प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

1. परिचय

25 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही भारत सरकारची एक प्रमुख गृहनिर्माण योजना आहे. 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

योजनेची रचना:

ही योजना दोन प्रमुख घटकांमध्ये विभागली आहे:

  • PMAY-शहरी (PMAY-U): शहरी भागांसाठी — गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) द्वारे राबवली जाते.
  • PMAY-ग्रामीण (PMAY-G): ग्रामीण भागांसाठी — ग्रामीण विकास मंत्रालय (MoRD) द्वारे राबवली जाते.

2. योजनेचे घटक

A) PMAY-शहरी 2.0 (PMAY-U 2.0)

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये PMAY-U 2.0 ची घोषणा करण्यात आली. हा नवीन टप्पा 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाला असून, 2024–2029 या कालावधीत 1 कोटी शहरी कुटुंबांना घरे उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. या टप्प्यात सुमारे ₹10 लाख कोटी खर्च अपेक्षित आहे.

लाभार्थी-नेतृत्व बांधकाम (Beneficiary-Led Construction- BLC)
EWS गटातील लाभार्थ्यांना स्वतःच्या जमिनीवर 45 चौ.मी. पर्यंत घर बांधण्यासाठी ₹2.5 लाखपर्यंत आर्थिक सहाय्य.
भागीदारीतून परवडणारी घरे (Affordable Housing in Partnership - AHP)
सार्वजनिक/खाजगी संस्थांच्या सहकार्याने EWS लाभार्थ्यांसाठी 30–45 चौ.मी. घरे.
व्याज अनुदान योजना (Interest Subsidy Scheme - ISS)
EWS, LIG व MIG साठी गृहकर्जावर ४% व्याज अनुदान — कमाल ₹1.80 लाख, 5 समान वार्षिक हप्त्यांमध्ये (प्रत्येकी ₹36,000).
परवडणारी भाडे घरे (Affordable Rental House - ARH)
शहरी स्थलांतरित, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी नवीन परवडणाऱ्या भाड्याच्या घरांची सोय.

B) PMAY-ग्रामीण (PMAY-G)

PMAY-G अंतर्गत ग्रामीण गरीब व बेघर कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून दिली जातात. ही योजना इंदिरा आवास योजना याचे रूपांतरण असून 20 नोव्हेंबर 2016 रोजी अधिकृतरित्या सुरू झाली.

  • लाभार्थी निवड: SECC-2011 + Awaas+ (2025-26)
  • खर्च विभागणी: मैदानी भागांत 60:40 (केंद्र:राज्य); डोंगराळ राज्ये, ईशान्य भारत व केंद्रशासित प्रदेशांत 90:10.

3. पात्रता निकष

PMAY-U 2.0 — उत्पन्न गट

उत्पन्न गट वार्षिक उत्पन्न मर्यादा लाभ
EWS ₹3 लाखपर्यंत BLC, AHP, ISS, ARH
LIG ₹3 लाख – ₹6 लाख ISS, ARH
MIG ₹6 लाख – ₹9 लाख ISS

इतर अटी

  • अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
  • लाभार्थी कुटुंब: पती, पत्नी आणि अविवाहित मुले.
  • महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, SC/ST/OBC समाजातील व्यक्तींना प्राधान्य.
  • आधार क्रमांक बंधनकारक आहे.

4. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

व्याज अनुदान
PMAY-U 2.0 मध्ये सर्व पात्र गटांसाठी एकसमान 4% व्याज अनुदान; कमाल ₹1.80 लाख अनुदान — 5 हप्त्यांत (प्रत्येकी ₹36,000).
आर्थिक सहाय्य
BLC अंतर्गत EWS साठी ₹2.5 लाखपर्यंत थेट मदत.
महिला सक्षमीकरण
घर महिला नावावर/संयुक्त मालकीत नोंदवणे बंधनकारक. BLC व ISS अंतर्गत मंजूर 96% घरे महिलांच्या नावे.
थेट लाभ हस्तांतरण(DBT)
अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा
पर्यावरणपूरक बांधकाम
हरित व आपत्ती-प्रतिरोधक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन
परवडणारे भाडे घरे (ARH)
स्थलांतरित कामगार, महिला कामगार यांच्यासाठी नवीन भाड्याच्या घरांची सोय — ही PMAY-U 2.0 ची नवीन सुविधा आहे.
डिजिटल अर्ज
संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन; pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/ वर उपलब्ध.

5. योजनेची उद्दिष्टे

सर्वांसाठी घरे
EWS, LIG व MIG गटांसाठी पक्की घरे उपलब्ध करणे.
झोपडपट्टी पुनर्वसन
योग्य पायाभूत सुविधांसह झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन.
व्याज अनुदान
CLSS/ISS द्वारे गृहकर्ज परवडणारे करणे.
शहरी + ग्रामीण विकास
दोन्ही भागांत प्रभावी अंमलबजावणी.
शाश्वत गृहनिर्माण
हरित व आपत्ती-प्रतिरोधक तंत्रज्ञान.
मूलभूत सुविधा
प्रत्येक घरात पाणी, स्वच्छता, वीज व रस्त्याची सोय.
महिला सशक्तीकरण
मालमत्ता महिलांच्या नावे नोंदवणे.

6. योजनेचे महत्त्व

PMAY ही केवळ गृहनिर्माण योजना नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे.
परवडणारी घरे
व्याज अनुदान व आर्थिक सहाय्यामुळे घर खरेदी सुलभ.
आर्थिक वाढ
बांधकाम व उद्योगांना चालना, रोजगार निर्मिती
सामाजिक उन्नती
झोपडपट्टी विकास व राहणीमान सुधारणा
लैंगिक समानता
महिलांच्या नावावर मालमत्ता — सशक्तीकरण
शाश्वत विकास
टिकाऊ व दीर्घकालीन गृहनिर्माण

7. योजनेतील आव्हाने व त्रुटी

PMAY योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाच्या अडचणी व मर्यादा आढळतात.
जमीन व खर्च
शहरांमध्ये मर्यादित जमीन व जास्त संपादन खर्च
अंमलबजावणी विलंब
नोकरशाहीतील अडथळ्यांमुळे निधी व प्रकल्पांमध्ये विलंब.
बांधकामाचा दर्जा
काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या तक्रारी.
जागरूकतेचा अभाव
विशेषतः ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना योजनेची पुरेशी माहिती नाही.
लाभार्थी ओळख
काही अपात्र व्यक्तींना लाभ; गरजूंना मात्र वंचित राहण्याचा धोका.
आर्थिक अडचणी
अत्यंत गरीब कुटुंबांना पतपात्रतेअभावी कर्ज मिळणे कठीण.
पायाभूत सुविधा
काही PMAY घरांमध्ये पाणी, स्वच्छता व विजेच्या सुविधा अपूर्ण.

8. MPSC/UPSC परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे

सुरुवात व अंमलबजावणी

मुद्दा तपशील
सुरुवात 25 जून 2015
PMAY-U 2.0 1 सप्टेंबर 2024
PMAY-G 20 नोव्हेंबर 2016
शहरी मंत्रालय MoHUA
ग्रामीण मंत्रालय MoRD
कालावधी 20024–2029
लक्ष्य 1 कोटी शहरी कुटुंबे
एकूण खर्च ₹10 लाख कोटी
व्याज अनुदान ₹1.80 लाख
BLC सहाय्य ₹2.5 लाख
शहरी पोर्टल pmaymis.gov.in
ग्रामीण पोर्टल pmayg.dord.gov.in

PMAY-U 2.0 चे चार विभाग

  • BLC: EWS साठी ₹2.5 लाख सहाय्य
  • AHP: सार्वजनिक/खाजगी भागीदारी
  • ISS: 4% व्याज अनुदान
  • ARH: भाडे घरे (स्थलांतरितांसाठी)

9. पुढील वाटचाल

23 फेब्रुवारी 2026 रोजी CSMC च्या ६व्या बैठकीत PMAY-U 2.0 अंतर्गत 2.88 लाख अतिरिक्त घरांना मंजुरी देण्यात आली.

यामुळे एकूण मंजूर घरांची संख्या 13.61 लाखांहून अधिक झाली आहे. या घरांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांसह 16 राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश आहे.

भविष्यातील प्राधान्यक्रम

जलद पूर्तता
प्रकल्पांची वेळेत पूर्णता व घरांचा ताबा
व्याप्ती वाढ
Awaas+ सर्वेद्वारे नवीन लाभार्थ्यांचा समावेश
हरित तंत्रज्ञान
शाश्वत व पर्यावरणपूरक बांधकाम
ग्रामीण सुविधा
पायाभूत सुविधांसह घरांची उपलब्धता वाढवणे

10. निष्कर्ष

प्रधानमंत्री आवास योजना ही भारतातील सर्वसमावेशक विकास व गरिबी निर्मूलनाची एक महत्त्वाची प्रेरक शक्ती आहे.

PMAY-U 2.0 च्या नवीन टप्प्यात व्याज अनुदान, परवडणारे भाडे घरे, डिजिटल अर्ज प्रणाली आणि महिला सशक्तीकरण या बाबींवर विशेष लक्ष दिले आहे.

आर्थिक सहाय्य, सुलभ कार्यपद्धती आणि 'सर्वांसाठी घरे' या उद्दिष्टाद्वारे ही योजना लाखो भारतीयांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

PMAY ही केवळ गृहनिर्माण योजना नसून सामाजिक, आर्थिक आणि शाश्वत विकासाला चालना देणारी परिवर्तनात्मक योजना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या