भीमा नदी व तिचे खोरे
भीमा नदी हि पूर्व वाहिनी नदी आहे. भीमा नदी हि वास्तविक पाहता कृष्णेची उपनदी आहे परंतु ती महाराष्ट्र बाहेर गेल्यावर कृष्णेला मिळते. महाराष्ट्रात या नद्यांची स्वतंत्र खोरी आहेत. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सह्याद्री पर्वतात होतो. भीमा नाडीची एकूण लांबी ८६७ किमी आहे तर महाराष्ट्रातील लांबी ४५१ किमी आहे. नदीचे एकूण जलवाहन क्षेत्र ७०६१३ चौ. किमी आहे तर महाराष्ट्रातील ४६१८४ चौ.किमी जलवाहन क्षेत्र आहे.
भीमा नदी पुणे,अहमदनगर,सोलापूर,सातारा,बीड,उस्मानाबाद अशी वाहते. भीमा नदी सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटकात प्रवेश करते.कर्नाटक राज्याच्या पूर्व सीमेजवळ रायचूरला कृष्णा नदीस मिळते. तीच्या खोरीचा विस्तार पुणे,अहमदनगर,सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्यात पसरला आहे.
भीमा नदीच्या उत्तरेस हरिश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगा आहेत तर दक्षिणेस शंभू महादेव डोंगररांग आहे.
उपनद्या :
उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या : घोड,सीना
दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या : भामा,इंद्रायणी,नीरा,मुळा-मुठा, माणगंगा
१. इंद्रायणी नदी :
इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्याच्या नैऋत्येस कुरवंटे घाटाजवळ सह्याद्री पर्वतात होतो. तिची एकूण लांबी ९३ किमी आहे. इंद्रायणी नदी तुळापूर येथे भीमा नदीला मिळते. आंध्र नदी इंद्रायणी नदीची प्रमुख उपनदी आहे. इंद्रायणी नदीच्या वरच्या भागात चार तलाव आहेत.
१. भुशी तलाव
२. वळवण तलाव - हे टाटा कंपनीद्वारे वीज निर्मिती साठी बांधण्यात आले.
३. शिरवट तलाव
४. आंध्र तलाव
२. मुळा- मुठा नदी :
मुळा- मुठा नद्यांचा संयुक्त प्रवाह आहे. मुळा नदीचा उगम बोरघाटात होतो.तिची पवना हि मुख्य उपनदी आहे.पुणे शहरात मुठा नदी मुळा नदीला मिळते.मुठा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात नैऋत्य भागातसह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो. तिच्या अंबी व मोशी ह्या उपनद्या आहेत. भारतातील नियोजित शहर लवासा हे मोशी नदीच्या खोऱ्यात आहे. मोशी नदीवर वीर बाजी पासलकर धरण आहे. अंबी नदीवर पानशेत धरण आहे तर मुठा नदीवर खडकवासला धरण आहे.
३. घोड नदी :
घोड नदीचा उगम सह्याद्री पर्वतात पुणे जिल्यातील आहुपे, आंबेगाव येथे होतो. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी भीमा नदीची उपनदी आहे. तिला प्रमुख दोन मीना आणि कुकडी उपनद्या आहेत. मीना नदीवर वडज धरण आहे तर कुकडी नदीवर येडगाव धरण व माणिकडोह धरण असे दोन धरणं आहेत. तसेच घोड नदीवर डिंभे धरणं आहे त्या धरणाची लांबी १४५ किमी आहे.
भीमा नदी खोऱ्यातील उगम स्थळे
नदी उगमस्थळ
भीमा भीमाशंकर (पुणे)
सीना हरिश्चंद्र डोंगर (अहमदनगर)
घोड गावडेवाडी(जुन्नर)
नीरा शिरगाव (भोर)
इंद्रायणी लोणावळा( पुणे)
कुकडी नाणेखडी (जुन्नर)
मुळा वेल्हे(पुणे)
वेळवंडी भोर (पुणे)
नदी शहर
भीमा राजगुरूनगर(खेड)
भीमा पंढरपूर
वेळवंडी भोर
कुकडी ओझर
इंद्रायणी देहू, आळंदी
नीरा नीरा
मुळा-मुठा पुणे
कऱ्हा सासवड, जेजुरी
कऱ्हा मोरगाव
उजनी प्रकल्प :
उजनी प्रकल्पास भीमा प्रकल्प असेही म्हणतात. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आहे. जलाशयाला यशवंत सागर म्हणतात. उजनी प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ १९६४ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. उजनी प्रकल्पाची उंची ५६.४ मीटर तर लांबी २.५ किमी आहे. प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ ३३७ चौ किमी आहे तर पाणी साठवण क्षमता ११७ घनमीटर आहे. धरणापासून जवळच माळढोक पक्षी अभयारण्य आहे.
0 टिप्पण्या