चोल साम्राज्य

चोल साम्राज्याचा इतिहास  (753-973 इ.स.)

चोल साम्राज्याचे महान शासक

1. विजयालय (848-871 इ.स)

संस्थापक शासक

  • पल्लव शासकांचे सामंत होते.
  • तंजावर (तंजौर) जिंकून नवीन राजधानी बनवली.
  • "नरकेशरी" ही पदवी धारण केली.
  • चोलेश्वर मंदिर बांधले.

2. आदित्य पहिला  (871-907 इ.स)

  • पल्लव शासक अपराजिता वर्मनचा पराभव करून स्वतंत्र चोल साम्राज्य स्थापन केले.
  • "कोदंडराम" ही पदवी धारण केली.

3. परांतक पहिला  (907-950 इ.स)

  • पांड्य शासक राजसिंह दुसरा याचा पराभव करून "मदुरैकोंडा" ही पदवी मिळवली. 
  • वेल्लोरच्या युद्धात पांड्य आणि श्रीलंकेच्या सैन्याचा पराभव.
  • चोल साम्राज्याच्या सीमा कन्याकुमारीपर्यंत वाढवल्या
  • चिदंबरम मंदिर बांधले.
  • राष्ट्रकूटांशी तक्कोलमच्या युद्धात पराभव.

4. राजराजा पहिला (985-1014 इ.स.) 

सर्वात शक्तिशाली शासक
  • कंडलूर येथे चेरांचा पराभव "काण्डलूर शालैकलमरूत" पदवी.
  • राजा महेंद्र पंचम याचा पराभव करून श्रीलंकेचा उत्तरी भाग जिंकला .
  • त्यांनी श्रीलंकेची राजधानी अनुराधापुरा येथून पोलोनारुवा येथे हलवली त्याचे नाव जयनाथमंगलम ठेवले .
  • "शिवपादशेखर" ही पदवी धारण.
  • वृहदेश्वर मंदिर (राजराजेश्वर मंदिर) बांधले.
  • जमीन सर्वेक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या.
  • चीनशी व्यापारी संबंध वाढवले.

5. राजेंद्र पहिला (1014-1044 इ.स)

चोल साम्राज्याचा सर्वात मोठा विस्तार

  • श्रीलंकेचा राजा महेंद्र पंचम याला कैद करून संपूर्ण श्रीलंका आपल्या राज्यात विलीन केला.
  • बंगालवर हल्ला करून "गंगाईकोंडा चोल" ही पदवी धारण केली.
  • श्रीविजय साम्राज्य (सुमात्रा, मलय द्वीपकल्प, जावा) जिंकले.
  • चोलागंगम तलाव बांधला.
  • वैदिक शिक्षणाचा विकास.

6. राजाधिराज पहिला (1044-1054 इ.स)

  • चेर, पांड्य आणि श्रीलंकेच्या संयुक्त सैन्याचा पराभव.
  • कल्याणी जिंकून "विजय राजेंद्र" पदवी धारण केली.
  • अश्वमेध यज्ञ केला.
  • कोप्पमच्या युद्धात चालुक्यांशी लढताना मृत्यू. 

7. राजेंद्र दुसरा  (1054-1063 इ.स)

  • कुडल संगमच्या युद्धात चालुक्य सोमेश्वर पहिल्याचा पराभव.
  • कोल्हापुरात जयस्तंभ बांधला ("प्रकेशरी" पदवी).

8. वीर राजेंद्र (1063-1067 इ.स.)

  • "राजकेशरी" ही पदवी धारण.
  • साम्राज्य वाढवण्यासाठी आपल्या मुलीचे लग्न कल्याणीच्या चालुक्य राजवंशाशी लावले.
  • याच काळात कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर याचा चोलांकडून पराभव त्यामुळे त्यानी तुंगभद्रा नदीत आत्महत्या केली.

9. अधिराजेंद्र (1067-1070 इ.स.)

  • विजयालयाने स्थापन केलेल्या चोल साम्राज्याचा अधिराजेंद्र हा शेवटचा शासक.
  • एका जनउत्क्रांतीत त्यांची हत्या.

10. चोल-चालुक्य राजवंश (कुलोत्तुंग पहिला – 1070-1120 इ.स.)

  • कलचुरी आणि कलिंगवर विजय.
  • श्रीलंकेचा राजा विजयबाहूने स्वातंत्र्य घोषित केले.
  • जमीन सर्वेक्षण पुन्हा सुरू केले.
  • व्यापार सुलभ करण्यासाठी सीमाशुल्क आणि जकात शुल्क रद्द ("शुंगमतविर्त" पदवी).

11. विक्रम चोल (1120-1133 इ.स.)

  • चिदंबरम येथील नटराज मंदिराचा जीर्णोद्धार.
  • लोकांकडून जबरदस्तीने कर वसूल केला.
  • मंदिरात स्थापित प्राचीन वैष्णव मूर्ती समुद्रात फेकून दिली ("त्याग समुद्र" पदवी)

12. कुलोत्तुंग दुसरा (1133–1150 इ.स.)

  • गोविंदराजची मूर्ती समुद्रात फेकून दिली.
  • ओट्टाक्कुट्टन, सेक्किलर आणि कंबन यांना संरक्षण दिले.

      राजराजा दुसरा (1150-1173 इ.स.) 

        (एक कमकुवत आणि अक्षम शासक)          

      राजाधिराजा दुसरा (1173-1182 इ.स.)

            (त्यांच्या कारकिर्दीत, पांड्य राजघराण्यात उत्तराधिकारावरून वाद झाला, ज्यामध्ये राजाधिराजा   दुसरा याने वीर पांड्याला पाठिंबा दिला.)

13. कुलोत्तुंग तिसरा (1182-1216 इ.स.) – शेवटचा महान चोल शासक

  • पांड्यांचा पराभव करून चोल सत्ता पुनर्स्थापित केली.
  • परंतु 1205 मध्ये पांड्यांकडून पराभव.

 **चोल साम्राज्याचा पतन (1216-1279 इ.स.)**  

  • राजाधिराज तिसरा (कमकुवत शासक) पांड्यांकडून कैद.
  • राजेंद्र तिसरा (1250-1279) हा शेवटचा चोल शासक. 
  • पांड्यांनी अंतिम विजय मिळवून चोल साम्राज्य संपुष्टात आणले. 

चोल साम्राज्याचे योगदान

✅ भव्य मंदिरे (वृहदेश्वर, चिदंबरम).
✅ नौदल शक्ती आणि व्यापारी विस्तार.
✅ स्थानिक स्वराज्य संस्था.
✅ कला, साहित्य आणि वास्तुकलेत प्रगती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या