शीख धर्माचे दहा गुरु (1469–1708)

🌟 शीख धर्माचे दहा गुरु (1469–1708)

शीख धर्म हा भारतातील एक महान धार्मिक आणि सामाजिक चळवळ आहे, ज्याची स्थापना गुरु नानक देवजी यांनी केली. एकूण दहा गुरुंनी या धर्माची शिकवण, तत्त्वज्ञान आणि संस्कृती विकसित केली. प्रत्येक गुरुने मानवतेला सत्य, समानता, सेवा आणि शौर्य यांचे आदर्श दिले.

🕉️ 1. गुरु नानक देव जी (1469–1539)

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी तलवंडी (सध्याचे नानकाना साहिब, पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे वडील मेहता कालू आणि आई माता तृप्ता होत्या. गुरु नानक देवजींचे लग्न माता सुलखनी यांच्याशी झाले होते.नानक यांना दोन मुलगे होते, श्रीचंद आणि लक्ष्मीचंद.1496 मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या रात्री त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.त्यांनी “संगत” (धार्मिक सभा) आणि “पंगत” (लंगर परंपरा) यांची स्थापना केली. त्यांनी कर्तारपूर शहराची स्थापना केली आणि 1539 मध्ये देह ठेवला.

🌼 2. गुरु अंगद देव जी (1539–1552)

गुरु नानक देवांचे उत्तराधिकारी गुरु अंगद देव यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फेरू जी होते, ते एक व्यापारी होते. त्यांच्या आईचे नाव रमा जी होते. गुरु अंगद देव यांना लहिना जी म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी गुरुमुखी लिपी विकसित केली आणि पंजाबी भाषेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी लंगर परंपरा अधिक दृढ केली.

🌿 3. गुरु अमर दास जी (1552–1574)

वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी गुरु अंगद देव यांना आपले गुरू बनवले आणि तेव्हापासून त्यांची सतत सेवा केली. गुरु अमर दास यांनी सती प्रथेचा विरोध केला आणि विधवा पुनर्विवाह तसेच आंतरजातीय विवाह यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या सेवाभावामुळे शीख धर्मात सामाजिक सुधारणा घडून आल्या.

🕊️ 4. गुरु रामदास जी (1574–1581)

गुरु अमरदास यांचे जावई गुरु रामदासजी यांनी अमृत सरोवर शहराची स्थापना केली, जे पुढे अमृतसर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या विनंतीवरून सम्राट अकबर यांनी पंजाबमधील कर माफ केले.

✨ 5. गुरु अर्जुन देव जी (1581–1606)

गुरु अर्जुन देव हे गुरु रामदास यांचे सुपुत्र होते. गुरु अर्जुन देव यांचा जन्म 15 एप्रिल 1563 रोजी झाला.त्यांनी हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) बांधले आणि आदि ग्रंथ तयार केला. गुरु अर्जुन देव यांना जहांगीरने त्यांचा मुलगा खुसरोला त्याच्या बंडात मदत केल्याबद्दल पकडले आणि पाच दिवस छळ केला. गंभीर छळांमुळे गुरु अर्जुन देव बेशुद्ध पडले आणि त्यांचे शरीर रावी नदीत फेकण्यात आले. गुरु अर्जुन देव जी यांच्या स्मरणार्थ, रावी नदीच्या काठावर 'गुरुद्वार डेरा साहिब' बांधण्यात आले आहे, जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. त्यांनी धर्मासाठी बलिदान दिले आणि त्यांना पहिले शीख शहीद म्हटले जाते.

⚔️ 6. गुरु हरगोविंद सिंह जी (1606–1645)

गुरु अर्जुन देव यांचे पुत्र गुरु हरगोविंद सिंह यांनी शीख पंथाला योद्ध्याचे स्वरूप दिले. त्यांनी अकाल तख्त ची स्थापना केली आणि मुघलांविरुद्ध लढा दिला.त्यांचे निधन 1644 मध्ये पंजाबमधील किरतपूर येथे झाले.

🌺 7. गुरु हर राय जी (1645–1661)

गुरु हर राय यांनी शांतता आणि दया यांचा संदेश दिला. त्यांनी दारा शिकोह याला मदत केली आणि सेवाभावाचे आदर्श दिले.

💫 8. गुरु हरकिशन साहिब जी (1661–1664)

गुरु हरकिशन साहिब यांचा जन्म 7 जुलै 1656 रोजी करतारपूर साहिब येथे झाला. फक्त 5 वर्षांच्या वयात गुरु बनलेले सर्वात लहान शीख गुरु. त्यांनी कॉलराच्या साथीमध्ये लोकांची सेवा केली आणि स्वतःही त्या आजाराला बळी पडले. त्यांच्या शेवटच्या शब्दांत त्यांनी “बाबा बकाले” असे उच्चारले.

🩸 9. गुरु तेग बहादूर सिंह जी (1664–1675)

गुरु तेग बहादूर यांनी धर्मस्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि त्यांना “हिंद की चादर” म्हटले जाते. औरंगजेबाने धर्मांतरासाठी छळ केल्यानंतरही त्यांनी न झुकता 24 नोव्हेंबर 1675 रोजी शहीद झाले.

🛡️ 10. गुरु गोविंद सिंह जी (1675–1708)

दहावे आणि अंतिम शीख गुरु, यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी पटना येथे झाला. त्यांनी खालसा पंथ स्थापन केला आणि गुरु ग्रंथ साहिब यांना पुढचा गुरु घोषित केले. त्यांनी नांदेड येथे 1708 मध्ये देह ठेवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या