गोदावरी नदी व तिचे खोरे
गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतात होतो.गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे.तिची एकूण लांबी १४६५ किमी. आहे तर महाराष्ट्रातील लांबी ६६८ किमी आहे.गोदावरी नदी सातमाळा,अजिंठा डोंगररांगांच्या दक्षिणेकडून वाहते तर हरिश्चंद्र, बालाघाट डोंगररांगांच्या उत्तरेकडून वाहते. गोदावरी नदीचा प्रवास हा महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड,परभणी नांदेड आणि पुढे गडचिरोली असा एकूण आठ जिल्ह्यातून होतो. सर्वात जास्त लांबीचा प्रवाह महाराष्ट्रतून जातो.गोदावरी नदीस वृद्धगंगा किंवा दक्षिणगंगा म्हणूनही संबोधले जाते. गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून वाहत जात बंगालच्या उपसागराला मिळते. गोदावरी नदीच्या खोऱ्याचा विस्तार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा,आंध्र प्रदेश या राज्यांत पसरलेला आहे.
गोदावरी नदीच्या उपनद्या(डाव्या बाजूने मिळणाऱ्या)
१. कादवा नदी: कादवा नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील वणी डोंगररांगात होतो.तिची लांबी ७४ किमी.आहे. नांदूरमधमेश्वर हे अभयारण्य कादवा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.
२. शिवना नदी: शिवना नदीचा उगम अजिंठा डोंगररांगात होतो.तिची लांबी ११० किमी.आहे.
३. खाम नदी: खाम नदीचा उगम दौलताबाद किल्ल्याजवळ होतो.
४. दक्षिण पूर्णा: दक्षिण पूर्णा नदीचा उगम औरंगाबाद मधील अजिंठा डोंगररांगात होतो.तिची लांबी २७३ किमी. आहे. तिचा प्रवाह मार्ग औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी असा आहे. तिला अंजना, गिरीजा,जीवनरेखा,काथरा, दुधना, घामना, खेळणा अशा उपनद्या आहेत.
५.प्राणहिता नदी: प्राणहिता नदी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातून वाहते तीची एकूण लांबी १२० किमी आहे. वर्धा व पैनगंगा या नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो तिथून या दोन्ही नद्यांना प्राणहिता या नावाने ओळखले जाते.
६. इंद्रावती नदी: इंद्रावती नदीचा उगम ओडिशा राज्यातील रामपूर जिल्ह्यात होतो तिथून ती वाहत महाराष्ट्रात येते.तिची एकूण लांबी ५३५ किमी आहेत तर महाराष्ट्रातील लांबी १२९ किमी आहे.
गोदावरी नदीच्या उपनद्या(उजव्या बाजूने मिळणाऱ्या)
१. दारणा नदी: गोदावरी नदीला तिच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यांपैकी दारणा हि एक नदी आहे त्या नदीचा उगम उगम नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे होतो. तिची लांबी ८८ किमी आहे.
२. प्रवरा नदी: प्रवरा नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे होतो.तिची लांबी २०८ किमी आहे. प्रवरा नदीवर भंडारदरा हे धरण आहे तर त्याची उंची साधारणतः ८२.३ मीटर आहे. मुळा आणि आढळा ह्या दोन प्रवरा नदीच्या उपनद्या आहेत.
३. सिंदफणा नदी: सिंदफणा नदीचा उगम बीड जिल्यातील पाटोदा येथे चिंचोली टेकड्यांमध्ये होतो. तिची लांबी १२२ किमी आहे तर किन्हा, बिंदुसरा, कुंडलिका ह्या उपनद्या आहेत.
४. बिंदुसरा नदी: बिंदुसरा नदीचा उगम बीड येथील बालाघाट डोंगररांगेत होतो.हि नदी पुढे जाऊन सिंदफणा नदीला मिळते.
५. मांजरा नदी: मांजरा नदीचा उगम बीड जिल्यातील पाटोदा येथे बालाघाट डोंगररांगेत होतो. तीचा प्रवाह मार्ग बीड, उस्मानाबाद, लातूर नांदेड अशा आहे तर तिची लांबी ७२४ किमी आहे. लातूर शहर मांजरा नदीच्या काठावर वसलेलं आहे. उत्तरेकडून केज, रेना,लिंबा,चौसाळा,धरणी,लेंडी,मन्याड ह्या उपनद्या मिळतात तर दक्षिणेकडून तावरजा आणि तेरणा ह्या उपनद्या मिळतात. मांजरा नदीवर कर्नाटकमध्ये निजामसागर प्रकल्प आहे.
गोदावरी खोऱ्यातील नदी काठावरील शहरे:
गोदावरी नदी : त्र्यंबकेश्वर, नाशिक,एकलहरे,कोपरगाव,पुणतांबे,प्रवरासंगम,पैठण, आपेगाव,गंगाखेड, नांदेड, धर्माबाद
प्रवरा नदी : नेवासे,संगमनेर,अकोले
खेळणा नदी : भोकरदन
शिंदफना नदी : माजलगाव, शिरूर
बिंदुसरा नदी : बीड
मांजरा नदी : लातूर, कळंब
कादवा नदी : निफाड
दक्षिण पूर्णा नदी : सिल्लोड
गोदावरी खोऱ्यातील संगम स्थळे
नद्या संगम स्थळ
१. गोदावरी- कादवा नांदूर मध्यमेश्वर (नाशिक)
२. गोदावरी-दारणा सायखेडा(नाशिक)
३. गोदावरी-प्रवरा टोके(अहमदनगर)
४. प्रवरा-मुळा पाचेगाव(अहमदनगर)
५. गोदावरी- शिवना धारेगाव(औरंगाबाद)
६. गोदावरी-खाम जोगेश्वरी(औरंगाबाद)
७. गोदावरी-दक्षिण पूर्णा कोठेश्वर(परभणी)
८. दक्षिण पूर्णा- दुधना हट्टागाव(परभणी)
९. गोदावरी- मांजरा कुंडलवाडी(नांदेड)
१०. गोदावरी- सिंदफणा मंजरथ(बीड)
११. गोदावरी-प्राणहिता नगरम-सिरोंचा(गडचिरोली)
१२. गोदावरी-इंद्रावती सोमनूर(गडचिरोली)
गोदावरी खोऱ्यातील धरणे
जिल्हा धरण नदी
नाशिक गंगापूर गोदावरी
नांदूरमध्यमेश्वर गोदावरी
दारणा दारणा
औरंगाबाद जायकवाडी गोदावरी
अंबाडी शिवना
गिरजा गिरजा
शिवना शिवना
अहमदनगर भंडारदरा प्रवरा
मुळा मुळा
नाळवंडे प्रवरा
बीड माजलगाव सिंदफणा
सिंदफणा सिंदफणा
मांजरा मांजरा
वाण वाण
कुंडलिका कुंडलिका
परभणी सिध्देश्वर पूर्णा
कापरा कापरा
नांदेड बाभळी गोदावरी
विष्णुपुरी गोदावरी
हिंगोली येलदरी पूर्णा
गंगापूर धरण
नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे.या धरणाच्या बांधकामाला सुरुवात १९४८ साली झाली आणि धारणाच बांधकाम हे १९५६ ळ पूर्ण झाले.हे जगातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. याची उंची ८७ मीटर आहे तर लांबी ३.९ किमी. आहे.या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण १६७ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ २२.८६ चौ.मीटर आहे. धरणावर ०५. मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प आहे.
जायकवाडी धरण
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जल सिंचन प्रकल्प आहे. जायकवाडी धरणाच्या बांधकामाला सुरुवात १९६५ साली लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आली तर धरणाचं बांधकाम १९७६ साली पूर्ण झाले.त्याचे लोकार्पण इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात.
धरणाची उंची ४२ मीटर तर लांबी १० किमी आहे.धरणाचे क्षेत्रफळ सुमारे ३५० चौ.मीटर आहे तर पाणी साठवणूक क्षमता २८५० दशलक्ष घनमीटर एवढी आहे. धरणाच्या परिसरात जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे.
भंडारदरा धरण
भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते. भंडारदरा धरण अहमदनगर जिल्यात प्रवरा नदीवर बांधले आहे. धरणाची उंची ८२ मीटर तर लांबी ४८७ मीटर आहे.या तलावाला लेक आर्थर हिल किंवा भंडारादरा लेक म्हणूनही ओळखले जाते.धरणाच्या पूर्वेस रंधा धबधबा आहे त्याची साधारणतः उंची ६० मीटर आहे.
0 टिप्पण्या