महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ पेपर- २

0%

प्रश्न 1: प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सूचवा.

D 16 N : H 2 S
B 256 M : ?
(1) X 6 B
(2) F 4 Q
(3) F 4 P
(4) M 8 Q
# प्रश्न 1 हा रद्द करण्यात आलेला आहे.

प्रश्न 2: खालील वेन आकृतीनुसार, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला आहे?



(1) गणित
(2) विज्ञान
(3) भूगोल
(4) इतिहास

प्रश्न 3: प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा.

2, 12, 30, 56, 90, ?
(1) 156
(2) 110
(3) 182
(4) 132

प्रश्न 4: श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम हा अमिरपेक्षा उंच आहे. सुधिर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंच कोण?
(1) समिर
(2) शिशिर
(3) अमिर
(4) राम

प्रश्न 5: दिलेल्या उदाहरणात, पहिल्या तीन मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा.



(1) 300
(2) 529
(3) 361
(4) 441

प्रश्न 6: एक विशिष्ट रक्कम A, B आणि C मध्ये अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वितरित करायची होती, परंतु ती चुकीने अनुक्रमे 7:2:5 या प्रमाणात वितरित केली गेली. याचा परिणाम म्हणून B ला रु. 30,000/- कमी मिळाले. तर ती रक्कम किती होती?
(1) रु. 1,57,500/-
(2) रु. 1,54,000/-
(3) रु. 57,500/-
(4) यापैकी नाही

प्रश्न 7: समजा तुमच्या घड्याळात नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे आहे, तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील?
(1) यापैकी नाही
(2) पश्चिम
(3) दक्षिण
(4) उत्तर

प्रश्न 8: पंकज, किरण व अनिल या तिघांना रु. 1,000/-, 2:3:5 या प्रमाणात वाटले. तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील?
(1) 200 रु.
(2) 250 रु.
(3) 300 रु.
(4) 350 रु.

प्रश्न 9: खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती निवडा.



(1)


(2)


(3) 

(4) 

प्रश्न 10: 


खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

(1) 14/35
(2) 15/36
(3) 21/36
(4) 15/32

प्रश्न 11: खालीलपैकी योग्य विधान/ने निवडा :

अ. PRERNA चा 15 जानेवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत गुजरातमधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत प्रायोगिक टप्पा सुरू झाला.
ब. PRERNA हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम आहे, जो इयत्ता V ते VIII पर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी संरचित केलेला आहे.
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ व ब दोन्हीही
(4) वरीलपैकी नाही

प्रश्न 12: भारतीय संसदेच्या नूतन इमारतीमध्ये स्थापित करण्यात आलेला 'सेंगोल' राजदंड हा कोणत्या साम्राज्याचे/राजवटीचे प्रतीक आहे?
(1) चोल
(2) चालुक्य
(3) मौर्य
(4) मराठा

प्रश्न 13: सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अरिजीत सिंग ला प्रदान करण्यात आला. कोणत्या गीतासाठी?
(1) जो तुम साथ हो
(2) झुमे जो पठाण
(3) तेरे हवाले
(4) केसरीया

प्रश्न 14: थायलंडच्या माजी पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा ह्या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत?
(1) पीपल्स पार्टी
(2) फेऊ थाई पार्टी
(3) भूमजाईथाई पार्टी
(4) पलांग प्रचारथ पार्टी

प्रश्न 15: जानेवारी 2025 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(1) अचलकुमार ज्योती
(2) जय शहा
(3) देवजीत सैकिया
(4) सौरव गांगुली

प्रश्न 16: जोड्या लावा (अर्जुन पुरस्कार, 2024).

'अ' (खेळाडू) 'ब' (क्रीडा प्रकार)
अ. वांतिका अग्रवाल i. नेमबाजी
ब. जर्मनप्रीत सिंह ii. स्क्वॉश
क. अभय सिंह iii. हॉकी
ड. स्वप्नील कुसळे iv. बुद्धिबळ
(1) अ-iv, ब-ii, क-iii, ड-i
(2) अ-iii, ब-iv, क-ii, ड-i
(3) अ-iii, ब-i, क-ii, ड-iv
(4) अ-iv, ब-iii, क-ii, ड-i

प्रश्न 17: दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो?
(1) 10 मार्च
(2) 20 मार्च
(3) 02 मार्च
(4) 23 मार्च

प्रश्न 18: लेक विक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशांच्या सीमांनी वेढलेले आहे?
(1) टांझानिया, युगांडा आणि केनिया
(2) इथिओपिया, सुदान आणि काँगो
(3) नामिबिया, झाँबिया आणि अंगोला
(4) सुदान, सोमालिया आणि नामिबिया

प्रश्न 19: भारतात पहिल्या ग्लास ब्रीजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(1) महाराष्ट्र
(2) बिहार
(3) तामिळनाडू
(4) केरळ

प्रश्न 20: पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे?
(1) प्रतिभाताई पाटील
(2) देवेंद्र फडणवीस
(3) सुधा मूर्ती
(4) नारायण राणे

प्रश्न 21: समजा A, B आणि C एखादे काम अनुक्रमे 20, 30 व 60 दिवसांत पूर्ण करू शकतात. A नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी B आणि C त्याला मदत करतात. तर या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील?
(1) 12 दिवस
(2) 15 दिवस
(3) 16 दिवस
(4) 18 दिवस

Question 22: खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे ?
(1)


(2) 

(3) 

(4) 

Question 23: प्रकृती विद्यालय व संस्कृती विद्यालय या दोन शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोड स्तंभालेखात दिला आहे :
प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिंपियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थीसंख्येतील फरकाच्या किती पट आहे ?
(1) 1
(2) 2
(3) 3
(4) 4

Question 24: खाली दिलेला जोड स्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षाची माहिती दर्शवितो. CEE २००० ते CEE २००६ पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले ?

(1) ३७.५ %
(2) २७.२७%
(3)  १५%
(4)  ८०%

प्रश्न 25: एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले तर बाकी काय असेल?
(1) 9
(2) 3
(3) 0
(4) 4

प्रश्न 26: एका शेतकऱ्याने 20,000 रु. कर्जाऊ घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 2,800 रु. हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रु. कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती?
(1) 2,450 रु.
(2) 2,400 रु.
(3) 2,350 रु.
(4) 2,250 रु.

Question 27: सोबतच्या पाय आकृतीत (pie diagram) कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शविले आहे. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार कार्यरत असतील ?

(1) 360
(2) 180
(3) 72
(4) 90

Question 28: खालील वेन आकृतीचा अभ्यास करा. i. आयत म्हणजे डॉक्टर दर्शविते. ii. त्रिकोण म्हणजे गायक दर्शविते. iii. वर्तुळ म्हणजे कलाकार दर्शविते. iv. चौकोन म्हणजे खेळाडू दर्शविते. खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे ?

(1) ४
(2) ३ 
(3) ६ 
(4) १२ 

प्रश्न 29: धातुच्या तीन भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. तीन घनांच्या बाजूंची लांबी 3 cm, 4 cm व 5 cm असल्यास त्या तीन घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती?
(1) 5:18
(2) 10:9
(3) 25:18
(4) 50:9

प्रश्न 30: एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेवून निघते. पहिल्या स्थानकावर ती एक तृतीयांश प्रवासी उतरवते आणि 280 अधिक घेते. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक घेते. तिसऱ्या स्थानकावर पोहचल्यावर 248 प्रवासी त्यात असल्याचे माहीत होते. तर सुरुवातीची प्रवासी संख्या काढा.
(1) 268
(2) 288
(3) 198
(4) 192

प्रश्न 31: खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10, 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो?
(1) 56160
(2) 36960
(3) 29700
(4) 47520

प्रश्न 32: m ची किंमत 2 असल्यास (-4m)-4 ÷ (8m)-3 ची किंमत किती?
(1) 2
(2) 1
(3) -2
(4) -1

प्रश्न 33: महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, 2015 च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे?
(1) कलम 12
(2) कलम 14
(3) कलम 40
(4) कलम 28

प्रश्न 34: माहिती अधिकार कायदा, 2005 च्या कलम 6(3) नुसार, जेथे माहितीसाठी विनंती करणारा अर्ज सार्वजनिक प्राधिकरणाकडे केला, जी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे आहे अशा वेळी, ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असा अर्ज केला आहे ते खालीलपैकी या कमाल कालावधीमध्ये तो अर्ज त्या दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करेल.
(1) अर्ज प्राप्त झाल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत
(2) अर्ज प्राप्त झाल्या तारखेपासून पाच दिवसांच्या आत
(3) अर्ज प्राप्त झाल्या तारखेपासून तीन कामकाजाच्या दिवसांच्या आत
(4) वरीलपैकी नाही

प्रश्न 35: माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधील शिक्षेबद्दल कोणत्या कलमात स्पष्टीकरण दिले आहे?
(1) 17
(2) 18
(3) 19
(4) 20

प्रश्न 36: खालीलपैकी योग्य कथने ओळखा.

अ. कोणतीही व्यक्ति, ती भारतीय नागरिक आणि 35 वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही.

ब. राज्यपाल, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधान मंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही.

क. जेव्हा एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्याबाबतीत, राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते यांचा खर्च, संसद आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागुन दिला जाईल.
(1) फक्त अ, ब
(2) फक्त ब, क
(3) फक्त अ, क
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 37: खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

अ. प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महा अधिवक्ता म्हणून नियुक्त करील.

ब. महा अधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करील आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करील असे पारिश्रमिक मिळेल.
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ व ब दोन्ही
(4) वरीलपैकी नाही

प्रश्न 38: खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा.

अ. महाराष्ट्र
ब. आंध्र प्रदेश
क. उत्तर प्रदेश
ड. तेलंगणा
ई. कर्नाटक
(1) ड, ब, ई, अ, क
(2) ड, ई, ब, अ, क
(3) ड, ब, अ, ई, क
(4) ड, अ, ब, ई, क

प्रश्न 39: संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा.

अ. 'सिंह' हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
ब. बी. एन. राव यांची संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.
क. एच. व्ही. आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते.
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) फक्त क
(4) वरीलपैकी नाही

प्रश्न 40: खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा.

एखादी व्यक्ती, भारतीय नागरिक, आणि --------- असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही.

अ. एखाद्या उच्च न्यायालयांची अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयांची निदान सलग दहा वर्षे न्यायाधीश.
ब. एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग पाच वर्षे अधिवक्ता.
क. राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेत्ता.
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ व ब दोन्ही
(4) अ व क दोन्ही

प्रश्न 41: खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

अ. अनुच्छेद 137 — संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाना अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेला कोणताही न्यायनिर्णय किंवा केलेला आदेश याचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल.

ब. अनुच्छेद 141 — सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा, भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल.
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) अ व ब दोन्ही
(4) वरीलपैकी नाही

प्रश्न 42: अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला होता?
(1) गोवा
(2) मणिपूर
(3) जम्मू काश्मीर
(4) बिहार

प्रश्न 43: भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात "मूलभूत कर्तव्ये" नमूद आहेत?
(1) भाग III
(2) भाग IV A
(3) भाग V
(4) भाग IX

प्रश्न 44: अनुसूची 08 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे?
(1) 08
(2) 18
(3) 21
(4) 22

प्रश्न 45: मुख्यमंत्रीबाबत योग्य कथने ओळखा.

अ. तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो.
ब. तो झोनल कौन्सिलचा अध्यक्ष असतो.
क. तो आंतर राज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो.
ड. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो.
(1) फक्त अ, ब, ड
(2) फक्त अ, क, ड
(3) फक्त क, ब
(4) फक्त अ, ड

प्रश्न 46: खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
(1) स्मारके आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे
(2) राष्ट्रगीताचा आदर करणे
(3) नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे
(4) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे

प्रश्न 47: जोड्या लावा (राज्य नीतीची मार्गदर्शक तत्त्वांवरील टीका).

'अ' (टीकाकार) 'ब' (कथन)
अ. के. टी. शहा i. पवित्र आकांक्षा
ब. आयव्हर जेनिंग्ज ii. उद्दिष्टे व आकांक्षाचा जाहीरनामा
क. के. सी. व्हियर iii. भावनांची खरी कचरापेटी
ड. टी. टी. कृष्णमाचारी iv. धार्मिक दिखावा
(1) अ-iv, ब-i, क-ii, ड-iii
(2) अ-iii, ब-ii, क-i, ड-iv
(3) अ-ii, ब-i, क-iii, ड-iv
(4) अ-iv, ब-ii, क-i, ड-iii

प्रश्न 48: संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिले आहे?
(1) अनुच्छेद 105
(2) अनुच्छेद 108
(3) अनुच्छेद 109
(4) अनुच्छेद 115

प्रश्न 49: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबासाठी स्वच्छतागृह की योजना कोणत्या वर्षी सुरू केली?
(1) 1995
(2) 1960
(3) 1992
(4) 1990

प्रश्न 50: खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते?
(1) सी. राजगोपालाचारी
(2) मोहम्मद सादूल्ला
(3) बी. एल. मिट्टर
(4) एन. गोपालस्वामी अय्यंगार

प्रश्न 51: भाऊ महाजन यांनी खालील वर्तमानपत्रे सुरू केली.
(1) शतपत्रे, ज्ञानोदय व ज्ञानप्रकाश
(2) ज्ञानदर्शन, धुमकेतू व प्रभाकर
(3) प्रभाकर, ज्ञानदर्शन व इंदुप्रकाश
(4) धुमकेतू, ज्ञानप्रकाश व प्रभाकर

प्रश्न 52: 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुणाच्या अध्यक्षतेखाली भरले?
(1) मोतीलाल नेहरू
(2) लाला लजपत राय
(3) श्रीपाद अमृत डांगे
(4) केशवराव जोगळेकर

प्रश्न 53: 21 मार्च 1920 रोजी कागल जहागिरीतल्या माणगाव येथे भरलेल्या परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
(1) आप्पासाहेब दादगोंडा पाटील
(2) दादासाहेब गायकवाड
(3) तुकाराम गणेशाचार्य
(4) गंगाराम कांबळे

प्रश्न 54: ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्यातल्या उंबरगाव, डहाणू, पालघर आणि जव्हार संस्थानच्या भागात कोणत्या आदिवासी जमातीची वस्ती अधिक होती?
(1) कोकणा आदिवासी जमात
(2) महादेव कोळी
(3) वारली
(4) भिल्ल

प्रश्न 55: नारायण ग. चंदावरकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ. 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेस स्थापनेच्या अधिवेशनाला नारायण ग. चंदावरकर उपस्थित राहिले.
ब. नारायण ग. चंदावरकर यांच्या मते हिंदुस्थानच्या वाढत्या दारिद्र्याचे कारण वाढती लोकसंख्या आहे.
क. नारायण ग. चंदावरकर यांनी 1889 च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या वाढत्या लष्करी खर्चावर टीका केली.
ड. नारायण ग. चंदावरकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु पद भूषविले.
(1) फक्त अ आणि ब
(2) वरीलपैकी सर्व
(3) फक्त क आणि ड
(4) फक्त अ, क आणि ड

प्रश्न 56: 1918 फेब्रुवारीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेले?
(1) लोकमान्य टिळक
(2) स्वा. वि. दा. सावरकर
(3) डॉ. कुर्तकोटी
(4) न्यायमूर्ती रानडे

प्रश्न 57: 1945 मध्ये 'आझाद दल' ही भूमिगत कार्यकर्त्यांची लष्करी संघटना कोणी उभारली?
(1) नागनाथ नायकवडी
(2) यशवंतराव चव्हाण
(3) नाना पाटील
(4) बापूसाहेब लाड

प्रश्न 58: सार्वजनिक सभा या नामवंत सभेने (संस्थेने) 24 सप्टेंबर 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला?
(1) न्यायमूर्ती रानडे
(2) छत्रपती शाहू
(3) महात्मा फुले
(4) लोकमान्य टिळक

प्रश्न 59: पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.

अ. मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना स्थापन.
ब. पहिला फॅक्टरी कायदा.
क. कामगार हितवर्धक सभा स्थापन करण्यात आली.
ड. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना.
(1) ब, अ, क आणि ड
(2) ब, क, ड आणि अ
(3) क, ड, अ आणि ब
(4) ड, अ, ब आणि क

प्रश्न 60: फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस कोण होते?
(1) शंकरराव देव
(2) धनाजी नाना चौधरी
(3) बाळकृष्ण चिंतामण लागू
(4) जवाहरलाल नेहरू

प्रश्न 61: ताजमहालला औद्योगिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणी दाखल केली होती?
(1) सुंदरलाल बहुगुणा
(2) रामचंद्र गुहा
(3) कपिल सिब्बल
(4) महेश चंद्र मेहता

प्रश्न 62: खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील संयुक्त वन व्यवस्थापनाचा पहिला ठराव मंजूर केला?
(1) पश्चिम बंगाल
(2) ओडिशा
(3) कर्नाटक
(4) हिमाचल प्रदेश

प्रश्न 63: 1972 मध्ये झालेल्या जागतिक वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना जगातील कितव्या क्रमांकाचा अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे?
(1) 7
(2) 9
(3) 18
(4) 16

प्रश्न 64: भारतीय वन सर्वेक्षणानुसार, 2013 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खारफुटीच्या वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे?
(1) पालघर
(2) रायगड
(3) रत्नागिरी
(4) सिंधुदुर्ग

प्रश्न 65: खालील महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमाने मांडा.

अ. कृष्णा नदी खोरे
ब. भिमा नदी खोरे
क. तापी नदी खोरे
ड. प्रवरा नदी खोरे
(1) अ, ब, क, ड
(2) ड, अ, ब, क
(3) ड, क, ब, अ
(4) क, ड, ब, अ

प्रश्न 66: महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?
(1) उष्णकटिबंधीय
(2) आर्द्र
(3) कोरडे
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 67: 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी बाल्य लिंग गुणोत्तर होते?
(1) कोकण
(2) औरंगाबाद
(3) नाशिक
(4) अमरावती

प्रश्न 68: क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे?
(1) हरित वायूचे उत्सर्जन
(2) झाडे तोडण्यावर नियंत्रण
(3) घरगुती कचरा
(4) रासायनिक शेती

प्रश्न 69: खालील जोड्या जुळवा.

वनस्पती उत्पादने
अ. हिरडा i. सुगंधी तेल
ब. खैर ii. टॅनिन
क. रोशा गवत iii. बिडी
ड. तेंदु पाने iv. कात
(1) अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
(2) अ-ii, ब-iv, क-iii, ड-i
(3) अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
(4) अ-ii, ब-iii, क-iv, ड-i

प्रश्न 70: महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते खनिज मोठ्या प्रमाणात आढळते?
(1) बॉक्साईट
(2) मँगनिज
(3) लोह खनिज
(4) डोलोमाईट

प्रश्न 71: 220 V (व्होल्ट) घरगुती विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या व 0.25 A (अॅम्पिअर) विद्युत धारा वाहून नेणाऱ्या बल्बची विद्युत शक्ती (पॉवर वॅटेज) किती असेल?
(1) 25 W (वॅट)
(2) 22 W (वॅट)
(3) 55 W (वॅट)
(4) 100 W (वॅट)

प्रश्न 72: कोणता किरणोत्सर्गी घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून वापरतात?
(1) रेडियम
(2) यूरेनियम
(3) पोलोनियम
(4) हेलियम

प्रश्न 73: बरोबर विधान निवडा.

i. आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो.
ii. ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता 20 Hz ते 20000 Hz असते.
iii. गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता वेगळी असते.
iv. गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताच्या वारंवारतेत बदल म्हणजे डॉपलर परिणाम होय.
(1) फक्त i विधान बरोबर आहे
(2) फक्त i, ii विधाने बरोबर आहेत
(3) फक्त ii, iii, iv विधाने बरोबर आहेत
(4) फक्त i, ii, iii विधाने बरोबर आहेत

प्रश्न 74: सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर खत व जैविक वायूमध्ये होणे, हे खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेचे उदाहरण आहे?

अ. विस्थापन अभिक्रिया
ब. समावेशन अभिक्रिया
क. प्रतियोजन अभिक्रिया
ड. अपघटन अभिक्रिया
(1) फक्त क आणि ब
(2) फक्त ड
(3) फक्त अ
(4) फक्त ब

प्रश्न 75: बायॉलॉजीकल ऑक्सिजन डिमांड (BOD) व केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) या संज्ञा कशाची प्रदूषण पातळी मोजण्यासाठी वापरतात?

अ. हवा
ब. ध्वनी
क. माती
ड. पाणी
(1) ब आणि क फक्त
(2) अ आणि ब फक्त
(3) क आणि ड फक्त
(4) फक्त ड

प्रश्न 76: खाली दिलेल्या पर्यायापैकी, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईडचे सामान्य नाव असे आहे.

अ. मोरचूद
ब. टाकणखार
क. ग्रीन व्हीट्रीओल
ड. विरंजक चूर्ण
(1) फक्त अ आणि ब चुकीचे आहेत
(2) फक्त ड बरोबर आहे
(3) फक्त क बरोबर आहे
(4) फक्त ब बरोबर आहे

प्रश्न 77: खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही?
(1) स्कोलियोडॉन
(2) हिप्पोकॅम्पस
(3) इकथिओफिस
(4) लेबिओ

प्रश्न 78: पक्ष्यांची निदान वैशिष्ट्ये —

अ. पिसांची चादर
ब. हवेचा श्वास
क. उबदार रक्त
ड. वरीलपैकी सर्व
(1) अ फक्त
(2) अ आणि ब फक्त
(3) अ आणि क फक्त
(4) ड फक्त

प्रश्न 79: संबंधित फायलम व त्यातील प्राण्याची जोडी लावा.

फायलम प्राणी
a. प्रोटोझुआ i. बटरफ्लाय
b. सिलेंटेरेटा ii. प्लाझमोडियम
c. आर्थोपोडा iii. स्टारफिश
d. इकिनोडर्माटा iv. हायड्रा
(1) a-iii, b-iv, c-i, d-ii
(2) a-ii, b-iv, c-i, d-iii
(3) a-i, b-iii, c-ii, d-iv
(4) a-iv, b-iii, c-ii, d-i

प्रश्न 80: पिकांवर होणाऱ्या किटकविकारांवर उपाय करण्यासाठी जास्त टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी पुढील दिल्याप्रमाणे कोणते उपाय जास्त उपयोगी आहेत?

i. रासायनिक किटकनाशके
ii. मायकोराईझा (मूळकवक)
iii. पीक रोटेशन (फिरवणे)
iv. दगडफुले
(1) i, ii, iii आणि iv
(2) i, ii आणि iv
(3) ii आणि iii
(4) i

प्रश्न 81: वनस्पतींचे पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी आणि कोणी सादर केले होते?
(1) 1789, अँटोइन लॉरेंट डी जूसी
(2) 1836, एनी कॅसिमीर डी कॅन्डॉल
(3) 1873, ऑगस्टीन पिरॅमस डी कॅन्डॉल
(4) 1883, जी. बेन्थम आणि जे. डी. हुकर

प्रश्न 82: खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक आहे?
(1) अॅसीटीलीन
(2) फॉरमॅलीन
(3) स्ट्रेप्टोमायसीन
(4) सायटोकायनीन

प्रश्न 83: जी.आय.एस. (GIS) मध्ये खालीलपैकी कोणते गुणविशेष आधारसामग्रीचे (Attribute Data) उदाहरण आहे?
(1) अक्षांश व रेखांश समन्वय
(2) भूमिउपयोजन वर्गीकरण माहिती
(3) स्थान आणि विस्तार
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 84: खालीलपैकी कोणते साधन हवाई छायाचित्राचे त्रिमिती सम्यक दर्शन होण्यासाठी वापरले जाते?
(1) स्टेरिओग्राफ
(2) स्टेरिओस्कोप
(3) स्टेरिओफोन
(4) फ्लॉपी डिस्क

प्रश्न 85: उपग्रह व विमानांद्वारे मिळविलेल्या सांख्यिकी आणि प्रतिमा प्राप्त करणे, प्रक्रिया करणे व अर्थ लावण्याच्या शास्त्रास खालीलपैकी कोणते शास्त्र म्हणतात?
(1) हवाई छायाचित्रण
(2) सुदूर संवेदन
(3) भौगोलिक माहिती प्रणाली
(4) ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम

प्रश्न 86: इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंगमध्ये वापरला जातो?
(1) विजिबल रीजन / दृश्यभाग
(2) मायक्रोव्हेव रीजन / सूक्ष्मतरंग भाग
(3) इन्फ्रारेड रीजन / अवरक्त भाग
(4) वरीलपैकी सर्व

प्रश्न 87: मॉनिटर किंवा व्हिडिओ डिस्प्ले युनिटचा आकार स्क्रीनच्या __________ लांबीमध्ये मोजला जातो.
(1) आडवी
(2) उभी
(3) कर्ण
(4) आडवी + उभी

प्रश्न 88: यु.आर.एल. (U.R.L.) म्हणजे —
(1) युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
(2) युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर
(3) युनिफॉर्म रिसोर्स लिंक
(4) युनिव्हर्सल रिसोर्स लिंक

प्रश्न 89: OSI मॉडेलमध्ये डेटा लिंक लेयरची खालीलपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी आहे?
(1) अनेक नेटवर्क्समधून पॅकेट्सना त्यांच्या गंतव्यस्थानावर मार्गनिश्चिती (राउट) करणे
(2) प्रेषणासाठी (ट्रान्समिशनसाठी) नेटवर्क लेयर पॅकेट्सना फ्रेम्समध्ये बंदिस्त करणे
(3) पूर्णतः संवाद व्यवस्थापित करणे आणि विश्वसनीय वितरण सुनिश्चित करणे
(4) भौतिक प्रसारणासाठी डेटाचे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करणे

प्रश्न 90: ----------- रोजी 'माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000' च्या तरतुदी लागू झाल्या.
(1) 09 जून, 2000
(2) 17 जून, 2000
(3) 09 ऑक्टोबर, 2000
(4) 17 ऑक्टोबर, 2000

प्रश्न 91: वर्ल्ड हॅपीनेस अहवाल 2018 मधील सर्वात दुःखी देश कोणता?
(1) दक्षिण सुदान
(2) बुरुंडी
(3) अफगाणिस्तान
(4) भारत

प्रश्न 92: राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे उद्दिष्ट आहे?
(1) 2075
(2) 2045
(3) 2030
(4) 2035

प्रश्न 93: योग्य पर्यायांची जोडी ओळखा.

'अ' 'ब'
i. आर्थिक नियोजन अ. पंतप्रधानाकडून निवड
ii. 12 वी पंचवार्षिक योजना ब. भारत सरकारचे धोरण राबविणारा विचार गट
iii. नीति आयोग क. जलद व शाश्वत वृद्धी
iv. नीति आयोगाचे उपाध्यक्ष ड. कालबद्ध कार्यक्रम
(1) i-क, ii-अ, iii-ड, iv-ब
(2) i-ड, ii-ब, iii-अ, iv-क
(3) i-ड, ii-क, iii-ब, iv-अ
(4) i-ब, ii-ड, iii-क, iv-अ

प्रश्न 94: निरपेक्ष दारिद्र्याचे मापन ----------- याद्वारे केले जाते.
(1) ऊष्मांक
(2) उत्पन्न
(3) संपत्ती
(4) राहणीमान

प्रश्न 95: फिलिप्स वक्र ------ यांच्यातील संबंध दर्शवितो.
(1) महागाई आणि बेरोजगारी
(2) महागाई आणि उत्पादन
(3) रोजगार आणि लोकसंख्या
(4) वस्तूंची मागणी आणि पुरवठा

प्रश्न 96: कोणते विधान बरोबर आहे?

अ. अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदीशक्ती कमी करणे.
ब. अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे.
(1) फक्त अ बरोबर
(2) फक्त ब बरोबर
(3) दोन्ही बरोबर आहेत
(4) दोन्ही चूक आहेत

प्रश्न 97: डिसेंबर 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे चलन ----- हे होते.
(1) यु.एस. डॉलर
(2) पौंड
(3) सोने
(4) एस.डी.आर. / विशेष उचल अधिकार

प्रश्न 98: शासनाकडून आपला खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा व पारंपारिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय — या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

अ. वस्तूंवरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात.
ब. वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आलेली आहे.
क. "एक देश, एक कर" (One Nation One Tax) हा जी.एस.टी.चा गाभा आहे.
ड. वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे.
(1) अ आणि ड
(2) ब फक्त
(3) क फक्त
(4) ब आणि क

प्रश्न 99: राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, 2013 महाराष्ट्रात कधी लागू झाला?
(1) 1 फेब्रुवारी 2014
(2) 1 जानेवारी 2016
(3) 1 फेब्रुवारी 2016
(4) 1 जानेवारी 2014

प्रश्न 100: विदेशी व्यापाराची भूमिका —

अ. परकीय चलननिर्मिती.
ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन.
क. श्रम विभागणी.
ड. निर्यातीच्या रचनेत बदल.
(1) अ आणि ब
(2) अ, ब आणि क
(3) ब आणि ड
(4) यापैकी नाही (सर्व — अ, ब, क आणि ड)

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या