भारतातील प्रमुख नगदी पिके
नगदी पिके म्हणजे जी पिके थेट बाजारात विक्रीसाठी आणि व्यावसायिक उद्देशाने घेतली जातात. ही पिके शेतकऱ्यांना थेट उत्पन्न देतात, म्हणून त्यांना व्यावसायिक पिके असेही म्हणतात. भारतातील प्रमुख नगदी पिकांमध्ये ऊस, रबर, कापूस, ताग, चहा, कॉफी आणि तंबाखू यांचा समावेश होतो.
1) ऊस
- ऊस हे Poaceae (ग्रॅमीनी) कुटुंबातील उष्णकटिबंधीय C4 पीक आहे.
- हे भारतातील सर्वाधिक सिंचनाखाली येणारे पीक आहे.
- पिक पूर्ण होण्यासाठी सुमारे 12 महिने लागतात.
- ऊस व साखर उत्पादनात भारत ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- साखरेच्या वापरात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
- प्रति हेक्टर उत्पादनात हवाई (USA) पहिला व क्युबा दुसरा.
- उत्तर प्रदेश – भारताच्या सुमारे 45% साखर उत्पादनाचा वाटा.
- भारतामध्ये सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत.
- दक्षिण भारतातील हवामानामुळे ऊसामध्ये रसाचे प्रमाण अधिक असते.
- Indian Institute of Sugar Technology – कानपूर.
- Indian Institute of Sugarcane Research – लखनऊ.
- भारत सरकार दरवर्षी उसासाठी "वाजवी आणि फायदेशीर किंमत" (FRP – Fair and Remunerative Price) ठरवते. साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही किंमत द्यावी लागते.
- साखर उद्योग हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा कृषी-आधारित उद्योग आहे.
2) रबर
- रबर हे उष्णकटिबंधीय पीक असून रबर हा मूळचा अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील (ब्राझील) वनस्पती आहे.
- पॅरा रबर हा सर्वोत्तम प्रकार मानला जातो.
- झाडाच्या पानांच्या दुधापासून (लेटेक्स) रबर मिळते.
- जगात ब्राझील सर्वात मोठा उत्पादक देश.
- प्रति हेक्टर उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर.
- भारतामध्ये केरळ हे प्रमुख उत्पादक राज्य.
- रबर वृक्ष उत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती आहेत : उच्च तापमान आणि सूर्यप्रकाश, 200 सेमी पेक्षा जास्त पाऊस, लॅटराइट माती.
3) कापूस
- कापूस हे मालवेसी (Malvaceae) कुटुंबातील पीक आहे.
- लागवडीखालील क्षेत्रात भारत जगात पहिला.
- उत्पादनात भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर.
- काळी माती (रेगुर) कापूस लागवडीस सर्वाधिक योग्य.
- गुजरात – भारतातील 34% कापूस उत्पादन.
- भारतीय कापसाच्या धाग्याची लांबी: 2.5–5 सेमी.
- वस्त्रोद्योग हा देशातील सर्वात मोठा संघटित उद्योग.
4) चहा
- 1834 मध्ये ब्रिटिशांनी आसाम खोऱ्यात लागवड सुरू केली.
- मूळ पीक – चीन.
- चहा लागवडीसाठी अनुकूल परिस्थिती : 150–250 सेमी पाऊस, जमीन डोंगराळ आणि उताराची असावी जेणेकरून पावसाचे पाणी मुळांमध्ये साचणार नाही, गंधकयुक्त माती आवश्यक.
- आसाम – भारताच्या सुमारे 50% चहा उत्पादन.
- आसाममधील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये चहाची लागवड केली जाते.
- जगातील आघाडीचे उत्पादक: चीन, भारत, केनिया.
- प्रमुख निर्यातदार: केनिया, चीन, श्रीलंका.
5) कॉफी
- मूळ – अमेझॉन खोरे (ब्राझील).
- 17व्या शतकात बाबा बुदन टेकडी (कर्नाटक) येथे लागवड.
- दक्षिण भारतातील पर्वतीय उतारांवर लागवड.
- कर्नाटक – सुमारे 68% उत्पादन.
- कॉफी उत्पादक देशांमध्ये आघाडीचे तीन देश आहेत: ब्राझील , व्हिएतनाम , इंडोनेशिया
- भारतात फक्त अरेबिका (Arabica )(68%) आणि रोबस्टा (Robusta) यांची लागवड केली जाते.
6) तंबाखू
- तंबाखूचा उगम अमेझॉन नदीच्या खोऱ्यात (ब्राझील) झाला.
- तंबाखूचे मुख्य दोन प्रकार निकोटियाना टॅबॅकम (Nicotiana tabacum) आणि निकोटियाना रस्टिका (Nicotiana rustica) आहेत. भारतात निकोटियाना टॅबॅकम मोठ्या प्रमाणात पिकवली जाते.
- 17 व्या शतकात जहांगीरच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांनी ते पहिल्यांदा भारतात आणले.
- भारतातील दोन सर्वाधिक तंबाखू उत्पादक राज्ये – आंध्र प्रदेश, गुजरात.
- जगातील सर्वात मोठे उत्पादक व ग्राहक – चीन.
7) ताग (Jute)
- ताग हे तंतुमय पीक आहे.
- भारतामधील 70% ताग उत्पादन पश्चिम बंगाल मध्ये.
- गंगा–ब्रह्मपुत्र खोरे – ज्यूट उत्पादनाचे केंद्र.
- जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश – बांगलादेश.
✅ MPSC / UPSC साठी उपयुक्त • व्यावसायिक आणि परीक्षाभिमुख नोट्स

0 टिप्पण्या