राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - सामान्य अध्ययन पेपर २

0%

Question 1: भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याच्या अधिकार कोणाला दिलेला आहे ?
1) केंद्रीय लोकसेवा आयोग
2) संसद
3) सर्वोच्च न्यायालय
4) राष्ट्रपती
Question 2: लोकसभेच्या सभापती बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. जर तो सभागृहाचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते.
ब. त्याचे सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठीचे अथवा सभागृहात सुव्यवस्था राखण्याबाबतचे वर्तनास केवळ सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते.
क. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यास पदावरून दूर करता येते.
ड. जेव्हा लोकसभा विसर्जित होते त्यावेळी तो पदावरून जात नाही, नवीन लोकसभेची बैठक होईपर्यंत तो पदावर असतो.

वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत ?
(1) केवळ अ आणि ब
(2) केवळ अ, ब आणि क
(3) केवळ अ आणि ड
(4) केवळ क आणि ड
Question 3: स्थापनेच्या तारखेप्रमाणे उच्च न्यायालयांचा चढता क्रम लावा.
अ. गुजरात उच्च न्यायालय
ब. केरळ उच्च न्यायालय
क. दिल्ली उच्च न्यायालय
ड. सिक्कीम उच्च न्यायालय
(1) क, ब, ड, अ
(2) ब, अ, क, ड
(3) क, ब, अ, ड
(4) ब, क, ड, अ
Question 4: लोकसभेचे पहिले अधिवेशन खालील पैकी कोणत्या वर्षी भरले होते ?
(1) १९५०
(2) १९५१
(3) १९५२
(4) १९५३
Question 5: भारतीय राष्ट्रपतींच्या पॉकेट व्हेटो अधिकारा विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) जेव्हा राष्ट्रपती आपल्या पॉकेट व्हेटोचा वापर करतात तेव्हा विधेयक अनिश्चित काळासाठी रोखले जाते
(2) घटनादुरुस्तीच्या विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना पॉकेट व्हेटोचा अधिकार आहे
(3) राष्ट्रपती विधेयक नाकारत नाही किंवा पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवत नाही
(4) राष्ट्रपतींना घटनेनुसार विधेयकावर कार्यवाही करण्यासाठी कालमर्यादा दिलेली नाही. परिणामी विधेयकावर कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रपती आपल्या पॉकेट व्हेटोचा वापर करतात
Question 6: खालीलपैकी योग्य जोडी/जोड्या जुळवा.
अ. के. एम. मुंशी – उद्देशपत्रिका ही संविधानाचा सर्वांत मौल्यवान भाग आहे. तो संविधानाचा आत्मा आहे.
ब. पंडीत ठाकुर दास भार्गव – उद्देशपत्रिका ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे.
क. अर्नेस्ट बार्कर – उद्देशपत्रिका ही संविधानाचे मुख्य तत्त्व आहे.
(1) अ व ब दोन्ही
(2) ब व क दोन्ही
(3) फक्त क
(4) फक्त अ
Question 7: नागरीकांचे मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील परस्पर संबंधाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. 26 व्या घटनादुरुस्तीद्वारे मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत अधिकारांपेक्षा श्रेष्ठ स्थान देण्यात आले.
ब. 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत अधिकारांपेक्षा श्रेष्ठ स्थान देण्यात आले.
क. 44 व्या घटनादुरुस्तीद्वारे मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत अधिकारांपेक्षा श्रेष्ठ स्थान देण्यात आले.
ड. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागता येत नाही, परंतु मार्गदर्शक तत्त्वे पाळली गेली नाहीत तर न्यायालयात दाद मागता येते.
(1) अ, ब बरोबर क, ड चूक
(2) अ, क बरोबर ब, ड चूक
(3) ब, क बरोबर अ, ड चूक
(4) ब, क, ड बरोबर अ चूक
Note:प्रश्न क्र.7 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 8: भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यासंदर्भातील खालीलपैकी चूक/चूकीची विधान/विधाने ओळखा.
अ. सरदार स्वरणसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आला.
ब. 03 जानेवारी 1976 पासून मूलभूत कर्तव्यांचा अंमलबजावणीस प्रारंभ झाला.
क. 42 च्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय संविधानाच्या कलम 51(क) मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
ड. 2003 मध्ये 86 च्या घटनादुरुस्तीनुसार 11 वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले.
(1) अ आणि ड
(2) ब आणि ड
(3) ब आणि क
(4) अ आणि क
Question 9: भारतीय संविधानातील दुरुस्तीसंदर्भात खालील विधान/विधाने वाचा.
अ. संसदेत मतभेद झाल्यास घटनादुरुस्तीचा प्रस्ताव रद्द होतो.
ब. घटनादुरुस्तीच्या विधेयकास राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक असते.
क. घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्यासाठी राज्य विधिमंडळावर वेळेचे बंधन आहे.
ड. घटनादुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकाराधिकार नाही.
(1) अ, ड बरोबर ब, क चूक
(2) अ, क बरोबर ब, ड चूक
(3) अ, ब बरोबर क, ड चूक
(4) अ, क, ड बरोबर ब चूक
Question 10: भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संदर्भात खालील विधान/विधाने तपासा.
अ. न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना अमेरिकेच्या संविधानातून स्वीकारलेली आहे.
ब. 42 व्या घटनादुरुस्तीनुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार मर्यादित करण्यात आला.
क. भारतीय संविधानाच्या कलम 130 नुसार सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
ड. मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार या खटल्याच्या निर्णयामुळे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे महत्व कमी झाले.
(1) अ, क बरोबर ब, ड चूक
(2) अ, ब बरोबर क, ड चूक
(3) ब, क बरोबर अ, ड चूक
(4) अ, ब, क बरोबर ड चूक
Question 11: दिल्ली संबंधातील पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ. ६९ व्या घटना दुरुस्तीद्वारे दिल्लीला 'राष्ट्रीय राजधानीचा क्षेत्र दिल्ली' हे नाव देण्यात आले.
ब. तरीही दिल्लीचा समावेश केंद्रशासीत प्रदेशाच्या वर्गातच करण्यात आला आहे.
क. दिल्लीस सध्या विधीमंडळ आणि मंत्रीमंडळ आहे.
ड. राष्ट्रीय राजधानी प्रांतनिर्मिती कायदा १९९० मधे हा विशेष संसदीय कायदा पारीत करून दिल्लीचा दर्जा वाढवण्यात आला.
(1) अ, ब, क, ड
(2) अ, ब, क
(3) ब, क, ड
(4) ब, क
Question 12: आंतर-राज्यीय परिषदेच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी कोणती बाब येत नाही ?
(1) आंतर-राज्यीय नदी आणि खोरे यांच्या वापराबाबत, वितरणाबाबत आणि नियंत्रणाबाबत विवाद किंवा तक्रारीचे निराकरण करणे
(2) राज्य-राज्यांत उद्भवणाऱ्या विवादाबाबत चौकशी करून सल्ला देणे
(3) केंद्र आणि राज्ये किंवा राज्यांचे समान हित असलेल्या विषयांचा तपास करून त्यावर चर्चा करणे
(4) अशा विषयांवर आणि विशेषतः त्या संबंधीत धोरण व कृती यांबाबत अधिक चांगल्या समन्वयासाठी शिफारशी करणे
Question 13: नीती आयोगाशी संलग्नीत कार्यालयाबाबत अयोग्य विधान ओळखा.
(1) NILERD ला पूर्वी IAMR म्हणून ओळखले जात असे
(2) IAMR ची स्थापना 1962 मध्ये झाली
(3) DMEO चे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे
(4) DMEO ची प्रादेशिक कार्यालये 2015 मध्ये बंद करण्यात आली
Question 14: चुकीचे/ची विधान/ने ओळखा.
अ. 1952 मध्ये मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली.
ब. राष्ट्रपतीच्या आदेशान्वये 28 मे 1990 मध्ये आंतर-राज्य परिषदेची स्थापना करण्यात आली.
क. 11 नोव्हेंबर 2000 रोजी आंतर-राज्य परिषदेची पुनर्रचना करण्यात आली.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ
(4) फक्त क
Question 15: खालीलपैकी कोण आंतरराज्य परिषदेचा सदस्य असणार नाही ?
(1) पंतप्रधान
(2) सर्व राज्यांचे मुख्यमंत्री
(3) विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री
(4) राष्ट्रपती
Question 16: पुढीलपैकी कोणत्या खटल्याच्या निकालात न्यायालयीन पुनर्विलोकन हे भारतीय संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे म्हटले आहे ?
(1) मनेका गांधी खटला
(2) गोलकनाथ खटला
(3) एस. आर. बोम्मई खटला
(4) मिनर्व्ह मिल्स खटला
Note:प्रश्न क्र.16 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 17: योग्य जोड्या निवडा.
अ. सेवांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचे दावे अनुच्छेद 335
ब. मातृभाषेमधून सूचना – अनुच्छेद 350 ए
क. हिंदी भाषेचा विकास – अनुच्छेद 350 बी
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ
(4) फक्त क
Question 18: खालीलपैकी कोणते/कोणती मार्गदर्शक तत्त्व/तत्त्वे 42 व्या घटनादुरूस्तीनुसार समाविष्ट केले आहे/केलेली आहेत ?
अ. समाजातील दुर्बल घटकांना कायद्याबाबत मोफत मदत.
ब. राहणीमान व आरोग्य सुधारणा.
क. कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग.
ड. राष्ट्रीय स्मारके व ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण.
(1) ब आणि ड
(2) अ आणि ब
(3) क आणि ड
(4) अ आणि क
Question 19: मालमत्तेचा अधिकार हा कायदेशीर हक्क यासंदर्भात खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
अ. संसदेच्या सामान्य कायद्याद्वारे हा अधिकार नियमित, कमी, रद्द किंवा सुधारीत केला जावू शकतो.
ब. ते कार्यकारी मंडळाच्या कारवाईपासून खाजगी मालमत्तेचे संरक्षण करते.
क. ते कायदे मंडळाच्या कारवाईपासून खाजगी मालमत्तेचे संरक्षण करते.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ
(4) फक्त क
Question 20: अयोग्य विधान/ने ओळखा.
अ. सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख (रिट) जारी करू शकते.
ब. उच्च न्यायालय मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्याही हेतुसाठी प्राधिलेख (रिट) जारी करू शकते.
क. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय प्राधिलेख (रिट) जारी करू शकते.
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ व क दोन्ही
(4) फक्त क
Question 21: घटक राज्याच्या विधान परिषदेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ. विधान परिषदेची सभासद संख्या ही विधान सभेच्या सभासद संख्येच्या एक-तृतीयांश पेक्षा जास्त नसावी.
ब. राज्यघटनेच्या अनुच्छेद-170 मध्ये परिषदेच्या रचनेची पद्धत नमूद करण्यात आली आहे.
क. राज्यपालांनी केलेल्या नामनिर्देशनाच्या प्रामाणिकपणा अथवा उचितपणा यांवर कोणत्याही प्रकारे न्यायालये प्रश्नविरुह उपस्थित करणार नाहीत.
ड. राज्यसभेच्या तुलनेत राज्यात विधान परिषदेचे स्थान बलशाली आहे.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(1) अ, ब
(2) ब आणि क
(3) अ आणि क 
(4) अ आणि ड
Question 22: राज्यांच्या मुख्यमंत्रीना पुढीलपैकी कोणती कार्ये करावी लागतात ? बरोबर पर्याय निवडा
अ. मंत्रिमंडळातील कॅबीनेटची निर्मिती
ब. मंत्र्यांना बडतर्फ करणे
क. राज्यपाल नियुक्त करणे
ड. विविध मंत्रालयां मध्ये समन्वय साधणे
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ, ब आणि ड
(4) ब, क आणि ड
Note:प्रश्न क्र.22 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 23: संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्रता ह्या विषयीचे/ची बरोबर विधान/ने ओळखा.
अ. एखाद्या व्यक्तीला भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत पक्षांतराज्या कारणास्तव अपात्र ठरविले जाऊ शकते.
ब. ५२ व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधाना मध्ये पक्षांतर ह्या कारणाचा समावेश करण्यात आला.
क. कलम १०० मध्ये अपात्रतेची कारणे नमूद केलेली आहेत.
(1) फक्त अ आणि ब
(2) फक्त ब
(3) फक्त अ आणि क
(4) फक्त क
Question 24: बरोबर विधाने ओळखा.
अ. महानगरातील न्यायालये महानगर दंडाधिकाऱ्याची न्यायालये म्हणून ओळखली जातात.
ब. मुख्य महानगर दंडाधिकाऱ्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याने अधिकार प्राप्त आहेत.
क. महानगर दंडाधिकाऱ्याला मुख्य न्याय दुय्यम श्रेणी दंडाधिकारी यांचे अधिकार प्राप्त आहेत.
(1) फक्त ब आणि क
(2) फक्त अ आणि ब
(3) फक्त अ
(4) फक्त क
Question 25: लोकसभेच्या अध्यक्षासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त ?
अ. लोकसभेत सुव्यवस्था राखण्याचे अंतिम अधिकार अध्यक्षांकडे असतात.
ब. लोकसभेच्या कामकाजाच्या नियमांचा अर्थ लावण्याचे अंतिम अधिकार अध्यक्षांकडे असतात.
क. सभागृहाची सुव्यवस्था राखणे तसेच कामकाजाचे नियमन करण्यासंबंधी अध्यक्षांचा व्यवहार हा सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत येतो.
(1) फक्त अ 
(2) फक्त ब
(3) फक्त ब आणि क
(4) फक्त अ आणि ब
Question 26: माहिती अधिकार अधिनियमाविषयीचे खालील कोणते विधान असत्य आहे ?
(1) हा अधिनियम कार्यालयीन गुप्तता अधिनियम, 1923 पेक्षा श्रेष्ठ आहे.
(2) या कायद्यातुसार दिलेल्या आदेशा संदर्भात न्यायालय कुठलाही दावा, अर्ज किंवा कामकाज चालवू शकत नाही.
(3) राज्य वगळून इतर व्यक्तीच्या कॉपीराइट वर अतिक्रमण होत असेल तर, सार्वजनिक माहिती अधिकारी माहितीसाठीची विनंती फेटाळू शकतो.
(4) संरक्षित व्यक्तिंना होणाऱ्या हानीपेक्षा जर सार्वजनिक हित जास्त महत्त्वाचे असले, तरीही माहिती आयोग माहिती प्रकट करण्यास परवानगी देवू शकत नाही.
Question 27: खालीलपैकी कोणते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्य नाही ?
(1) मानवी हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपायांची शिफारस करणे.
(2) मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे.
(3) स्वेच्छेने मानवाधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि संस्थांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे.
(4) आदर्श कारागृहांची स्थापना करणे.
Question 28: भारताचे परदेशी नागरीक कार्डधारकांच्या हक्कांबद्दल बरोबर विधाने निवडा.
अ. तो भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लडवण्यासाठी अपात्र असेल.
ब. तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असेल.
क. तो मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असेल.
(1) फक्त क
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ, क
(4) फक्त अ
Question 29: भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल सादर करण्याची तरतूद आहे ?
(1) कलम ३३०
(2) कलम ३२६
(3) कलम ३२०
(4) कलम ३२३
Question 30: 2002 च्या शहाऐंशीच्या (86th) घटनादुरुस्ती विधिनियमाद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली नाही ?
(1) प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार करण्यात आला
(2) राज्याकडून अनुदान मिळणाऱ्या किंवा न मिळणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांसह सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी विशेष तरतूदी करण्याचे अधिकार राज्याला देण्यात आले
(3) मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुच्छेद 45 च्या विषयात बदल करण्यात आला
(4) अनुच्छेद 51A मध्ये एका मूलभूत कर्तव्याचा नव्याने समावेश करण्यात आला
Question 31: सरकारीया आयोगाबाबत चुकीचे/ची विधान/ने ओळखा.
अ. अनुच्छेद 263 नुसार कायम स्वरूपी आंतर-राज्य परिषदेची स्थापना करण्याची शिफारस आयोगाने केली.
ब. रेडीओ व दूरदर्शन यांना स्वायत्तता असावी अशी शिफारस आयोगाने केली.
क. बी. शिवरामन व एस. आर. सेन हे सरकारीया आयोगाचे इतर दोन सदस्य होते.
(1) फक्त क
(2) फक्त ब
(3) फक्त अ
(4) फक्त अ आणि क
Question 32: खालीलपैकी नीती आयोगाबाबत चुकीचे विधान ओळखा.
(1) नीती आयोगाच्या उपाध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
(2) नीती आयोगाच्या उपाध्यक्षाचा दर्जा कॅबिनेट मंत्र्याचा असतो.
(3) पूर्ण वेळ सदस्य असलेल्यांचा दर्जा राज्यमंत्रीचा असतो.
(4) पदसिद्ध सदस्यांची नियुक्ती पंतप्रधानांद्वारे केली जाते.
Question 33: भारतीय संघराज्याचे वर्णन 'आभासी संघराज्य' असे कोणी केले ?
(1) के. सी. व्हेअर
(2) मॉरीस जोन्स
(3) ग्रॅनविल ऑस्टीन
(4) आयव्हर जेनींग्ज
Question 34: जोड्या लावा (निवडक राज्यांसाठी विशेष तरतूदीबाबत अनुच्छेद)
‘अ’ (अनुच्छेद)
अ. अनुच्छेद 371 ए
ब. अनुच्छेद 371 बी
क. अनुच्छेद 371 सी
ड. अनुच्छेद 371 डी

‘ब’ (विषय)
i. आंध्र प्रदेशासाठी वा तेलंगणासाठी विशेष तरतूद
ii. मणिपुरसाठी विशेष तरतूद
iii. आसामसाठी विशेष तरतूद
iv. नागालँण्डसाठी विशेष तरतूद
     अ ब क ड
(4) iv iii ii i
(1) i ii iii iv
(2) ii iii i iv
(3) iii ii iv i
Question 35: मनेका गांधी विरुद्ध भारतीय सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद-21 चा व्यापक व विस्तृत अर्थ लावला ज्यामुळे अनुच्छेद-21 वरील निवाड्यांचे खालीलपैकी कोणते परिणाम झाले ?
अ. सर्वोच्च न्यायालयाने गोपालन खटल्यातील स्वतःचा निकाल अग्राह्य ठरविला.
ब. सर्वोच्च न्यायालयाने 'कायद्याची योग्य पद्धत' ही अमेरिकन संकल्पना स्वीकृत केली.
क. अनुच्छेद-21 मधील 'व्यक्तिगत स्वातंत्र्य' या संज्ञेचा अर्थ अत्यंत व्यापक व विस्तृत असून त्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असलेल्या विविध हक्कांचा समावेश होतो हे स्वीकारले.
(1) फक्त अ
(2) अ आणि ब
(3) अ आणि क
(4) अ, ब आणि क
Question 36: रूसा (RUSA) योजना ही प्रामुख्याने ______ यासाठी आखलेली आहे.
1) सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे.
2) सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे.
3) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसाहाय्य पुरवावे.
4) महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसाहाय्य पुरवावे.
Question 37: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेसंदर्भातील कोणते/कोणती विधान/विधाने चूक/चुकीची आहे/आहेत?
अ. या परिषदेने पूर्वीचे नाव राज्य शिक्षण शास्त्र संस्था होते.
ब. ही संस्था 1962 मध्ये स्थापन करण्यात आली.
क. 1985 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद असे नामकरण करण्यात आले.
ड. ही परिषद अध्यापकांच्या प्रशिक्षणासंदर्भात संशोधन करते.
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) क आणि ड
(4) ब आणि ड
Question 38: योग्य विधाने ओळखा :
अ. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 2009 मध्ये प्रारंभ करण्यात आले.
ब. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाला संयुक्त राष्ट्राच्या आंतराष्ट्रीय विकास विभागाद्वारे साहाय्य व आर्थिक मदत करण्यात आली आहे.
क. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाला जागतिक बँकेच्या आंतराष्ट्रीय विकास संघटनेद्वारे आर्थिक निधी मिळाला आहे.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ, क
(4) अ, ब आणि क
Question 39: राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?
(1) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणा (IRAHE) स्थापन करण्याची शिफारस केली.
(2) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने 50 राष्ट्रीय विद्यापीठे स्थापन करण्याची शिफारस केली.
(3) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने पदवी शिक्षणासाठी केंद्रीय बोर्ड स्थापन करण्याची शिफारस केली.
(4) राष्ट्रीय ज्ञान आयोगाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) ची स्थापना करण्याची शिफारस केली.
Question 40: 'सर्व शिक्षा अभियाना' संदर्भात खालील विधान/विधाने विचारात घ्या.
अ. प्राथमिक शिक्षणाद्वारे सामाजिक न्याय वृद्धिंगत केला जातो.
ब. या अभियानात समाजाचा सहभाग महत्वाचा आहे.
क. मुलींच्या शिक्षणास प्राधान्य दिलेले आहे.
ड. या अभियानामध्ये केवळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार यांचा समावेश आहे.
वरीलपैकी योग्य व अयोग्य विधाने ओळखा.
(1) अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे
(2) ब, क बरोबर आणि अ, ड चूक आहे
(3) ब, क, ड बरोबर आणि अ चूक आहे
(4) अ, ब बरोबर आणि क, ड चूक आहे
Question 41: खालीलपैकी कोणता अधिकारी संसदेच्या आणि विधीमंडळाच्या मतदारसंघातील मतदार याद्या तयार करण्यास जबाबदार असतो?
(1) मुख्य निवडणूक अधिकारी
(2) जिल्हा निवडणूक अधिकारी
(3) मतदार नोंदणी अधिकारी
(4) जिल्हाधिकारी
Question 42: इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या (EVM).
अ. सन १९९५ पासुन आयोगाने इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांचा वापर केला आहे.
ब. या यंत्रांच्या वापरामुळे अवैध आणि शंकास्पद मतांची शक्यता बरीच कमी झाली आहे.
क. छापाईच्या खर्चात बचत होते.
ड. या यंत्रांमुळे मतमोजणी पूर्वापेक्षा अधिक जलदगतीने होते.
वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत?
(1) फक्त अ
(2) फक्त ब आणि क
(3) फक्त अ आणि ड
(4) फक्त ब
Question 43: खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षांची स्थापना 1999 मध्ये झाली होती ?
अ. लोक जनशक्ति पार्टी
ब. तेलंगणा राष्ट्र समिती
क. नागा पिपल्स फ्रंट
ड. जनता दल (धर्मनिरपेक्ष)
इ. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (जम्मू आणि काश्मीर)
फ. बीजू जनता दल
(1) फक्त ड, इ
(2) फक्त अ, ब, क
(3) फक्त क, ड, इ
(4) फक्त इ, फ
Question 44: निवडणूकी वेळी जर एखादा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला (agent) काही विशिष्ट तक्रार वा अडचण/समस्या निवडणूकीच्या आयोजना विषयी असल्यास ते यासंबंधी कोणाच्या निदर्शनास आणू शकतात ?
(1) पोलिंग ऑफिसर/मतदान अधिकारी
(2) झोनल ऑफिसर/क्षेत्रीय अधिकारी
(3) प्रसारमाध्यमे
(4) निरीक्षक
Question 45: भारतातील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) संदर्भात अयोग्य विधाने कोणती आहेत ?
अ. ईव्हीएमच्या बॅटरी/पॉवर पॅक आयात केले जातात.
ब. त्यांची रचना आणि निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ India लिमिटेड (ECIL) याद्वारे होते.
क. व्हीव्हीपॅट यंत्रांची रचना स्वदेशी नसून आयात केलेली आहे.
(1) अ, ब, क
(2) फक्त अ, ब
(3) फक्त ब, क
(4) फक्त अ, क
Question 46: भारतात राष्ट्रीय प्रेस (Press) दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
(1) १६ नोव्हेंबर
(2) ३ मे
(3) ३० मे
(4) १७ नोव्हेंबर
Question 47: प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया संबंधी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत ?
अ. वैधानिक यंत्रणा आहे
ब. अर्ध न्यायिक स्वरूपाची यंत्रणा
क. भारताच्या संचित निधीतून निधी मिळतो
ड. परंपरेनुसार या यंत्रणेचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार किंवा संपादक असतात
(1) अ, ब, क, ड
(2) फक्त ब, क
(3) फक्त क, ड
(4) फक्त ब, ड
Question 48: माहिती तंत्रज्ञानाबाबत संसदीय स्थायी समिती संबंधीची योग्य विधाने ओळखा :
अ. माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने मे, 2013 रोजी लोकसभेत पेड न्यूजशी संबंधित विषयावर आपला 47 वा अहवाल सादर केला.
ब. श्री. इंद्रजीत गुप्ता या समितीचे अध्यक्ष होते.
क. वर नमूद केलेल्या समितीने असे मत मांडले की, माध्यमांचे आर्थिक खाते, विशेषतः संशयीत पेड न्यूज प्रकरणाचे महसूल स्रोत तपासले जावे.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ, क
(4) अ, ब आणि क
Question 49: मुद्रित प्रसारमाध्यमांच्या संदर्भात खालील योग्य विधाने ओळखा.
अ. मुद्रित माध्यम हे स्थिर माध्यम आहे.
ब. मुद्रित माध्यम हे एक बंदिस्त व्यासपीठ आहे.
क. इतर माध्यमांसारखे येथे वेळेचे बंधन नाही.
ड. भाषा हा मुद्रित माध्यमांचा आत्मा आहे.
(1) क आणि ड
(2) अ आणि क
(3) ब, क आणि ड
(4) अ, क आणि ड
Question 50: स्वयम (SWAYAM) वरील अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही ?
(1) भारतीय विज्ञान संस्था (आय आय एस सी)
(2) राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था (एन आय ओ एस)
(3) भारतीय व्यवस्थापन संस्था, बेंगलोर (आय आय एम बी)
(4) शैक्षणिक संवाद संकाय/संघ (सी ई सी)
Question 51: 1991 ते 1999 या काळातील लोकसभा निवडणूकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिंकलेल्या जागांच्या बरोबर जोड्या जुळवा.
अ. 1991 - 14
ब. 1996 - 09
क. 1998 - 12
ड. 1999 - 04
(1) अ, ब बरोबर आणि क, ड चूक
(2) ब, क बरोबर आणि अ, ड चूक
(3) अ, ड बरोबर आणि ब, क चूक
(4) अ, क बरोबर आणि ब, ड चूक
Question 52: जोड्या लावा.
'अ' (राजकीय नेते)
अ. एस. ए. डांगे
ब. बलराज मधोक
क. मिनू मसानी
ड. अशोक मेहता
'ब' (राजकीय पक्ष)
i. भारतीय जनसंघ
ii. स्वतंत्र पक्ष
iii. प्रजा समाजवादी पक्ष
iv. भारतीय साम्यवादी पक्ष
(1) अ-i, ब-iii, क-iv, ड-ii
(2) अ-iv, ब-i, क-ii, ड-iii
(3) अ-i, ब-iv, क-iii, ड-ii
(4) अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
Question 53: भारतीय शेतकरी कामगार पक्षासंदर्भात खालीलपैकी चूक / चूकीची विधान/विधाने ओळखा.
अ. 1948 मध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली.
ब. 1978 मध्ये स्थापन झालेल्या पुरोगामी लोकशाही दलाच्या आघाडीमध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्ष सहभागी नव्हता.
क. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अग्रेसर होते.
ड. उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे हे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते.
(1) अ आणि ड
(2) फक्त ब
(3) ब आणि क
(4) फक्त क
Question 54: खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ. बसपाचे निवडणूक चिन्ह हे 'हत्ती' आहे.
ब. बसपाने विधानसभा निवडणूकीत 1984 मध्ये प्रथमतः प्रवेश केला.
क. 13 व्या लोकसभेत (1999-2004) बसपाचे 20 सदस्य होते.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ, क
(4) अ, ब आणि क
Question 55: भारतीय निवडणूक आयोगाने व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट ट्रेल (VVPAT) व्यवस्थेचा वापर भारतात पहिल्यांदा कोठे केला होता ?
(1) उत्तर परावूर विधानसभा मतदारसंघ, केरळ
(2) नोकसेन विधानसभा मतदारसंघ, नागालँड
(3) म्हापसा विधानसभा मतदारसंघ, गोवा
(4) नांबोल विधानसभा मतदारसंघ, मणिपूर
Question 56: बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीजचे खालीलपैकी कोणते उद्धिष्ट नाही ?
(1) तरुणांची रोजगार क्षमता वाढविणे
(2) माध्यमिक स्तरावरील गळतीचे प्रमाण कमी करणे
(3) शिक्षित आणि अशिक्षित यांच्यातील अंतर भरून काढणे
(4) बहुल-प्रवेश आणि बहुल-गमन अध्ययनाच्या संधी आणि उभ्या गतिशीलतेच्या तरतूदीद्वारे त्यांची स्पर्धात्मकता कायम ठेवणे
Question 57: योग्य क्रमानुसार लावा (राजकीय पक्षांची स्थापना वर्ष सर्वात जुना ते सर्वात नवा पक्ष).
a. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)
b. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस
c. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
d. भारतीय जनता पार्टी
(1) c, d, a, b
(2) d, c, b, a
(3) c, a, d, b
(4) a, c, d, b
Question 58: भारतातील परिसीमन आयोगासंबंधी पुढील विधानांपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ. या आयोगाला सीमा आयोग असेही म्हणतात.
ब. भारतात आजपर्यंत पाच वेळा परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
क. या आयोगाच्या आदेशांना कायद्याची ताकद असते आणि त्या आदेशावर न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येत नाहीत.
ड. या आयोगाच्या आदेशांच्या प्रती लोकसभा तसेच संबंधित राज्य विधीमंडळापुढे सादर करण्यात येतात आणि ते यांमध्ये गरज असल्यास बदल सूचवू शकतात.
(1) अ, ब, क, ड
(2) फक्त अ, ब, क
(3) फक्त अ, क
(4) फक्त अ, क, ड
Question 59: 'समग्र शिक्षा' संबंधी पुढील विधानांपैकी सत्य विधाने कोणती आहेत ?
अ. समग्र शिक्षा अभियान २०१८-१९ पासून सुरू करण्यात आले.
ब. या योजनेत शाळापूर्व ते १०वी इयत्तेपर्यंतच्या मुलांचा समावेश होतो.
क. ही केंद्र पुरस्कृत योजना आहे.
(1) अ, ब, क
(2) फक्त अ, ब
(3) फक्त ब, क
(4) फक्त अ, क
Question 60: शिक्षण मंत्रालय भारत शासनाची पुढीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षण संस्थांचे भारतातील क्रमवारी (Ranking) जाहीर करते ?
(1) ए आय एस एच ई (AISHE)
(2) ए आय सी टी ई (AICTE)
(3) एन ए ए सी (NAAC)
(4) एन आय आर एफ़ (NIRF)
Note:प्रश्न क्र.60 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 61: २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेने किती जागा जिंकल्या होत्या ?
(1) १४
(2) १६
(3) १८
(4) १९
Question 62: खालीलपैकी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण होते ?
(1) कांशीराम
(2) छत्रपती शाहू महाराज
(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(4) महात्मा ज्योतीबा फुले
Question 63: खालीलपैकी कोणते दबाव गट आहेत ?
अ. कामगार संघटना
ब. कृषी संघटना
क. व्यावसायिक संघटना
ड. विद्यार्थी संघटना
(1) अ आणि ब
(2) क आणि ड
(3) अ, ब आणि क
(4) अ, ब, क आणि ड
Question 64: नव्या राजकीय पक्षाची नोंदणी पुढीलपैकी कोणत्या कायद्या अंतर्गत केली जाते ?
(1) लोकप्रतिनिधी कायदा, १९५१
(2) परिसीमन कायदा, २००२
(3) लोकप्रतिनिधी कायदा, १९७५
(4) राजकीय पक्ष चिन्ह कायदा, १९५५
Question 65: महाराष्ट्रातील महिला संघटना आणि त्यांच्या प्रमुख यांची/यांच्या योग्य जोडी/जोड्या जुळवा.
अ. नीलम गोऱ्ह — भारतीय महिला फेडरेशन
ब. कुंदा कदम — रिपब्लिकन महिला आघाडी
क. सुधा कुलकर्णी — महिला दक्षता समिती
ड. प्रणस गोरे — श्रमजीवी महिला संघ
(1) अ, क बरोबर आणि ब, ड चूक
(2) ब, क बरोबर आणि अ, ड चूक
(3) क, ड बरोबर आणि अ, ब चूक
(4) ब, ड बरोबर आणि अ, क चूक
Question 66: ईव्हीएम/व्हीव्हीपॅट यांचे आयुष्य संपल्यावर निर्धारित नियमकानुसार ते नष्ट करण्यासाठी कोणत्या ठिकाणी पाठवले जातात ?
(1) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
(2) भारतीय निवडणूक आयोग
(3) इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय
(4) भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)
Question 67: भारतातील निवडणूक सुधारणे संदर्भात खालील विधान / विधाने विचारात घ्या.
अ. 2014 पासून सर्व स्तरावरील निवडणूकीमध्ये मतदारांना NOTA चा पर्याय देण्यात आला.
ब. 2019 पासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत VVPAT चा वापर सुरू झाला.
क. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 60 सूचक तर 60 अनुमोदक यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
ड. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये 50 सूचक तर 50 अनुमोदक यांची स्वाक्षरी असणे आवश्यक असते.
(1) ब, क बरोबर आणि अ, ड चूक
(2) अ, क बरोबर आणि ब, ड चूक
(3) अ, ब बरोबर आणि क, ड चूक
(4) क, ड बरोबर आणि अ, ब चूक
Question 68: भारतीय निर्वाचन आयोगासंदर्भात खालील विधान/विधाने विचारात घ्या.
अ. 1972 मध्ये संयुक्त संसदीय समितीने भारताचा निर्वाचन आयोग बहुसदस्यीय असावा अशी भूमिका मांडली होती.
ब. मार्च 1974 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष शिष्टमंडळाने निर्वाचन आयोग बहुसदस्यीय असावा अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली होती.
क. ऑक्टोबर 1994 मध्ये निर्वाचन आयोग त्रिसदस्यीय करण्यात आला.
ड. निर्वाचन आयोगासंदर्भातील तरतूदी भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 15 मध्ये केलेल्या आहेत.
(1) अ, ड बरोबर आणि ब, क चूक
(2) अ, ब बरोबर आणि क, ड चूक
(3) ब, ड बरोबर आणि अ, क चूक
(4) अ, क बरोबर आणि ब, ड चूक
Note:प्रश्न क्र.68 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 69: भारतातील निवडणूक विषयक सुधारणांसंदर्भात खालील विधान/विधाने लक्षात घ्या.
अ. मतदारांना 2014 पासून नकाराधिकार (नोटा) उपलब्ध झाला.
ब. राजकीय पक्षांना जून 2014 पासून माहितीच्या अधिकार कक्षेत आणले गेले.
क. विजयी उमेद्वाराच्या 1/6 पेक्षा जास्त मते मिळविणाऱ्या उमेद्वाराची अनामत रक्कम जप्त केली जात नाही.
ड. तारकुंडे समितीने केलेल्या शिफारशीनुसार विविध स्तरावरील निवडणूकीतील अनामत रक्कम वाढविण्यात आली.
वरीलपैकी बरोबर व चूक विधाने ओळखा :
(1) अ, क बरोबर आणि ब, ड चूक आहे
(2) अ, ब बरोबर आणि क, ड चूक आहे
(3) ब, क बरोबर आणि अ, ड चूक आहे
(4) अ बरोबर आणि ब, क, ड चूक आहे
Note:प्रश्न क्र.69 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 70: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्राथमिक उद्देश काय आहे ?
(1) हवामानाचे अपडेट्स पुरविणे
(2) ऑनलाईन शॉपिंगची सोप करणे
(3) लोकांना जोडणे आणि संवाद वाढविणे
(4) वैद्यकीय सल्ला देणे
Question 71: नागरीकांच्या सनदेची खालीलपैकी कोणती तत्त्वे आहेत ?
a. गुणवत्ता
b. प्रदत्तीकरण
c. निवड
d. पारदर्शकता
(1) a, b आणि c
(2) a, c आणि d
(3) b, c आणि d
(4) a, b आणि d
Question 72: 'सचिवालय म्हणजे निर्णय निर्धारण संस्था आणि संचालनालय म्हणजे अंमलबजावणी करणारी संस्था असा फरक समाप्त केला पाहिजे', अशी शिफारस कोणत्या समितीने / आयोगाने केली आहे ?
a. मध्यप्रदेश प्रशासकीय सुधारणा आयोग
b. आंध्रप्रदेश प्रशासकीय सुधारणा समिती
c. राजस्थान प्रशासकीय सुधारणा समिती
(1) फक्त a
(2) फक्त a आणि b
(3) a, b आणि c
(4) फक्त b आणि c
Question 73: जोड्या लावा : 
(ई-गव्हर्नन्स प्रकल्प)
a. भूमी
b. लोकवाणी
c. ज्ञानदूत
d. लोकमित्र
(राज्य)
i. उत्तर प्रदेश
ii. हिमाचल प्रदेश
iii. कर्नाटक
iv. मध्यप्रदेश
     a  b  c  d
(1) i  ii  iii  iv
(2) ii  iii  iv  i
(3) iii  i  iv  ii
(4) iv  iii  i  ii
Question 74: भारतात श्वेतक्रांती यशस्वी होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांचा हातभार लागला ?
a. दूध प्रक्रियेतील गुंतवणूक
b. दूध विपणन आणि व्यापार
c. निर्यातीकडे कल नाही
d. सहकारी संस्था
e. गायींमध्ये कृत्रिम रेतन
(1) a, c आणि e
(2) a, b आणि c
(3) b, c, d आणि e
(4) a, b, d आणि e
Question 75: अमृत (AMRUT) मिशन हे कशाशी संबंधीत आहे ?
(1) ग्रामीण व शहरी दळणवळण
(2) ग्रामीण व शहरी परिवर्तन
(3) शहरी दळणवळण
(4) शहरी परिवर्तन
Question 76: कोठारी समितीच्या शिफारशीनुसार नागरी सेवा परीक्षेची दोन टप्प्यांची योजना कोणत्या वर्षी लागू करण्यात आली ?
(1) 1976
(2) 1979
(3) 1989
(4) 1985
Question 77: कोणत्या विचारवेत्ताने नोकरशाहीच्या आधुनिक समाजशास्त्रीय अध्ययनाची स्थापना केली ?
(1) मॅक्स वेबर
(2) कार्ल मार्क्स
(3) व्हिन्सेन्ट डी गोर्ने
(4) उर्विक
Question 78: मॅक्स वेबरच्या मते, खालीलपैकी कोणते नोकरशाही संघटनेचे वैशिष्ट्य नाही ?
(1) अवैयक्तीकता आणि तटस्थता
(2) कार्य विभाजन, पदानुक्रम आणि नियम
(3) तर्कशुद्धता
(4) त्यांचा राजकीय पक्षांशी जवळचा संबंध असतो
Question 79: नव लोक व्यवस्थापन प्रतिमानाचा प्राथमिक घटक कोणता आहे ?
(1) नोकरशाही नियंत्रण वाढविणे
(2) उच्च दर्जाच्या सेवा देणे
(3) सरकारी खर्च कमी करणे
(4) सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार विस्तार करणे
Question 80: आज सनदी सेवांची कर्तव्ये अनेक व विविध आहेत आणि यात खालील कर्तव्यांचा समावेश आहे.
a. धोरणाच्या सर्व गोष्टीवर मंत्र्यांना सल्ला देणे.
b. शासनाच्या सर्व पैलूवर देखरेख.
c. कर गोळा करणे, लेखा ठेवणे आणि टपाल तिकीट विकणे यासारखी नियमीत कार्ये करणे.
(1) फक्त a बरोबर नाही
(2) फक्त b बरोबर आहे
(3) फक्त b आणि c बरोबर आहेत
(4) फक्त a, b आणि c बरोबर आहेत
Question 81: ----यांच्या शिफारशी वरून इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ पब्लीक अॅडमीनिस्ट्रेशनची स्थापना करण्यात आली.
(1) लॉर्ड रिपन
(2) कॉर्नवॉलीस
(3) पॉल एच. अॅपलबी
(4) रिग्ज
Question 82: खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा.
A. नागरी सेवा दिनाचा एक भाग म्हणून लोकप्रशासनात उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कार्यासाठी मुख्यमंत्री पुरस्कार प्रदान केला जातो.
B. नागरी सेवा दिनाचा एक भाग म्हणून लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कार्यासाठी प्रधानमंत्री पुरस्कार प्रदान केला जातो.
C. भारत सरकार दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा करते.
(1) फक्त A बरोबर आहे
(2) फक्त A आणि B बरोबर आहेत
(3) सर्व A, B आणि C बरोबर आहेत
(4) फक्त B आणि C बरोबर आहेत
Question 83: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेच्या कोणत्या कायद्याद्वारे "अखिल भारतीय सेवेत" नेमल्या जाणाऱ्या व्यक्तिंच्या भरती करण्यासाठीचे नियम, नियमावली आणि सेवाशर्ती, राज्य सरकारांशी सल्लामसलत करून, तयार करण्याचे अधिकार केन्द्र सरकारला प्रदान करण्यात आले ?
(1) अखिल भारतीय सेवा अधिनियम, 1950
(2) अखिल भारतीय सेवा अधिनियम, 1951
(3) अखिल भारतीय सेवा अधिनियम, 1954
(4) अखिल भारतीय सेवा अधिनियम, 1955
Question 84: सनदी सेवकांच्या प्रशिक्षणाचे खालील उद्दिष्ट्ये आहेत.
a. क्षमता वाढवणे.
b. अभिवृत्तीत परिवर्तन करणे.
c. दृष्टी आणि दृष्टीकोन विस्तृत करणे.
d. वृत्ती आणि मनोबल मजबूत करणे.
(1) b आणि c
(2) a, b आणि c
(3) a आणि b
(4) a, b, c आणि d
Question 85: कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केन्द्रीय लोकसेवा आयोगाने 2013 पासून नागरी सेवांच्या मुख्य परीक्षेच्या प्रणालीत बदल केले ?
(1) कोठारी समिती
(2) सतीशचंद्र समिती
(3) खन्ना समिती
(4) निगवेकर समिती
Question 86: मुघल काळात परगण्याचे कार्यकारी प्रमुख आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची होती ?
(1) अमीन
(2) बक्षी
(3) सदर
(4) शिगदार
Question 87: भारताच्या आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेची सुरुवात करण्यासाठीच्या सुधारणा कोणी केल्या ?
(1) कॉर्नवॉलीस
(2) वॉरेन हेस्टींग्ज
(3) लॉर्ड रिपन
(4) सर जॉर्ज कॅम्पबेल
Question 88: विधान आणि कारण.
विधान (A): ब्रिटीशांनी भारतीय नागरी सेवेतील नियुक्तीसाठी खुल्या स्पर्धात्मक परिक्षांचा आधार घेतला.
कारण (R): सन 1853 च्या चार्टर कायद्याने भारतीय नागरी सेवेत नियुक्त्या करण्याचा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांचा अधिकार रद्द केला.
(1) दोन्ही (A) आणि (R) बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे
(2) दोन्ही (A) आणि (R) बरोबर आहेत परन्तु (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही
(3) (A) बरोबर आहे परन्तु (R) चूक आहे
(4) (A) चूक आहे परन्तु (R) बरोबर आहे
Question 89: भारतीय संविधानातील कलम 309 खालीलपैकी कोणत्या सेवासंबंधी आहे ?
a. संरक्षण सेवा
b. स्थानिक सेवा
c. राज्य सेवा
d. केंद्रीय नागरी सेवा
(1) a फक्त
(2) b आणि c फक्त
(3) c आणि d फक्त
(4) a आणि d फक्त
Question 90: सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी कोणत्या राज्यात आहे ?
(1) तेलंगाणा
(2) गुजरात
(3) तामिळनाडू
(4) आंध्रप्रदेश
Question 91: जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
a. या कार्यालयाची निर्मिती 1774 साली करण्यात आली.
b. इतर देशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत याला समांतर व्यवस्था आहेत.
c. या कार्यालयाची निर्मिती वॉरेन हेस्टिंग्ज यांनी केली.
d. जिल्हाधिकारी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखतात.
(1) a, b आणि c विधाने योग्य आहेत
(2) a, c आणि d विधाने योग्य आहेत
(3) c आणि d विधाने योग्य आहेत
(4) a आणि c विधाने योग्य आहेत
Question 92: खालील विधाने विचारात घ्या :
A. रेग्यूलेटिंग कायदा 1773 नुसार बंगाल प्रांतासाठी गव्हर्नर जनरल हे प्रशासनातील प्रमुख पद निर्माण करण्यात आले.
B. ब्रिटीश कालखंडामध्ये सन 1923 मध्ये कार्यालयीन गोपनियता कायदा पारीत करण्यात आला होता.
C. Brिटीश कालखंडामध्ये सन 1924 मध्ये कार्यालयीन गोपनियता कायदा पारीत करण्यात आला होता.
(1) फक्त A आणि B बरोबर आहेत
(2) फक्त A आणि C बरोबर आहेत
(3) फक्त B बरोबर आहे
(4) फक्त A बरोबर आहे
Question 93: जिल्हाधिकाऱ्याचे प्रमुख कर्तव्य काय आहे ?
(1) कायदा व व्यवस्था राखणे
(2) महसूल गोळा करणे
(3) विकासाचा आराखडा तयार करणे
(4) त्याच्या जिल्ह्यात नियमीत दौरे करणे
Question 94: खालील विधाने विचारात घ्या :
A. महसूल प्रशासनातील तलाठी या पदाचे नाव बदलून ग्राम अधिकारी असे करण्यात आले आहे.
B. महसूल प्रशासनातील तलाठी या पदाचे नाव दि. 14 ऑक्टोबर 2024 पासून बदलून ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे.
C. दि. 14 ऑक्टोबर 2022 पासून तलाठी या पदाचे नाव महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे.
(1) फक्त B बरोबर आहे
(2) फक्त A बरोबर आहे
(3) फक्त A आणि B बरोबर आहेत
(4) फक्त B आणि C बरोबर आहेत
Question 95: जिल्हाधिकारी विषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) जिल्हाधिकारी हा जिल्हा दंडाधिकारीसुद्धा आहे.
(2) तो पोलीस ठाणेची तपासणी करू शकतो आणि कोणतीही माहिती विचारू शकतो.
(3) तो संशयीत गुन्हेगारास अटक करण्यासाठी वॉरंट काढू शकतो.
(4) तो कोणत्याही पोलीस स्टेशनच्या प्रमुखाला व्यक्तिशः येऊन प्रकरणांसंबंधीचे स्पष्टीकरण देण्यास सांगू शकत नाही.
Question 96: खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ. राज्यघटनेतील कलम 162 नुसार राज्यपालास सहाय्य करण्याकरीता आणि सल्ला देण्याकरीता मुख्यमंत्रीच असतात.
ब. राज्यघटनेतील कलम 163 नुसार राज्यपालास सहाय्य करण्याकरीता आणि सल्ला देण्याकरीता मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रीपरीषद असेल.
क. मंत्रीपरिषदेतील एकूण मंत्र्याची संख्या विधान सभेतील एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही.
(1) अ आणि ब बरोबर
(2) अ, ब आणि क बरोबर
(3) अ आणि क बरोबर
(4) ब आणि क बरोबर
Question 97: जोड्या लावा : 

A. लॉर्ड मेयोचा ठराव
B. लॉर्ड रिपनचा ठराव
C. मुंबई म्युन्सीपल कार्पोरेशन अॅक्ट
D. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक नागरी कायदा

I. 1888
II. 1965
III. 1870
IV. 1882
      A  B  C  D
(1) I  II  III  IV
(2) IV  III  II  I
(3) I  IV  III  II
(4) III  IV  I  II
Question 98: राज्य निर्वाचन आयोगानुसार जिल्हा परिषदेत निवडून देण्याची महाराष्ट्रात जास्तीत जास्त सदस्यसंख्या ही इतकी होती.
(1) ७५
(2) ७०
(3) ५०
(4) ४२
Question 99: लोकलेखा समीतीच्या सदस्य संख्येबाबत खालीलपैकी कोणते एक बरोबर आहे ?
(1) २२
(2) २५
(3) ३०
(4) ३२
Note:प्रश्न क्र.99 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 100: कॅन्टोन्मेंट कायदा केंद्रीय विधिमंडळाने साली मंजूर केला.
(1) १९४९
(2) १९५१
(3) १९२४
(4) १९३५
Question 101: जोड्या लावा : 
(कार्यक्रम)
अ. संसद आदर्श ग्राम योजना
ब. प्रधानमंत्री किसान बीमा योजना
क. आयुष्मान भारत योजना
ड. प्रधानमंत्री आवास योजना
(वर्ष)
i. 2018
ii. 2016
iii. 2015
iv. 2014
      अ  ब  क  ड
(1) i  ii  iii  iv
(2) iv  iii  i  ii
(3) ii  iii  iv  i
(4) iv  i  ii  iii
Note:प्रश्न क्र.1017 रद्द करण्यात आलेला आहे.

Question 102: भारतीय संसदेच्या लोक लेखा समितीचा शताब्दी समारोह साजरा करण्यात आला तो दिवस म्हणजे
(1) 4 व 5 डिसेंबर 2021
(2) 4 व 5 जानेवारी 2021
(3) 5 व 6 डिसेंबर 2021
(4) 5 व 6 जानेवारी 2021
Question 103: कोणत्या राज्याने सर्वप्रथम लोकायुक्त व उपलोकायुक्त अधिनियम अंमलबजावणी केला ?
(1) महाराष्ट्र
(2) राजस्थान
(3) बिहार
(4) उत्तरप्रदेश
Question 104: 'लोकपाल' संबंधी खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
(1) लोकपाल ही बहुसदस्यीय संस्था आहे, ज्या मध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त आठ सदस्य असतात.
(2) लोकपाल चे अध्यक्ष हे भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा निर्दोष सचोटी आणि उत्कृष्ट क्षमता असलेली प्रतिष्ठित व्यक्ति असावी जिला भ्रष्टाचार विरोधी धोरणाशी संबंधीत बाबींमध्ये किमान 25 वर्षांचे ज्ञान आणि कौशल्य असावे.
(3) लोकपालचे जास्तीत जास्त आठ सदस्यांपैकी निम्मे न्यायिक सदस्य असतील आणि किमान 50% सदस्या या महिला असतील.
(4) लोकपालचा न्यायिक सदस्य सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा माजी मुख्य न्यायाधीश असतो.
Question 105: महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात येते ?
(1) कलम १६१
(2) कलम १६३
(3) कलम १६५
(4) कलम १६७
Question 106: महाराष्ट्रातील पंचायत समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. सभापती किंवा उप-सभापती यांच्या निवडणूकीच्या वैधते संबंधात विवाद उपस्थित झाल्यास, त्या बाबतीत, जिल्हाधिकाऱ्यास किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास / सदस्यास तो विवाद निवडणूकीच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत आयुक्तांकडे निर्णयासाठी निर्देशित करता येईल.
ब. आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध करावयाचे अपील अशा निर्णयाच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत राज्य शासनाकडे दाखल करता येईल.
(1) विधान अ बरोबर
(2) विधान ब बरोबर
(3) दोन्हीही विधाने बरोबर
(4) दोन्हीही विधाने चुकीची
Question 107: खालील विधाने विचारात घ्या.
A. भारतीय राज्यघटनेतील कलम 165 नुसार महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते.
B. महाधिवक्ता महाराष्ट्र विधान सभा व विधान परिषदेच्या बैठकांना उपस्थित राहू शकतो.
(1) A आणि B सत्य
(2) A सत्य आणि B असत्य
(3) A असत्य आणि B सत्य
(4) A आणि B असत्य
Question 108: भारतात अर्थसंकल्प तयार करणे आणि एकत्रिकरण करण्या संदर्भातील टप्यांचा योग्य क्रम लावा.
a. मंत्रिमंडळाची मान्यता.
b. वित्त मंत्रालयाद्वारे अंदाजांची छाननी आणि एकत्रिकरण.
c. विभागीय नियंत्रक अधिकाऱ्यांकडून अंदाजांची छाननी.
d. संवितरण अधिकाऱ्यांकडून प्राथमिक अंदाज तयार करणे आणि एकत्रिकरण करणे.
e. महालेखापाल आणि प्रशासकीय विभागाद्वारे सुधारित अंदाजाची छाननी.
(1) a, b, c, d आणि e
(2) d, c, b, e आणि a
(3) c, d, e, a आणि b
(4) d, c, e, b आणि a
Question 109: खालील विधाने विचारात घ्या.
अ. भारतीय राज्यघटनेतील कलम 48 मध्ये नियंत्रक व महालेखापाल याविषयी तरतूद आहे.
ब. नियंत्रक व महालेखापालाने राष्ट्रपतीकडे सादर केलेला अहवाल राज्यघटनेतील कलम 151 नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाकडे पाठवावा लागतो.
(1) अ आणि ब सत्य
(2) अ आणि ब असत्य
(3) अ असत्य आणि ब सत्य
(4) अ सत्य आणि ब असत्य
Question 110: पुढील विधाने विचारात घ्या.
अ. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) आहेत.
ब. कॅग हे पद ग्रहण केल्यापासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 62 वर्षे वयापर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत पद धारण करतो.
(1) फक्त अ बरोबर आहे
(2) फक्त ब बरोबर आहे
(3) दोन्ही अ व ब बरोबर आहेत
(4) दोन्ही अ आणि ब चुकीची आहेत
Question 111: 'कॅबिनेट' आणि 'कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स' यातील फरकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. पंतप्रधानांनी निवडलेल्या आणि नियुक्त केलेल्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची मिळून बनलेली छोटीशी संस्था म्हणजे 'कॅबिनेट' असते.
ब. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सर्व मंत्र्यांची मिळून झालेली मोठी संस्था म्हणजे 'कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स' असते.
क. अनुच्छेद 356 (4) मध्ये 'कॅबिनेट' या शब्दाची व्याख्या दिलेली आहे तर 'कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स' हा शब्दप्रयोग राज्यघटनेच्या विविध अनुच्छेदामध्ये आढळतो.
ड. कॅबिनेटचे निर्णय प्रक्रिया आणि धोरण निश्चिती यावर लक्ष केन्द्रीत झालेले असते तर कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स सल्लात्मक आणि समन्वयात्मक म्हणून कार्यरत असते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(1) अ, ब, क
(2) क आणि ड
(3) अ, ब, ड
(4) अ आणि क
Question 112: जोड्या लावा : 
(विधानसभा अध्यक्ष)
a. श्री. शेषराव वानखेडे
b. श्री. बाळासाहेब भारदे
c. श्री. प्राणलाल व्होरा
d. श्री. अरुणलाल गुजराथी
(कार्यकाळ)
i. 22.10.1999-17.10.2004
ii. 22.03.1972-20.04.1977
iii. 17.03.1962-13.03.1967
iv. 01.02.1980-29.06.1980
      a  b  c  d
(1) i  ii  iii  iv
(2) ii  iii  iv  i
(3) iii  iv  i  ii
(4) iv  i  ii  iii
Question 113: महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार चालते ?
(1) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८
(2) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९६०
(3) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६०
(4) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१
Question 114: संविधानाचा खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्यपालास न्यायीक कार्यवाहीत संरक्षण देतो ?
(1) अनुच्छेद १५२
(2) अनुच्छेद १५४
(3) अनुच्छेद ३६०
(4) अनुच्छेद ३६१
Question 115: एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत असेल तर त्याचे वेतन आणि भत्ते कार्यरत राज्यामध्ये विभाजित करण्याचा अधिकार हा
(1) राज्यांच्या मुख्यमंत्र्याना असतो
(2) राज्यांच्या मंत्रिमंडळाला आहे
(3) राज्यपाल स्वतः ठरवतात
(4) विभाजनाचे गुणोत्तर राष्ट्रपती ठरवतील
Question 116: खालील विधाने विचारात घ्या.
अ. डायरेक्टोरेट जनरल डिफेन्स इस्टेट्स (DGDE) ही संरक्षण मंत्रालयाची आंतरसेवा संस्था आहे जी थेट छावणी प्रशासनावर नियंत्रण ठेवते.
ब. सर्व छावणी क्षेत्रपालिकांचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे आणि संसदेला सादर करणे हे डायरेक्टोरेट जनरल डिफेन्स इस्टेट्स चे कार्य आहे.
(1) विधान अ बरोबर
(2) विधान ब बरोबर
(3) अ आणि ब विधाने बरोबर आहेत
(4) अ आणि ब विधाने चुकीची आहेत
Question 117: कोणत्या महानगरपालिका वार्ड समित्या गठीत करू शकतात ?
(1) तीन लाख किंवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका
(2) चार लाख किंवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका
(3) पाच लाख किंवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका
(4) सहा लाख किंवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका
Question 118: महाराष्ट्रातील महानगरपालिके संबंधात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे ?
(1) स्थायी समितीच्या सदस्यांपैकी निम्मे सदस्य पुढील प्रत्येक वर्षी निवृत्त होतात.
(2) स्थायी समितीचा सभापती हा परिवहन समितीसाटी पदसिद्ध सभापती असतो.
(3) महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश सदस्या ह्या महिला पालिका सदस्यांमधील असल्या पाहिजे.
(4) कलम 143Q हे महानगरपालिकेच्या रचनेशी संबंधित आहे.
Question 119: जिल्हा परिषदेच्या बैठकाबाबत कोणते एक बरोबर नाही ?
(1) अध्यक्ष बैठकची तारीख ठरवतो.
(2) झेड. पी. आवश्यक असेल तितक्या वेळा सभा घेऊ शकते.
(3) शेवटच्या सभेत व पुढच्या सभेची तारीख यामध्ये तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे.
(4) सर्व साधारण सभेसाठी १५ दिवसांची नोटीस काढणे आवश्यक आहे.
Question 120: "महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961" कलम 45 नुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ?
(1) उपजिल्हाधिकारी
(2) तहसीलदार
(3) विभागीय आयुक्त
(4) जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यापेक्षा दर्जा कमी नसलेला त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी
Question 121: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाति (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 चे कोणते कलम पीडित आणि साक्षीदारांना अधिकार प्रदान करते ?
(1) कलम 12
(2) कलम 15
(3) कलम 15A
(4) कलम 17
Question 122: नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 नुसार "स्थान" यात घर, इमारत आणि अन्य बांधकाम व वास्तू यांचा समावेश आहे आणि तसेच त्यात यांचाही समावेश आहे
(1) तंबू
(2) वाहन
(3) जलयान
(4) वरील सर्व
Question 123: कोणतेही जेष्ठ नागरिक किंवा पालक न्यायाधिकरणाच्या आदेशाने व्यथित पीडित झाल्यास, आदेशाच्या तारखेपासून च्या आत अपीलीय न्यायाधिकरणाकडे अपील करू शकतात.
(1) साठ दिवस
(2) तीस दिवस
(3) नव्वद दिवस
(4) सहा महिने
Question 124: पालक व जेष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण कायदा, २००७ अंतर्गत न्यायाधिकरणाचा अध्यक्ष हा या अधिकाऱ्याच्या हुद्यापेक्षा कमी दर्जाचा नसावा
(1) तहसिलदार
(2) राज्याचे उप-विभागीय अधिकारी
(3) जिल्हाधिकारी
(4) आयुक्त
Question 125: नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 या कायद्याचे नाव 1976 पर्यंत खालीलपैकी हे होते
(1) अस्पृश्यता अपराध कायदा, 1955
(2) अस्पृश्यता निवारण कायदा, 1955
(3) अस्पृश्यता प्रथा काढून टाकण्याचा कायदा, 1955
(4) अस्पृश्यता कायदा, 1955
Question 126: केंद्रीय दक्षता आयुक्त आणि दक्षता आयुक्तांची नियुक्ती द्वारे केली जाते.
(1) राष्ट्रपती
(2) केंद्र सरकार
(3) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
(4) संसद
Question 127: भारतीय नागरी सेवा किंवा अखिल भारतीय सेवांचा कर्मचारी असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भात, राज्यघटनेच्या अनुच्छेद 311 अंतर्गत अनिवार्य आहे.
अ. त्याला बदलीच्या आदेशाची माहिती देणे
ब. त्याची बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे किंवा पदावनतीपूर्वी त्याची चौकशी करणे
क. पगार वाढीची व कपातीबाबत माहिती देणे
ड. त्याच्या कुटुंबाची, शिक्षणाची आणि धार्मिक पार्श्वभूमीची चौकशी करणे
(1) अ आणि ड
(2) ब
(3) क आणि ड
(4) अ
Question 128: प्रशासकीय न्यायाधिकरण कायद्याच्या नुसार, न्यायाधिकरण नागरी प्रक्रिया संहितेच्या तांत्रिकतेला बांधील नसले तरी नैसर्गिक न्यायाच्या नियमांचे पालन करण्यास किंवा त्यांचे अनुसरण करण्यास बांधील राहील.
(1) कलम २१
(2) कलम २२
(3) कलम २३
(4) कलम २४
Question 129: लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, २०१३ च्या कलम 53 नुसार, लोकपालास संबोधीत केलेल्या तक्रारीमध्ये कोणत्याही गुन्ह्याचा उल्लेख असल्यास आणि असा गुन्हा घडल्यानंतर असल्यास लोकपाल अशा प्रकरणाची चौकशी करणार नाही. कालावधीनंतर तक्रार केली
(1) सहा महिने
(2) 150 दिवस
(3) पाच वर्ष
(4) सात वर्ष
Question 130: कोणाच्या मते "ड्रॉइट अॅडमिनिस्ट्रेटिफ (Droit Administratif)" हे कायद्याचे राज्य या तत्वाच्या विरोधी आहे ?
(1) प्रो. इ. सी. एस. वेड
(2) डायसे
(3) एडवर्ड कोक
(4) प्रो. ए. एल. गुडहार्ट
Question 131: माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९ नुसार, राज्य लोक माहिती अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे असंतुष्ट व्यक्तीस, दुसरे अपील करण्याची तरतूद आहे जी राज्य माहिती आयुक्तांकडे आत करावी लागेल. च्या
(1) नव्वद दिवस
(2) साठ दिवस
(3) तीस दिवस
(4) छत्तीस दिवस
Question 132: माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 नुसार सायबर दहशतवादासाठी कोणती शिक्षा निर्धारीत आहे ?
(1) पाच वर्षापर्यंत कारावास किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही
(2) जन्मठेपेपर्यंत वाढू शकणारी कारावासाची शिक्षा
(3) दहा वर्षापर्यंत कारावास
(4) सात वर्षापर्यंत कारावास किंवा दहा लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही
Question 133: माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या या कलमामध्ये इलेक्ट्रॉनीक स्वाक्षरी प्रमाणपत्र जारी करण्याच्या परवान्या संदर्भात तरतूद देण्यात आली आहे.
(1) कलम 42
(2) कलम 21
(3) कलम 41
(4) कलम 67
Question 134: भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत शासन यांची नियुक्ती करते.
(1) विशेष पोलीस
(2) अतिरिक्त न्यायाधीश
(3) भ्रष्टाचार विरोधी न्यायालय
(4) विशेष न्यायाधीश
Question 135: भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ कलम २ (ग) प्रमाणे "लोक सेवक" यांचा अर्थ
अ. शासनाच्या सेवेतील किंवा शासनाकडून वेतन घेणारी किंवा कोणतेही सार्वजनिक कर्तव्य बजावण्या साठी शासना कडून फी च्या किंवा कमीशनच्या स्वरूपात परिश्रमीक दिली जाणारी कोणतीही व्यक्ति.
ब. अशी व्यक्ति जी कोणत्याही स्थानीकाकडून सेवेकरीता वेतन घेते.
क. केंद्रीय, प्रांतिय किंवा राज्य अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये स्थापन करण्यात आलेल्या निगमाकडून वेतन घेते.
ड. ज्या पदाच्या आधारे एखाद्या व्यक्तिला कोणतेही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यास प्राधिकृत करण्यात किंवा फर्मावण्यात आले असेल असे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ति.
(1) पर्याय अ, ब आणि क योग्य आहेत
(2) पर्याय ब, क आणि ड योग्य आहेत
(3) पर्याय अ, क आणि ड योग्य आहेत
(4) सर्व पर्याय योग्य आहेत
Question 136: समाजातील दुर्बल घटकांना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे ?
(1) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण
(2) राष्ट्रीय विधी विद्यापीठ
(3) बार असोसिएशन
(4) ग्राहक न्यायालये
Question 137: भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात स्त्री आणि पुरुष दोघांना समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद आहे ?
(1) कलम 12
(2) कलम 19 (2)
(3) कलम 36
(4) कलम 39 (d)
Question 138: संरक्षण अधिकाऱ्याला कौटुंबिक हिंसाचाऱ्याच्या घटनेची माहिती कोण देऊ शकते ?
(1) फक्त पोलीस अधिकारी
(2) कोणतीही व्यक्ती
(3) फक्त पीडित
(4) फक्त पीडिताचे नातेवाईक
Question 139: भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने चौदा वर्षाखालील मुलाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास किंवा इतर कोणतेही धोकादायक काम करण्यास मनाई केली आहे ?
(1) कलम 22
(2) कलम 24
(3) कलम 35
(4) कलम 32
Question 140: खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका गरीब आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत न्याय मिळवून देण्यास मदत करते असे नमूद केले आहे ?
(1) मधु लिमये विरुद्ध अधीक्षक (1975)
(2) बिहार लीगल सपोर्ट सोसायटी विरुद्ध सी. जे. ऑफ इंडिया (1986)
(3) मोहित विरुद्ध डी. एम. (1974)
(4) शर्मा विरुद्ध कृष्ण सिन्हा (1960)
Question 141: पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 चे कोणते कलम केंद्र सरकारला हवा, पाणी आणि मातीच्या संदर्भात गुणवत्तेच्या मानकांशी संबंधित नियम बनविण्याचा अधिकार देते ?
(1) कलम 4
(2) कलम 9
(3) कलम 6
(4) कलम 7
Question 142: शाश्वत विकासाचा सिद्धांत, सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्व प्रथम लागू केला ?
(1) नसरुद्दीन झैदी खटला
(2) गुलाबी शहर खटला
(3) ऑरेंज शहर खटला
(4) व्हेल्लोरचे नागरीक खटला
Question 143: बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार बालकाचे वय
(1) सहा ते चौदा वर्षे
(2) अठरा वर्षे
(3) पंधरा वर्षे
(4) एकवीस वर्षे
Question 144: बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार स्थानिक प्राधिकरणांचे खालीलपैकी हे कर्तव्य नाही.
(1) शैक्षणिक दिनदर्शिका ठरवणे.
(2) कार्यक्षेत्रातील शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे.
(3) शाळेच्या इमारतीसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
(4) नियमित अंतराने विद्यार्थांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षा आयोजित करणे.
Question 145: माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या------नुसार, माहितीसाठी विनंती करणाऱ्या अर्जदारास माहितीसाठी विनंती करण्यास कोणतीही कारणे देण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी, आवश्यक असेल त्याखेरीज अन्य कोणताही वैयक्तीक तपशील देण्यास भाग पाडता येणार नाही.
(1) कलम ६ (२)
(2) कलम ६ (३) (i)
(3) कलम ६ (१) (b)
(4) कलम ६ (३) (ii)
Question 146: महाराष्ट्र जमीन महसूल कोड 1966 च्या कलम 29 नुसार जी व्यक्ती कायमस्वरूपी अलीप्त जमीन धारण करते आणि जिच्या हस्तांतरणाच्या अधिकारावर कोणतेही बंधन नसते असे व्यक्ती जातात. हे समजले
(1) भोगवटादार वर्ग I
(2) भोगवटादार वर्ग II
(3) सरकारी भाडेकरू
(4) वहिवाटदार वर्ग III
Question 147: महाराष्ट्र जमीन महसूल कोड 1966 नुसार सर्व खनिजे जी पृष्ठभागावर अथवा भूमिगत अशी कोणत्याही ठिकाणी सापडली असतील त्यावर----- यांचा अधिकार असतो.
(1) राज्य सरकार
(2) केंद्र सरकार
(3) जमिनीचा मालक
(4) जमिनीचा ताबा असणारा
Question 148: एखादी व्यक्ती जी चुकीच्या पद्धतीने जमिनीचा ताबा घेऊन आहे, त्या व्यक्तीस जिल्हाधिकारी द्वारा बेदखल करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल कोड 1966 च्या खालील कलमामध्ये देण्यात आली आहे.
(1) कलम 143
(2) कलम 242
(3) कलम 234
(4) कलम 230
Question 149: महाराष्ट्र जमीन महसूल कोड 1966 च्या कलम 252 नुसार कोणत्या आदेशाविरुद्ध अपील करता येणार नाही
(1) कलम 251 अंतर्गत पुनरावलोकनासाठी अपील किंवा अर्ज स्विकारणे
(2) कोणताही अर्ज दाखल करण्यात झालेला विलंब माफ करण्याच्या आदेशाविरुद्ध
(3) 1 आणि 2 दोन्ही
(4) जागेचा ताबा मिळणेबाबत
Question 150: महाराष्ट्र जमीन महसूल कोड 1966 नुसार, भोगवटादार भाडेकरू किंवा सरकारी भाडेकरू यांच्या ताब्यात असलेल्या जमीनी व्यतिरिक्त गावातील जमीन ही
(1) जंगल जमीन
(2) ताबाविरहीत जमीन
(3) पारडी जमीन
(4) वरीलपैकी कोणतीही नाही

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या