महाराष्ट्र गट-क सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा 2025 - पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी)

0%

प्रश्न 1: पुढीलपैकी कोणता शब्द 'शर' या शब्दाचा समानार्थी नाही ?
(1) सायक
(2) तीर
(3) बाण
(4) थकवा

प्रश्न 2: 'भयभीत' ह्या शब्दाला खालील पर्यायांमधून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
अ. सभ्य
ब. सत्य
क. बोलका
ड. निर्भय
(1) अ व ब बरोबर
(2) ब व क बरोबर
(3) क बरोबर
(4) ड बरोबर

प्रश्न 3: 'बलवत्तर' या शब्दाला खालील पर्यायांमधून समानार्थी शब्द ओळखा.
(1) भारी
(2) चांगला
(3) समर्थ
(4) खरा

प्रश्न 4: 'गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
a. अभिधा
b. लक्षणा
c. व्यंजना
d. वाच्यार्थ
(1) फक्त a व d बरोबर
(2) फक्त b बरोबर
(3) फक्त c बरोबर
(4) फक्त d बरोबर

प्रश्न 5: खाली दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा वापर करा.
'पोट बिघडले असल्यामुळे स्वातीने -------- पसंत केले'.
(1) उपाशी राहणे
(2) थंडा फराळ करणे
(3) तोंड मोकळे सोडणे
(4) तोंडसुख घेणे

प्रश्न 6: पुढील म्हण पूर्ण करा.
"येत्याच्या चार वाटा, जात्याच्या ------ वाटा."
(1) दहा
(2) अकरा
(3) बारा
(4) तेरा

प्रश्न 7: म्हणी व म्हणींचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
म्हणीम्हणींचे अर्थ
अ. अठरा विश्वे दारिद्र्यi. फारच अत्यल्प प्रमाण असणे
ब. इन मीन साडेतीनii. फाजील उत्सुकता दाखविणे
क. उचलली जीभ लावली टाळ्यालाiii. अतिशय गरिबी
ड. घे सुरी अन् घाल उरीiv. मन मानेल तसे बोलणे
(1) अ-i, ब-iii, क-ii, ड-iv
(2) अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
(3) अ-iii, ब-ii, क-i, ड-iv
(4) अ-ii, ब-iii, क-i, ड-iv

प्रश्न 8: कार्यालयात जाण्याच्या गडबडीत असलेल्या वडिलांनी 'आईची सही घे' हे सांगताच अमोल कमी गुण मिळालेले प्रगतीपुस्तक घेऊन पटकन सटकला यालाच म्हणतात. या अर्थाची अचूक म्हण ओळखा.
a. बापसे बेटा सवाई
b. सुंढीवाचून खोकला गेला
c. पडत्या फळाची आज्ञा घेणे
d. उथळ पाण्याला खळखळाट फार
(1) फक्त a बरोबर
(2) फक्त b व d बरोबर
(3) फक्त c बरोबर
(4) फक्त b बरोबर

प्रश्न 9: 'उडत्या पाखराची पिसे मोजणे' या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
(1) पाखराकडे बारकाईने पाहणे
(2) पाखराच्या पंखाचे निरीक्षण करणे
(3) सर्वांना बरोबर घेऊन विकास साध्य करणे
(4) अगदी सहजपणे दूरवरच्या गोष्टीचे परीक्षण करणे

प्रश्न 10: खाली दिलेल्या वाक्यातून योग्य म्हणीचा वापर केलेले वाक्य ओळखा.
(1) अमेयने सर्व पुस्तके कमीत कमी किमतीत देण्याचे आश्वासन दिले आहे, पण लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे.
(2) आईबापाविना पोर म्हणून कुसुमला काकाच्या घरी शहाण्याला शब्दाचा मार.
(3) सुनेची बाजू कितीही बरोबर असली तरी सासऱ्यापुढे तिचे काहीच चालले नाही, म्हणतात ना हपापाचा माल गपापा.
(4) गणू आपल्या व्यवसायात भराभर अधिक पैसे कमविण्यासाठी नेहमीच हलक्या कानाचा होतो.

प्रश्न 11: 'श्रीराम' या शब्दाची खालीलपैकी कोणती वर्णरचना बरोबर आहे ?
(1) श् + र् + ऐ + र् + अ + म् + अ
(2) श् + र् + ए + र् + आ + म् + आ
(3) श् + र् + ई + र् + आ + म् + अ
(4) श् + र् + इ + र् + अ + म् + अ

प्रश्न 12: पररूपसंधीचे उदाहरण -------- हे आहे.
(1) घर + ऊन = घरून
(2) सत् + आचार = सदाचार
(3) महा + ऋषि = महर्षि
(4) अति + आनंद = अत्यानंद

प्रश्न 13: शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखा.
(1) अध्यात्मिक, अनुसया, आशिर्वाद
(2) आध्यात्मिक, अनसूया, आशीर्वाद
(3) आध्यात्मिक, अनसूया, आशिर्वाद
(4) अध्यात्मिक, अनुसया, आशीर्वाद

प्रश्न 14: खालील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा.
a. गड आला; पण सिंह गेला.
b. तू केव्हा अर्ज करणार आहेस?
c. ती म्हणाली, "मी दररोज अभ्यास करते."
d. सुरेश, गावाला गेला!
(1) फक्त a व b बरोबर
(2) फक्त c व d बरोबर
(3) फक्त a, b व c बरोबर
(4) सर्व पर्याय बरोबर

प्रश्न 15: उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य कोणते ?
(1) दोन अक्षरांना जोडणे
(2) दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडणे
(3) वाक्यातील क्रिया किती वेळा घडते हे दाखविणे
(4) वाक्यातील व्याकरणांचा क्रम सांगणे

प्रश्न 16: 'जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
(1) मिश्र
(2) संयुक्त
(3) केवल
(4) संकेतार्थी

प्रश्न 17: खालील वाक्याचे केवल वाक्य तयार करा.
'तो झाडावर चढला, त्याचा पाय घसरला, तो पडला.'
(1) झाडावर चढत असताना पाय घसरून तो पडला
(2) झाडावर चढताना पाय घसरून पडला
(3) तो झाडावर चढत असताना पाय घसरून पडला असता
(4) तो झाडावर चढताना पाय घसरून पडेल

प्रश्न 18: खालील दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
'अपमान केल्यास कुणाला राग येत नाही?'
(1) अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच
(2) अपमान केल्यास राग आलाच पाहिजे
(3) अपमान केल्यास राग मानू नये
(4) अपमान केल्यास प्रत्येकाला राग येऊ नये

प्रश्न 19: समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असते ?
(1) तत्पुरुष समास
(2) अव्ययीभाव समास
(3) द्वंद्व समास
(4) बहुव्रीही समास

प्रश्न 20: वाक्याच्या अनुरोधाने योग्य जोड्या लावा.
'अ' गट'ब' गट
a. विधानार्थीi. क्रियापदावरून विनंती, उपदेश गोष्टींचा बोध होतो
b. आज्ञार्थीii. क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता यांचा बोध होतो
c. विद्यर्थीiii. अमूक केले तर अमूक होईल असा बोध होतो
d. संकेतार्थीiv. वाक्यात केवळ विधान असते
(1) iii, i, iv, ii
(2) iv, iii, ii, i
(3) ii, iv, i, iii
(4) iv, i, ii, iii

प्रश्न क्र. 21 ते 25 : पुढील उतारा वाचून प्रश्नांची योग्य ती उत्तरे लिहा.

उदारमतवाद हे मानवाच्या प्रतिष्ठेला बांधलेले तत्त्वज्ञान आहे. मानवाच्या प्रतिष्ठेबद्दल उदारमतवादाची काही ठाम भूमिका आहे; आणि या भूमिकेपासून हे तत्त्वज्ञान केव्हाही विचलित झालेले नाही: आणि हाच हे तत्त्वज्ञान आणि इतर उजवी व एकान्तिक डावी किंवा हुकूमशाहीवादी, सर्वकषवादी तत्त्वज्ञाने यांच्यातला सर्वांत मोठा फरक आहे. उदारमतवाद सोडल्यास इतर सर्व राजकीय तत्त्वज्ञाने मनुष्याच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न सोडवताना मनुष्याला केवळ सामाजिक प्राणी मानतात आणि त्याच्या सामाजिकत्वाच्या गुणधर्मातून त्याच्या सर्व हालचालींचा हिशेब मांडतात. उदाहरणार्थ, ही सगळी तत्त्वज्ञाने मनुष्याच्या आचार-विचारासाठी एकच ठोकळेबाज नमुना गृहीत धरतात आणि आदर्श नमुन्यांप्रमाणे त्याच्या कक्षेतल्या सर्वांचे राजकीय व इतर वर्तन नियंत्रित करू पाहतात. हिंदू राजकीय विचारातल्या चार वर्णांची सामाजिक विभागणी किंवा कम्युनिस्टांची श्रमजीवी हाच एकमेव आदर्श मानवी नमुना ही उदाहरणे आपण डोळ्यांसमोर आणावी. या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे मनुष्याने कसे जगावे यासंबधी प्रारंभीच काही नियम ठरवल्यावाचून राजकीय सिद्धान्त तयार होऊ शकत नाही. उदारमतवादात अशा प्रकारच्या ठोकळेबाज आदर्शाना थारा नसतो. या संबंधात उदारमतवाद्यांची भूमिका अगदी साधी व सरळ आहे. उदारमतवाद्यांच्या मते आपले जीवन कसे जगले जावे, या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने द्यावे. उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नांवर सर्वांसाठी एकच तोडगा असावा हेच उदारमतवाद्याला कधी पटत नाही. शासनाने उत्तम आयुष्याची स्वतःची ठोकळेबाज कल्पना नागरिकांच्या माथी मारणे हेच उदारमतवाद्याला आक्षेपार्ह वाटते. शासनाने व्यक्तिच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे हेच उदारमतवाद्याला सर्वाधिक आक्षेपार्ह वाटते. ज्याला त्याला स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे जगण्याचा हक्क आहे आणि हा हक्क अत्यंत पवित्र आहे.

प्रश्न 21: उदारमतवाद्यांची भूमिका कशी असावी ?
(1) अगदी साधी व सरळ
(2) आपलेपणाची व बोलकी
(3) अधिकार व हक्क सांगणारी
(4) उपयोगी व ठळक

प्रश्न 22: उदारमतवादात कोणत्या आदर्शांना थारा नसतो ?
(1) ठोकळेबाज आदर्श
(2) सामाजिक आदर्श
(3) राजकीय आदर्श
(4) मानवाचा आदर्श

प्रश्न 23: उत्कृष्ट जीवनाच्या प्रश्नांवर उदारमतवादी कोणती भूमिका मांडतात ?
(1) एकच गोष्टीचा विचार करावा
(2) अनेक गोष्टींचे तोडगे असावेत
(3) शासनाचा हस्तक्षेप असावा
(4) ठोकळेबाज जीवन जगावे

प्रश्न 24: उदारमतवाद्यांची जगण्याच्या हक्काविषयी पुढील भूमिका कोणती ?
(1) खाजगी आयुष्यात डोकावणे
(2) आयुष्य स्वतःच्या मताप्रमाणे जगणे
(3) न्यायाचा निवाडा एकांगी करणे
(4) मारून मुटकून जगायला लावणे

प्रश्न 25: उदारमतवादी लोकांना कोणती गोष्ट अधिक खटकते ?
(1) ठोकळेबाज कल्पना माथी न मारणे
(2) व्यक्तिला प्रतिष्ठा देणे
(3) खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे
(4) सर्वांना न्यायाने वागविणे

प्रश्न 26: 'एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर लक्ष ठेवून असणे' या अर्थाचे वाक्प्रचार कोणते ?
a. डोळा चुकवणे
b. डोळा मारणे
c. डोळे उघडणे
d. डोळा असणे
(1) फक्त a व b बरोबर
(2) फक्त b व c बरोबर
(3) फक्त d बरोबर
(4) सर्व पर्याय बरोबर

प्रश्न 27: खाली दिलेल्या वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या जुळवा.
वाक्प्रचारअर्थ
अ. ओलीसुकी करणेi. गोडगोड बोलणे
ब. उसने पारणे फेडणेii. मनाला झोंबणे
क. इंगळ्या डसणेiii. सूड उगवणे
ड. अमृत शिंपडणेiv. खरे-खोटे करून घेणे
(1) iv, iii, ii, i
(2) iv, iii, i, ii
(3) i, ii, iv, iii
(4) iv, ii, iii, i

प्रश्न 28: अचूक जोड्या लावा.
'अ' गट'ब' गट
a. हात ओला करणेi. सहज घडणारी गोष्ट
b. हातचा मळii. जेमतेम खाण्यास मिळणे
c. हातातोंडाशी गाठ पडणेiii. देखत फसवून जाणे
d. हातावर तुरी देणेiv. पैसा, भोजन मिळणे
(1) iii, i, iv, ii
(2) iv, i, ii, iii
(3) iv, iii, ii, i
(4) ii, iii, iv, i

प्रश्न 29: 'क्षिती न बाळगणे' या वाक्प्रचाराचा अर्थ---
(1) पर्वा न करणे
(2) महत्त्व न देणे
(3) भीती दूर होणे
(4) खात्री न करणे

प्रश्न 30: खालीलपैकी कोणता शब्द समूह पुल्लिंगी आहे ?
(1) रुमाल, ग्रंथ, देह
(2) पागोटे, पुस्तक, शरीर
(3) पगडी, पोथी, काया
(4) वाडा, पणती, घर

प्रश्न 31: 'वीसपट' हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ते ओळखा.
(1) आवृत्तिवाचक
(2) साकल्यवाचक
(3) क्रमवाचक
(4) गणनावाचक

प्रश्न 32: 'गडद निळे - गडद निळे जलद भरूनी आले'. या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास कोणता ?
(1) उपपद तत्पुरुष
(2) अनुप्रास
(3) विशेषण पूर्वपद
(4) अलुक तत्पुरुष

प्रश्न 33: खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते ?
(1) आपण
(2) आम्ही
(3) त्या
(4) कोण

प्रश्न 34: खालीलपैकी कोणता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पोटप्रकार आहे ?
(1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
(2) कारकबोधक उभयान्वयी अव्यय
(3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
(4) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय

प्रश्न 35: क्रियापद म्हणजे काय ?
(1) अर्थ न पूर्ण करणारा शब्द
(2) अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
(3) अर्थपूर्ण शब्द होय
(4) शब्दाला प्रत्यय लागून आलेला शब्द

प्रश्न 36: पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता ?
(1) कागदपत्र
(2) पुढेपुढे
(3) गोडधोड
(4) डावपेच

प्रश्न 37: अचूक विधाने ओळखा.
a. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत.
b. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात.
c. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.
d. प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना उपसर्गघटित शब्द म्हणतात.
(1) फक्त a व c बरोबर
(2) फक्त b व d बरोबर
(3) फक्त c बरोबर
(4) सर्व पर्याय बरोबर

प्रश्न 38: पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत ?
a. कान, चाक, आग
b. घर, गाव, काम
c. सत्कार, समर्थन, उत्सव
d. पोट, रेडा, चिमणी
(1) फक्त a व b बरोबर
(2) फक्त c बरोबर
(3) फक्त d बरोबर
(4) सर्व पर्याय बरोबर

प्रश्न 39: खालील शब्दप्रकार व शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा.
शब्दप्रकारशब्द
अ. तत्सम शब्दi. कमान
ब. तद्भव शब्दii. उतरंड
क. देशी शब्दiii. दूध
ड. फारसी शब्दiv. अरण्य
(1) iv, iii, i, ii
(2) iv, iii, ii, i
(3) iii, iv, i, ii
(4) iii, iv, ii, i

प्रश्न 40: --------- हा फार्सी + फार्सी असा सामासिक शब्द आहे.
(1) डावपेच
(2) कागदपत्र
(3) मेवामिठाई
(4) धनदौलत

प्रश्न 41: खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले.
(1) मूळ उद्देश
(2) कर्म
(3) मूळ विधेय
(4) कर्मविस्तार

प्रश्न 42: योग्य जोड्या लावा.
'अ' गट'ब' गट
a. उद्देश्यi. क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषण बंध
b. विधेयii. शब्दाचे विशेषण अथवा विशेषण बंध
c. उद्देश्यविस्तारकiii. प्रत्यक्ष कर्ता
d. विधेयविस्तारiv. क्रियापद किंवा क्रियासंबंध
(1) iv, i, ii, iii
(2) iv, iii, i, ii
(3) ii, iii, iv, i
(4) iii, iv, ii, i

प्रश्न 43: 'केवढी उंच इमारत ही!' या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्यपरिवर्तन कसे होईल ?
a. ही इमारत खूप उंच आहे.
b. ही इमारत उंचच उंच आहे.
c. शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे.
d. ही तर फार उंच इमारत आहे.
(1) फक्त a बरोबर
(2) फक्त b बरोबर
(3) फक्त c व d बरोबर
(4) फक्त c बरोबर

प्रश्न 44: खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
(1) अपकर्षवाचक
(2) कालवाचक
(3) गतिदर्शक
(4) क्षणवाचक

प्रश्न 45: दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.
'मला गाणे आवडते.'
(1) आज्ञार्थी
(2) विधानार्थी
(3) विध्यर्थी
(4) होकारार्थी

प्रश्न 46: समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट'ब' गट
a. अमृतi. शुक
b. पोपटii. विस्तव
c. अनलiii. हिमांशू
d. चंद्रiv. सुधा
(1) iv, i, ii, iii
(2) iv, iii, ii, i
(3) iii, i, iv, ii
(4) ii, iv, i, iii

प्रश्न 47: पुढीलपैकी कोणते महाप्राण वर्ण आहेत ?
(1) ख्, घ्, छ्
(2) क्, ग्, च्
(3) द्, प्, ब्
(4) त्, ध्, द्

प्रश्न 48: 'कपिलाषष्ठीचा योग' या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते ?
a. विलक्षण योगायोग
b. अपूर्व घटना
c. पुष्कळ काळाने येणारी संधी
d. हतबलता
(1) फक्त a व c बरोबर
(2) फक्त b व d बरोबर
(3) फक्त a, b व c बरोबर
(4) सर्व पर्याय बरोबर

प्रश्न 49: 'मात्रा' या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते ?
a. उपाय
b. औषधाची गोळी
c. मृत्यू
d. माप
(1) फक्त a बरोबर
(2) फक्त c बरोबर
(3) फक्त c व d बरोबर
(4) फक्त a व b बरोबर

प्रश्न 50: 'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
a. बसण्याचा पाट
b. पाण्याचा पाट
c. विवाहाचा प्रकार
d. शरीराची मागील बाजू
(1) फक्त a व b
(2) फक्त c व d
(3) फक्त c
(4) फक्त d

Q51: Choose from the following an option with the correct synonymous word-pairs:
a. 'Dismal: Gloomy' and 'Naive: Artless/simple'.
b. 'Pious: Wise' and 'Rare: Abundant'.
c. 'Mad: Insane' and 'Sly: Silent'.
d. 'Deny: Refuse' and 'Idle: Busy'.
(1) d only
(2) b only
(3) a only
(4) c only

Q52: Choose from the following an option with the correct antonymous word-pairs:
a. 'Humility: Arrogance' and 'Morbid: Healthy'.
b. 'Extrinsic: External' and 'False: Wrong'.
c. 'Mild: Harsh' and 'Liberty: Freedom'.
d. 'Motion: Rest' and 'Master: Owner'.
(1) d only
(2) a only
(3) c only
(4) b only

Q53: Identify the correct sentence/s:
i. These events led up to the establishment of a republic.
ii. These events culminated in the establishment of a republic.
(1) Only i is correct
(2) Only ii is correct
(3) Both i and ii are correct
(4) Both i and ii are incorrect

Q54: Choose the odd word from the following:
(1) National
(2) Original
(3) Focal
(4) Abdominal

Q55: Choose the misspelt word from the following:
i. Tranquillity ii. Symmetry iii. Occassionally iv. Privilege
(1) Occassionally
(2) Tranquillity
(3) Privilege
(4) Symmetry

Q56: a. We do nothing in the wasteland b. The bougainvillaea looks nice c. She left all her money to an orphanage d. All women are simply the loving sisters during the elections — These are examples of --------- sentences.
(1) Complex
(2) Simple
(3) Complex-compound
(4) Compound

Q57: a. I believe that only selfless people can do justice to human beings. b. They declared that henceforth there will be no elections in the oligarchic India. c. The police said that all the roadways are blocked ahead. d. What he said is true? — These are examples of --------- clause.
(1) adverb
(2) noun
(3) adjective
(4) relative

Q58: A noun phrase is a group of words with --------- as its head.
(1) Verb
(2) Preposition
(3) Adverb
(4) Noun

Q59: Umesh said to his father, "I need more money". The underlined clause in this sentence is ---------.
(1) Reporting verb
(2) Direct speech
(3) Direct narration
(4) Reported speech

Q60: To add similar additional information, which of the following linking word(s) is/are not used?
(1) and
(2) furthermore
(3) generally
(4) in addition

Q61: 'We ought to inculcate patriotic feelings in the youth'. The Modal underlined in the sentence above expresses:
a. Moral obligation
b. External compulsion
c. National obligation
d. Mild compulsion
(1) d only
(2) a only
(3) b only
(4) c only

Q62: Identify the categories of the verbs underlined in the following sentences.
a. I feel some pain from the injury.
b. The comforter feels soft.
c. We taste the fine wines.
d. The wine tastes fine.
(1) Action, Linking, Action, Linking
(2) Action, Action, Action, Action
(3) Linking, Linking, Action, Action
(4) Linking, Linking, Action, Linking

Q63: i) The public are tired of demonstrations. ii) The committee have considered your request. The subject nouns obey the principle of:
a. Grammatical concord
b. Notional concord
c. Proximity concord
d. Subject + complement concord
(1) d only
(2) a only
(3) b only
(4) c only

Q64: Choose an option/options containing the verb/s with their correct type/s:
a. Sit-Sat = Weak Verb
b. Feel-Felt = Weak Verb
c. Flee-Fleet = Strong Verb
d. Post-Posted = Weak Verb
(1) d only
(2) both b and d
(3) a only
(4) both b and c

Q65: Choose the correct plural/s of the following compound noun/s:
a. Passer-bys
b. Commander-in-chiefs
c. Brothers-in-law
d. Sons-in-law
(1) both c and d
(2) b only
(3) a only
(4) both a and d

Read the given passage and answer question no. 66 to 70:

Those of you who are old enough to follow the talk, which goes on among your elders, must have heard how much discontent there is all around us. Someone is always to be heard grumbling about the fact that there are not enough houses to live in, not enough food to eat and not enough clothes to wear for all, except a few wealthy people at the top. One also hears a great deal about the 'pugree' racket, about bribery and corruption, about daylight robbery in Railway trains and on the highway, and scandals in various departments of public life. People who have plenty of money, we are told, seem always to be able to get more, and people, we have none get much less than they should. Now there may be some, or even a great deal of, truth in these allegations, and if we look at the whole thing impartially we shall find that this country is afflicted with a great many diseases and disabilities of all kinds. What most people do not realise, however, is that when a country, like a person, falls sick, it has to be carefully doctored, carefully nursed and carefully brought back to health. Everybody belonging to the patient must make every possible effort to bring it round, even though it involves a great deal of weariness, trouble, sleepless nights, and sacrifices of all kinds. But because we are human, and most human beings are inclined to be lazy, we do not want to be robbed of our sleep, of our comfort or pleasures. We must realise, however, that nothing is possible without effort, and that life yields just as much as we are willing to put into it. We have to work hard and not care how tired we feel, or how difficult the task, if we want to belong to a country in which there are enough houses for everyone to live in, food for everyone to eat, clothes for everyone to wear, and everything else that makes for contented and civilised living.

Q66: Choose the correct option/s.

People who have plenty of money--------.

a. seem always to be able to get more.
b. often help the poor directly.
c. are unaffected by the country's problems.
d. get much less than they could.
e. dominate access to scarce resources.

(1) a and b
(2) c and e
(3) a and e
(4) b and d

Q67: Which of the following best captures the central analogy of the passage?
(1) a. Society is like a market that needs regulations.
(2) c. Society is like a sick patient needing careful treatment.
(3) b. Society is like a battlefield requiring strength.
(4) d. Society is like a school needing discipline.

Q68: Match the following.
AB
a. briberyi. things given up for a cause
b. 'pugree' racketii. hard work needed to achieve something
c. discontentiii. illegal practice of demanding money for favours
d. effortiv. dissatisfaction with conditions
e. sacrificev. giving money to get unlawful favour
(1) v, iii, iv, ii, i
(2) v, ii, iii, iv, i
(3) ii, iv, iii, v, i
(4) i, iv, ii, iii, v

Q69: Which of the following statements are true in the context of the given passage?
a. The author believes national problems can be fixed without personal sacrifice.
b. Corruption and inequality are presented as symptoms of the country's condition.
c. Wealthy people are described as getting less than they deserve.
d. Improving the country is compared to nursing a sick patient back to health.
e. The passage suggests effort is unnecessary for social progress.
(1) a and b
(2) b and c
(3) d and e
(4) b and d

Q70: Choose the correct option/s.

According to the writer----.

a. people generally welcome sleepless nights and hardship.
b. laziness helps solve national issues.
c. discontent arises because basic needs are unequally met.
d. recovery requires collective effort and sacrifice.
e. corruption is irrelevant to the country's problems.

(1) a and b
(2) c and d
(3) b and e
(4) a and d

Q71: When 'but' and 'for' connect clauses, they are preceded by ---------.
(1) a single inversion
(2) double inversion
(3) exclamation
(4) a comma

Q72: 'Through and through' means ---------.
(1) entirely
(2) partially
(3) a little bit
(4) total loss

Q73: 'To be hard up' means ---------.
(1) very strict
(2) very angry
(3) to be short of kindness
(4) to be short of money

Q74: 'Come up to' implies ---------.
a. to be very near
b. to approach to
c. to be equal to
d. to try to join hands
(1) a only
(2) b and d only
(3) c only
(4) d only

Q75: Identify the correct sentence that properly refers to the idiom "get a monkey off your back".
(1) She got a monkey off her back after eating too much cake.
(2) The new policy will get a monkey off your back for employee.
(3) He tried to get a monkey off his back going to the gym but it was closed.
(4) Quitting his toxic job was a huge relief, like getting a monkey off his back.

Q76: Read the following words from Column X and Column Y and match them accurately.
Column XColumn Y
I. CorroborateA. Ordeal
II. UbiquitousB. Propagate
III. VicissitudeC. Universal
IV. DisseminateD. Reinforce
(1) I-A, II-B, III-C, IV-D
(2) I-D, II-C, III-A, IV-B
(3) I-B, II-D, III-A, IV-C
(4) I-C, II-A, III-B, IV-D

Q77: Give one word substitute to the statement, "The action of looking back on past time".
a. Recapitulation
b. Retrospection
c. Introspection
d. Memorization
(1) a only
(2) b only
(3) b and c only
(4) d only

Q78: Point out the base in the word 'unfriendliness'--------.
(1) Unfriend
(2) Unfriendly
(3) Friend
(4) Friendly

Q79: Choose the correct phrase for the word, 'call at'.
(1) To call someone
(2) To be called by someone
(3) To visit somebody's house, office
(4) All of the above

Q80: Select the word which is most opposite in meaning to the word 'boisterous'.
(1) Raucous
(2) Quiet
(3) Uproarious
(4) None of the above

Q81: "We will continue to fight for as long as it takes."

In this sentence "fight" most nearly means------.

a. Hide
b. Struggle for a cause
c. Surrender
d. Complete in a game

(1) c
(2) a
(3) b
(4) d

Q82: Choose the proper suffix to make the following sentence meaningful:

"Her child--- enthusiasm was contagious, lifting everyone's mood."

(1) ------like
(2) -----ish
(3) ------minder
(4) ------hood

Q83: Choose the correct option that replaces the phrase 'agree with' in the sentence: "I agree with your terms."
(1) allow
(2) except
(3) approval
(4) accept

Q84: Point out the correct statements.
a. A person who writes plays is a playwright.
b. Asylum is a place where mentally ill and mad persons are kept.
c. A hermit is a person who lives in nature after discarding society for some religious reasons.
d. A place where birds and animals are protected and encouraged to breed is a sanctuary.
(1) All of these
(2) None of these
(3) b and d
(4) a and c

Q85: Choose from the following an option/options with the correct synonymous word-pair/s:
a. 'Sterile: Barren' and 'Vulgar: Coarse'.
b. 'Static: Moving' and 'Weary: Enthusiastic'.
c. 'Zeal: Passion' and 'Wild: Tame'.
d. 'Shy: Bashful' and 'Tame: Moderate'.
(1) d only
(2) a only
(3) both a and b
(4) c only

Q86: 'To show the white feather', implies ---------.
a. to deceive someone
b. to act like a coward
c. to behave like a brave
d. to gossip about someone
(1) a and d only
(2) b only
(3) c only
(4) d only

Q87: "The whole family is in the soup nowadays." Trace the meaning of the underlined idiom.
a. in happiness
b. in difficulty
c. in festival
d. in celebrations
(1) a only
(2) b only
(3) c only
(4) c and d only

Q88: Trace the exact meaning of the idiom, 'To have kangaroos in the top paddock'.
a. to be mad or eccentric
b. to be after someone
c. to take revenge
d. to be furious
(1) a only
(2) b only
(3) c only
(4) c and d only

Q89: Choose the sentence/s where the phrase "give over" is meaningfully used.
a. Give over, Chris! You're hurting me.
b. The flowers will give over beautiful colours in the garden.
c. Give over complaining!
d. She will give over the party tonight.
(1) a and b
(2) b and c
(3) a and c
(4) b and d

Q90: Identify the sentence/s where the phrase "in the heat of the moment" is properly used.
a. In the heat of the moment, she forgot what she wanted to say.
b. The cake was baked in the heat of the moment.
c. The company is launching a new product in the heat of the moment next quarter.
d. He proposed to her in the heat of the moment and she is still smiling about it.
(1) a and c
(2) b and c
(3) a and d
(4) b and d

Q91: Turn the following sentence into indirect speech.

He said to me, "I don't believe you."

(1) He said to me that I don't believe you
(2) He said that he didn't believe you
(3) He said that he didn't believe me
(4) He said that he didn't believe him

Q92: Choose the correct passive sentence of the given sentence.

The guard refused him admittance.

(1) He has been refused with his admittance by the guard
(2) Admittance was refused to him by the guard
(3) He was refused admittance by the guard
(4) Admittance has been refused him by the guard

Q93: Change the following sentence into a 'Yes-No' type question.

"He has a car."

a. Does he have a car?
b. Has he got a car?
c. Has he gets a car?
d. Does he has a car?

(1) a and b
(2) c and d
(3) b and c
(4) a and d

Q94: Identify the condition expressed in the sentence.

"If the police had arrived earlier, the robbery might have been prevented."

(1) Possibility
(2) Ability
(3) Improbability
(4) Impossibility

Q95: Choose the correct option/s.

Change the voice:

"My uncle gave me a pen."

a. I was given a pen by my uncle.
b. A pen was given to me by my uncle.
c. My uncle was given a pen.
d. I am given a pen by my uncle.

(1) a and b
(2) a and d
(3) b and c
(4) b and d

Q96: Choose from the following a sentence/sentences with the correct subject (actual) and verb agreement.
a. The cost of all the necessaries has gone up.
b. The cost of all the necessaries have gone up.
c. The information our journal offers to the exporters is very valuable.
d. The information our journal offers to the exporters are very valuable.
(1) c only
(2) both a and c
(3) d only
(4) b only

Q97: Which of the following sentences are in the imperative mood?
a. Drive slowly.
b. Matheran is a hill station.
c. God be with you.
d. Walk fast.
(1) a and d
(2) b and c
(3) c and d
(4) a and b

Q98: Fill in the blanks. "--------- virtue ----------- the power vested ----- me, I hereby order."
(1) In, by, of
(2) By, of, in
(3) Of, in, by
(4) By, in, of

Q99: Choose the correct alternative to complete the sentence.

"He ----- here for the last five years."

(1) has been working
(2) is working
(3) does work
(4) worked

Q100: Which is/are correct sentence/s to talk about the things that happened repeatedly in the past?
i. We would lend him money when he was unemployed.
ii. We used to lend him money when he was unemployed.
iii. Tim would visit his parents every other weekend.
iv. Tim used to visit his parents every other weekend.
(1) Only ii and iv are correct
(2) Only i and iii are correct
(3) All are incorrect
(4) All are correct

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या