पैनगंगा- वर्धा- वैनगंगा खोरे
पैनगंगा नदी खोरे
पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिह्यात अजिंठा डोंगररांगेत होतो. पैनगंगा नदीची लांबी ६७६ किमी आहे. नदीचा प्रवाह मार्ग बुलढाणा, वाशीम,हिंगोली,नांदेड,यवतमाळ ,चंद्रपूर असा आहे.पैनगंगा नदीचा जलवाहन क्षेत्रफळ २३,९०० चौ.किमी आहे.
उपनद्या: उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या : अरुणावती,अडाण,विदर्भा,खुमी,वाघाडी,पूस.
दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या : कयाधु.
पैनगंगा नदी खोऱ्यातील शहरे:
नदी शहर
१.कयाधु हिंगोली
२.पुस पुसद,महागाव
३.अरुणावती आर्णी
४.पैनगंगा मेहकर
५.वाघाडी घाटंजी
६.खुनी पांढरकवडा
वर्धा नदी खोरे:
वर्धा नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. तिचा उगम मध्य प्रदेशात बेतूल येथे मुलताई पठारावर होतो. तिची एकूण लांबी ४६४ किमी आहे तर महाराष्ट्रातील लांबी ४३२ किमी आहे. वर्धा नदीस ‘विदर्भाची वरदायिनी नदी’ असे म्हणतात. वर्धा नदीचे जलवाहन क्षेत्र ४६१८६ एवढे आहे. वर्धा- पैनगंगा यांचा संगम यवतमाळ जिल्ह्यातील जुगाड येथे होतो.
वर्धा नदीच्या उपनद्या
पश्चिमेकडून मिळणाऱया नद्या: रामगंगा,बेबांला,विदर्भा,निरगुडा.
पूर्वेकडून मिळणाऱ्या नद्या : कार,इरई,बोर,यशोदा,वेणा,पांझरा,नंद,धोम.
चंद्रपूर शहर हे इरई नदीकाठावर आहे.
वैनगंगा नदी खोरे
विदर्भातील दक्षिणवाहिनी नदी आहे. वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील शिवनी येथे महादेव डोंगररांगात होतो. वैनगंगा नदीची एकूण लांबी ५८० चौ.किमी आहे तर महाराष्ट्रातील लांबी २९५ चौ.किमी आहे. वैनगंगा नदीचे एकूण जलवाहन क्षेत्र ६१०९३ चौ. किमी तर महाराष्ट्रातील जलवाहन क्षेत्र ३७,९२८ चौ. किमी आहे.मध्य प्रदेशात उगम पावल्यानंतर वाहत येत पैनगंगा नदी महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागात प्रवेश करते. वर्धा व वैनगंगा नदीचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो.वैनगंगा नदीच्या खोऱ्यात अनेक लहान मोठे तलाव आहेत त्यामुळे गोंदिया जिल्ह्यास तलावाचा जिल्हा म्हणतात.
उपनद्या :
पश्चिमेकडून मिळणाऱ्या नद्या : कन्हान,मूल,सूर,बावनथडी
पूर्वेकडून मिळणाऱ्या नद्या : बाघ,चुलबंद,गाढवी,दीना.
वैनगंगा नदी खोऱ्यातील नदी काठावरील शहर
वैनगंगा नदी - भंडारा
नाग नदी - नागपूर
कन्हाननदी - कामठी
पांगोली नदी - गोंदिया
0 टिप्पण्या