संयुक्त राष्ट्रे (United Nations)

🌍 संयुक्त राष्ट्रे (United Nations – UN)

दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या प्रचंड मानवी, आर्थिक व सामाजिक हानीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील जागतिक संघर्ष रोखणे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे आणि राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवणे या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांची (United Nations – UN) स्थापना करण्यात आली. ही संस्था पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या पण प्रभावी ठरू न शकलेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) उत्तराधिकारी आहे.

25 एप्रिल 1945 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 50 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा (UN Charter) मसुदा तयार केला. 25 जून 1945 रोजी ही सनद स्वीकारण्यात आली आणि 24 ऑक्टोबर 1945 रोजी ती अंमलात आली. म्हणूनच 24 ऑक्टोबर हा दिवस ‘संयुक्त राष्ट्र दिन (UN Day)’ म्हणून साजरा केला जातो. स्थापनेच्या वेळी संयुक्त राष्ट्रांचे 51 सदस्य देश होते (पोलंड नंतर सहभागी झाला). सध्या संयुक्त राष्ट्रांचे 193 सदस्य देश आहेत, तसेच व्हॅटिकन सिटी (Holy See) आणि पॅलेस्टाईन ही दोन निरीक्षक राष्ट्रे आहेत.
संयुक्त राष्ट्रांनी सहा भाषांना (अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश) अधिकृत भाषांचा दर्जा दिला आहे.

🎯 संयुक्त राष्ट्रांची प्रमुख उद्दिष्टे

  • आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे
  • राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे
  • मानवी हक्कांचे संरक्षण व प्रोत्साहन देणे
  • मानवतावादी मदत पुरवणे
  • शाश्वत विकासाला चालना देणे
  • आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान व अंमलबजावणी सुनिश्चित करणे

🏛️ संयुक्त राष्ट्रांची रचना (Six Principal Organs)

  • UNGA सर्वसाधारण सभा (UN General Assembly)
    सर्व सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारे मुख्य विचारमंथन व्यासपीठ. प्रत्येक देशाला एक मताचा अधिकार असतो. महासभा बजेट मंजूर करते, UNSC च्या शिफारशीवर नवीन सदस्य स्वीकारते, UNSC चे अस्थायी सदस्य, ECOSOC चे सदस्य, UN सरचिटणीस आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश निवडते.
  • UNSC संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UN Security Council)
    आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखण्याची मुख्य जबाबदारी. परिषदेकडे सर्व सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक ठराव (resolutions) मंजूर करण्याचा आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. यामध्ये 15 सदस्य असतात – 5 स्थायी सदस्य (अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स) ज्यांना व्हेटो अधिकार आहे आणि 10 अस्थायी सदस्य (2 वर्षांचा कार्यकाल).
  • ECOSOC आर्थिक व सामाजिक परिषद 
    आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व विकासविषयक बाबींमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवते. UN च्या विशेष एजन्सी व कार्यक्रमांचा समन्वय साधते. याचे 54 सदस्य असतात.
  • ICJ आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)
    आंतरराष्ट्रीय कायद्याचे सर्वोच्च न्यायालय (मुख्यालय – द हेग, नेदरलँड्स). राज्यांमधील कायदेशीर वाद सोडवते आणि सल्लागार मते देते. यामध्ये 15 न्यायाधीश असतात, जे 9 वर्षांसाठी निवडले जातात.
  • Secretariat संयुक्त राष्ट्र सचिवालय (UN Secretariat)
    संयुक्त राष्ट्रांची प्रशासकीय संस्था. परिषदांचे आयोजन, अहवाल तयार करणे आणि धोरणांची अंमलबजावणी ही कामे करते. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस हे या संस्थेचे प्रमुख असतात.
  • Trusteeship विश्वस्त परिषद (Trusteeship Council)
    माजी वसाहती प्रदेशांच्या प्रशासनासाठी स्थापन करण्यात आली होती. 1 नोव्हेंबर 1994 रोजी पलाऊला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही परिषद निष्क्रिय आहे.

UN सरचिटणीस

S. No. Name Country Tenure
1 Trygve Lie Norway 1946 – 1952
2 Dag Hammarskjöld Sweden 1953 – 1961
3 U Thant Burma (Myanmar) 1961 – 1971
4 Kurt Waldheim Austria 1972 – 1981
5 Javier Pérez de Cuéllar Peru 1982 – 1991
6 Boutros Boutros-Ghali Egypt 1992 – 1996
7 Kofi Annan Ghana 1997 – 2006
8 Ban Ki-moon South Korea 2007 – 2016
9 António Guterres Portugal 2017 – Present

👤 सध्याचे UN सरचिटणीस

अँटोनियो गुटेरेस (2017–2026)
मुख्य लक्ष: हवामान बदल, संघर्ष प्रतिबंध, UN सुधारणा, Global South

🌍 संयुक्त राष्ट्रांच्या 15 विशेष एजन्सी (UN Specialised Agencies)

एजन्सी संक्षिप्त रूप मुख्यालय स्थापना
अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) FAO रोम 1945
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना(International Labour Organization) ILO जिनिव्हा 1919
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी  (International Monetary Fund) IMF वॉशिंग्टन DC 1944
जागतिक बँक गट (World Bank Group) WBG वॉशिंग्टन DC 1944
संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) UNESCO पॅरिस 1946
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) WHO जिनिव्हा 1948
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (International Civil Aviation Organization) ICAO मॉन्ट्रियल 1944
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (International Telecommunication Union) ITU जिनिव्हा 1865
जागतिक टपाल संघ (Universal Postal Union) UPU बर्न 1874
जागतिक हवामान संघटना (World Meteorological Organization) WMO जिनिव्हा 1950
आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी  (International Fund for Agricultural Development) IFAD रोम 1977
संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (United Nations Industrial Development Organization) UNIDO व्हिएन्ना 1966
जागतिक बौद्धिक संपदा संघटना (World Intellectual Property Organization) WIPO जिनिव्हा 1967
आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (International Maritime Organization) IMO लंडन 1948
जागतिक पर्यटन संघटना (UN Tourism (पूर्वी UNWTO)) UN Tourism माद्रिद 1974
📌 Exam Tip: ITU (1865) व UPU (1874) या UN पेक्षा जुन्या संस्था असून नंतर UN च्या Specialised Agencies बनल्या.

🌍 संयुक्त राष्ट्रांचे कार्यक्रम व निधी (UN Funds & Programmes)

संयुक्त राष्ट्रांचे कार्यक्रम व निधी (Funds & Programmes) या संस्था UN प्रणालीअंतर्गत कार्यरत असून त्या थेट विकास, मानवतावादी मदत, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कल्याण यावर लक्ष केंद्रित करतात. या संस्था सदस्य राष्ट्रांच्या ऐच्छिक योगदानावर चालतात.

🎯 मुख्य वैशिष्ट्य:
• स्वतंत्र Charter नसतो
• UN General Assembly / ECOSOC कडे अहवाल सादर करतात
• थेट क्षेत्रीय (Field-level) कामावर भर
संस्था संक्षिप्त रूप मुख्य कार्यक्षेत्र
United Nations Children’s Fund UNICEF बालहक्क, आरोग्य, पोषण
United Nations Development Programme UNDP शाश्वत विकास, गरीबी निर्मूलन
United Nations Environment Programme UNEP पर्यावरण संरक्षण, हवामान बदल
United Nations High Commissioner for Refugees UNHCR निर्वासित व विस्थापित संरक्षण
World Food Programme WFP अन्नसुरक्षा, आपत्कालीन मदत
United Nations Population Fund UNFPA लोकसंख्या, माता आरोग्य
United Nations Office on Drugs and Crime UNODC अंमली पदार्थ, गुन्हेगारी नियंत्रण
Joint United Nations Programme on HIV/AIDS UNAIDS HIV/AIDS नियंत्रण
UN Human Settlements Programme UN-Habitat शहरी विकास, गृहनिर्माण
United Nations Conference on Trade and Development UNCTAD विकसनशील देशांचा व्यापार
⚛️ IAEA (International Atomic Energy Agency) ही UN शी संलग्न स्वायत्त संस्था आहे. ती UN ची Specialised Agency नाही, परंतु UN सोबत स्वतंत्र कराराद्वारे कार्य करते.
📌 Exam Tip:
• Funds & Programmes = Voluntary funding
• Specialised Agencies = स्वतंत्र Charter
• IAEA = Autonomous but UN-linked

भारत आणि संयुक्त राष्ट्रसंघ

भारत संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारताने 1944 मध्ये वॉशिंग्टन डी.सी. येथे संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती.

तसेच, 25 एप्रिल ते 26 जून 1945 दरम्यान सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारत सहभागी होता आणि UN Charter च्या निर्मितीत योगदान दिले.

🌍 Exam Point:
भारत = UN चा मूळ (Founding) सदस्य

संयुक्त राष्ट्रांच्या मूळ सदस्यांपैकी एक म्हणून, भारताने आंतरराष्ट्रीय शांतता, सार्वभौम समानता, मानवी हक्क आणि विकास या संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांना सातत्याने पाठिंबा दिला आहे.

आज भारतात सुमारे 26 संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी, कार्यक्रम व निधी कार्यरत असून, भारतामधील UN Country Network हे जगातील सर्वात मोठ्यांपैकी एक मानले जाते.

🌾 अन्न आणि कृषी संघटना (FAO)

FAO 1948 मध्ये FAO ने भारतात कार्य सुरू केले. सुरुवातीला अन्नसुरक्षा, शेती उत्पादनवाढ आणि धोरणात्मक सल्ला हे प्रमुख उद्दिष्ट होते.

गेल्या काही दशकांत FAO ने अन्न व पोषण, ग्रामीण उपजीविका, शाश्वत शेती, हवामान-संवेदनशील शेती या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

🌱 Latest Focus:
SDGs च्या पार्श्वभूमीवर FAO चे लक्ष शाश्वत कृषी पद्धती व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेतीवर आहे.

🚜 आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD)

IFAD IFAD व भारत सरकारने लघु व सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीचे व्यापारीकरण आणि बाजारपेठांशी जोडणी यावर भर दिला आहे.

IFAD-समर्थित प्रकल्पांमुळे महिला बचत गट, सूक्ष्म वित्त, व बँकिंग सेवांमध्ये प्रवेश वाढला आहे.

🩺 UNAIDS (एचआयव्ही/एड्स)

UNAIDS UNAIDS व भारत सरकारने नवीन एचआयव्ही संसर्ग रोखणे, उपचार व सामाजिक कलंक कमी करणे या उद्दिष्टांसाठी एकत्र काम केले आहे.

2001-2012 दरम्यान भारतामध्ये एचआयव्ही रुग्णसंख्या सुमारे 50% ने घटली. ही सकारात्मक प्रवृत्ती नंतरही मोठ्या प्रमाणात टिकून आहे.

📌 Updated Note:
भारत सध्या “End AIDS by 2030” या SDG लक्ष्याच्या दिशेने कार्यरत आहे.

💡 आशियाई व पॅसिफिक तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्र (APCTT)

UNESCAP 1977 मध्ये स्थापन झालेली ही प्रादेशिक संस्था तंत्रज्ञान हस्तांतरण, नवोपक्रम व्यवस्थापन आणि MSME विकासावर लक्ष केंद्रित करते.

🏦 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

IMF भारत IMF सोबत धोरण सल्ला, आर्थिक स्थैर्य, आणि जागतिक वित्तीय व्यवस्थेत सहकार्य करतो.

💰 Exam Fact:
भारत 2000 नंतर IMF कडून कर्ज न घेणारा, निव्वळ योगदानकर्ता देश आहे.

🎓 युनेस्को (UNESCO)

UNESCO भारत 1946 पासून युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर नियमितपणे निवडून येत आहे.

2012 मध्ये नवी दिल्ली येथे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन फॉर पीस अँड शाश्वत विकास (MGIEP) ही UNESCO Category-I संस्था स्थापन झाली.

🏛️ Extra Info:
भारतामध्ये अनेक UNESCO जागतिक वारसा स्थळे आहेत, जे सांस्कृतिक व पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत.

⚕️ जागतिक आरोग्य संघटना (WHO)

WHO WHO भारत सरकारसोबत सार्वजनिक आरोग्य, लसीकरण, रोग नियंत्रण यामध्ये जवळून काम करते.

कॉलरा, पोलिओ (निर्मूलन), मलेरिया, क्षयरोग यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात WHO ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

🩻 Latest Update:
COVID-19 नंतर WHO–India सहकार्य आरोग्य पायाभूत सुविधा, डिजिटल हेल्थ व महामारी तयारीवर केंद्रित आहे.

🌍 संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे योगदान

भारत स्थापनेपासूनच संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सक्रिय, जबाबदार आणि प्रभावी सदस्य राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने जागतिक पातळीवर मानवाधिकार, शांतता, अहिंसा आणि वसाहतवादविरोधी भूमिका ठामपणे मांडली.

🕊️ मानवाधिकार व सामाजिक न्याय

  • 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद (Apartheid) विरोधात आवाज उठवणारा भारत हा पहिला देश होता.
  • 1948 मध्ये मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्राच्या (UDHR) मसुद्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली.
महत्त्वाची नोंद : हंसा मेहता यांनी “All men are born free” ऐवजी “All human beings are born free” असा समावेशक बदल सुचवून इतिहास घडवला.

🏛️ संयुक्त राष्ट्र महासभेतील नेतृत्व

  • 1953 मध्ये विजयालक्ष्मी पंडित या UN General Assembly च्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या.
  • भारताने UNGA मध्ये विकसनशील देशांचा आवाज सातत्याने मांडला आहे.

🔐 सुरक्षा परिषद (UNSC) मधील भूमिका

  • भारत आतापर्यंत 8 वेळा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य राहिला आहे.
  • अलीकडील कार्यकाळ : 2021-2022
  • UNSC सुधारणा व विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व यासाठी भारत आग्रही आहे.

🪖 संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमा

  • भारत हा UN Peacekeeping मध्ये सर्वात मोठा योगदान देणाऱ्या देशांपैकी एक आहे.
  • कोरिया, इजिप्त, काँगो, हैती, अंगोला, सोमालिया, लायबेरिया, रवांडा, लेबनॉन, दक्षिण सुदान इत्यादी देशांमध्ये भारताने शांती सैनिक पाठवले.
  • आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक भारतीय शांती सैनिक UN मोहिमांमध्ये सहभागी झाले आहेत.

☮️ गांधीजी, अहिंसा आणि भारत

  • महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्त्व संयुक्त राष्ट्रांच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत आहे.
  • 2007 मध्ये 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित करण्यात आला.
  • 2014 मध्ये भारताच्या पुढाकाराने 21 जून – आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित झाला.
निष्कर्ष : भारताचे संयुक्त राष्ट्रांतील योगदान केवळ सदस्यत्वापुरते मर्यादित नसून शांतता, मानवाधिकार, विकास, आरोग्य, पर्यावरण आणि नैतिक नेतृत्व या सर्व क्षेत्रांमध्ये भारताची भूमिका जागतिक स्तरावर प्रभावी ठरली आहे.

🌐 संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणा व संयुक्त राष्ट्रांसमोरील आव्हाने

संयुक्त राष्ट्रसंघाला (United Nations) स्थापनेपासून जागतिक शांतता, सुरक्षितता आणि विकास टिकवून ठेवण्यासाठी अनेक राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागला आहे. आज ही आव्हाने बहुआयामी, गुंतागुंतीची आणि परस्परावलंबी बनली आहेत.

⚔️ 1. भूराजकीय आक्रमकता व महासत्ता स्पर्धा

  • जागतिक संघर्ष सामान्य होत चालले असून प्रॉक्सी युद्धांचे प्रमाण वाढले आहे.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मधील व्हेटो राजकारण तटस्थ व प्रभावी निर्णयप्रक्रियेत अडथळा आणते.
  • युक्रेन युद्ध, गाझा संघर्ष यांसारख्या घटनांमध्ये UN ची भूमिका अनेकदा मर्यादित ठरते.

🪖 2. लष्करी हस्तक्षेप व राजवट बदलाचा वारसा

  • इराक, अफगाणिस्तान, लिबिया, सीरिया यांसारख्या देशांमध्ये बाह्य हस्तक्षेपांमुळे दीर्घकालीन स्थैर्य आलेले नाही.
  • यामुळे UN च्या हस्तक्षेपांबाबत विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

🚶‍♀️ 3. सक्तीचे विस्थापन व निर्वासित संकट

  • UNHCR च्या अलीकडील अहवालानुसार जगात 11 कोटीहून अधिक लोक सक्तीने विस्थापित झाले आहेत.
  • निर्वासितांचा सर्वाधिक भार शेजारील विकसनशील देशांवर पडतो.
  • अल्पकालीन सीमा-नियंत्रण उपाय दीर्घकालीन समस्यांना वाढवतात.

🤝 4. संघर्षशील मानवतावाद

  • WHO, UNICEF, WFP यांसारख्या संस्था मोठे योगदान देत असल्या तरी संसाधने अपुरी पडतात.
  • मानवतावादी मदत अनेकदा राजकीय संघर्षांमध्ये अडकते.

🏛️ 5. UNSC सुधारणा – सर्वात मोठे संस्थात्मक आव्हान

  • सध्याची सुरक्षा परिषद 1945 च्या जागतिक वास्तवाचे प्रतिबिंब आहे.
  • भारत, जर्मनी, ब्राझील आणि जपान (G4 देश) कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी एकमेकांना पाठिंबा देतात.
  • आफ्रिकन देश अधिक प्रतिनिधित्व, स्थानिकीकरण व निर्णयक्षमतेची मागणी करत आहेत.
अद्ययावत मुद्दा : UN Secretary-General यांनी अलीकडील भाषणांमध्ये UNSC सुधारणा, बहुपक्षीयतेचे पुनरुज्जीवन आणि Global South च्या प्रतिनिधित्वावर भर दिला आहे.

🌱 6. नवीन व उदयोन्मुख जागतिक आव्हाने

  • हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास
  • महामारी व जागतिक आरोग्य संकटे
  • सायबर सुरक्षा व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)
  • लोकसंख्या वाढ, राज्यहीन लोक व अन्नसुरक्षा

🛠️ सुधारणा व पुढील मार्ग

✔ SDGs आधारित दृष्टिकोन : शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) ही राजकीय मतभेदांवर मात करण्यासाठी सामायिक व स्वीकारार्ह चौकट ठरू शकते.
✔ शांतता निर्माण व प्रतिबंध : संघर्षानंतर हस्तक्षेप करण्यपेक्षा संघर्ष होण्यापूर्वी प्रतिबंधावर भर देणे आवश्यक.
✔ लोककेंद्रित दृष्टिकोन : महिला, युवक, स्थानिक समुदाय व नागरी समाज यांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढवणे.
✔ UN प्रणाली सुधारणा : कमी नोकरशाही, अधिक पारदर्शकता आणि स्थानिक स्तरावर निर्णयक्षमता देणे.

निष्कर्ष : संयुक्त राष्ट्रांसमोरील आव्हाने गंभीर असली तरी योग्य सुधारणा, समावेशक बहुपक्षीयता आणि लोककेंद्रित धोरणांमुळे UN अजूनही जागतिक शांतता व विकासाचा प्रमुख आधारस्तंभ राहू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या