न (भाडे, वेतन, व्याज, नफा) आणि तात्पुरते भारतात राहणाऱ्या अनिवासींनी मिळवलेले घटक उत्पन्न यांच्यातील फरक आहे.
H) हस्तांतरण देये (Transfer Payments)
हस्तांतरण देयके म्हणजे अशा एकतर्फी देयके ज्यांच्याशी संबंधित वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण होत नाही. उदाहरण: शिष्यवृत्ती, भेटवस्तू, देणग्या इ. हस्तांतरण देयके राष्ट्रीय उत्पन्नात (NI) समाविष्ट केलेली नाहीत.
I) भांडवल उत्पादन गुणोत्तर व वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर
| संकल्पना | व्याख्या | सूत्र |
| भांडवल उत्पादन गुणोत्तर (Capital Output Ratio) | एका युनिट उत्पादनासाठी आवश्यक भांडवल. COR उंच → कार्यक्षमता कमी. | COR = भांडवल/उत्पादन |
| वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर (Incremental COR) | अतिरिक्त एकक उत्पादनासाठी अतिरिक्त भांडवल गरज. | ICOR = वाढीव भांडवल/वाढीव उत्पादन |
3. राष्ट्रीय उत्पन्नाचे मुख्य मापक
3.1 सकल देशांतर्गत उत्पादन (GDP)
GDP हे एका वर्षाच्या कालावधीत देशांतर्गत अर्थव्यवस्थेत होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या एकूण उत्पादनाचे मोजमाप करते. ठराविक निवासी नागरिकांचे तसेच त्या भौगोलिक सीमेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांचे उत्पादन विचारात घेतले जाते.
GDP चे दोन महत्त्वाचे प्रकार:
| प्रकार | व्याख्या | सूत्र |
| GDP at Market Price (GDPMP) – बाजारभावावर आधारित GDP | वस्तू व सेवांचे एकूण मूल्य बाजारभावाने मोजले जाते. यात अप्रत्यक्ष कर (Indirect Taxes) समाविष्ट असतात आणि अनुदाने (Subsidies) वजा केलेली असतात. | GDPMP = GDPFC + अप्रत्यक्ष कर – अनुदाने |
| GDP at Factor Cost (GDPFC) – घटक खर्चावर आधारित GDP | उत्पादन घटकांना (मजुरी, भाडे, व्याज, नफा) मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे मोजलेले उत्पादनाचे मूल्य. यात अप्रत्यक्ष कर वगळलेले आणि अनुदाने समाविष्ट असतात. | GDPFC = GDPMP – अप्रत्यक्ष कर + अनुदाने |
3.2 Real GDP vs Nominal GDP
| मुद्दा | Real GDP | Nominal GDP |
| किंमत आधार | स्थिर किंमत | चालू किंमत |
| चलनवाढ | समाविष्ट नाही | समाविष्ट |
3.3 सकल राष्ट्रीय उत्पादन (GNP)
सकल राष्ट्रीय उत्पादन (Gross National Product – GNP) म्हणजे एखाद्या देशातील नागरिक किंवा देशाच्या मालकीच्या उत्पादन घटकांनी दिलेल्या ठराविक कालावधीत (साधारणतः एका वर्षात) उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या एकूण मूल्याचा अंदाज होय.
यात देशातील नागरिकांनी देशांतर्गत तसेच परदेशात केलेल्या उत्पादनाचे मूल्य समाविष्ट केले जाते.
3.4 GVA (Gross Value Added)
GVA हे उत्पादनाचे मूल्य औनि मध्यवर्ती वापराचे मूल्य वजा केलेले आहे. उत्पादन प्रक्रियेत श्रम आणि भांडवलाचे योगदान दर्शवते.
3.5 NDP आणि NNP
| मापक | सूत्र | तपशील |
| NDP (निव्वळ देशांतर्गत उत्पादन) | NDP = GDP – घसारा | घसाऱ्यानंतर देशांतर्गत उत्पादन |
| NNP (निव्वळ राष्ट्रीय उत्पादन) | NNP = GNP – घसारा | घसाऱ्यानंतर राष्ट्रीय उत्पादन |
| NNI (निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न) | NNP FC = राष्ट्रीय उत्पन्न | घटक खर्चावरील NNP = राष्ट्रीय उत्पन्न |
4. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
| पद्धती | तपशील | सूत्र |
| उत्पन्न पद्धती (Income Method) | अर्थव्यवस्थेतील सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाचा सारांश | NI = कर्मचारी भरपाई + नफा + मालकाचे उत्पन्न + भाडे + निव्वळ व्याज |
| उत्पादन/मूल्यवर्धन पद्धती (Output Method) | विविध क्षेत्रांनी उत्पादित वस्तू/सेवांचे मूल्य जोडणे; दुहेरी गणना टाळण्यासाठी GVA वापरतात | NI = सर्व क्षेत्रांचा GVA |
| खर्च पद्धती (Expenditure Method) | उत्पन्न वापर + गुंतवणूक यावर आधारित; व्यापार शिल्लक विचारात घेतो | GDP = C + I + G + (X − M) |
5. नवीन GDP मालिका (Base Year 2022-23)
- MoSPI ने 27 फेब्रुवारी 2026 रोजी नवीन GDP मालिका जाहीर केली
- आधार वर्ष बदल: 2011-12 → 2022-23
- Supply and Use Table (SUT) framework वापर
- GST, MCA, RBI, NABARD आणि e-Vahan डेटा समाविष्ट
6. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात अडचणी
- अ-बाजार व्यवहार (Non-Market Transactions):
- राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ पैशाच्या बदल्यात होणाऱ्या व्यवहारांचा विचार केला जातो. घरगुती कामे (उदा. स्वयंपाक, मुलांची देखभाल इ.) यांचे मूल्य बाजारात मोजता येत नसल्यामुळे ते राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही.
- सरकारी सेवांचे मूल्यांकन:
- संरक्षण, न्यायव्यवस्था, प्रशासन यांसारख्या सरकारी सेवांचे बाजारभाव नसतात, त्यामुळे त्यांचे अचूक मूल्य ठरवणे कठीण होते.
- अनौपचारिक / द्वैत अर्थव्यवस्था (Informal Economy):
- भारतासारख्या देशात अनौपचारिक क्षेत्र (Unorganized Sector) मोठे आहे. अनेक आर्थिक व्यवहार नोंदवले जात नसल्यामुळे त्यांचे अचूक मोजमाप करणे अवघड होते.
- दुहेरी गणना (Double Counting):
- उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर एकाच वस्तूचे मूल्य पुन्हा-पुन्हा मोजले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अंतिम उत्पादनच मोजण्याची काळजी घ्यावी लागते.
- अपुरा सांख्यिकीय डेटा:
- अनेक ठिकाणी विश्वसनीय आणि अद्ययावत माहिती उपलब्ध नसते, तसेच डेटा संकलनासाठी पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी नसतात.
- प्रादेशिक विविधता:
- भारतामध्ये भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता मोठी असल्यामुळे सर्व भागांतून एकसमान पद्धतीने डेटा गोळा करणे कठीण होते.
7. GDP च्या मर्यादा
- उत्पन्नातील असमानता दर्शवत नाही
- GDP वाढला तरी उत्पन्नाचे वितरण समान आहे का नाही हे स्पष्ट होत नाही. आर्थिक वाढीचा फायदा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतो का, हे GDP सांगू शकत नाही.
- गैर-बाजार व्यवहारांचा विचार होत नाही
- घरगुती कामे, शेजाऱ्यांना केलेली मदत, स्वयंसेवी कामे यांसारखे अ-बाजार व्यवहार (Non-Market Activities) GDP मध्ये समाविष्ट केले जात नाहीत.
- काळा बाजार व बेकायदेशीर क्रियाकलाप
- अनौपचारिक अर्थव्यवस्था, काळा पैसा आणि बेकायदेशीर व्यवहार अधिकृत आकडेवारीत समाविष्ट नसल्यामुळे GDP चे अचूक चित्र मिळत नाही.
- पर्यावरणीय नुकसानाचा विचार नाही
- औद्योगिक उत्पादन वाढताना पर्यावरणीय हानी, प्रदूषण किंवा नैसर्गिक संसाधनांची झीज यांचा GDP मध्ये विचार केला जात नाही. त्यामुळे शाश्वत विकासाचे योग्य मोजमाप होत नाही.
- ‘चांगले’ आणि ‘वाईट’ खर्च यात फरक करत नाही
- GDP मध्ये समाजासाठी उपयुक्त खर्च (उदा. शिक्षण, आरोग्य) तसेच अनिष्ट घटनांवरील खर्च (उदा. आपत्ती नंतरचे पुनर्निर्माण, आजारपणावरील खर्च) दोन्हींचा समावेश होतो.
- जीवनमानातील इतर घटक मोजत नाही
- फुरसतीचा वेळ, कौटुंबिक आनंद, सामाजिक सुरक्षितता यांसारख्या जीवनमानाशी संबंधित घटकांचा GDP मध्ये विचार केला जात नाही.
8. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
| निर्देशांक | व्याख्या | विशेष |
| HDI (मानव विकास निर्देशांक) | आरोग्य (आयुर्मान), शिक्षण (शालेय शिक्षणाची वर्षे) आणि राहणीमान (PPP पद्धतीने मोजलेले प्रति व्यक्ती GNI) यांवर आधारित विकासाचे मापन | United Nations Development Programme द्वारे प्रकाशित; संकल्पना Amartya Sen आणि Mahbub ul Haq यांनी विकसित केली |
| GNH (सकल राष्ट्रीय आनंद) | आर्थिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि मानसिक कल्याण मोजणारा निर्देशांक | Bhutan मध्ये विकसित; कल्पना Jigme Singye Wangchuck यांनी 1970 च्या दशकात मांडली |
| GPI (वास्तविक प्रगती निर्देशांक) | आर्थिक उत्पादनासोबत पर्यावरणीय हानी, सामाजिक खर्च व जीवनमानाचे घटक विचारात घेऊन प्रगतीचे मापन | GDP चा पर्याय / पूरक निर्देशांक म्हणून वापरला जातो |
| SPI (सामाजिक प्रगती निर्देशांक) | नागरिकांच्या मूलभूत सामाजिक गरजा, कल्याण आणि संधी यांचे प्रत्यक्ष परिणामांवर आधारित मापन | Social Progress Imperative या संस्थेने विकसित केला |
| HCI (मानव भांडवल निर्देशांक) | एखाद्या मुलाला 18 वर्षांपर्यंत मिळणारे संभाव्य मानव भांडवल — आरोग्य, शिक्षण व अस्तित्व यावर आधारित मापन | World Bank द्वारे विकसित |
| Green GDP (हरित GDP) | पारंपरिक GDP मधून पर्यावरणीय हानी, संसाधनांची झीज व प्रदूषण यांचे समायोजन करून मोजलेले उत्पादन | शाश्वत विकासाचे अधिक वास्तव चित्र देण्याचा प्रयत्न |
9. निष्कर्ष
राष्ट्रीय उत्पन्न हे केवळ एक आर्थिक मापक नसून देशाच्या आर्थिक प्रगती, उत्पादन क्षमता आणि विकासाचे व्यापक चित्र दर्शवते. GDP वाढीसोबत मानव विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांनाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे.
.webp)
0 टिप्पण्या