महाराष्ट्र गट-क सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा 2025 - पेपर क्रमांक 2

0%

प्रश्न 1: पूर्व-पश्चिम सरळ रेषेत असणाऱ्या महामार्गावर A आणि B या दोन गावातून चिन्मय व निखिल हे दोघे जण एकमेकांना भेटायला निघाले. चिन्मय A या गावातून सरळ रस्ताने 20 कि.मी. आला, पुढे रस्ता बंद असल्याने त्यास उजवीकडे वळून 20 कि.मी. व पुन्हा डावीकडे वळून 13 कि.मी. यावे लागले. नंतर डावीकडे वळून 20 कि.मी. अंतर कापून चिन्मय महामार्गावर आला व थांबला. निखिल B या गावातून निघाला होता व त्याने महामार्गावर सरळ रेषेत 35 कि.मी. अंतर कापले व थांबला. आता त्यांच्या मधील अंतर किती?
(1) 35 कि.मी.
(2) 42 कि.मी.
(3) 50 कि.मी.
(4) माहिती अधुरी

प्रश्न 2: खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर द्या.

सहा व्यक्ती वर्तुळाकार बसल्या आहेत. A, B च्या समोर आहे. B ही E च्या उजव्या बाजूला आणि C च्या डाव्या बाजूला आहे. C ही D च्या डाव्या बाजूला आहे, F ही A च्या उजव्या बाजूला आहे. आता D ने त्याची जागा F बरोबर आणि E ने B बरोबर बदलली. तर C च्या डाव्या बाजूला कोण बसेल?
(1) E
(2) F
(3) A
(4) B

प्रश्न 3: पुढील पद ओळखा.

(1) T388
(2) T400
(3) T374
(4) T401

प्रश्न 4: खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत?
(1) 16
(2) 20
(3) 26
(4) 30

प्रश्न 5: पावणे पाच वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यातील कोन किती असेल?
(1) 120°
(2) 125°
(3) 130.5°
(4) 127.5°

प्रश्न 6: पुढील विधाने सत्य मानून योग्य निष्कर्ष निवडा.
अ. सर्व पुस्तके वह्या आहेत.

ब. काही वह्या पुस्तके नाहीत.

क. काही कप वह्या आहेत.

ड. एकही कप पुस्तक नाही.
वरील विधाने सत्य मानल्यास, पुढीलपैकी योग्य विधान कोणते?
(1) काही पुस्तके कप असू शकतात
(2) सर्व वह्या कप आहेत
(3) काही वह्या कप व पुस्तक दोन्ही आहेत
(4) काही वह्या कप आहेत

प्रश्न 7: खालील वर्तुळालेखामध्ये एका शहरातील शिक्षित व अशिक्षित पुरुष आणि स्त्रिया यांची टक्केवारी दिली आहे. शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्या संख्येमध्ये किती फरक आहे? (एकूण संख्या = 2,50,000)
(1) 75,000
(2) 15,000
(3) 5,000
(4) 500

प्रश्न 8: एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी ₹80,000 आहे आणि कंत्राटी प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी ₹60,000 आहे. जर दोन्ही गटांच्या पगारांची एकत्रित सरासरी ₹68,000 असेल, तर महाविद्यालयातील कंत्राटी प्राध्यापकांची टक्केवारी किती?
(1) 20%
(2) 40%
(3) 60%
(4) 80%

प्रश्न 9: एका विशिष्ट भाषेमध्ये GRASP → BMVNK असा सांकेतिक शब्द तयार केला जातो. तर खालीलपैकी CRANE हा शब्द कसा सांकेतिक केला जाईल?
(1) FUDQH
(2) HWFSJ
(3) GVERI
(4) XMVIZ

प्रश्न 10: एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 से.मी. ने जास्त आहे आणि रुंदी 3 से.मी. ने कमी आहे, तर आयताची परिमिती काढा.
(1) 17 से.मी.
(2) 26 से.मी.
(3) 30 से.मी.
(4) 34 से.मी.

प्रश्न 11: पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातील पहिली UCI 2.2 श्रेणीतील पुरुषांची रोड रेस म्हणून मान्यताप्राप्त होती. ही बहु-टप्प्यांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती आणि ती जागतिक सायकलिंग नियामक संस्थेकडून मान्य होती.

UCI या संक्षेपाचा योग्य पूर्ण अर्थ कोणता आहे?
(1) Union Cyclist Internationale
(2) Union Cycliste Internationale
(3) Union Cycliste International
(4) Union Cyclist International

प्रश्न 12: दुर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या 'एज्युकेट गर्ल्स (Educate Girls)' या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक कोण आहेत?
(1) इला भट
(2) सफीना हुसैन
(3) अरुंधती राय
(4) बानू मुश्ताक

प्रश्न 13: डॉ. कृष्णस्वामी कस्तूरीरंगन अलिकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
(1) ते 2000 पासून टी.आय.एफ. आर. (TIFR) परिषदेचे सदस्य होते.
(2) त्यांनी 1994 ते 2003 पर्यंत इस्रो (ISRO) चे अध्यक्ष म्हणून कार्य केले.
(3) ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चे प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते.
(4) त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रश्न 14: अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
अ. ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी
ब. आरोग्य क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी
क. शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी वसतिगृहे स्थापन करण्यासाठी
ड. झाडे लावणे व स्थानिक वनस्पतींच्या बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी
(1) फक्त अ
(2) फक्त ब आणि ड
(3) फक्त क
(4) फक्त अ आणि क

प्रश्न 15: फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान, कोणत्या भारतीय विद्यापीठाने 'हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम (Hebrew University of Jerusalem)' सोबत सामंजस्य करार (MoU) केला?
(1) दिल्ली विद्यापीठ
(2) नालंदा विद्यापीठ
(3) बनारस हिंदू विद्यापीठ
(4) मुंबई विद्यापीठ

प्रश्न 16: खालील योग्य जोड्या जुळवा.
पद्मश्री पुरस्कार विजेते कार्यक्षेत्र
i. भिकल्या लाडक्या धिंडा अ. मानवी दुग्ध पेढी (Human Milk Bank) स्थापन करणे
ii. आर्मिडा फर्नांडिस ब. रंगभूमी आणि सिनेसृष्टी
iii. सतीश शहा क. तारपा लोककला
iv. रघुवीर तुकाराम खेडकर ड. व्यसनांविरोधात जनजागृती
(1) i-क, ii-अ, iii-ब, iv-ड
(2) i-ड, ii-क, iii-ब, iv-अ
(3) i-ब, ii-अ, iii-ड, iv-क
(4) i-अ, ii-ब, iii-क, iv-ड

प्रश्न 17: ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400 वा विजय मिळवणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण आहे ?
(1) रॉजर फेडरर
(2) राफेल नदाल
(3) नोव्हाक जोकोविच
(4) कार्लोस अल्काराझ

प्रश्न 18: जोड्या लावा (पद्म पुरस्कार, 2026).
'अ' (व्यक्ती) 'ब' (क्षेत्र)
अ. पी. नारायणन i. सार्वजनिक व्यवहार
ब. व्ही. एस. अच्युतानंदन ii. साहित्य व शिक्षण
क. ममूट्टी iii. वाणिज्य व उद्योग
ड. उदय कोटक iv. कला
(1) अ-iv, ब-ii, क-i, ड-iii
(2) अ-ii, ब-i, क-iv, ड-iii
(3) अ-ii, ब-iii, क-iv, ड-i
(4) अ-iii, ब-ii, क-iv, ड-i

प्रश्न 19: खालीलपैकी कोणी 'मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा' या राष्ट्रीय एकात्मता गीताचे शब्द लिहिले होते?
(1) भीमसेन जोशी
(2) लुईस बँक्स
(3) पियुष पांडे
(4) कैलाश सुरेंद्रनाथ

प्रश्न 20: 2025-2029 या कालावधीसाठी खालीलपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फीअर (Man and the Biosphere - MAB) कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेत (International Coordinating Council - ICC) निवड झाली आहे?
(1) सऊदी अरेबिया
(2) कतार
(3) बहरीन
(4) ओमान

प्रश्न 21:
खाली दिलेल्या स्तंभालेखामध्ये (Bar graph) विविध विभागातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या दर्शविली आहे. जर IT विभागातील 20% कर्मचारी HR विभागात बदली केले तर HR मधील टक्केवारी (%) बदल शोधा.
(1) 60%
(2) 50%
(3) 40%
(4) 30%

प्रश्न 22: जोडस्तंभ आलेखाचा (Multiple Bar Diagram / Grouped Bar Chart) उपयोग कशासाठी केला जातो?
(1) दोन किंवा अधिक गटांची तुलना करण्यासाठी
(2) वर्तुळ काढण्यासाठी
(3) नकाशा काढण्यासाठी
(4) क्षेत्रफळ मोजण्यासाठी

प्रश्न 23:
दिलेल्या जोड स्तंभलेखावरून, जर प्रत्येक संस्थेत 7000 कर्मचारी असतील तर सर्व संस्थेतील एकूण पुरुषांची संख्या किती ?
(1) 21200
(2) 20300
(3) 23400
(4) 24100

प्रश्न 24:
(1) 30
(2) 60
(3) 120
(4) 240

प्रश्न 25: दोन वस्तू प्रत्येकी ₹1,400 ला विकल्या गेल्या. एका व्यवहारात 20% तोटा झाला, तर दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झाला. एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला?
(1) 4% नफा
(2) 1% तोटा
(3) 4% तोटा
(4) 5% नफा

प्रश्न 26: खालील घातांकांचे (निर्देशांकांचे) योग्य उत्तर काय आहे?
(1) 2
(2) 5
(3) 1
(4) 0

प्रश्न 27: गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व विज्ञानाचे सरासरी 78 गुण आहेत. विज्ञान व गणिताचे सरासरी 93 गुण आहेत. तर गणिताचे गुण किती?
(1) 92
(2) 89
(3) 86
(4) 96

प्रश्न 28:
(1) 4
(2) 5
(3) 8
(4) 9

प्रश्न 29: सोडवा
3.6 × 0.04 + 0.0096
0.12
(1) 1.28
(2) 1.36
(3) 1.44
(4) 1.56

प्रश्न 30: रेखा आणि नेहा यांच्या सध्याच्या वयांचे गुणोत्तर 7 : 5 आहे. जर 6 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 3 असेल, तर नेहाचे सध्याचे वय किती ?
(1) 32 वर्षे
(2) 36 वर्षे
(3) 30 वर्षे
(4) 28 वर्षे

प्रश्न 31: मुंबई ते नागपूर हे 850 कि.मी. अंतर आहे. मुंबईहून सकाळी 7:30 वा. सुटलेल्या ताशी 80 कि.मी. वेगाने जाणाऱ्या ट्रेनची त्याच वेळी नागपूरहून सुटलेल्या ताशी 90 कि.मी. वेगाने येणाऱ्या ट्रेनशी किती वाजता भेट होईल ?
(1) सकाळी 10:00 वा.
(2) सकाळी 11:30 वा.
(3) दुपारी 12:30 वा.
(4) दुपारी 1:30 वा.

प्रश्न 32: दोन संख्यांचा महत्तम सामाईक विभाजक (म.सा.वि.) 12 आहे आणि त्यांचा लघुत्तम सामाईक विभाजक (ल.सा.वि.) 1800 आहे. जर एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या शोधा.
(1) 380
(2) 370
(3) 340
(4) 360

प्रश्न 33: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम 18(1) नुसार, दुसऱ्या अपील प्राधिकरणाच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या पात्र व्यक्तीला किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्याला असा आदेश मिळाल्यापासून ------- आत आयोगासमोर अपील दाखल करता येईल.
(1) पंचेचाळीस दिवसांच्या
(2) तीस दिवसांच्या
(3) साठ दिवसांच्या
(4) नव्वद दिवसांच्या

प्रश्न 34: माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 2(ट) नुसार, राज्य माहिती आयोग म्हणजे -------- अंतर्गत स्थापन केलेला राज्य माहिती आयोग होय.
(1) कलम 15 मधील उपकलम (2)
(2) कलम 16 मधील उपकलम (2)
(3) कलम 15 मधील उपकलम (1)
(4) कलम 16 मधील उपकलम (1)

प्रश्न 35: माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 7(1) अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात येत असेल, तर यथास्थिती, केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी, माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस सदर अधिनियमाच्या --------- कलमानुसार,

i) असा विनंती अर्ज फेटाळण्याची कारणे;
ii) ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी; आणि
iii) अपील प्राधिकरणाचा तपशील;

कळवील.
(1) कलम 7(7)
(2) कलम 7(8)
(3) कलम 7(5)
(4) कलम 7(9)

प्रश्न 36: खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
राष्ट्रपती स्वतःच्या निर्णयक्षमतेचा आणि सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करतात, जेव्हा—

अ. मंत्रिमंडळाने लोकसभेचा विश्वास गमावला असूनही राजीनामा देण्यास नकार दिल्यास, मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी.

ब. लोकसभेत बहुमत गमावलेल्या किंवा ज्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आहे अशा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी.
(1) फक्त (अ)
(2) फक्त (ब)
(3) (अ) व (ब) दोन्हीही
(4) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न 37: खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकसभेचे अध्यक्षपद दोन वेळा भूषविले नाही ?
(1) एम. ए. अय्यंगार
(2) जी. एस. धिल्लो
(3) बलराम जाखड
(4) मनोहर जोशी

प्रश्न 38: राज्यपालांना काही प्रकरणांमध्ये माफी देण्याचा, शिक्षा स्थगित करण्याचा, शिक्षा कमी करण्याचा किंवा कमी दर्जाची शिक्षा देण्याचा अधिकार राज्यघटनेच्या --------- नुसार आहे.
(1) अनुच्छेद 157
(2) अनुच्छेद 160
(3) अनुच्छेद 161
(4) अनुच्छेद 158

प्रश्न 39: भारतीय संविधानाचे "संघराज्यीय स्वरूप" कोणत्या वैशिष्ट्यांद्वारे सिद्ध होते ?
(1) संविधानाचे श्रेष्ठत्व
(2) अधिकारांचे विभाजन
(3) स्वतंत्र न्यायपालिका
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 40: खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना 'रिट' जारी करण्याचा अधिकार मिळाला आहे ?
(1) अनुच्छेद 14
(2) अनुच्छेद 32 आणि 226
(3) अनुच्छेद 21
(4) अनुच्छेद 39A

प्रश्न 41: भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार परकीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत ?
अ. कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण
ब. प्राथमिक शिक्षणाचा अधिकार
क. अल्पसंख्याकांची भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण
ड. धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य
(1) फक्त (अ), (ब), (क)
(2) फक्त (अ), (क), (ड)
(3) फक्त (ब), (क), (ड)
(4) फक्त (अ), (ब), (ड)

प्रश्न 42: खालीलपैकी कोणत्या राज्यात आदिवासी कल्याणासाठी मंत्री बाबतचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत करण्यात झाला आहे ?
अ. छत्तीसगड
ब. झारखंड
क. ओडिशा
ड. केरळ
इ. कर्नाटक
(1) फक्त (अ), (ब), (क)
(2) फक्त (अ), (ब), (ड)
(3) फक्त (क), (ड), (इ)
(4) फक्त (अ), (क), (इ)

प्रश्न 43: महानगरपालिका सीमानिश्चितीचा अधिकार ------ ला आहेत.
(1) केंद्र सरकार
(2) स्थानिक स्वराज्य संस्था
(3) राज्य सरकार
(4) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न 44: पंचायत (अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार) अधिनियम, 1996 (PESA Act, 1996) अंतर्गत ग्राम सभेला खालील अधिकार प्रदान करण्यात आले आहेत ----------
अ. गावातील बाजारपेठांचे व्यवस्थापन करणे
ब. खनिज पट्ट्यांवर नियंत्रण ठेवणे
क. विकास योजनांना मंजुरी देणे
ड. प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन करणे
(1) फक्त (अ), (ब), (क)
(2) फक्त (ब), (क), (ड)
(3) फक्त (अ), (क), (ड)
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 45: खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे ?
अ. 42 वी घटना दुरुस्ती
ब. 44 वी घटना दुरुस्ती
क. 84 वी घटना दुरुस्ती
ड. 86 वी घटना दुरुस्ती
(1) फक्त (अ), (ड)
(2) फक्त (ब), (क)
(3) फक्त (अ), (ब), (क)
(4) फक्त (ब), (क), (ड)

प्रश्न 46: 126 व्या घटना दुरुस्ती विधेयकाचा मुख्य उद्देश काय होता ?
अ. अनुसूचित जाती/जमातींना आरक्षणाचा कालावधी वाढवणे
ब. निवडणूक आयोगाला अधिक अधिकार प्रदान करणे
क. आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी नवीन आरक्षण
ड. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
(1) अनुसूचित जाती/जमातींना आरक्षणाचा कालावधी वाढवणे
(2) निवडणूक आयोगाला अधिक अधिकार प्रदान करणे
(3) आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी नवीन आरक्षण
(4) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे

प्रश्न 47: खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थामध्ये, अनुच्छेद 28 नुसार धार्मिक शिक्षण पूर्णपणे प्रतिबंधित आहे ?
अ. राज्याद्वारे मान्यता प्राप्त संस्था
ब. राज्याकडून अनुदान प्राप्त संस्था
क. राज्याकडून पूर्णपणे चालविल्या जाणाऱ्या संस्था
(1) फक्त (अ), (ब)
(2) फक्त (ब), (क)
(3) फक्त (क)
(4) फक्त (अ)

प्रश्न 48: भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते ?
अ. अनुच्छेद 229
ब. अनुच्छेद 239
क. अनुच्छेद 249
ड. अनुच्छेद 259
(1) 229
(2) 239
(3) 249
(4) 259

प्रश्न 49: जोड्या लावा (राज्यांसाठी विशेष तरतुदी बाबत अनुच्छेद).
'अ' (अनुच्छेद)          'ब' (विषय)

अ. अनुच्छेद 371 एफ       i. गोवासाठी विशेष तरतूद
ब. अनुच्छेद 371 जी       ii. सिक्कीमसाठी विशेष तरतूद
क. अनुच्छेद 371 एच       iii. अरुणाचल प्रदेशसाठी विशेष तरतूद
ड. अनुच्छेद 371 आय       iv. मिझोरमसाठी विशेष तरतूद
(1) ii     iv     iii     i
(2) iv     ii     i     iii
(3) iv     i     iii     ii
(4) i     ii     iv     iii

प्रश्न 50: पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क याबाबत योग्य कथन/ने ओळखा.
जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे, ती व्यक्ती भारतीय संविधानाच्या प्रारंभी भारताचे नागरिक असल्याचे मानले जाईल, जर

अ. तिचा अथवा तिच्या मातापित्यांपैकी किंवा तिच्या आजोबा-आजीपैकी कोणाही एकाचा भारत शासन अधिनियम, 1935 यात व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल, तर

ब. अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्याबाबतीत, आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर
(1) फक्त (अ)
(2) फक्त (ब)
(3) (अ) व (ब) दोन्ही
(4) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न 51: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात भाषिक व सांस्कृतिक आधारावर नव्या प्रांताची निर्मिती करावी ही मागणी काँग्रेस पक्ष व तत्कालीन केंद्र सरकार यांनी मान्य केली असली तरी, तिला मूर्त रूप देण्यापूर्वी 27 नोव्हेंबर 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालील कोणत्या बाबींचा विचार करावा असे मत मांडले होते ?
अ. भारताची सुरक्षितता व स्थैर्याला अग्रक्रम
ब. भाषेच्या आधारे प्रांताची निर्मिती करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने इष्ट नाही
क. प्रांतरचना करताना भाषा हा निर्णायक व मुख्य आधार समजता कामा नये
ड. एक किंवा एकाहून अधिक सीमा आयोग नेमावे लागतील
(1) क, अ
(2) ड, ब
(3) क, ब
(4) अ, ड

प्रश्न 52: राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणांबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ. मागासवर्गीय व वंचित घटकांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष सवलती व वसतिगृहे सुरू केली
ब. त्यांनी शिक्षण व्यवस्था फक्त उच्चवर्णीय समाजापुरती मर्यादित ठेवली.
क. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यास त्यांनी विरोध केला होता.
ड. शिक्षणाचा प्रसार हा सामाजिक समतेचा मुख्य मार्ग आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता.
(1) अ आणि ड
(2) ब आणि क
(3) अ, ब आणि ड
(4) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत

प्रश्न 53: खालीलपैकी कोणती विधाने सेनापती बापट यांच्या संबंधी बरोबर आहेत ?
अ. सेनापती बापट यांनी इंजिनियर होण्यासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेतली नाही.
ब. सेनापती बापट यांनी सावरकरांची प्रभावी वाणी व तेजस्वी लेखणी घेऊन नेतृत्व केले.
क. सेनापती बापट हे सावरकरांपेक्षा वयाने लहान होते.
ड. सेनापती बापट भारतात परतले ते दोन पिस्तुले व बॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान घेऊनच.
(1) अ आणि ब बरोबर आहेत
(2) ब आणि क बरोबर आहेत
(3) अ, ब, क बरोबर आहेत
(4) ब आणि ड बरोबर आहेत

प्रश्न 54: शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेल्या "मुकनायक" या पाक्षिकाचे संपादक कोण होते ?
अ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ब. पांडुरंग नंदराम भटकर
क. शिवराम जाणबा कांबळे
ड. किसन फागू बनसोडे
(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(2) पांडुरंग नंदराम भटकर
(3) शिवराम जाणबा कांबळे
(4) किसन फागू बनसोडे

प्रश्न 55: पुणे जवळील देवाची आळंदी येथे 3 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेमध्ये पुढीलपैकी कोणाकोणाचा समावेश होता ?
अ. शंकरराव मोरे
ब. केशवराव जेधे
क. भाऊसाहेब राऊत
ड. तुळशीदास जाधव
(1) वरीलपैकी कोणीही नाही
(2) वरीलपैकी सर्व
(3) फक्त अ, ब आणि ड
(4) फक्त अ आणि ड

प्रश्न 56: 19 व्या शतकात महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होण्यास कारणीभूत ठरलेल्या व ब्रिटिशांची महसुली नीती स्पष्ट करणाऱ्या इ.स. 1880 मधील खोती वतन कायद्याशी खालीलपैकी संबंधित वैशिष्ट्ये कोणती ?
अ. सरकारने ठरविलेला शेतसारा देणे खोतांना बंधनकारक.
ब. शेतकऱ्यांनी सारा भरता यावा यासाठी पीक पद्धतीत बदल केला.
क. शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध केली.
ड. शेतसारा रोख किंवा धान्याच्या रूपात भरण्याची सोय झाली.
इ. शेतीचे अंशतः व्यापारीकरण झाले.
(1) अ, क, इ
(2) अ, क, ड
(3) ब, ड, इ
(4) अ, ब, इ

प्रश्न 57: खालील घटनांचा योग्य क्रम लावा.
अ. महाडच्या पाण्याचा सत्याग्रह
ब. पुणे येथील पर्वती मंदिर सत्याग्रह
क. माणगांव परिषद
ड. बहिष्कृत हितकारिणी सभा
(1) ब, अ, ड, क
(2) क, ड, अ, ब
(3) अ, क, ब, ड
(4) ड, ब, क, अ

प्रश्न 58: महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ. श्रीपाद अमृत डांगे यांचे उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले.
ब. 'गांधी व्हर्सेस लेनिन' या नावाचा इंग्रजी ग्रंथ लिहिला.
क. श्रीपाद अमृत डांगे यांनी कामगारांचे संघटन करून कामगारांच्या चळवळी उभारल्या.
ड. श्रीपाद अमृत डांगे यांनी 'युगांतर' हे वृत्तपत्र सुरू केले.
(1) फक्त अ आणि ब
(2) फक्त अ, ब आणि क
(3) फक्त ब, क आणि ड
(4) फक्त अ, क आणि ड

प्रश्न 59: मुंबई येथे 'स्टुडंट लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी' च्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा सहभाग होता ?
अ. गोपाळ गणेश आगरकर
ब. दादाभाई नौरोजी
क. डॉ. भाऊ दाजी लाड
ड. विश्वनाथ नारायण मंडलीक
(1) फक्त अ आणि ब
(2) फक्त अ, ब आणि क
(3) फक्त ब, क आणि ड
(4) फक्त अ, क आणि ड

प्रश्न 60: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या स्त्रियांना शिक्षण कार्यात सहकार्य केले होते ?
अ. रखमाबाई केळवकर
ब. भागिरथीबाई देसाई
क. काशीबाई राऊत
ड. इंदूमती देवी
(1) फक्त अ आणि ब
(2) फक्त ब आणि क
(3) फक्त अ आणि ड
(4) फक्त ब, क आणि ड

प्रश्न 61: पर्यावरण संवर्धनात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील संघटना व त्यांची मुख्यालये स्थित असलेल्या शहरांच्या जोड्या जुळवा.
संघटना             मुख्यालय

अ. भारतीय प्राणी कल्याण मंडळ       I. देहराडून
ब. भारतीय वनस्पती सर्वेक्षण       II. बल्लभगड/बलरामगड (हरियाणा)
क. वन अनुसंधान संस्था       III. चेन्नई
ड. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण       IV. कलकत्ता
(1) II     I     III     IV
(2) III     II     I     IV
(3) II     IV     I     III
(4) IV     III     II     I

प्रश्न 62: खालीलपैकी अणुउर्जेच्या इतिहासातील पहिला अपघात कोणता ?
(1) चर्नोबिल
(2) चॉक रिव्हर
(3) फुकूशिमा
(4) थ्री माईल आयलॅण्ड
(1) चर्नोबिल
(2) चॉक रिव्हर
(3) फुकूशिमा
(4) थ्री माईल आयलॅण्ड

प्रश्न 63: "वसंतराव नाईक तांडा/बस्ती विकास" ही योजना -------द्वारे राबविली जाते.
(1) आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
(2) अल्पसंख्यांक विभाग आणि औकाफ मंत्रालय, महाराष्ट्र शासन
(3) ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन
(4) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
(1) आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
(2) अल्पसंख्यांक विभाग आणि औकाफ मंत्रालय, महाराष्ट्र शासन
(3) ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन
(4) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन

प्रश्न 64: महाराष्ट्रातील 'वलेण कोंढ' हे मत्स्य अभयारण्य कोणत्या नदीवर आहे ?
(1) आंबी नदी
(2) काल नदी
(3) वैतरणा नदी
(4) मुठा नदी
(1) आंबी नदी
(2) काल नदी
(3) वैतरणा नदी
(4) मुठा नदी

प्रश्न 65: निळा कार्बन परिसंस्थांसाठी आंतरराष्ट्रीय धोरण चौकट --------- यांनी विकसित केली आहे.
(1) आय.पी.बी.ई.एस.
(2) सी.आय.टी.ई.एस.
(3) सी.आय. आणि आय.यू.सी.एन.
(4) डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.
(1) आय.पी.बी.ई.एस.
(2) सी.आय.टी.ई.एस.
(3) सी.आय. आणि आय.यू.सी.एन.
(4) डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.

प्रश्न 66: महाराष्ट्र राज्य वनधोरण - 2008 नुसार खालीलपैकी कोणत्या विभागाकडे मानव संसाधन विकास योजनेच्या (एच.आर.डी. योजना) अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे ?
(1) वन विभाग
(2) सामाजिक वनीकरण विभाग
(3) वन विकास महामंडळ
(4) वरील सर्व
(1) वन विभाग
(2) सामाजिक वनीकरण विभाग
(3) वन विकास महामंडळ
(4) वरील सर्व

प्रश्न 67: खालील जोड्या जुळवा :
विभाग            अभयारण्यांची संख्या

अ. कोकण            i. 10
ब. खान्देश           ii. 04
क. विदर्भ           iii. 02
ड. पश्चिम महाराष्ट्र     iv. 15
(1) iii     iv     i     ii
(2) ii     iii     iv     i
(3) iv     i     ii     iii
(4) i     iv     iii     ii

प्रश्न 68: पश्चिम घाट विकास कार्यक्रमाची खालीलप्रमाणे प्रमुख उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत.
अ. या क्षेत्रातील अनुवांशिक विविधता जतन करणे.
ब. या क्षेत्रातील वंशाचे जतन करणे.
क. या क्षेत्रातील नैसर्गिक वैशिष्ट्ये जतन करण्यासाठी पर्यावरण परिस्थितीचा समतोल राखणे.
ड. या क्षेत्रातील मानवी विकास कार्यक्रमांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग मिळविणे.
(1) फक्त ब आणि क
(2) फक्त अ आणि क
(3) फक्त अ, क आणि ड
(4) अ, ब, क आणि ड

प्रश्न 69: 1971-2000 च्या कालावधीतील पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार भारतातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे ?
(1) 900 मी.मी.
(2) 1000.1 मी.मी.
(3) 1160.1 मी.मी.
(4) 1460.1 मी.मी.
(1) 900 मी.मी.
(2) 1000.1 मी.मी.
(3) 1160.1 मी.मी.
(4) 1460.1 मी.मी.

प्रश्न 70: खालील विधानांचा विचार करा.
अ. महाराष्ट्रातील ताम्हिणी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.
ब. हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वातसन्मुख बाजूला असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो.
क. भारतामध्ये 5,000 मि.मी. पेक्षा जास्त वार्षिक सरासरी पर्जन्य पडणारी 14 ठिकाणे आहेत. त्यापैकी 10 ठिकाणे ही पश्चिम घाटात आढळतात.

वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/त ?
(1) फक्त अ
(2) फक्त ब आणि क
(3) फक्त अ आणि क
(4) अ, ब आणि क

प्रश्न 71: योग्य विधाने निवडा.
अ. मानवी डोळ्यातील पारदर्शक स्फटीकमय भिंग हे दुहेरी अंतर्वक्र भिंग असते.
ब. ते (दुहेरी अंतर्वक्र भिंग) वास्तविक आणि उलटी प्रतिमा तयार करते.
क. मानवी डोळ्यातील पारदर्शक स्फटीकमय भिंग हे दुहेरी बहिर्वक्र भिंग असते.
ड. ते (दुहेरी बहिर्वक्र भिंग) आभासी व सरळ प्रतिमा तयार करते.
(1) अ आणि ड
(2) अ आणि ब
(3) क आणि ब
(4) क आणि ड

प्रश्न 72: खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरणोत्सर्गी क्षय निर्मिती आढळतात ?
(1) α - क्षय ज्यामध्ये हेलियम केंद्रक 4He उत्सर्जित होते
(2) β - क्षय ज्यामध्ये इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन उत्सर्जित होतात
(3) γ - क्षय ज्यामध्ये उच्च ऊर्जा फोटॉन्स उत्सर्जित होतात
(4) यापैकी सर्व
(1) α - क्षय ज्यामध्ये हेलियम केंद्रक 4He उत्सर्जित होते
(2) β - क्षय ज्यामध्ये इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन उत्सर्जित होतात
(3) γ - क्षय ज्यामध्ये उच्च ऊर्जा फोटॉन्स उत्सर्जित होतात
(4) यापैकी सर्व

प्रश्न 73: प्रकाशाच्या तरंगलांबीमध्ये वाढ झाल्यास माध्यमाचा अपवर्तनांक सामान्यतः--------
(1) वाढतो
(2) कमी होतो
(3) स्थिर राहतो
(4) शून्य होतो
(1) वाढतो
(2) कमी होतो
(3) स्थिर राहतो
(4) शून्य होतो

प्रश्न 74: धातू त्याच्या धातुखनिजापासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला ------- म्हणतात.
(1) स्फटीकीकरण
(2) अवसादन
(3) बहुलकीकरण
(4) धातुशास्त्र
(1) स्फटीकीकरण
(2) अवसादन
(3) बहुलकीकरण
(4) धातुशास्त्र

प्रश्न 75: विद्युत विच्छेदन प्रक्रियेमध्ये कोणते वाक्य बरोबर आहे ?
अ. रासायनिक शक्तीचे विद्युत शक्तीत रूपांतर करते.
ब. विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त प्रक्रियेसाठी वापरली जाते.
क. विद्युत शक्ती ही अउत्स्फूर्त प्रक्रियेसाठी वापरली जाते.
ड. विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त व अउत्स्फूर्त प्रक्रियेसाठी वापरली जाते.
(1) फक्त अ आणि ब
(2) फक्त अ आणि क
(3) फक्त क
(4) फक्त अ आणि ड

प्रश्न 76: आधुनिक आवर्त नियमानुसार, मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ही ----ची आवर्ती कार्ये आहेत.
(1) अणूभार
(2) न्यूट्रॉनची संख्या
(3) अणूक्रमांक
(4) अणू वस्तुमान
(1) अणूभार
(2) न्यूट्रॉनची संख्या
(3) अणूक्रमांक
(4) अणू वस्तुमान

प्रश्न 77: कोणत्या आंतरदेहगुही प्राण्याला समुद्री फर (Sea Fur) म्हणून सामान्यपणे ओळखले जाते ?
(1) पेनॅटुला
(2) फिसलिया
(3) हायड्रा
(4) ओबेलिया
(1) पेनॅटुला
(2) फिसलिया
(3) हायड्रा
(4) ओबेलिया

प्रश्न 78: सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासास ---- संबोधतात.
(1) ओरनिथोलॉजी
(2) हर्पेटोलॉजी
(3) ऑस्टियोलॉजी
(4) इक्थिऑलॉजी
(1) ओरनिथोलॉजी
(2) हर्पेटोलॉजी
(3) ऑस्टियोलॉजी
(4) इक्थिऑलॉजी

प्रश्न 79: हायड्राच्या नेमाटोसिस्टमध्ये असलेले विषारी द्रव म्हणजे-----
(1) टॉक्सिन
(2) हिप्नोटॉक्सिन
(3) विष
(4) हेमॅटिन
(1) टॉक्सिन
(2) हिप्नोटॉक्सिन
(3) विष
(4) हेमॅटिन

प्रश्न 80: वनस्पती स्वतःचे सेंद्रिय अन्न तयार करतात त्यास ------ म्हणतात.
(1) हेटेरोट्रॉफीक
(2) ऑटोट्रॉफीक
(3) पैरासायटीक
(4) सॅप्रोफायटीक
(1) हेटेरोट्रॉफीक
(2) ऑटोट्रॉफीक
(3) पैरासायटीक
(4) सॅप्रोफायटीक

प्रश्न 81: ---- हे बोर्डो मिश्रणामध्ये वापरत नाहीत.
(1) कॉपर सल्फेट
(2) चुना/चुनकळी
(3) सोडियम सल्फेट
(4) पाणी
(1) कॉपर सल्फेट
(2) चुना/चुनकळी
(3) सोडियम सल्फेट
(4) पाणी

प्रश्न 82: लिनियस यांचे 'सिस्टीमा नेचुरी (Systema Naturae)' हे पुस्तक कोणत्या वर्षी प्रकाशित झाले ?
(1) 1735
(2) 1737
(3) 1753
(4) 1783
(1) 1735
(2) 1737
(3) 1753
(4) 1783

प्रश्न 83: बलूनमधून घेतलेले पहिले हवाई छायाचित्र 1858 मध्ये--------यांनी घेतले.
(1) जोसेफ नाइसफोर नीप्स
(2) जेम्स क्लार्क मॅक्सवेल
(3) जी. एफ. टरनाचॉन
(4) राल्फ डब्ल्यू. कीफर
(1) जोसेफ नाइसफोर नीप्स
(2) जेम्स क्लार्क मॅक्सवेल
(3) जी. एफ. टरनाचॉन
(4) राल्फ डब्ल्यू. कीफर

प्रश्न 84: खालील विधानांचा विचार करा.
अ. वनस्पती मोठ्या प्रमाणात इन्फ्रारेड प्रकाश परावर्तित करतात.
ब. सदाहरित वनस्पतीपेक्षा लाकडाचे इन्फ्रारेड प्रकाश-परावर्तन खूपच कमी असते.
क. पाणी आणि मृदा हेदेखील प्रात्यक्षिकपणे कोणताही इन्फ्रारेड प्रकाश परावर्तित करत नाहीत.

वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/त ?
(1) फक्त अ आणि क
(2) फक्त ब
(3) फक्त अ आणि ब
(4) वरील सर्व

प्रश्न 85: खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रिझोल्यूशन रिमोट सेन्सिंग सेन्सरद्वारे शोधता येणारी सर्वात लहान वस्तू (Object) निश्चित करतो ?
(1) टेम्पोरल रिझोल्यूशन
(2) स्पेक्ट्रल रिझोल्यूशन
(3) रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन
(4) स्पेशियल रिझोल्यूशन
(1) टेम्पोरल रिझोल्यूशन
(2) स्पेक्ट्रल रिझोल्यूशन
(3) रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन
(4) स्पेशियल रिझोल्यूशन

प्रश्न 86: विद्युत चुंबकीय वर्णपटाच्या दृश्य भागातील हिरव्या पानांद्वारे होणारे सौर किरणांचे परावर्तन तुलनेने कमी का असते ?
(1) पानांतील रंगद्रव्य प्रकीर्णन क्रियेद्वारे सौर ऊर्जेचा मोठा भाग परावर्तित करते
(2) वनस्पतीच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे
(3) क्लोरोफिल रंगद्रव्यामध्ये सौर ऊर्जेचे शोषण होत असल्यामुळे
(4) यापैकी नाही
(1) पानांतील रंगद्रव्य प्रकीर्णन क्रियेद्वारे सौर ऊर्जेचा मोठा भाग परावर्तित करते
(2) वनस्पतीच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे
(3) क्लोरोफिल रंगद्रव्यामध्ये सौर ऊर्जेचे शोषण होत असल्यामुळे
(4) यापैकी नाही

प्रश्न 87: CIA's ट्राएड सिक्युरिटी पॅराडाइम नुसार अक्षर 'I' चा अर्थ --- आहे.
(1) इन्फॉर्मेशन
(2) इंटेग्रिटी
(3) इंटिग्रेशन
(4) इनोवेशन
(1) इन्फॉर्मेशन (Information)
(2) इंटेग्रिटी (Integrity)
(3) इंटिग्रेशन (Integration)
(4) इनोव्हेशन (Innovation)

प्रश्न 88: ------- कायदा डोमेन नेम, मीडिया टॅग्स, मिररिंग, फ्रेमिंग, लिंकिंग इत्यादींशी निगडित आहे.
(1) Semiconductor
(2) Copyright
(3) Patent
(4) Trademark
(1) Semiconductor
(2) Copyright
(3) Patent
(4) Trademark

प्रश्न 89: न्यूमेरिक-डाटा-अॅनॅलिसिस साधन वापरून आपण कम्प्युटराइज्ड लेजर बनवू शकतो. त्या साधनाला --------- म्हणतात.
(1) स्प्रेडशीट सॉफ्टवेअर
(2) वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर
(3) डाटा अॅनॅलिसिस सॉफ्टवेअर
(4) डाटाबेस सॉफ्टवेअर
(1) स्प्रेडशीट सॉफ्टवेअर
(2) वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर
(3) डाटा अॅनॅलिसिस सॉफ्टवेअर
(4) डाटाबेस सॉफ्टवेअर

प्रश्न 90: IoT चा अर्थ आहे.
(1) Internet of Things
(2) Intranet of Things
(3) Internet of Thinks
(4) Intranet of Thinks
(1) Internet of Things
(2) Intranet of Things
(3) Internet of Thinks
(4) Intranet of Thinks

प्रश्न 91: ----- यांनी चेन्नई, कोलकाता, मुंबई, दिल्ली या चार महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प सुरू केला.
(1) श्री. नितीन गडकरी
(2) कै. श्री. अटल बिहारी वाजपेयी
(3) कै. श्री. राजीव गांधी
(4) श्री. नरेंद्र मोदी
(1) श्री. नितीन गडकरी
(2) कै. श्री. अटल बिहारी वाजपेयी
(3) कै. श्री. राजीव गांधी
(4) श्री. नरेंद्र मोदी

प्रश्न 92: संपूर्ण आर्थिक क्रियाकलापाच्या सतत वाढ आणि घट होण्याच्या नियमित प्रक्रियेला ----- असे म्हटले जाते.
(1) व्यापार चक्र
(2) उत्पादन चक्र
(3) अर्थव्यवस्थेचे जीवन चक्र
(4) मौद्रिक चक्र
(1) व्यापार चक्र
(2) उत्पादन चक्र
(3) अर्थव्यवस्थेचे जीवन चक्र
(4) मौद्रिक चक्र

प्रश्न 93: ------ ही रेषा उत्पन्न व उपभोग यामधील मर्यादा निश्चित करते.
(1) समखर्च रेषा
(2) समउत्पन्न रेषा
(3) समउपभोग रेषा
(4) दारिद्र्य रेषा
(1) समखर्च रेषा
(2) समउत्पन्न रेषा
(3) समउपभोग रेषा
(4) दारिद्र्य रेषा

प्रश्न 94: अॅडम स्मिथ यांच्या मते दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो कारण-----
(1) समान खर्च भिन्नता असते
(2) सर्वंकष खर्च भिन्नता असते
(3) तुलनात्मक खर्च भिन्नता असते
(4) वरीलपैकी सर्व
(1) समान खर्च भिन्नता असते
(2) सर्वंकष खर्च भिन्नता असते
(3) तुलनात्मक खर्च भिन्नता असते
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 95: खालीलपैकी कोणते महागाईचे / चलनवाढीचे प्रकार आहेत ?
अ. रांगणारी महागाई
ब. चालणारी महागाई
क. वेगवान महागाई
ड. धावणारी महागाई
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) दोन्ही अ आणि ब
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 96: भारतातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले, त्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ. 1979 साली ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (आय. आर. डी. पी.) अंतर्गत सुरू करण्यात आली.
ब. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (2005) अंतर्गत जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय जिल्हा पातळीवरील रोजगार हमी कार्यक्रमासाठी जबाबदार असेल.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त ?
(1) फक्त 'अ'
(2) 'अ' आणि 'ब' दोन्हीही
(3) 'अ' आणि 'ब' दोन्हीही नाही
(4) फक्त 'ब'

प्रश्न 97: केंद्रीय अंदाजपत्रक 2023-24 मध्ये "MISHTI" (मिष्टी) कार्यक्रमाचा कोणता उद्देश होता?
(1) पाणथळ जमिनीचा पर्याप्त वापर
(2) मँग्रोव्ह (खारफुटी) च्या संवर्धनाला प्रोत्साहन
(3) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
(4) जैविक खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे
(1) पाणथळ जमिनीचा पर्याप्त वापर
(2) मँग्रोव्ह (खारफुटी) च्या संवर्धनाला प्रोत्साहन
(3) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
(4) जैविक खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे

प्रश्न 98: योग्य जोड्या जुळवा.
'अ'
i. प्रत्यक्ष कर
ii. अप्रत्यक्ष कर
iii. शुल्क व दंड
iv. शिलकी अंदाजपत्रक

'ब'
अ. करेतर उत्पन्न
ब. चलनवाढ
क. वस्तू व सेवा कर
ड. व्यक्तिगत उत्पन्न कर
(1) i-ड, ii-क, iii-ब, iv-अ
(2) i-क, ii-ड, iii-अ, iv-ब
(3) i-ड, ii-क, iii-अ, iv-ब
(4) i-अ, ii-ब, iii-क, iv-ड

प्रश्न 99: भारतातील रोजगारी संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान/विधाने कोणते ?
अ. भारतातील असंघटित क्षेत्रात रोजगारी जास्त आहे.
ब. भारतात संरचनात्मक बेरोजगारी आढळते.
क. आर्थिक उदारीकरणामुळे रोजगार वाढला.
ड. भारतातील आर्थिक वृद्धी रोजगार वाढ दर्शवते.
(1) अ आणि ब
(2) ब आणि क
(3) अ आणि ड
(4) वरील सर्व

प्रश्न 100: 'बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक' ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या तीन निर्देशकांवर आधारित आहे ?
(1) आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा
(2) शिक्षण, आरोग्य आणि लिंग गुणोत्तर प्रमाण
(3) शिक्षण, स्वाभिमान आणि सृजनशीलता
(4) आरोग्य, शिक्षण आणि अर्भक मृत्यू दर
(1) आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा
(2) शिक्षण, आरोग्य आणि लिंग गुणोत्तर प्रमाण
(3) शिक्षण, स्वाभिमान आणि सृजनशीलता
(4) आरोग्य, शिक्षण आणि अर्भक मृत्यू दर

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या