🌟 मुघल साम्राज्य – हुमायून (1530 - 1556) 🌟
🟢 सिंहासनावर आगमन
बाबरच्या मृत्यूनंतर 1530 मध्ये त्याचा मोठा मुलगा हुमायून गादीवर बसला. तेव्हा त्याचे वय फक्त 30 वर्षे होते. त्याला नासिर-उद्दीन मुहम्मद हुमायून या नावानेही ओळखले जायचे. बाबरच्या तुलनेत हुमायूनच्या स्वभावात अस्थिरता व निर्णयक्षमतेचा अभाव होता.
🔴 मोठ्या चुका
- भावांमध्ये साम्राज्याचे विभाजन केले.
- कालिंजर किल्ला जिंकूनही परत केला.
- चुनार किल्ला मिळवून पुन्हा शेरशाह सूरीकडे दिला.
- गुजरात जिंकूनही ताबा टिकवू शकला नाही.
⚔️ महत्त्वाची युद्धे
- कालिंजरवर हल्ला (1531) - 1531 मध्ये हुमायूनने कालिंजरवर पहिला हल्ला केला, जिथे शासक रुद्रदेव होता. हुमायूनने त्याचा पराभव केला आणि किल्ला ताब्यात घेतला, परंतु ताबा न घेता त्याने किल्ल्यावरून आपले सैन्य मागे घेतले आणि रुद्रदेवाशी तह केला.
- दोहरिया युद्ध (1532) – बाबरच्या काळापासून अफगाण हे मुघल सल्तनतचे सर्वात मोठे शत्रू होते. म्हणून हुमायूनने 1532 मध्ये शेरखानवर हल्ला केला. ही लढाई दोहरिया नावाच्या ठिकाणी झाली. या युद्धात महमूद लोदीने अफगाण बाजूचे नेतृत्व केले आणि अफगाणांना पराभव पत्करावा लागला.
- मंदसौर युद्ध (1535) – चित्तोडची राणी कर्णावती यांनी हुमायूनला राखी पाठवून बहादूर शाहपासून संरक्षण मागितले. बहादूर शाहने माळवा, रायसिन आणि चित्तोड जिंकून आपली सत्ता वाढवली होती. त्याची वाढती ताकद पाहून हुमायूनने 1535 मध्ये मंदसौर येथे त्याच्यावर विजय मिळवला. मात्र हा विजय अल्पकाळ टिकला आणि पोर्तुगीजांच्या मदतीने बहादूर शाहने पुन्हा गुजरात व माळवा ताब्यात घेतले.
- चुनारगडवर दुसऱ्यांदा हल्ला - शेरखानची वाढती ताकद रोखण्यासाठी हुमायूनने 1538 मध्ये चुनारगडवर दुसऱ्यांदा हल्ला केला. सहा महिन्यांच्या वेढ्यानंतरही त्याला यश मिळाले नाही. मात्र बहादूर शाहच्या सैन्यातील तोफखाना प्रमुख रूमी खानच्या मदतीने अखेर हुमायूनला किल्ला ताब्यात घेता आला.
- चौसा युद्ध (1539) – 1538 मध्ये हुमायूनने बंगाल जिंकून मुघल सत्ता प्रस्थापित केली, पण परतताना 26 जून 1539 रोजी कर्मनाशा नदीकाठी चौसा येथे शेरखानशी त्याची लढाई झाली. या युद्धात हुमायूनचा मोठा पराभव झाला. या विजयाने शेरखानने "शेरशाह" ही पदवी घेतली, स्वतःच्या नावाने नाणी जारी केली आणि खुतबा वाचून घेतला.
- कन्नौज युद्ध (1540) – 17 मे 1540 रोजी कन्नौजच्या युद्धात हुमायूनचा पुन्हा पराभव झाला आणि शेरखानच्या विजयामुळे दिल्लीतील अफगाणांचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले.
- सरहिंद युद्ध (1555) – 1544 मध्ये हुमायूनने इराणचा शाह तहमस्पकडे आश्रय घेतला आणि लष्करी तयारी करून आपले साम्राज्य पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने भाऊ कामरानकडून काबूल व कंदहार ताब्यात घेतले. अखेर 15 वर्षांच्या वनवासानंतर, बैराम खानच्या मदतीने त्याने 15 मे 1555 रोजी माछिवाडा आणि 22 जून 1555 रोजी सरहिंदच्या युद्धात शेरखान (शेरशाह सूरी) चा वंशज सिकंदर शाह सूरीचा पराभव केला आणि दिल्ली पुन्हा हस्तगत करून मुघल साम्राज्याचे पुनरुज्जीवन केले.
🌍 निर्वासित जीवन
1540 नंतर हुमायूनने आग्रा, लाहोर,सिंध व पर्शियात आश्रय घेतला. पर्शियाचा शाह तहमस्प याने मदत केली. याच काळात 29 ऑगस्ट 1541 रोजी हमीदा बानो बेगम सोबत विवाह झाला. हिच्यापासून पुढे अकबर याचा जन्म झाला.जो नंतर मुघल साम्राज्याचा सर्वात महान शासक बनला.
🏛️ कार्य व योगदान
- 1535 मध्ये यमुना नदीकाठी ‘दीनपनाह’ शहर वसवले.
- धर्मश्रद्धाळू, विद्वान व सौंदर्यप्रेमी शासक.
- भावंडांच्या मतभेदामुळे व अस्थिरतेमुळे सत्ता दुर्बल.
⚰️ मृत्यू
1555 मध्ये दिल्ली पुन्हा जिंकल्यानंतर, 27 जानेवारी 1556 रोजी दीनपनाह किल्ल्यातील शेर मंडल ग्रंथालयाच्या पायऱ्यांवरून पडून त्याचा मृत्यू झाला. त्याचे समाधीस्थळ आज दिल्लीतील प्रसिद्ध हुमायूनचे थडगे आहे.
📝 इतिहासकारांचे मत
लेनपूल म्हणतात :
"हुमायूनला पडून या जीवनातून मुक्तता मिळाली, जसे तो आयुष्यभर पडून जीवनातून चालत होता."
0 टिप्पण्या