🌸 मुघल साम्राज्य – जहांगीर (1605-1627 इ.स.)
जन्म : 30 ऑगस्ट 1569 रोजी फतेहपूर सिक्री येथे झाला. अकबर आणि जोधाबाई यांचा तो पुत्र. त्याचे बालपणीचे नाव मुहम्मद सलीम होते, जो पुढे जहांगीर म्हणून प्रसिद्ध झाला.
राज्याभिषेक : अकबराच्या मृत्यूनंतर 3 नोव्हेंबर 1605 रोजी आग्रा येथे गादीवर बसला. गादीवर बसताच त्याला मुलगा खुसरोच्या बंडाचा सामना करावा लागला. भेरवालच्या युद्धात खुसरोचा पराभव झाला. खुसरोने गुरु अर्जुनदेवांकडे आश्रय घेतल्याने, संतप्त जहांगीरने अर्जुनदेवांना फाशीची शिक्षा दिली.
👑 विवाह व कुटुंब
- मानबाई – पोटी खुसरो
- गोसाई – पोटी खुर्रम (शाहजहान)
- मेहरुन्निसा (नूरजहाँ) – 1611 मध्ये विवाह; राज्यकारभारावर मोठा प्रभाव.
नूरजहाँचे वडील घियास बेग यांना "इत्माद-उद-दौला" पदवी देण्यात आली, तर तिच्या भावाला असफ खानला उच्च पद मिळाले.
⚔️ प्रमुख घडामोडी
- 1605 ते 1615 या काळात जहांगीर आणि मेवाडचा तत्कालीन राजा राणा अमर सिंह यांच्यात सुमारे 18 युद्धे झाल्यानंतर, एक करार झाला, जो जहांगीरची एक मोठी कामगिरी मानली जाते.
- 1620 मध्ये अनेक दिवस वेढा घातल्यानंतर, ईशान्य पंजाबच्या डोंगराळ भागात असलेल्या कांगडा किल्ल्याचा विजय हे जहांगीरचे उल्लेखनीय यश होते.
- 1626 मध्ये महावत खानने बंड केले आणि जहांगीरला कैद केले. तथापि, नूरजहाँच्या हुशारीमुळे ही योजना अयशस्वी झाली. महावत खान हा मुघल साम्राज्याचा दरबारी होता.
📖 साहित्य व कला
जहांगीरने तुझुक-ए-जहांगीरी हे आत्मचरित्र फारसी भाषेत लिहिले. चित्रकलेचे गाढ ज्ञान असल्यामुळे त्याच्या कारकिर्दीला चित्रकलेचा सुवर्णकाळ म्हटले जाते.जहांगीरने सुरसागर लिहिणाऱ्या प्रसिद्ध ब्रजभाषा कवी सूरदास यांनाही आश्रय दिला होता.
🕌 वास्तुकला
- सिकंदरा येथे अकबराचा मकबरा पूर्ण केला.
- लाहोर मशिद व शालीमार बाग बांधकाम.
- नूरजहाँने तिच्या वडिलांच्या स्मरणार्थ इत्माद-उद-दौला मकबरा बांधला.
🌍 परकीय संबंध
इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याने दूत पाठवले: विल्यम हॉकिन्स (1608), पॉल कॅनिंग (1612), व सर्वात महत्त्वाचा सर थॉमस रो (1615). यामुळे इंग्रजांना व्यापारी विशेषाधिकार मिळाले.
धार्मिक धोरण
वडील अकबराप्रमाणेच तो धर्म सहिष्णु होता. मंदिरे व पुजाऱ्यांना दान करत असे. त्याने तंबाखूवर बंदी घातली व 1612 मध्ये पहिल्यांदा रक्षाबंधन साजरा केला.
मृत्यू
7 नोव्हेंबर 1627 रोजी काश्मीरहून लाहोरला परतताना त्याचा मृत्यू झाला. त्याचे पार्थिव लाहोर, शाहदरा येथे रावी नदीकाठी दफन करण्यात आले. त्याचा मुलगा शाहजहान पुढे सम्राट झाला.
0 टिप्पण्या