कल्याणीचे चालुक्य (पश्चिम चालुक्य)

कल्याणीचे चालुक्य (पश्चिम चालुक्य)

दख्खनचे साम्राज्यशाही शासक

कल्याणीच्या चालुक्यांना पश्चिम चालुक्य म्हणूनही ओळखले जाते. राष्ट्रकूट राजवंशाच्या पतनानंतर त्यांचा उदय झाला आणि त्यांनी दख्खनमध्ये एक नवीन साम्राज्य स्थापन केले. हे घराणे मूळचे कन्नड प्रदेशातील (सध्याचे कर्नाटक) असून त्यांनी वराह हे राज्यचिन्ह स्वीकारले होते.

संस्थापक : तैलप दुसरा (इ.स. 973-997)

  • ✓ तैलप दुसरा हा कल्याणी चालुक्य घराण्याचा पाया रचणारा शासक होता.
  • ✓ त्याने राष्ट्रकूटांच्या कमकुवत शासक कर्क दुसऱ्याला पराभूत करून आपली सत्ता स्थापन केली.
  • मन्यखेत (राष्ट्रकूटांची जुनी राजधानी) येथे आपली राजधानी बनवली.
  • "अश्वमाल" ही पदवी धारण केली.
  • ✓ दरबारात "मेरुतुंग" नावाचा एक कवी होता.

कल्याणी चालुक्यांचे महान शासक

1. सत्यश्रय (इ.स. 997-1006 इ.स.)

  • त्याने कोकणच्या शिलाहार घराण्याचा अपराजित आणि गुर्जर राजा चामुंडराज यांना पराभूत केले.
  • वेंगीवर स्वारी करून तेथील शासकाला आपले अधिपत्य मान्य करावे लागले.

2. विक्रमादित्य पाचवा (इ.स. 1006-1015)

  • कैथोम शिलालेखात त्याचा "गौरवशाली आणि उदार शासक" म्हणून गौरव केला आहे.

3. जयसिंग दुसरा (इ.स. 1015-1043)

  • परमार राजा भोज यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि लाट आणि कोकण जिंकले , परंतु नंतर जयसिंगाने परत ही प्रदेशे जिंकली.

4. सोमेश्वर पहिला (1043-1068 इ.स.)

  • राजधानी मन्यखेतहून कल्याणी येथे हलवली.
  • मगध, कलिंग  आणि अंगच्या राज्यकर्त्यांचा पराभव केला.
  • परमार राजा भोज यालाही युद्धात शरणागती पत्करावी लागली.
  • सोमेश्वर पहिलाने करुवतीजवळील तुंगभद्रा नदीत बुडून आत्महत्या केली.

विक्रमादित्य सहावा (इ.स. 1076-1126) - सर्वात महान शासक

  • चालुक्य-चोल संघर्ष शांत करून शांततेचे वातावरण निर्माण केले.
  • "विक्रम संवत" सुरू केला.
  • "विक्रमपूर" शहर वसवले आणि विष्णूचे भव्य मंदिर बांधले.
  • त्याच्या दरबारात विज्ञानेश्वर (मिताक्षरा ग्रंथकार) होते.

ऱ्हासकाळ आणि अंतिम शासक

  • सोमेश्वर चौथा (इ.स. 1184-1200) - शेवटचा चालुक्य शासक
  • त्याने कलचुरींचा नाश करून "कलचूर्यकुल निर्मूलता" ही पदवी धारण केली.
  • राज्यातील बंडखोरी आणि शेजाऱ्यांच्या दबावामुळे कल्याणी चालुक्य साम्राज्य संपुष्टात आले.

वारसा

कल्याणीच्या चालुक्यांनी कला, साहित्य, स्थापत्य आणि राजकीय संघटनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या काळातील मंदिरे, शिलालेख आणि सांस्कृतिक वैभव आजही इतिहासप्रेमींना आकर्षित करते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या