वनस्पतींचे वर्गीकरण
Classification of Plants — MPSC / UPSC सामान्य विज्ञान नोट्स
1. वनस्पती सृष्टीची ओळख
- पेशीभित्तिकायुक्त, दृश्यकेंद्रकी (Eukaryotic) पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला 'वनस्पती' म्हणतात.
- वनस्पती हरितद्रव्याच्या (Chlorophyll) साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करत असल्याने त्या स्वयंपोषी असतात.
- वनस्पतीशास्त्रज्ञ ए. डब्ल्यू. आयक्लर (A. W. Eichler) यांनी इ.स. 1883 मध्ये वनस्पतीसृष्टीचे दोन उपसृष्टींत वर्गीकरण केले — अबीजपत्री (Cryptogamae) व बीजपत्री (Phanerogamae).
2. वर्गीकरणाचा आधार
- सर्वप्रथम वनस्पतींना विशिष्ट अवयव (मूळ-खोड-पान) आहेत की नाहीत, हे पाहिले जाते.
- त्यानंतर पाणी व अन्नाच्या वहनासाठी स्वतंत्र संवहनी ऊतीसंस्था आहे की नाही, हे तपासले जाते.
- बियांवर फळांचे आवरण आहे की नाही, यावरून पुढील वर्गीकरण होते.
- शेवटी बीजपत्रांच्या (Cotyledons) संख्येनुसार एकबीजपत्री व द्विबीजपत्री गट ठरवले जातात.
सारांश: फुले-फळे-बिया (बीजपत्री/अबीजपत्री) → बियांवर आवरण (आवृत्तबीजी/अनावृत्तबीजी) → बीजपत्रांची संख्या (एकबीजपत्री/द्विबीजपत्री)
3. अबीजपत्री वनस्पती (Cryptogamae)
या वनस्पतींना फुले व बिया येत नाहीत; प्रजनन बीजाणूंमार्फत (Spores) होते.
- प्रामुख्याने पाण्यात वाढतात; मूळ-खोड-पान असे स्पष्ट अवयव नसतात.
- हरितद्रव्ययुक्त, स्वयंपोषी गटाला शैवाल (Algae) म्हणतात — एकपेशीय ते बहुपेशीय, सूक्ष्म ते मोठ्या आकाराचे.
- उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम. काही गोड्या तर काही खाऱ्या पाण्यात आढळतात.
- हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशी यांचा स्वतंत्र गट म्हणजे कवके (Fungi).
- यांना वनस्पतीसृष्टीचे 'उभयचर' म्हणतात — कारण त्या ओलसर जमिनीवर वाढतात.
- निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी; प्रजनन बीजाणूंमार्फत होते.
- खरी मुळे/खोड/पाने नसतात — त्याऐवजी मुलाभ (Rhizoid) व पानसदृश रचना असतात; संवहनी ऊती नसते.
- उदा. मॉस (फ्युनारिआ), मर्केशिया, ॲन्थोसिरॉस, रिक्सिया.
- मुळे, खोड, पाने असे स्पष्ट अवयव व संवहनी ऊतीसंस्था असते; फुले-फळे येत नाहीत.
- पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते.
- उदा. नेफ्रोलेपिस (नेचे), मार्सेलिया, टेरिस, ॲडिअँटम, इक्विसेटम, लायकोपोडियम.
4. बीजपत्री वनस्पती (Phanerogamae)
ज्या वनस्पतींत प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया (भ्रूण + अन्नसाठा) निर्माण करतात, त्यांना बीजपत्री म्हणतात. बिया फळात झाकलेल्या असणे/नसणे यावरून अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे दोन विभाग पडतात.
- बहुधा सदाहरित, बहुवार्षिक; खोडांना फांद्या नसतात, पानांचा मुकुट तयार होतो.
- नर व मादी फुले एकाच झाडावर वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात.
- बियांवर नैसर्गिक आच्छादन (फळ) नसते — म्हणून 'अनावृत्तबीजी' (Gymnos = अनावृत्त, Sperm = बीज).
- उदा. सायकस, पायनस (देवदार), थुजा (मोरपंखी), पिसिया (ख्रिसमस ट्री).
🌸 ब. आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)
Flowering plants
- फुले हे प्रजननाचे अवयव; फुलांचे रूपांतर फळांत होऊन फळांच्या आत आवरणयुक्त बिया तयार होतात (Angios = आवरण, Sperm = बीज).
- बियांचे सहज दोन भाग होणे/न होणे यावरून द्विबीजपत्री व एकबीजपत्री असे दोन उपगट पडतात.
- द्विबीजपत्री उदा. सूर्यफूल, हरभरा; एकबीजपत्री उदा. गहू, मका, गवत.
5. सारांश तक्ता (Quick Revision)
| गट | मुळे/खोड/पाने | संवहनी ऊती | प्रजनन | उदाहरण |
|---|---|---|---|---|
| थॅलोफायटा | नाहीत | नाहीत | बीजाणूद्वारे | स्पायरोगायरा, उल्वा |
| ब्रायोफायटा | खरी नाहीत (मुलाभ) | नाहीत | बीजाणूद्वारे | फ्युनारिआ, रिक्सिया |
| टेरिडोफायटा | स्पष्ट अवयव | आहेत | बीजाणूद्वारे | नेचे, इक्विसेटम |
| अनावृत्तबीजी | स्पष्ट अवयव | आहेत | बिया (आवरणरहित) | सायकस, पायनस |
| आवृत्तबीजी | स्पष्ट अवयव | आहेत | बिया (फळाच्या आवरणात) | सूर्यफूल, गहू |
6. महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे (MPSC/UPSC सराव)
| क्र. | प्रश्न | उत्तर |
|---|---|---|
| 1 | स्ट्रॉबेरी हे कोणत्या प्रकारचे फळ आहे? | अॅग्रीगेट फळ (Aggregate fruit) |
| 2 | वनस्पतींना द्विनामपद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली? | कार्ल लिनिअस (Carl Linnaeus) |
| 3 | वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करून भातशेतीची सुपीकता वाढवणारे निळे-हिरवे शेवाळ कोणते? | नॉस्टॉक (Nostoc) |
| 4 | वनस्पतीमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कॅटायन कोणता? | पोटॅशियम (K⁺) |
| 5 | 'टॅक्सोनॉमी' हा शब्द कोणी दिला? | डी कँडोल (de Candolle, 1813) |
| 6 | 'ड्रासेरा' ही वनस्पती कोणत्या गटात मोडते? | कीटकभक्षक वनस्पती (Insectivorous plant) |
| 7 | पाण्यात वाढणाऱ्या, अपुष्प शैवाल वनस्पतीचे नाव सांगा. | स्पायरोगायरा (Spirogyra) |
| 8 | संवहनी ऊती व बीजाणू-निर्मिती असते पण बिया नसतात, असा वनस्पती गट कोणता? | टेरिडोफायटा |
| 9 | 'अमरवेल' ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? | खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती (Cuscuta) |
| 10 | वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत एकक (घटक) कोणते? | जाती / स्पीशीज (Species) |
| 11 | नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वाधिक लोकप्रिय वर्गीकरण पद्धत कोणी मांडली? | बेंथम आणि हूकर (Bentham & Hooker) |
| 12 | आवृत्तबीजी वनस्पतींमधील सर्वात लहान वनस्पती कोणती? | वोल्फिया (Wolffia) |
| 13 | वनस्पती पेशीत प्रथिन-निर्मिती कोणत्या अंगकात होते? | रायबोझोम्स (Ribosomes) |
| 14 | नेचे (Ferns) कोणत्या गटात येतात? | टेरिडोफायटा |
| 15 | सूर्यफूल ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? | द्विबीजपत्री (Dicot) |
| 16 | ब्रायोफायटा टेरिडोफायटापेक्षा कोणत्या बाबतीत वेगळे असतात? | संवहनी ऊती नसणे (बिगर-वाहिनीयुक्त) |
| 17 | 'अगार' या पदार्थाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी कोणते शेवाळ वापरतात? | लाल शैवाळ (Red algae) |
| 18 | मुळा, गाजर, बीट या द्विवार्षिक (Biennial) वनस्पती कोणत्या गटातील आहेत? | आवृत्तबीजी – द्विबीजपत्री |





0 टिप्पण्या