ऑनलाईन सातबारा कसा काढायचा ?

 ऑनलाईन सातबारा कसा काढायचा ?

आता जमिनी संबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाईन पाहता येणार आहेत.

 ७/१२ उतारा, ८ अ उतारा, फेरफार, मालमत्ता पत्रक यासारख्या सेवा आपल्याला ऑनलाईन घरबसल्या पाहता आणि डाउनलोड करता येणार आहेत.


७/१२ उतारा, ८ अ उतारा, फेरफार, मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी कोणतेही शुल्क शासन आकारात नाही. परंतु

ते ऑनलाईन काढण्यासाठी शासन काहीप्रमाणात शुल्क आकारते.


आता आपण ७/१२ कसा पाहायचा ते बघू. 

सर्व प्रथम computer किंवा मोबाईल वर google chrome , Mozilla Firefox  किंवा आपल्याकडे असलेल्या Web browser वर https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ हि अधिकृत वेबसाइट उघडावी.




७/१२ पाहण्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या ७/१२ उतारा डाउनलोड या वर क्लिक करा.

त्या नंतर असा पेज उघडेल. त्यामध्ये आपल्याला विचारलेली माहिती भरायची आहे.

सर्व प्रथम आपल्याला ULPIN  म्हणजेच युनिक लँड पार्सल क्रमांक विचारला आहे. जर आपल्याकडे ते असेल तर त्यावर टिक करावी आणि युनिक लँड पार्सल क्रमांक व मोबाईल नंबर टाकावा.

पण हा क्रमांक नसल्यास आपण खाली दिलेली माहिती भरावी.

प्रथमतः आपण ज्या विभागात येतो तो विभाग निवडावा. एकूण सहा विभाग आहेत.

विभाग : 
  • अमरावती
  • औरंगाबाद
  • कोकण(मुंबई)
  • नागपूर 
  • नाशिक 
  • पुणे

आपला विभाग निवडल्यानंतर आपला जिल्हा निवडावा.

त्यानंतर आपला तालुका निवडावा. नंतर गाव निवडावे.

खाली आपल्याला पर्याय दिले आहेत त्या पर्याय पैकी कोणताही एक पर्याय निवडावा.

O सर्वे क्रमांक      O पहिले नाव        O मधले नाव        O आडनाव         O अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर

समजा आपण सर्वे क्रमांक हा पर्याय निवडला तर त्यामध्ये आपला सर्वे क्रमांक लिहून बाजूला असलेल्या शोध बटनावर क्लिक करावे. त्यानंतर खाली उप सर्वे नंबर सिलेक्ट करावा. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा आणि खाली दिलेल्या ७/१२ उतारा पहा बटनावर क्लिक करावे.

आपल्याला आपला सातबारा पाहता येईल.

अशाच प्रकारे आपण O पहिले नाव,  O मधले नाव,  O आडनाव,  O अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर  या पर्यायांचा वापर करून आपला सातबारा पाहू शकता.

हा सातबारा फक्त पाहण्यासाठी असतो त्याचा अधिकृत रित्या कुठेहि वापर करता येत नाही. त्यासाठी आपल्याला डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा डाउनलोड करावा लागतो.

डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईट  वर   (https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ ) जावे त्यानंतर उजव्या कोपऱ्यात असलेल्या चिन्हावर क्लिक करून लॉगिन/ नोंदणी करा.  (खाली दिलेला फोटो पहा ) 

  अशी स्क्रीन उघडेल. सर्वप्रथम आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करावे लागते. Register for Citizen ह्यावर क्लीक करून आपली माहिती भरावी.
 




प्रथम आपल नाव लिहावं त्यानंतर ई-मेल आय डी टाकावा त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा.
आपल्याला हवा तो पासवर्ड ठेवावा. उदा. Abc@123 
 पासवर्ड आणि Confirm पासवर्ड हा सारखाच असावा. त्यानंतर send OTP वर क्लीक करावे. 

आपल्या मोबाईल वर एक OTP येईल तो इथे टाकावा आणि confirm OTP वर क्लीक करावे.

 आता आपला user तयार झाला. परंतु कोणतेही दस्तऐवज डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपली user profile पूर्ण करावी लागेल.(खाली दिलेला फोटो पहा ) 



इथे जाऊन Profile  वर क्लीक करा. खाली अशी स्क्रीन उघडेल. 

Edit Profile वर क्लिक करून आपली सर्व माहिती भरा. हि सर्व माहिती भरून झाल्यावर Profile update करा.

आता आपण कोणतेही दस्तऐवज डाउनलोड करू शकता.
वर दिलेल्या सेवा या बटनावर क्लीक करून आपल्याला  ७/१२ उतारा, ८ अ उतारा, फेरफार, मालमत्ता पत्रक डाउनलोड करता येईल. 
आता आपण डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२ डाउनलोड करू.

वर सातबारा पाहण्या साठी जशी आपण मूलभूत माहिती भरतो तशी सर्व माहिती भरायची आणि सातबारा उतारा पहा या वर क्लीक करायचं. (विभाग,जिल्हा,तालुका,गाव,सर्वे क्रमांक )



तुमचा ७/१२ बरोबर आहे कि नाही हे तुम्ही येथे पाहू शकता. आणि जर सातबारा बरोबर असेलतर कार्टमध्ये जोडा या बटनावर क्लिक करा. 

७/१२ कार्टमध्ये आल्यानंतर रुपये १५ शुल्क भरायचे आहे.


हे payment आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग  व UPI च्या साहाय्याने करू शकतो. payment पूर्ण झाल्यावर आपल्याला ७/१२ डाउनलोड करायला येईल.



अशाप्रकारे आपण डिजिटल स्वाक्षरी ७/१२ डाउनलोड करू शकतो आणि हा ७/१२ आपण कोणत्याही सरकारी अथवा कायदेशीर कामासाठी वापरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या