भारताचे स्थान व विस्तार

 

      

                    विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भागात विभागणी होते.एक उत्तर गोलार्ध तर दुसरं दक्षिण गोलार्ध, भारताचे स्थान हे उत्तर गोलार्धात येते. त्याच प्रमाणे रेखावृत्ताने सुद्धा पृथ्वीचे दोन भागात विभागणी होते. एक पूर्व गोलार्ध तर दुसरं पश्चिम गोलार्ध, यामध्ये भारत पूर्व गोलार्धात येते. पृथ्वीवर भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडामध्ये भारताचा दक्षिण आशियाई देशामध्ये समावेश होतो.
स्थान :
अक्षांक : ८०४' ते ३७०६' उत्तर .
रेखांश : ६८०७' ते ९७०२५' पूर्व .
विस्तार :
पूर्व-पश्चिम लांबी : सुमारे २९३३ कि.मी.
उत्तर दक्षिण लांबी : सुमारे ३२१४ कि.मी.
विषुववृत्ताच्या उत्तरेस २३०३०' अक्षवृत्तास कर्कवृत्त म्हणतात.
हे कर्कवृत्त भारताच्या मध्यातून आठ राज्यातून जाते . (गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, प.बंगाल,त्रिपुरा, मिझोराम .)
भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार मध्यभागी जास्त आहे.
भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने व्यापलेला आहे.या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात.

क्षेत्रफळ :
एकूण भौगोलिक क्षेत्रफळ : ३२,८७,२६३ चौ. किमी
जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताचे क्षेत्र २.४२ % आहे.क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो.
भारताच्या सीमा :
पूर्व : बंगालचा उपसागर
दक्षिण : हिंदी महासागर
पश्चिम : अरबी समुद्र
वायव्य : पाकिस्तान व अफगाणिस्तान
उत्तर : चीन, नेपाळ आणि भूटान
आग्नेय: इंडोनेशिया
भारताची प्रमाण वेळ
भारताची प्रमाणवेळ ८२.५ ' पूर्व रेखावृत्तावर निश्चित करण्यात आली आहे.
८२.५' हे रेखावृत्त भारताच्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा,आंध्रप्रदेश राज्यातुन गेले आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी राज्ये
राज्य क्षेत्रफळ (चौ.किमी )         
राजस्थान      ३,४२,२३९
मध्य प्रदेश             ३,०८,२५२
महाराष्ट्र                 ३,०७,७१३ 
उत्तर प्रदेश            ,४०,९२८
गुजरात                  १,९६,२४
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटी राज्ये
राज्य  क्षेत्रफळ (चौ.किमी )  
गोवा                        ३,७०२
सिक्कीम                 ७,०९६
त्रिपुरा                      १०,४९
नागालँड                  १६,५७९
मिझोराम                 २१,०८१ 
जलसीमा
भारताला एकूण ७,५१७ किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. यामध्ये नऊ राज्यांना ६,१०० किमी आणि चार केंद्र शासित प्रदेशांना १,४१७ किमी लांबीचा समुद्र किनारा आहे.
 समुद्र किनारा लाभलेली राज्ये व केंद्र शासित प्रदेश
गुजरात,आंध्र प्रदेश,तामिळनाडू,महाराष्ट्र,केरळ,ओडिशा,प. बंगाल,कर्नाटक,गोवा
अंदमान आणि निकोबार,लक्षद्वीप,पाँडिचेरी, दीव दमण 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या