विश्वाची उत्पत्ती (The Origin of the Universe) आणि पृथ्वीची उत्पत्ती (Origin of the Earth)

विश्वाची उत्पत्ती (The Origin of the Universe) आणि पृथ्वीची उत्पत्ती (Origin of the Earth)

विश्वाची उत्पत्ती आणि पृथ्वीची निर्मिती हा विज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आधुनिक संशोधनानुसार बिग बँग सिद्धांत (Big Bang Theory) हा विश्वाच्या उत्पत्तीचा सर्वाधिक स्वीकारलेला सिद्धांत असून सौर तेजोमेघ सिद्धांत (Solar Nebular Theory) पृथ्वी व ग्रहांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देतो.


विश्वाची उत्पत्ती (The Origin of the Universe)

बिग बँग सिद्धांत (Big Bang Theory)

  • बिग बँग म्हणजे अवकाशात झालेला सामान्य स्फोट नसून स्वतः अवकाश (Space) आणि काळ (Time) यांच्या विस्ताराची सुरुवात होय.
  • या सिद्धांतानुसार विश्वाची सुरुवात अत्यंत उष्ण, अत्यंत घन आणि अतिशय सूक्ष्म अवस्थेतून झाली.
  • त्यानंतर विश्व सतत विस्तारत गेले आणि आजही विस्तारत आहे.
  • विश्वाचे सध्याचे वय सुमारे 13.8 अब्ज वर्षे आहे.

बिग बँग सिद्धांताचे प्रमुख पुरावे

Expanding Universe
  1. एडविन हबल यांचा शोध (1929)
    • अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांनी 1929 मध्ये आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात असल्याचे निरीक्षण केले.
    • यावरून विश्वाचा विस्तार होत असल्याचे सिद्ध झाले.
    • यालाच हबलचा नियम (Hubble's Law) म्हणतात.
  2. कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी (Cosmic Microwave Background - CMB)
    • 1965 मध्ये या सूक्ष्म किरणोत्सर्गाचा शोध लागला.
    • हा बिग बँगनंतर उरलेला उष्णतेचा अवशेष मानला जातो.
    • बिग बँग सिद्धांतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे.
  3. हलक्या मूलद्रव्यांचे प्रमाण

    बिग बँगनंतर काही मिनिटांत

    • हायड्रोजन
    • हेलियम
    • लिथियम
    यांसारखी हलकी मूलद्रव्ये तयार झाली.

    आज विश्वात आढळणारे त्यांचे प्रमाण बिग बँग सिद्धांताशी सुसंगत आहे.


विश्वाच्या विकासाची कालरेषा

कालावधी घटना
13.8 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग झाला.
पहिल्या सेकंदाच्या अंशात अत्यंत वेगवान विस्तार (Inflation).
पहिल्या 3 मिनिटांत हायड्रोजन व हेलियम केंद्रकांची निर्मिती.
3.8 लाख वर्षांनी पहिले अणू तयार झाले.
काही कोटी वर्षांनी पहिले तारे तयार झाले.
काहीशे कोटी वर्षांनी आकाशगंगांची निर्मिती.
4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्य व सौरमालेची निर्मिती.
4.54 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती.

विश्वाचा विस्तार

  • विश्व आजही विस्तारत आहे.
  • विस्तारामुळे आकाशगंगांमधील अंतर सतत वाढत आहे.
  • विस्ताराचा अर्थ आकाशगंगा अवकाशातून धावत नाहीत; अवकाश स्वतः विस्तारत आहे.

विश्वाचे संघटन

घटक प्रमाण
डार्क एनर्जी 68%
डार्क मॅटर 27%
सामान्य पदार्थ 5%

स्थिर स्थिती सिद्धांत (Steady State Theory)

  • हा सिद्धांत फ्रेड हॉयल थॉमस गोल्ड,हरमन बोंडी यांनी मांडला.
  • विश्व सदैव सारखेच राहते असे मानले.
  • नवीन पदार्थ सतत निर्माण होतो.
  • विश्वाला सुरुवात नाही.
  • आधुनिक निरीक्षणांनुसार हा सिद्धांत मोठ्या प्रमाणात नाकारला गेला असून बिग बँग सिद्धांताला सर्वाधिक वैज्ञानिक मान्यता आहे.

पृथ्वीची उत्पत्ती (Origin of the Earth)

पृथ्वीची निर्मिती सुमारे 4.54 अब्ज वर्षांपूर्वी झाली.


आज सर्वाधिक मान्यता प्राप्त सिद्धांत म्हणजे

सौर तेजोमेघ सिद्धांत (Solar Nebular Theory)

यालाच Nebular Hypothesis / Solar Nebula Theory असेही म्हणतात.
  • इमॅन्युएल कांट (1755) यांनी प्रथम ग्रहांच्या निर्मितीबाबत कल्पना मांडली.
  • Pierre-Simon Laplace (1796) यांनी त्या कल्पनेत सुधारणा करून नेब्युलर सिद्धांत अधिक विकसित केला.
  • आधुनिक काळात 1950 च्या दशकात Otto Schmidt आणि Carl Friedrich von Weizsäcker यांनी सुधारित सिद्धांत मांडला.
  • आज ग्रहनिर्मितीचे स्पष्टीकरण Accretion Theory (संलग्नीकरण सिद्धांत) आणि Solar Nebula Model यांच्या साहाय्याने केले जाते.

ग्रहांची निर्मिती

  1. वायू आणि धुळीचा विशाल तेजोमेघ तयार झाला.
  2. गुरुत्वाकर्षणामुळे मध्यभागी सूर्य तयार झाला.
  3. भोवती फिरणारी धूळ व वायूची चकती (Protoplanetary Disk) तयार झाली.
  4. धुळीचे कण एकत्र येऊन ग्रहिकाभ (Planetesimals) तयार झाले.
  5. ग्रहिकाभांपासून प्रोटोग्रह तयार झाले.
  6. प्रोटोग्रहांपासून पृथ्वीसह सर्व ग्रह तयार झाले.

पृथ्वीची सुरुवातीची अवस्था

  • पृथ्वी सुरुवातीला वितळलेल्या खडकांचा गोळा होती.
  • थंड होत गेल्यानंतर केंद्रक(Core, मॅंटल(Mantle) आणि भूपटल(Crust) तयार झाले.
  • लोह आणि निकेल केंद्रभागी जमा झाले.

चंद्राची निर्मिती

    आधुनिक संशोधनानुसार सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी
  • थीया (Theia) नावाचा मंगळाएवढा ग्रह पृथ्वीवर आदळला.
  • धडकेनंतर बाहेर फेकल्या गेलेल्या पदार्थांपासून चंद्र तयार झाला.
  • ही कल्पना Giant Impact Hypothesis म्हणून ओळखली जाते आणि आज सर्वाधिक स्वीकारली गेलेली आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे

घटक माहिती
विश्वाचे वय 13.8 अब्ज वर्षे
पृथ्वीचे वय 4.54 अब्ज वर्षे
सौरमालेचे वय 4.6 अब्ज वर्षे
विश्वाचा विस्तार आजही सुरू आहे
हबलचा पुरावा 1929
CMB चा शोध 1965
विश्वाचा प्रमुख सिद्धांत बिग बँग सिद्धांत
ग्रहनिर्मितीचा प्रमुख सिद्धांत Solar Nebular Theory

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या