महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची खोरी
डोंगराच्या दोन रांगांमध्ये जो अरुंद खोलगट भाग असतो, त्याला दरी असे म्हणतात.
बर्फाच्छादित पर्वता तसेच अनेक छोटे- मोठे झरे,तलाव एकत्रित येऊन नदीचा उगम होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निःसारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्याप्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात.
कृष्णा नदी व तिचे खोरे
पठारी महाराष्ट्रात सर्वात दक्षिणेस कृष्णेचे खोरे आहे. कृष्णा नदी सह्याद्रीत महाबळेश्वर येथे उगम पावते पुढे वाहत कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथे बंगालच्या उपसागरात मिळते.
कोयना, वारणा व पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य तीन उपनद्या आहेत. कृष्णा नदीची एकूण लांबी १४०१ किमी. आहे तर महाराष्ट्रातील तिची लांबी २८२ किमी. आहे. कृष्णा नदीचे एकूण जलवाहन क्षेत्रफळ २५९६०० चौरस किलोमीटर आहे तर महाराष्ट्रातील जलवाहन क्षेत्रफळ २८७०० चौरस किलोमीटर आहे.
कृष्ण नदीच्या खोऱ्याची उत्तरेकडील मर्यादा म्हणजे शंभू महादेव डोंगर व दक्षिणेस चिकोटी डोंगर, ज्योतिबा डोंगर यांच्या दरम्यान आहे. तर पश्चिमेस सहयाद्री पर्वत. कृष्णा नदीचा प्रवाह हा उत्तर दक्षिण असून सह्याद्री पर्वतास बऱ्याच अंशी समांतर आहे.
कृष्णा नदीला महाराष्ट्रात मिळणाऱ्या तिच्या उपनद्या साधारणतः सह्याद्री पर्वतात व शंभू महादेव डोंगर यात उगम पावतात. कृष्णानदीला डावीकडून म्हणजेच उत्तरेकडून येरळा नदी मिळते. तर उजवीकडून म्हणजेच दक्षिणेकडून वेण्णा, कोयना, वारणा,पंचगंगा,दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी ह्या नद्या मिळतात.
१. वेण्णा नदी:
वेण्णा नदीची लांबी ६४ किमी आहे. ती महाबळेश्वर येथे उगम पावते. सातारा जिल्ह्यातील माहुली येथे वेण्णा नदी कृष्णा नदीला मिळते. वेण्णा नदीवर लिंगमळा धबधबा आहे त्याची उंची १८० मीटर एवढी आहे.
सातारा शहराच्या वायव्येस वेण्णा नदीवर कण्हेर येथे मातीचे धरण आहे.
२.कोयना नदी:
कोयना नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. तिची लांबी ११९ किमी.आहे तर कोयना नदीवर
महाराष्ट्रातील सर्वात उंच कोयना धरण आहे त्याची उंची १०३ मीटर तर लांबी ८०७ मीटर आहे. हे धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे.धरणाची पाणी साठवण क्षमता २७९७.४ दसलक्ष घनमीटर एव्हडी आहे. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजीसागर म्हणतात. कोयना धरणाचा प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी उपयोग करण्यात येतो. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. लेक टॅपिंगचा वापर सर्वप्रथम वापर भारताने कोयना धरणात केला. धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात कोयना अभयारण्य आहे.
३.वारणा नदी:
वारणा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात प्रचितगड येथे होतो.सांगली जिल्ह्यात हरिपूर येथे जाऊन कृष्णा नदीला मिळते. वारणा नदीवर चांदोली धरण आहे.
४. पंचगंगा नदी :
पंचगंगा नदी म्हणजे पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह यामध्ये कुंभी,कासारी,सरस्वती, तुळशी आणि भोगावती नद्यांचा समावेश होतो.
५. घटप्रभा नदी :
घटप्रभा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात कोल्हापूर जिल्ह्यात होतो.तिची एकूण लांबी २८३ किमी. आहे तर महाराष्ट्रातील तिची लांबी ६० किमी आहे. घटप्रभा नदीवर गोकाक हा प्रसिद्ध धबधबा आहे.
कृष्णा नदीच्या खोऱ्यातील संगम :
नद्या संगम स्थळ
१. वेण्णा-कृष्णा माहुली (सातारा)
२. कोयना - कृष्णा प्रीतिसंगम,कराड (सातारा)
३. वारणा - कृष्णा हरिपूर (सांगली)
४. पंचगंगा - कृष्णा नृसिंहवाडी (कोल्हापूर)
५. येरळा - कृष्णा ब्रह्मनाळ ( सांगली)
६. घटप्रभा - कृष्णा बागलकोट (कर्नाटक)
७. भीमा - कृष्णा रायचूर (कर्नाटक)
कृष्णा खोऱ्यातील नदीकाठावरील शहर
नदी शहर
१. कृष्णा वाई,कराड,सांगली,नृसिंहवाडी
२. पंचगंगा इचलकरंजी,कोल्हापूर
३. भोगावती राधानगरी
४. दूधगंगा- कागल
५. हिरण्यकेशी गडहिंग्लज
६. कोयना पाटण (सातारा)
कृष्णा खोऱ्यातील धरणे
धरण नदी जिल्हा
१. धोमधरण कृष्णा वाई(सातारा)
२.शिवाजीसागर कोयना हेळवाक (सातारा)
३.चांदोली वारणा चांदोली (सांगली)
४. कण्हेर वेण्णा सातारा
५. लक्ष्मीतलाव भोगावती राधानगरी (कोल्हापूर)
६.काळम्मावाडी दूधगंगा कोल्हापूर
७.तुळशी तुळशी कोल्हापूर
८. तिल्लारी तिल्लारी चंदगड (कोल्हापूर)
0 टिप्पण्या