मृदेची संरचना

🌱 मृदेची संरचना

मृदा कशी तयार होते, कोणते घटक तिच्यावर परिणाम करतात आणि pH नुसार ती कशी बदलते — हे सोप्या भाषेत खाली दिले आहे.मृदेवर परिणाम करणारे पाच घटक आहेत:

🔹 1. मूळ खडक (Parent Rock)

मृदेला मूलभूत खनिजे आणि पोषक तत्वे पुरवतात. मृदेच्या प्रकारावर खडकांचा थेट परिणाम होतो.

🔹 2. हवामान (Climate)

रासायनिक क्रिया, तापमान बदल, पाऊस, वारे यांमुळे खडक झिजतात — यालाच अपक्षय म्हणतात.
हवामान मातीतील जीवाणूंची हालचाल, रासायनिक प्रतिक्रिया व ओलावा नियंत्रित करते.

🔹 3. वनस्पती (Vegetation)

सुकी पाने, काडीकचरा आणि जैविक अवशेष यांच्या विघटनातून ह्यूमस तयार होतो.
ह्यूमसमुळे मृदा सुपीक, मऊ आणि पाणीधारक बनते.

🔹 4. भूजल (Groundwater)

मृदेमध्ये योग्य ओलावा निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक घटक.

🔹 5. सूक्ष्मजीव (Microorganisms)

बुरशी, कवक, जीवाणू हे सेंद्रिय पदार्थ विघटित करून ह्यूमस तयार करतात.
वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक खनिजे उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.


🌧️ हवामान आणि मृदा निर्मिती

हवामान हा मृदा निर्मितीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

➡ जास्त पाऊस असलेल्या भागांत

जास्त पावसामुळे किंवा जास्त सिंचनामुळे मातीतील पोषक तत्वे पाण्यासोबत जमिनीत खोलवर झिरपून जातात, या प्रक्रियेला अपक्षालन किंवा लीचिंग म्हणतात. यामुळे मातीतील पोषक घटकांची कमतरता निर्माण होते, ज्याचा वनस्पतींच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो.

📌 उदाहरण: पश्चिम घाट
पावसामुळे मातीतील सिलिका धुऊन जाते व लॅटराइट माती तयार होते — ही माती अन्नधान्यासाठी कमी योग्य पण लोखंड-अॅल्युमिनियम युक्त असते.

➡ कोरडे व गरम प्रदेशांत

उष्णतेमुळे मातीतील पाणी जलद बाष्पीभवन होते.चुना (Calcium) व क्षार वरच्या थरात साठतात.

त्यामुळे माती क्षारीय (Alkaline) बनते व सुपीकता कमी होते.

📌 उदाहरण: राजस्थान

अति कोरडेपणामुळे क्षार पृष्ठभागावर येतात आणि माती क्षारीय/नापीक बनते.


🌍 मृदेची रचना (Soil Composition)

  • खनिजे: 40-45%
  • ह्यूमस: 5-10%
  • मातीतील पाणी: 25%
  • मातीतील हवा: 25%
  • सूक्ष्मजीव: जीवाणू, बुरशी, कवक

🪨 मृदेचे थर (Soil Horizons)

मातीचे चार थर असतात. सर्वात वरचा Top Soil सर्वाधिक सुपीक असतो आणि याच थरात वनस्पतींच्या मुळ्या वाढतात.

पृथ्वीच्या सर्वात वरच्या आवरणाला कवच (Crust) म्हणतात. कवचामध्ये खालील चार महत्त्वाचे घटक आढळतात:

  • ऑक्सिजन (Oxygen) — पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे तत्त्व.
  • सिलिका (Silica) — खडक व मातीच्या रचनेत महत्त्वाची भूमिका राखते.
  • ऍल्युमिनियम (Aluminum) — अनेक खनिजांमध्ये आढळते आणि मातीच्या प्रकारात परिणाम करते.
  • लोह (Iron) — मातीचे रंग, उदा. लाल/लॅटराइट मातीपण, यासाठी कारणीभूत असते.

🧪 अम्लीय व क्षारीय मृदा (Acidic & Alkaline Soil)

  • pH = 7 : उदासीन मृदा
  • pH < 7 : अम्लीय मृदा
  • pH > 7 : क्षारीय मृदा

🌿 अम्लीय मृदा

  • हायड्रोजन आयनचे प्रमाण जास्त
  • चहाच्या लागवडीसाठी उत्तम
  • अम्लीय मृदा सुधारण्यासाठी → चुन्याचा (Lime) वापर

🌿 क्षारीय मृदा

  • पोटॅशियम (K) व सोडियम (Na) आयन जास्त
  • भारतामध्ये सर्वाधिक क्षारीय माती → उत्तर प्रदेश
  • क्षारीय मृदा सुधारण्यासाठी → जिप्समचा वापर

📌 भारतातील सर्वाधिक लवणीय मृदा → गुजरात

🌿 पिकांसाठी सर्वोत्तम pH

बहुतेक पिकांच्या वाढीसाठी pH 6 ते 7.5 हे मूल्य सर्वात योग्य मानले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या