🌟 मुघल साम्राज्य – औरंगजेब (1658-1707 इ.स.)
औरंगजेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरातमधील दाहोद (किंवा दोहाद) येथे झाला. तो आपल्या कठोर शासकीय धोरणांमुळे “जिंदा पीर” म्हणूनही ओळखला जात असे. त्याचे वडील शाहजहां होते आणि शाहजहानला चार मुलगे व तीन मुली होत्या. शाहजहानच्या आजारपणामुळे उद्भवलेल्या उत्तराधिकार युद्धात, औरंगजेबाने सर्वांना पराभूत करून 21 जुलै 1658 रोजी मुघल साम्राज्याचे सिंहासन ताब्यात घेतले. आणि शाहजहान याला आग्रा किल्ल्यातील शाहबुर्जमध्ये कैद करण्यात आले. औरंगजेबाचे राज्याभिषेक दोनदा झाले – 3 जुलै 1658 आणि 15 जून 1659, दोन्ही दिल्लीमध्ये, आणि त्यानंतर त्याने “आलमगीर” ही पदवी धारण केली.
औरंगजेब धार्मिकदृष्ट्या कट्टर सुन्नी मुस्लिम होता आणि हिंदूंबद्दल असहिष्णु धोरणे राबवली. 1663 मध्ये हिंदूंवर तीर्थयात्रा कर आणि व्यापाऱ्यांवर कर लादला गेला, सती प्रथा, हिंदू सण आणि धार्मिक विधींवर बंदी घालण्यात आली. 1669 मध्ये काशीचे विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर आणि मथुरेतील केशवराय मंदिर नष्ट केले गेले, तर 1679 मध्ये जझिया कर पुन्हा सुरु केला. त्याने नौरोज सण, जुगार, मादक पदार्थ आणि कुराणविरोधी कृतींवर बंदी घातली.
औरंगजेबाच्या कठोर धोरणांमुळे अनेक बंड उठले – अफगाण, जाट, सतनामी, राजपूत, शिख, आणि मराठे यांच्याकडून. मथुरेच्या जाटांनी गोकुळच्या नेतृत्वाखाली बंड केले; शिखांचे गुरु तेग बहादूर यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली. मराठ्यांचा सामना करताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर तो पराभूत झाला, जरी 1665 मध्ये पुरंदरच्या तहावर शिवाजी महाराजांना काही किल्ले सोपवावे लागले. 1674 मध्ये स्वतःला शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राजा घोषित केले, तर त्यानंतर संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांनी मराठा सत्ता चालवली आणि मुघलांविरुद्ध लढा दिला.
औरंगजेबाने विजापूर (1676) आणि गोलकोंडा (1687) मुघल साम्राज्यात समाविष्ट केले. जवळजवळ 50 वर्ष राज्य केल्यानंतर, 3 मार्च 1707 रोजी 88 व्या वर्षी औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्याचे पार्थिव दौलताबाद, महाराष्ट्र येथे दफन झाले. त्यानंतर मुघल साम्राज्याचे ऱ्हास सुरु झाला आणि ब्रिटिशांनी हळूहळू सत्ता मिळवली.
औरंगजेबानंतर मुघल साम्राज्यात आलेल्या शासकांची नावे:
नाव | राजवटीचा काळ | महत्वाच्या घटना |
---|---|---|
बहादुर शाह | 1707-1712 | उत्तराधिकारी संघर्ष |
जाहादर शाह | 1712-1713 | अल्पकाळी गादीवर |
फारूख्शियर | 1713-1719 | ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला खंडणीच्या बदल्यात शुल्क-मुक्त व्यापार |
मोहम्मद शाह | 1719-1748 | पर्शियाचा नेपोलियन नादिरशह दिल्लीवर हल्ला (1739) |
अहमद शाह | 1748-1754 | मुघल साम्राज्यात अराजकता वाढली |
आलमगीर-2 | 1754-1759 | बंगालवर ब्रिटिशांचे नियंत्रण, प्लासीचे युद्ध |
शाह आलम-2 | 1760-1806 | पानिपतची तिसरी लढाई |
अकबर-2 | 1806-1839 | साम्राज्य दुर्बल |
बहादुर शाह-2 | 1837-1857 | शेवटचा मुघल शासक |
0 टिप्पण्या