भारतामध्ये मान्सूनची माघार ही हवामानातील अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सूर्याच्या स्थितीनुसार, ITCZ च्या हालचालीनुसार आणि वाऱ्यांच्या बदलत्या दिशेनुसार घडते.
21 जून — सूर्याची किरणे कर्क रेषेवर लंबवत पडतात.
22 जून — सूर्य दक्षिण दिशेने सरकू लागतो.
23 सप्टेंबर — सूर्य पुन्हा विषुववृत्तावर येतो.
22 डिसेंबर — सूर्य मकर रेषेवर लंबवत पडतो.
कालावधी: 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर
सुरुवात: सर्वात आधी राजस्थान येथे.
सप्टेंबरमध्ये हवा कोरडी होत जाते, तापमान वाढते आणि वाऱ्यांची दिशा बदलते. परिणामतः नैऋत्य मान्सून भारतीय उपखंडातून बाहेर पडू लागतो.
सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये बंगालचा उपसागर अतिशय गरम होतो. त्यामुळे परतणारा मान्सून येथे मोठ्या प्रमाणात ओलावा शोषतो. ही ओलावा-भरलेली वारे पूर्व किनारपट्टीकडे जातात आणि पाऊस पाडतात.
या काळात बंगालच्या उपसागरावर वातावरण उष्ण असल्यामुळे चक्रीवादळे तयार होण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण होते. ही चक्रीवादळे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जातात व पूर्व घाटाजवळ तीव्र पाऊस पाडतात.
पर्वतावर वारे आदळल्यावर ते थंड होतात (Adiabatic Cooling) आणि पाऊस पडतो. पण दुसऱ्या उतारावर उतरताना वाऱ्यांचे तापमान वाढते (Adiabatic Heating) आणि ते आर्द्रता शोषू लागतात, त्यामुळे पाऊस पडत नाही.
हा पाऊस न पडणारा भाग म्हणजे ‘पर्जन्यछाया क्षेत्र’.
ITCZ म्हणजे विषुववृत्ताजवळील कमी दाबाची पट्टी, जिथे उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे एकमेकांना भिडतात. येथे हवेचा दाब कमी, तापमान अधिक आणि ढगांची निर्मिती जास्त होते.
- उन्हाळ्यात ITCZ कर्क रेषेपर्यंत उत्तरेला सरकतो.
- हिवाळ्यात ITCZ मकर रेषेकडे दक्षिणेकडे सरकतो.
- हा हलता पट्टा 35° उत्तर ते 35° दक्षिण अक्षांशांदरम्यान हालचाल करतो.

0 टिप्पण्या