📜 दिल्ली सल्तनत - सय्यद वंश (1414 - 1451 इ.स.)
सय्यद वंश हा दिल्ली सल्तनतवर राज्य करणारा चौथा वंश होता.
त्यांनी 1414 ते 1451 या कालावधीत दिल्लीवर सत्ता गाजवली.
हा वंश तुघलक वंशाचा उत्तराधिकारी असून तुर्की मुस्लिम घराण्यातील शेवटचा वंश मानला जातो.
👑 सय्यद घराण्याचे शासक
- सय्यद ख़िज़्र खान (1414-1421)
- मुबारक शाह (1421-1434)
- मुहम्मद शाह (1434-1445)
- आलम शाह (1445-1476)
⚔️ सय्यद ख़िज़्र खान (1414 - 1421)
स्थापक शासक : 1414 मध्ये दिल्लीचे सिंहासन काबीज करून सय्यद वंशाची स्थापना.
- त्याने सुलतान ही पदवी न धारण करता, "रयत-ए-आला" या पदवीवर समाधान मानले.
- तैमूर लंगच्या परतीनंतर त्याला मुलतान, लाहोर आणि दिपालपूरचा शासक म्हणून नियुक्त केले.
- त्याच्या काळात पंजाब, मुलतान आणि सिंध पुन्हा दिल्लीच्या ताब्यात आले.
- महसूल गोळा करण्यासाठी वारंवार लष्करी मोहिमा राबवाव्या लागत.
- त्याने नाण्यांवर तुघलक सुलतानांची नावे कोरली.
- फ़रिश्ता याने त्याचे वर्णन न्यायी व उदार शासक म्हणून केले आहे.
मृत्यू: 20 मे 1421 रोजी निधन. त्याच्या मृत्यूनंतर प्रजाजनांनी शोक व्यक्त करून काळी वस्त्रे धारण केली.
🏹 मुबारक शाह (1421 - 1434)
- ख़िज़्र खानच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मुबारक शाह गादीवर आला.
- त्याने स्वतःला सुलतान घोषित केले.
- 1434 मध्ये यमुना नदीकाठावर "मुबारकाबाद" शहराची स्थापना केली.
- 'शाह' ही पदवी घेतली व स्वतःच्या नावाने नाणी जारी केली.
- त्याच्या नावाने खुत्बा (स्तुतीपर रचना) वाचण्यात आली.
- दिल्ली सल्तनतमध्ये प्रथमच दोन महत्त्वाच्या हिंदू श्रेष्ठींचा उल्लेख आढळतो.
- विद्वान याहिया बिन अहमद सरहिंदी याला आश्रय दिला. त्याने लिहिलेले तारीख-ए-मुबारकशाही हे ग्रंथ मुबारक शाहच्या काळाची मौल्यवान माहिती देते.
- मृत्यू : त्याचा वजीर सरवर-उल-मुल्क याने षड्यंत्र रचून 19 फेब्रुवारी 1434 रोजी हत्या केली.
👑 मुहम्मद शाह (1434 - 1445)
- मुबारक शाहच्या मृत्यूनंतर त्याचा दत्तक मुलगा मुहम्मद शाह (बिन खरिद खान) गादीवर बसला.
- प्रारंभी तो वजीर सरवर-उल-मुल्कच्या छायेखाली नाममात्र शासक होता.
- वजीराच्या कटकारस्थानांची माहिती मिळताच त्याने त्याला व त्याच्या समर्थकांना मृत्युदंड दिला.
- नवीन वजीर म्हणून कमालमुल्क याची नियुक्ती केली.
- 1440 मध्ये महमूद खिलजीने हल्ला केला, पण नंतर शांतता झाली.
- बहलोल लोदीला त्याने "खान-ए-जहाँ" पदवी देऊन दत्तक मुलासारखा स्वीकारला.
- मृत्यू : बहलोल लोदीच्या दिल्लीवरील हल्ल्यानंतर (1443-1445) तो मृत्यू पावला. काही विद्वान 1445 हे वर्ष योग्य मानतात.
🛡️आलम शाह (1445 - 1476)
- आलम शाह (अलाउद्दीन शाह) हा मुहम्मद शाहचा मुलगा होता.
- 1445 मध्ये गादीवर बसला पण तो खूपच कमकुवत आणि अक्षम शासक होता.
- त्याच्या ताब्यात फक्त दिल्ली शहर व आसपासची गावे शिल्लक राहिली होती.
- 1451 मध्ये त्याने दिल्लीचे सिंहासन बहलोल लोदीला सोपवले.
- त्यानंतर तो बदायूं येथे स्थायिक झाला.
- मृत्यू : 1476 मध्ये निधन.
0 टिप्पण्या